Wednesday, June 26, 2019

खुबसुरत मधुबालाला चित्रपटात अशी मिळाली संधी






तिच्‍या नटखट अदा, सुंदर हास्‍याने भुरळ घालणारी ती मधुबाला. मधुबालाला चार बहिणी. मधुबाला तिसर्‍या क्रमांकाची. मोठी बहिण कनीज फातिमा, दुसरी बलसारा, तिसरी मधुबाला, धाकटी चंचल आणि पाचव्‍या क्रमांकाची शहिदा. 

मधुबालाचे वडील अताऊल्‍ला खाँ. ते जुन्‍या दिल्‍लीत राहायचे. तेव्‍हा ते इंम्‍पिरिअल टोबॅको कंपनीमध्‍ये नोकरीला होते. परंतु, तंबाखूच्‍या कारखान्‍यात काम केल्‍यामुळे त्‍यांना त्रास झला. त्‍यामुळे त्‍यांची नोकरी सुटली. मधुचं खरं नाव मुमताज जहाँ बेगम-देहलवी. तिचं बालपणापासूनच आकर्षक व्‍यक्‍तिमत्त्‍व. तिचं हासणं म्‍हणजे सुमधूर, सूरमय. 
असे म्‍हटले जाते की, घरातल्‍या घरात बसून ती सोहराब मोदींच्‍या 'पुकार'मधले सीन करायची. हे तिच्‍या वडिलांनी पाहिलं आणि चित्रपटसृष्‍टीत तिचे नशीब आजमावण्‍यासाठी तिला मुंबईला घेऊन आले. ते मुंबईत स्‍टुडिओमध्‍ये मधुला काम मिळण्‍यासाठी चकरा मारायचे. 
अखेर मधुला एका चित्रपटात काम करायला मिळाले. बॉम्‍बे टॉकिजने १९४२ ला बसंत (मुमताज शांती, उल्‍हास) मध्‍ये बालतारका म्‍हणून काम मिळालं. महिन्‍याला शंभर रुपये पगारही मिळाला. 'बसंत' हा चित्रपट अमिया चक्रवर्ती यांनी दिग्‍दर्शित केला होता. त्‍यात 'मेरे छोटे से मन की छोटी सी दुनिया रे' हे गाणे मधुवर चित्रित करण्‍यात आलं होतं. 
'बॉम्‍बे टॉकिज'ची मालकीण देविका राणीला मधुचं काम आवडलं. संस्‍थेच्‍या ज्‍वारभाटासाठी त्‍यांनी मधुला बोलावले. त्‍याचबराबेर, राजकपूरसोबत 'नीलकमल'मध्‍ये मधुला मुख्‍य नायिका म्‍हणून काम द्‍यायचं असं त्‍यांनी ठरवलं होतं. 
'ज्‍वारभाटा'मध्‍ये दिलीपकुमार (त्‍यांचा पहिला सिनेमा) व मृदूला यांच्‍या मुख्‍य भूमिका होत्‍या. तर बालकलाकार म्‍हणून मधु दिसणार होती. परंतु, काही कारणांमुळे देविका राणी यांनी मधुला घेतले नाही. मात्र, सेटवरच दिलीपकुमार यांची मधुशी ओळख झाली. केदार शर्मा यांच्‍या 'नीलकमल'मध्‍ये राजकपूर नायक म्‍हणून दिसणार होते. केदार यांच्‍या पत्‍नी कमला चॅटर्जी या नायिकेची भूमिका साकारणार होत्‍या. आणि त्‍यांच्‍या लहानपणीची भूमिका मधुबाला साकारणार होती. तिचे अकाली निधन झाले. त्‍यामुळे हा चित्रपट थांबला. परंतु, मधुच्‍या वडिलांनी केदार यांच्‍या मागे लागून हा चित्रपट करावरास लाला. आणि या चित्रपटात मधुला नायिका म्‍हणून घेण्‍याची विनंती केली. केदार यांनी ती मान्‍य केली. 
केदार यांचा 'नीलकमल' चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातील राज कपूर आणि मधु यांचा दमदार अभिनयाने दिग्‍दर्शक मोहन सिन्‍हांना मोहून टाकले. मोहन यांनी 'चितोड विजय' आणि 'दिल की रानी'मध्‍ये त्‍या दोघांनाही संधी दिली. केदार यांनी मधुला 'नेकी और बंदी' चित्रपटात पुन्‍हा संधी दिली. यामध्‍ये केदार स्‍वत: नायक बनले. परंतु, हा चित्रपट चालला नाही. 
