Tuesday, October 22, 2019

ऐश्वर्याचा मिस वर्ल्डपर्यंतचा प्रवास थक्‍क करणारा




मिस वर्ल्डमध्‍ये होतोय 'ती'चा गौरव
एखाद्या सौंदर्यवतीच्‍या डोक्‍यावर तिच्या सौंदर्यासाठी चढवला जाणारा सौंदर्यवतीचा मुकूट पाहणं म्‍हणजे अविस्‍मरणीयच क्षण असतो. काळ कोणताही असो, तरुणींचं सौंदर्य नेहमीच आकर्षित करणारं आणि प्रभाव पाडणारं असतं. त्‍याचं व्‍यक्‍तिमत्त्‍वही अनेकदा छाप पाडून जातं. सौंदर्याबरोबरच हुशार, तत्‍काळ निर्णय घेण्‍याची क्षमता आणि कलेमध्‍ये प्रावीण्‍य असणार्‍या तरुणींची नेहमीच स्‍तुती केली जाते. सार्वजनिकपणे तरुणींचं टॅलेंट दिसण्‍यासाठी काळानुरूप, मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्‍हर्स यासारख्‍या स्‍पर्धादेखील अस्‍तित्त्‍वात आल्‍या. जागतिकीकरणाच्या युगात सौंदर्याच्या स्‍पर्धा या वैश्‍विक स्‍तरावर पोहोचल्‍या. मिस वर्ल्ड या स्‍पर्धेचेच घ्‍या. जगभरातील तमाम देशांतील सौंदर्यवती मिस वर्ल्ड स्‍पर्धेत सहभागी होतात. परंतु, जिंकते तिच जी सौंदर्याबरोबर आपलं टॅलेंट जगासमोर मांडते.
सौंदर्याचे मोजमाप करायला न कुठले माप असते ना परिमाण. परंतु, माणसांनी सौंदर्याचे विश्‍लेषण करण्‍यासाठी स्‍पर्धा ठेवल्‍या. सौंदर्य आणि स्‍किल या दोन्‍ही कसोट्‍या पार करून अनेक तरुणींनी मिस वर्ल्डचं मुकूट परिधान केलं आहे. सौंदर्य स्‍पर्धेत भाग घेणं म्‍हणजे केवळ आपलं सौंदर्य दाखवणं, इतकचं असत नाही तर तरुणींमधले सुप्‍त गुण, त्‍यांची कला, स्‍किल या गोष्‍टीही पाहिल्‍या जातात.
मिस वर्ल्ड या सौंदर्य स्‍पर्धेत सहभागी होणार्‍या शंभरहून अधिक देशांतील सौंदर्यवतींबरोबर स्‍पर्धा करुन ही कठीण स्‍पर्धा पार पाडणे, तितके सोपे राहिलेले नाही. 
मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशन
विश्‍वसुंदरी निवडणारी मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनची स्‍थापना २९ जुलै १९५१ मध्ये झाली होती. पहिली स्‍पर्धा कॅलिफोर्नियाच्‍या पॅसिफिक मिल्‍सने १९५२ मध्‍ये घेतली होती. १९६६ च्‍या आधी केवळ परदेशातच सौंदर्य स्‍पर्धा आयोजित केल्‍या जात होत्या. पाश्‍चात्‍य देशातील तरुणी त्‍यात सहभागी व्‍हायच्‍या. आता जगभरातील कानाकोपर्‍यातून तरुणी सहभागी होतात. त्‍यात भारतानेही जगाच्‍या नकाशावर आपली वेगळी प्रतिमा निर्माण केलीय. रिटा फारिया, ऐश्‍वर्या राय, डायना हेडन, युक्‍ता मुखी, प्रियांका चोप्रा आणि मानुषी छिल्‍लर या भारताच्‍या सौंदर्यवतींनी जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली. 
