
बॉलिवूडमध्ये समलैंगिकतेवर आधारीत 'हे' १२ चित्रपट
भारतात आधी समलैंगिक संबध हा गुन्हा मानला जात असे. तरी बॉलिवूडमधील काही चित्रपटांत या मुद्दयावर बिनधास्त भाष्य केले आहे. समाजातील समलैंगिकांचे भावनाविश्व उलगडणारे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आले. काळानुसार, बॉलिवूडमध्ये समलैंगिकता विषय गंभीरपणे मांडण्यात आले. 'बॉम्बे टॉकीज', 'मार्गरिटा विद अ स्ट्रॉ', 'कपूर एंड सन्स'मध्ये संवेदनशीलपणे हा विषय सादर करण्यात आला होता. ‘कपूर ॲन्ड सन्स’मध्ये ज्याप्रकारे फवाद खानची भूमिका दाखवण्यात आली, त्याच्या अभिनयाचे खूप कौतुकही झाले.
बॉलिवूड अशा चित्रपटांमध्ये अनेक दिग्दर्शकांनी समलैंगिक संबंध मोठ्या पडद्यावर सादर केले आहेत. जाणून घेऊया या चित्रपटांविषयी...

शीर कोरमा
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि दिव्या दत्ता यांच्या मुख्य भूमिका असणारा 'शीर कोरमा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची कहाणी समलैंगिकतेवर आधारित आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन फराज आरिफ अन्सारी करत आहेत.

एक लडकी को देखा तो ऐसा लगा
याआधी सोनम कपूरचा चित्रपट 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'मध्ये समलैंगिकता विषय मांडण्यात आला होता. सोनम, राजकुमार राव, रेजिना, अनिल कपूर यांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका होत्या. यामध्ये सोनम आणि रेजिना लेस्बियन दाखवण्यात आले होते. राजकुमार राव एक लेखकच्या भूमिकेत तर सोनम स्वीटीच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. स्वीटी बालपणापासूनच प्रेम आणि लग्नाचे स्वप्न पाहते. यादरम्यान, स्वीटीची भेट शाहिल म्हणजेच राजकुमार रावशी होते. हे दोघे प्रेमात आहेत, असे स्वीटीच्या कुटुंबीयांना वाटते. परंतु, स्वीटीचे रहस्य वेगळे आहे. ती लेस्बियन आहे, असे चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

फायर
अभिनेत्री शबाना आजमी आणि नंदिता दास यांचा ‘फायर’ हा चित्रपट १९९६ मध्ये रिलीज झाला होता. दीपा मेहता यांच्या या चित्रपटात एकाच घरातील दोन सूना आणि त्यांच्यातील संबंध याची कहाणी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाबाबत वादही निर्माण झाला होता.

फॅशन
चित्रपट ‘फॅशन’मध्ये समीर सोनीने एका गे ची भूमिका साकारली होती. समाज त्या व्यक्तीला कशा प्रकारे नाकारतो आणि अशा परिस्थितीत एक गे व्यक्ती कशाप्रकारे डिप्रेशनमध्ये जातो, याची कहाणी दाखवण्यात आलीय.

दोस्ताना
जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन यांचा चित्रपट ‘दोस्ताना’मध्ये दोन मित्र भाड्याने घर घेण्यासाठी ‘गे’ होण्याचे नाटक करतात, याची कथा दाखवण्यात आलीय. हा चित्रपट २००७ मध्ये आला होता.

माय ब्रदर निखिल
दिग्दर्शक ओनिर यांचा चित्रपट ‘माय ब्रदर निखिल’ सन २००५ मध्ये आला होता. या चित्रपटात दोन तरुणांमधील समलैंगिक संबंध दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट समलैंगिक रिलेशनशिवाय एचआयव्ही एड्सवरही आधारित आहे.

कपूर ॲण्ड सन्स
प्रसिध्द अभिनेता फवाद खान या चित्रपटात गेची भूमिका केली होती. कशाप्रकारे समलैंगिक लोकांचे आयुष्य चढ-उताराने भरलेले असते, हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
गर्लफ्रेंड
सन २००४ मध्ये आलेल्या 'गर्लफ्रेंड' या चित्रपटाबाबत मोठा वाद निर्माण झाला होता. चित्रपटात लेस्बियन रिलेशन दाखवण्यात आलं होतं. चित्रपटात ईशा कोपिकर आणि अमृता अरोराने मुख्य भूमिका साकारली होती.

बॉम्बे टॉकीज
चित्रपट ‘बॉम्बे टॉकीज’मध्ये वेगवेगळ्या कथा दाखवण्यात आल्या होत्या. पहिल्या कथेत तीन कॅरेक्टर होते. राणी मुखर्जी, रणदीप हुड्डा आणि साकिब सलीम यांच्या भूमिका होत्या. नव्या पिढीचे लोक एका गे अथवा लेस्बियनला कशा प्रकारे स्वीकार करतात, हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
अलीगढ
मनोज वाजपेयी आणि राजकुमार राव स्टारर ‘अलीगढ’ २०१६ मध्ये आला होता. अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचे प्रो. रामचंद्र यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटाबाबत वादही निर्माण झाला होता. चित्रपटाची कहाणी रिअल स्टोरीवर आधारित होती.

कल हो न हो
करण जोहरच्या ‘कल हो ना हो’मध्ये सैफ अली खानच्या मोलकरणीला शाहरुख आणि सैफने साकारलेल्या भूमिकांमध्ये समलिंगी संबंध असल्याचे वाटत असते. अर्थात या भूमिका गमतीदार पद्धतीने मांडण्यात आल्या होत्या.
‘डोन्ट नो वाय…ना जाने क्यों’
२०१०मध्ये संजय शर्माने दिग्दर्शित केलेल्या ‘डोन्ट नो वाय…ना जाने क्यों’ ही फिल्म एका समलैंगिक मॉडेलच्या जीवनावर आधारित होती. यामध्ये करिअरसाठी एका मॉडेलला आपल्या नैतिकतेशी सौदा करण्यासाठी असहाय्य व्हावे लागते, याची कथा दाखवण्यात आली आहे.
‘पेज ३’
मधुर भंडाकरने ‘पेज ३’ आणि ‘फॅशन’ या चित्रपटांमध्ये समलैंगिकतेचा मुद्दा हाताळला होता.
No comments:
Post a Comment