१९६० च्या दशकात आला ‘मुगल-ए-आझम.’ त्यातील सलीमच्या विविध छटा दिलीपकुमार यांनी सुंदर साकारल्या. ‘मोगल-ए-आझम’मध्ये एकही गीत नव्हतं. मात्र, चित्रपटाचा नायक हा राजकुमार असल्यामुळे सर्वसामान्य तरुणाप्रमाणे नायिकेसह प्रेमगीत किंवा तिच्यासाठी विरह गीत गाणार नाही, हे दिग्दर्शक के. असीफ यांनी पटवून दिल्यावर दिलीपकुमार यांनी गाण्याचा हट्ट बाजूला ठेवला होता. या चित्रपटामध्ये त्यांची नायिका होती त्यांची प्रेयसी मधुबाला. चित्रपट सुरू होताना नायिकेसाठी दिलीपकुमारनीच मधुबालाचं नाव के. असिफना सुचवलं होतं. 'प्‍यार किया तो डरना क्‍या' हे गाणे मधुबालाने भरसभेत 'मुघल-ए-आझम'मध्‍ये गायिलं.
पुढे १९५१ मध्‍ये मधु आणि दिलीपकुमार 'तराना'मध्‍ये एकत्र आले. मधुबालाला दिलीपकुमार आवडायचे. बी. आर. चोप्रा यांच्‍या 'नया दौर'मध्‍ये सुरुवातीला मधुबालाला घेणार होते. चित्रपटाचे एक शूटिंग सुरू होते. तेथे मधुला जाण्‍यास तिच्‍या वडिलांनी मज्‍जाव केला. त्‍यामुळे मधुने चोप्रा यांना आपला नकार कळवला आणि 'नया दौर'साठी वैजयंती मालाची निवड करण्‍यात आली. त्‍यावेळी 'चलती का नाम गाडी' आणि 'हाफ टिकट' या चित्रपटांमुळे मधु ही किशोरकुमार यांच्‍या सहवाहात आली होती. त्‍या सुमारास मधु लोकप्रिय बनली होती. मधुने १९६० मध्‍ये किशोरकुमार यांच्‍याशी लग्‍न केले. 
किशोरकुमार यांचा भाऊ अशोककुमार. अशोककुमार यांच्‍यासोबत मधुबालाने 'महल' आणि 'हावडा ब्रीज' हे चित्रपट केले. ते तुफान गाजले. 'पराई आग' या चित्रपटाच्‍या सेटवर पहिल्‍यांदा मधुबालाने कमाल अमरोहींना पाहिले. तेव्‍हा ते संगीतकार गुलाम मोहम्‍मदशी बोलत उभे होते. कमालजींची उर्दूमिश्रित काव्‍यभाषा ऐकून मधुबाला प्रभावीत झाली होती. ती आपल्‍याकडे बघत आहे, हे समजल्‍यावर आदाब अर्ज हे असे कमाल म्‍हणाले. महल हा चित्रपट कमाल यांनी दिग्‍दर्शित केला. मधुबालाच त्‍याची नायिका म्‍हणून त्‍यांना हवी होती. परंतु, काही जणांना ते मान्‍य नव्‍हते. त्‍यामुळे स्‍क्रिन टेस्‍ट घ्‍याचे ठरवले. आणि मधुने दिलेल्‍या शूटनंतर सुरैय्‍याऐवजी मधुला घेण्‍यात आले. सुरैय्‍या त्‍यावेळी ४ हजार रुपये घेत होती. परंतु, मदुला ७ हजार रुपये द्‍यावे लागले होते. 
संत, नीलकमल, दुलारी, बेकसूर, तरगना, अमर, मिस्‍टर ॲण्‍ड मिसेस ५५, चलती का नाम गाडी, हावडा ब्रीज, मुघल-ए-अआझम, असे एकापेक्षा एक चित्रपट मधुबालाने सिनेइंडस्‍ट्रीला दिले. तिला हॉलिवूडमधूनही ऑफर आली होती. परंतु, तिच्‍या वडिलांनी नकार दिल्‍याने तिला हॉलिवूडमध्‍ये जाता आले नाही.  
नियतीने मधुबालाला खरे प्रेम मिळवून दिले नाही. 'आयेगा आनेवाला' अशी साद घालत तिने जगाचा निरोप घेतला.  