भारताची पहिली मिस वर्ल्ड रिटा फारिया 
भारताची पहिली मिस वर्ल्ड रिटा फारिया. १९६६ मध्‍ये पहिल्‍यांदा भारताचं प्रतिनिधीत्‍व करत रिटा फारियाने विश्‍वसुंदर स्‍पर्धेत आपली उपस्‍थिती लावली होती. मिस वर्ल्डचं मुकूट परिधान करून भारतच नाही तर जागतिक स्‍तरावर भारताची नवी ओळख तिनं करून दिली. सावळ्‍या रंगाची १९ वर्षीय रिटा फारिया त्‍यावेळी मुंबईच्‍या जे. जे. कॉलेजमध्‍ये मेडिकलची विद्यार्थिनी होती. रिटा एक डॉक्टर (फिजीशियन) देखील आहे. तिचा जन्म मुंबईत १९४५ ला झाला. मिस वर्ल्ड स्‍पर्धेत भाग घेणं, तिच्‍यासाठी स्‍वप्‍नासारखं होतं. परंतु, तिची मोठी बहीण फिलोमिनाच्‍या आग्रहास्‍तव रिटा सौंदर्य स्‍पर्धेत उतरली. रिटाची मिस इंडिया स्‍पर्धेसाठी निवड झाली. त्‍यावेळी तिने आईची जुनी साडी आणि जुने सी सँडेल घालून रॅम्‍प वॉक केलं होतं. मिस इंडिया स्‍पर्धा तिने जिंकली. काही कालावधीनंतर ती लंडनच्‍या रॉयल अल्‍बर्ट हॉलमध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या मिस वर्ल्ड स्‍पर्धेत भाग घेतला. तिथेही तिने आपली चुणूक दाखवून मिस वर्ल्डचं मुकूट आपल्‍या नावे केलं. 
सौंदर्याची हकदार ऐश्‍वर्या राय
ऐश्वर्या रायला मिस वर्ल्डचं मुकूट १९९४ मध्ये मिळालं. मिस वर्ल्ड जमैकाची रहिवासी असणारी लिसा हन्नाने घातलं होतं. ऐश्‍वर्याने आंतरराष्‍ट्रीय कॉन्‍ट्रॅक्‍ट अंतर्गत एक वर्षापर्यंत मॉडेलिंग, चित्रपटात काम करू शकत नव्‍हती. विशेष म्‍हणजे याकाळात तिच्‍याकडे २४ चित्रपटांचे प्रस्‍ताव आले होते. त्‍यानंतर ऐश्‍वर्या चित्रपटात आली. मणीरत्‍नम यांचा 'इरुवर' या तामीळ चित्रपटातून तिने सिनेजगतात पाऊल ठेवलं. तिचे एकामागोमाग एक तीन चित्रपट फ्‍लॉप ठरले. परंतु, ऐश्‍वर्याने हार मानली नाही. १९९९ मध्‍ये अभिनेता अक्षय खन्‍नासोबत तिने 'आ अब लौट चले' चित्रपट केला. हा चित्रपट सुपरहीट ठरला. त्‍यानंतर एकापेक्षा एक चित्रपट तिला मिळत गेले. संजय लीला भन्‍साळी यांचा 'हम दिल दे चुके सनम' चित्रपट केला. त्‍यात अजय देवगण आणि सलमान खान यांच्‍या मुख्‍य भूमिका होत्‍या. या चित्रपटाच्‍या माध्‍यमातून बॉलिवूडमध्‍ये तिने यशाचं शिखर गाठलं. सुभाष घई यांचा 'ताल' आणि भन्‍साळी यांच्‍या 'देवदास'ने ऐश्‍वर्याच्‍या अभिनयात चारचाँद लावले. ऐश्वर्या दुसरी इंडियन मॉडल आहे. ऐश्वर्या राय बच्चनला २०१४ च्‍या 'मिस वर्ल्ड पीजेंट' दरम्‍यान 'सक्सेसफूल मिस वर्ल्ड'ने गौरवण्‍यात आलं होतं. डिसेंबर २०१४ मध्‍ये मिस वर्ल्ड स्‍पर्धेत ऐश्‍वर्याला चीफ गेस्ट म्‍हणूनही आमंत्रित करण्‍यात आलं होतं. 
