Tuesday, November 27, 2018

सुष्मितासह 'या' अभिनेत्री लग्‍नाआधी झाल्‍या आई

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा आज ४३ वा वाढदिवस. सुष्मिताच्‍या वाढदिवसानिमित्त तिच्‍या आयुष्‍याविषयी जाणून घेऊयात. त्‍याचबरोबर अशा काही बॉलिवूड अभिनेत्री आहेत, ज्‍या लग्‍नाआधी आई बनल्‍या होत्‍या. सिंगल मदर पॅरेंट्स म्‍हणून या पुढील अभिनेत्रींनी आपल्‍या मुलांचा सांभाळ केला. 

भारताची पहिली मिस युनिव्‍हर्स सुष्मिता सेन 
माजी मिस युनिव्‍हर्स आणि बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री सुष्मिता सेन आज आपला ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. सुष्मिता अविवाहित आहे. परंतु, तिच्‍या दोन मुली आहेत. सुष्मिता ज्‍यावेळी २५ वर्षांची होती, त्‍यावेळी तिने एका मुलीला दत्तक घेतले होते. त्‍या मुलीचं नाव रिनी आहे. सन २००० मध्‍ये रिनीला सुष्‍मिताने दत्तक घेतले होते. सुष्मिताने आणखी एका मुलीला २०१० ला दत्तक घेतलं होतं. त्‍या मुलीचं नाव अलीशा असं आहे. 
Image result for sushmita sen and her daughters
बॉलिवूडची ही सिंगल मदर पॅरेंट्‍स असलेल्‍या सुष्‍मिताने अतिशय चांगल्‍या पद्‍धतीने मुलींचा सांभाळ केला आहे. सुष्मिताचं नाव त्‍याचा तथाकथित बॉयफ्रेंड रोमन शॉलसोबत जोडलं गेलं आहे. दोघेही अनेकदा स्‍पॉट झाले आहेत. त्‍यामुळे नव्‍या वर्षांत दोघे लग्‍नाच्‍या बेडीत अडकतील, असे म्‍हटले जात आहे. 
dinsta
Image result for sushmita sen and her daughters
नीना गुप्‍ता
नीना गुप्‍ता यांनी अनेक चित्रपट आणि छोट्‍या पडद्‍यावर काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. नीना यांचं खासगी आयुष्‍य चांगलं राहिलं नाही. एका वृत्तपत्राने दिलेल्‍या माहितीनुसार, नीना वेस्ट इंडियन क्रिकेटर विवान रिचर्डसोबत रिलेशनशीपमध्‍ये होत्‍या. त्‍यांची एक मुलगी आहे, जिचं नाव मसाबा गुप्ता आहे. नीना यांनी रिचर्डशी कधी लग्‍न केले नाही. नीना यांनीच मसाबाचा सांभाळ केला. मिसाबा फॅशन डिझायनर आहे. मसाबाने प्रोड्यूसर मधु मनटीना वर्माशी विवाह केला आहे. 
Image result for raveena tandon karishma kapoor, neena gupta
अमृता सिंह
अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खानचा सांभाळ अमृता सिंहने केला. अमृता आणि सैफने १९९१ मध्‍ये विवाह केला होता. त्‍यानंतर साराचा जन्म झाला. आता ती 'केदारनाथ' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्‍यू करत आहे. सैफ आणि अमृताचा एक मुलगा आहे, इब्राहिम अली खान. सारा आणि इब्राहिम या दोन्‍ही मुलांचा सांभाळ अमृताने केला आहे. सैफ आणि अमृताचा घटस्‍फोट २००४ मध्‍ये झाला. सारा 'केदारनाथ'शिवाय, रणवीर सिंहचा चित्रपट 'सिम्‍बा'मध्‍येही दिसणार आहे.  
Related image
करिश्मा कपूर 
अभिनेत्री करिश्मा कपूर सिंगल मदर पॅरेंट आहे. करिश्माने २००३ मध्‍ये उद्‍योगपती संजय कपूरशी विवाह केला होता. परंतु, त्‍यांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांनी लग्‍नानंतर १० वर्षांनी घटस्‍फोट घेण्‍याच्‍या निर्णय घेतला. ते २०१६ मध्‍ये एकमेकांपासून वेगळे झाले. करिश्माने मुलगी रमायरा कपूर आणि मुलगा किआन राज कपूरचा सांभाळ केला. 
Image result for raveena tandon karishma kapoor, neena gupta
रवीना टंडन 
रवीना टंडन १९ वर्षांची असताना दोन मुलींना दत्तक १९९५ मध्‍ये घेतले होते. त्‍या दोन मुलींची नावे पूजा आणि छाया अशी आहेत. त्‍यावेळी त्‍या दोन्‍ही मुली ११ आणि ८ वर्षांच्‍या होत्‍या. नंतर २००४ मध्‍ये रवीनाने डिस्ट्रीब्यूटर अनिल ठडानीशी विवाह केला. त्‍यांची दोन मुले राशा आणि रणबीर अशी आहेत. 
Related image
Related image

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...