सर्वोत्तम अदाकारा मधुबाला






हिंदी सिनेमा जगतात पाऊल ठेवणार्‍या सुंदर मधुबालाने मुगल-ए-आजम, चलती का नाम गाडी, मिस्टर ॲण्‍ड मिसेज ५५ यासारख्‍या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांत काम केले. आपल्‍या अदाकारीने, सौंदर्याने, दमदार अभिनयाने हिंदी सिनेमा जगतावरच नाही तर लाखों-करोडो प्रेक्षकांवर राज केले. आज मधुबालाचा जन्‍मदिवस.

दिलीपकुमार, राज कपूर आणि देव आनंद हे सुपरस्‍टार होण्‍यापूर्वी १५ वर्षे आधी अशोककुमार हे सुपरस्‍टार होते. या सुपरस्‍टारबद्‍दल कुणालाही आकर्षण वाटावे असे अशोककुमार यांचे व्‍यक्‍तिमत्त्‍व होते. मधुबालाही त्‍याला अपवाद नव्‍हती. तिच्‍यासारखी सुंदर, मनमोहक अदानी घायाळ करणारी अदाकारा, आपल्‍या मादक अदानी आणि मदमस्‍त नयनांनी, सुंदर हास्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी मधुबाला. व्‍हॅलेंटाईन्‍स डे ला म्‍हणजेच १४ फेब्रुवारी, १९३३ चा तिचा जन्‍म.  
असे म्‍हटले जाते की, महलचा सुटाबुटातील अशोककुमार मधुबालालाही भावला. मधुबालाने अशोककुमारला प्रेमपत्र आणि लाल गुलाब देऊन प्रेम व्‍यक्‍त केले होते. अशोककुमार हे नलिनी जयवंतच्‍या प्रेमात होते. त्‍यामुळे मधुबाला यांचे पत्र बालिशपणा म्‍हणून त्‍यांनी सोडून दिले होते. 
Related image
अशोकुमार आणि नलिनी यांचे 'संग्राम' आणि 'समाधी' हे दोन चित्रपट तुफान गाजले होते. 'समाधी'मधील 'गोरे गोरे बाँके छोरे,' 'कभी मेरी गली आया करो' हे दोन गाणी प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्‍यांनी 'शेरू,' 'नौबहार,' 'सलोनी,' 'जलपरी,' 'नाझ' आणि 'मिस्‍टर एक्‍स' या चित्रपटांत एकत्र काम केले. परंतु, दोघेही खर्‍या खुर्‍या आयुष्‍यात प्रेमात होते. याआधीच अशोककुमार यांचे लग्‍न झाले होते. नलिनी-अशोककुमार दोघे लग्‍नही करणार होते. परंतु, त्‍यांचे लग्‍न होऊ शकले नाही. 
Related image
अशोकुमार आणि मधुबाला   
'महल' हा चित्रपट सुपरडुपर हिट झाल्‍यानंतर अशोकुमार आणि मधुबाला यांचे तीन चित्रपट हिट झाले. १९५० साली 'निशाणा' हा चित्रपट आला. त्‍यानंतर तब्‍बल सात वर्षांनी 'एक साल' हा चित्रपट आला. या चित्रपटातील ओ. पी. नय्‍यरच्‍या संगीताने धूम माजवली. 