डायना हेडन
ऐश्‍वर्यानंतर १९९७ मध्‍ये हैदराबादच्‍या डायना हेडनने मिस वर्ल्डचं मुकूट परिधान केलं. सावळ्‍या रंगाची डायनाचं व्‍यक्‍तिमत्त्‍व आकर्षक होतं. डायना 'बिग बॉस-२'मध्‍ये तसेच अनेक चित्रपटांतही भूमिका केल्‍या आहेत. तिचं चित्रपट करिअर म्‍हणावं फुललं नाही. 
Related image
युक्ता मुखी
लंडनमध्‍ये ४ डिसेंबर, १९९९ मध्ये युक्‍ताने ४९ वी मिस वर्ल्ड स्‍पर्धा जिंकली. ९३ देशांच्‍या सौंदर्यवतींना मागे टाकत या मुकूटावर आपलं नाव कोरलं. युक्‍ता मुखीला सहजासहजी हा किताब मिळाला नव्‍हता. तिच्‍या वडिलांना सौंदर्य स्‍पर्धेत भाग घेणं पसंद नव्‍हते. युक्‍ताने डॉक्‍टर बनावे, अशी त्‍यांची इच्‍छा होती. परंतु, युक्‍ताने आपल्‍या वडिलांना जिंकून दाखवेन, असा विश्‍वास दिला. युक्ताने २००२ मध्‍ये आलेला चित्रपट 'प्यासा' मधून बॉलिवूड डेब्‍यू केलं होतं. त्‍यात आफताब शिवदासानीची मुख्‍य भूमिका होती. हा चित्रपट फ्‍लॉप ठरला. त्‍यानंतर २००५ मध्‍ये युक्‍ताने 'मेमसाब' आणि 'लव्‍ह इन जपान' चित्रपट केले. या चित्रपटांची जादू बॉक्‍स ऑफिसवर म्‍हणावी तशी चालली नाही. 
Image result for miss world yukta mukhi
प्रियांका चोप्रा
सन २००० मध्‍ये प्रियांकाने मिस वल्‍ड स्‍पर्धा जिंकली. प्रियांकाच जन्‍म जमशेदपूरमध्‍ये झाला. नंतर ते बरेलीत आले. नंतर प्रियांका आई मधू चोप्रा यांच्‍यासोबत मुंबईत आली, आणि मिस इंडिया स्‍पर्धेत उतरली. टॅलेंट आणि सौंदर्याच्‍या जोरावर प्रियांकाने मिस इंडियाचा किताब पटकावला. त्‍यावेळी प्रियांका १८ वर्षांची होती. त्‍यानंतर मिस वर्ल्डच्‍या तयारीसाठी प्रियांकाने मुंबईच्‍या जयहिंद कॉलेजमध्‍ये प्रवेश घेतला होता. तिने मिस वर्ल्ड स्‍पर्धेत सहभागी झाली स्‍पर्धा जिंकलीही. लंडनच्‍या मिलेनियम डोममध्‍ये प्रियांकाला युक्‍ता मुखीने मुकूट घातला होता. मिस वर्ल्ड बनल्‍यानंतर 'द हीरो'तून प्रियांकाने  बॉलिवूडमध्‍ये पदार्पण केलं. एकानंतर एक सुपरहिट चित्रपट देऊन ती बी-टाऊनची लोकप्रिय अभिनेत्री बनली. 