Image result for madhubala
या चित्रपटातील 'आईये मेहरबाँ, बैठीए जानेजा, शौकसे लिजिए जी इश्‍क के इम्‍तेहान' हे सुंदर रोमँटिक गाणे मधुबालाने आपल्‍या आयुष्‍यातील सर्वोत्तम नृत्‍य आणि अदाकारी पेश केली आहे. तिच्‍या या अदानी प्रेक्षकांना घायाळ केले. 
Related image
'महल' चित्रपटाच्‍यावेळी अशोककुमार ३८ वर्षांचे होते. तर मधुबाला १६ वर्षांची होती. एकेकाळची 'बॉम्‍बे टॉकिज'ची मालकीण देविका राणी हिचा नायक म्‍हणून अशोककुमार यांनी काम केले होते. याच देविका राणी यांनी बेबी मुमताज यांचे नाव मधुबाला असे केले होते. 
Related image
किशोरकुमार आणि मधुबाला
'किस्‍मत' हा १९४२ ला आलेल्‍या चित्रपटाने अशोककुमार यांना प्रचंड प्रसिध्‍दी मिळवून दिली. याच चित्रपटाच्‍या शूटिंगवेळी बेबी मुमताज (मधुबाला) 'बॉम्‍बे टॉकिज'मध्‍ये यायची. त्‍यावेळी ती ९ वर्षांची होती. अशोककुमार यांचा लहान भाऊ किशोरकुमार आणि हास्‍य अभिनेता मुमताज अलीचा मुलगा मेहमूद त्‍यावेळी बॉम्‍बे टॉकिजमध्‍ये खेळत असायची. मधुबाला आणि किशोरकुमार हे भातुकलीचा खेळ खेळणारे खर्‍याखुर्‍या जीवनात पती-पत्‍नी बनले. आणि मधुबालाचे प्रेम नाकारणारे अशोककुमार मोठे दीर बनले. 
Image result for madhubala
किशोरकुमार आणि मधुबाला यांनी लग्‍न केले होते. त्‍यांच्‍या लग्‍नाने अशोककुमार यांची आई प्रचंड संतापली. सून म्‍हणून मधुबाला त्‍यांना मान्‍य नव्‍हती. परंतु, अशोककुमार यांनी आपल्या आईची समजूत घातली आणि मधुबालाला सन्‍मानाने सून म्‍हणून घरात घ्‍यायला लावले. 
Image result for madhubala
अशोककुमार यांनी ३०४ चित्रपटांमध्‍ये काम भूमिका केल्‍या. हिमांशू यांचा मृत्‍यू झाल्‍यानंतर 'बॉम्‍बे टॉकिज' ही चित्रपटनिर्मिती संस्‍था कर्जात बुडाली. अशोककुमार यांनी बॉम्‍बे टॉकिजला कर्जातून बाहेर काढले. असे म्‍हटले जाते की, त्‍यावेळचे ३५ लाख रुपयांचे बॉम्‍बे टॉकिजचे कर्ज अशोककुमार यांनी फेडले. 
Image result for madhubala
नलिनी जयवंत आणि अशोककुमार यांचे नाते फार काळ टिकले नाही. नलिनी आणि अशोककुमार चेंबूरच्‍या युनियन पार्क कॉलनीमध्‍ये समोरासमोरच्‍या बंगल्‍यात राहत असे. मृत्‍यूपर्यंत ते तेथेच राहिले होते.  