Related image
भल्‍याभल्‍यांना मागे टाकले मानुषीने
मानुषी छिल्लरने १७ वर्षांनंतर मिस वर्ल्ड २०१७ चा मुकूट आपल्‍या नावे केला. आधी प्रियांकाने २००० मध्‍ये हा मुकूट परिधान केला. मानुषीने चीनच्‍या सान्या शहर एरीनामध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या मिस वर्ल्ड स्‍पर्धेत भाग घेतला. जगभरातील विविध देशांतील १०८ सौंदर्यवतींना मागे टाकून मानुषीने ही स्‍पर्धा जिंकली. मानुषीने आपलं शिक्षण दिल्‍लीच्‍या सेंट थॉमस स्‍कूलमध्‍ये पूर्ण केलं. नंतर सोनीपतच्‍या गव्‍हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्‍ये तिने प्रवश घेतला. ती एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करत आहे. मिस वर्ल्ड होण्‍यासाठी तिने शिक्षणातून एक वर्षाचा ब्रेक घेतला होता. त्‍याआधी २०१६ मध्‍ये तिने कॉलेज प्रिन्‍सेसचा किताब पटकावला होता. तिला तेथे ब्‍युटी विथ ब्रेन असं म्‍हटलं जायचं. २०१६ मध्‍ये ती मिस हरियाणा देखील झाली होती. जून २०१७ मध्‍ये मुंबईत झालेली फेमिना मिस इंडियाच्‍या स्‍पर्धेत मानुषीने ३० सौंदर्यवतींना मागे टाकले. 
Related image
आज छोट्‍या-छोट्‍या शहरांतही सौंदर्यस्‍पर्धा भरवल्‍या जात आहेत. अनेक तरुणींना आपलं सौंदर्य, आपले गुण, टॅलेंट दाखवण्‍यासाठी हे एक हक्‍काचं व्‍यासपीठ मिळालय. याचं व्‍यासपीठावरून त्‍यांना जगात ओळख निर्माण करण्‍याची संधी मिळते. कुणीही ओळखत नसलेल्‍या त्‍या तरुणींना सौंदर्य स्‍पर्धांच्‍या माध्‍यामातून एका रात्रीत जग ओळखू लागतं. 
ग्‍लॅमर आणि करिअर 
सौंदर्यस्‍पर्धेतून जगभर ओळख निर्माण होते. आता या स्‍पर्धा केवळ सौंदर्यस्‍पर्धा राहिल्‍या नसून त्‍याकडे ग्‍लॅमर म्‍हणून पाहिले जाते. स्‍पर्धा जिंकल्‍यानंतर अनेक चित्रपटांचे प्रस्‍ताव त्‍यांच्‍याकडे येऊ लागतात. या स्‍पर्धांकडे एक करिअर म्‍हणूनही पाहिले जाते. अशा स्‍पर्धांमुळे करिअरच्‍या अनेक संधी निर्माण होताहेत. काळानुसार आता सौंदर्याच्या व्‍याख्या बदलल्या आहेत. जागतिक पातळीवर एकाद्या स्‍त्रीच्या सौंदर्याचा गौरव होतो तेव्‍हा तो तिचा एकटीचा गौरव होत नाही तर  स्‍त्री जातीचाही तो गौरव होत असतो.

कादर खान यांच्‍या अभिनयाने इम्‍प्रेस झाले होते दिलीप कुमार

कादर खान काही वर्षांपासून लाईमलाईटपासून दूर होते. मोठ्‍या पडद्‍यावर खळखळून हसवणारे कादर खान यांचा अभिनय चित्रपटात आहे म्‍हटल्‍यावर प्रेक्षक आवर्जुन तो चित्रपट पाहायला जायचे. कादर खान यांचे चित्रपट म्‍हणजे त्‍या चित्रपटाला मिळालेले यश, असे समीकरण असायचे. त्‍यांनी आपल्‍या दमदार अभिनयाने आणि विनोदाने प्रेक्षकांना अक्षरश: पोट धरून हसायला लावले. जितक्‍या विनोदात्‍मक भूमिका केल्‍या, तितक्‍याच गंभीर भूमिकाही साकारल्‍या. 

Image result for kader khan
कादर खान यांनी 'डाग' या चित्रपटापासून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्‍यांनी 'होशियार,' 'हत्‍या,' 'कुली' यासारख्‍या चित्रपटांचे लेखन केले. नव्‍वदच्‍या दशकात तर अनेक चित्रपटांमध्‍ये त्‍यांनी उत्तम अभिनय केला. उत्तम अभिनयाकरिता आणि लेखनासाठी त्‍यांना आजपर्यंत अनेक पुरस्‍कारांनी सन्‍मानित करण्‍यात आले होते. 