Friday, June 7, 2019

... म्‍हणून अमृताने नाकारलेला सलमानचा चित्रपट



आपल्‍या अदाने अमृता रावने प्रेक्षकांच्‍या मनावर अधिराज्‍य गाजवलं. 'इश्क विश्क', 'विवाह', 'मैं हूं ना' यांसारख्‍या चित्रपटातून दमदार अभिनय साकारणार्‍या अभिनेत्री अमृता रावचा आज वाढदिवस. अमृताने चित्रपट ठाकरेमधून मोठ्‍या पडद्‍यावर वापसी केली होती. 

dinsta
७ जून, १९८१ रोजी अमृताचा जन्‍म मुंबईमध्‍ये झाला होता. अमृताने आपले करिअर मॉडलिंगमधून सुरू केले. ती अचानक मॉडलिंगच्‍या विश्‍वात आली. ती कॉलेजमध्‍ये होती, त्‍यावेळी तिला एका क्रीमच्‍या जाहिरातीसाठी निवडण्‍यात आलं. जवळपास १८ महिन्‍यांमध्‍ये तिने ३५ हून अधिक जाहिरातीमध्‍ये काम केलं. 
dinsta
त्‍याचा पहिला चित्रपट होता- अब के बरस (२००२). त्‍याचे दिग्‍दर्शन राज कंवरने केले होते. पण, तिला प्रसिध्‍दी मिळाली ती, के. एन. घोष यांचा चित्रपट 'इश्क विश्क'मधून. त्‍यानंतर, तिने २००४ मध्‍ये 'मस्ती,' 'मैं हूं ना' आणि २००५ मध्‍ये 'वाह! लाईफ हो तो ऐसी' या चित्रपटांमध्‍ये झळकली. या चित्रपटातील तिच्‍या अभिनयाचे खूप कौतुकही करण्‍यात आले होते. 
dinsta
तिचा सर्वात यशस्‍वी चित्रपट म्‍हणजे विवाह. यामध्‍ये शाहिद कपूरची मुख्‍य भूमिका होती. 
dinsta
... म्‍हणून नाकारला सलमानचा हा चित्रपट 
dinsta
अमृता रावला सलमान खानचा चित्रपट प्रेम रतन धन पायोदेखील ऑफर झाली होती. परंतु, तिने हा चित्रपट नाकारला. या चित्रपटामध्‍ये अमृताला सलमान खानच्‍या बहिणीची भूमिका ऑफर करण्‍यात आली होती. परंतु, तिने हा चित्रपट नाकारला. नंतर ही भूमिका स्‍वरा भास्‍कर मिळाली. 
dinsta
अमृता रावला अनेक पुरस्‍कारांनी सन्‍मानित करण्‍यात आले आहे. मराठी चित्रपटामध्‍ये बेस्‍ट डेब्‍यूसाठी दादासाहेब फाळके एक्‍सीलन्‍स ॲवॉर्डने तिला सन्‍मानित करण्‍यात आले आहे. फिल्‍मफेयर ॲवॉर्ड, आयफा ॲवॉर्ड, स्‍टारडस्‍ट ॲवॉर्डदेखील आपल्‍या नावे तिने केले आहेत. 
dinsta
अमृता रावने २०१६ मध्‍ये आर. जे. अनमोलशी विवाह केला होता. दोघांनी ७ वर्षे डेटिंग केल्‍यानंतर विवाहबंधनात अडकले. 
dinsta
dinsta

एकता कपूरने 'या' सेलेब्‍सना केलं होतं टीव्‍हीवर लॉन्‍च


टीव्‍ही निर्माती एकता कपूरचा ७ जूनला ४४ वा वाढदिवस. एकता कपूरचे अधिकतर टीव्‍ही शो हिट ठरले. त्‍यामध्‍ये उल्‍लेखनीय म्‍हणजे, 'क्योंकि सास भी कभी बहू थी' आणि 'कसौटी जिंदगी की' या मालिकांचा समावेश करावा लागेल. सर्व मालिकांनी टीआरपी लिस्टमध्‍ये टॉपमध्‍ये आपले स्‍थान मिळवले होते. एकता कपूरने आपल्‍या मालिकांमध्‍ये अनेक नव्‍या चेहर्‍यांना लॉन्च केले होते. टीव्‍हीवर प्रसिध्‍दी मिळवल्‍यानंतर हे सेलिब्रिटीज आता बॉलिवूडमध्‍ये आपली जादू दाखवत आहेत. पाहुता, ते कोणकोणते सेलिब्रिटीज आहेत, ज्‍यांना एकता कपूरने टीव्‍हीवर लॉन्च केले होते. 

सुशांत सिंह राजपूत:
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला एकता कपूरने टीव्‍हीवर लॉन्च केलं होतं. एकता कपूरचा शो पवित्र रिश्तामधून सुशांत लोकप्रिय बनला. पुढे सुशांतला बॉलिवूडमध्‍ये संधी मिळाली. सुशांतने काय पो छे, शुध्‍द देसी रोमान्‍स, एम. एस. धोनी, केदारनाथ यासारख्‍या चित्रपटात काम केले आहे. 
Image result for sushant singh rajput
रोनित रॉय :
एकता कपूरची मालिका कसौटी जिंदगी कीमध्‍ये मिस्टर बजाजची भूमिका रोनित रॉयने साकारली होती. रोनित रॉयला या मालिकेतून खूप प्रसिध्‍दी मिळाली होती. रोनित रॉयने बॉलिवूड चित्रपटांमध्‍येही काम केले आहे.
Image result for ronit roy
विद्या बालन:
प्रसिध्‍द बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनला एकता कपूरने हम पांच या मालिकेतून टीव्‍हीवर लॉन्‍च केले होते. या शोनंतर विद्या बालनने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्‍ये काम केले आहे. 
Image result for vidya balan
प्राची देसाई :
एकता कपूरच्‍या 'कसम से' या मालिकेतून प्राची देसाईने टीव्‍ही जगतमध्‍ये आपली चांगली ओळख बनवली. पुढे प्राचीने बॉलिवूडमध्‍ये पदार्पण केले. 
Image result for prachi desai

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...