Image result for kader khan hd
अफगानिस्तानमधील काबुल येथे १९३७ मध्‍ये जन्मलेल्‍या कादर खान यांनी ३०० हून अधिक चित्रपटात काम केले. त्‍यांनी लेखनापासून अभिनयापर्यंत अनेक चित्रपटात काम केले. कादर खान यांनी चित्रपट करिअरमध्‍ये वेगवेगळ्‍या भूमिका निभावून प्रेक्षकांच्‍या मनावर अधिराज्‍य गाजवले. प्रेक्षकांना त्‍यांच्‍या नेगेटिव्‍ह आणि कॉमिक दोन्‍ही भूमिका आवडल्‍या. सातत्‍याने प्रकृती बिघडत असल्‍याने ते चित्रपटांपासून दूर होते. 
Image result for kader khan hd
कादर खान यांनी लिहिलेले डायलॉग्‍ज
हळूहळू कादर इंडस्‍ट्रीमध्‍ये सेटल झाले. त्‍यांनी अभिनयाबारोबरच 'सत्‍ते पे सत्‍ता', 'अमर अकबर एंथोनी', 'मिस्‍टर नटवर लाल', 'दो और दो पांच', 'अग्निपथ' यांसारख्‍या चित्रपटांचे डायलॉग्‍ज लिहिले. अमिताभ बच्‍चन यांचे बहुतांशी डायलॉग्‍ज कादर यांनी लिहिले होते. त्‍यानंतर त्‍यांना चित्रपटात काम करण्‍याची संधी मिळाली. सुरुवातीला निगेटिव्‍ह  भूमिका मिळाली. पुढे दाक्षिणात्‍य चित्रपट 'हिम्‍मतवाला'मध्‍ये काम करण्‍याची संधी त्‍यांना मिळाली. या चित्रपटातील त्‍यांच्‍या भूमिकेने कादर खान यांच्‍यासाठी कॉमेडीचे दरवाजे उघडले. 
कादर खान एक दिग्‍दर्शक, स्क्रीन रायटर, कॉमेडियन देखील होते. चित्रपट रोटीचे (१९७४) डायलॉग लिहिण्‍यासाठी  राजेश खन्ना आणि मनमोहन देसाई यांनी त्‍यांना १.२१ लाख रुपये मानधन दिले होते. त्‍यावेळीहे मानधन जास्‍त असल्‍याचे म्‍हटले जायचे. 
Image result for kader khan
कादर यांच्‍या अभिनयावर इम्‍प्रेस झाले होते ट्रॅजिडी किंग 
कॉलेजमध्‍ये कादर यांनी एक नाटक लिहिले होते. या नाटकासाठी त्‍यांना पुरस्‍कारदेखील मिळाला होता. त्‍यांनी बेस्‍ट ॲक्‍टर, बेस्‍ट रायटर, बेस्‍ट डायरेक्‍टर या कॅटेगरीमध्‍ये पुरस्‍कार जिंकला होता. पुरस्‍काराची राशी म्‍हणून त्‍यांना १५०० रुपयांचे कॅश प्राईज मिळाले होते. असे म्‍हटले जाते की, कॉलेजमध्‍ये असताना कादर खान ज्‍यावेळी वार्षिक समारंभात परफॉर्म करत होते. त्‍यावेळी दिलीप कुमार त्‍यांच्‍या अदाकारीने इम्‍प्रेस झाले होते. पुढे दिलीप यांनी कादर खान यांना आपल्‍या चित्रपटात साईन केले. त्‍यानंतर कादर खान यांचे कुटुंबीय मुंबईत आले. 
कादर खान यांचे उल्‍लेखनीय चित्रपट असे -
कुली
कुली चित्रपटात त्‍यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. दमदार अभिनय करून त्‍यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. 
तकदीरवाला 
तकदीरवाला चित्रपटात कादर खान यांनी यमराज भूमिका साकारली होती. यमराजची भूमिका असूनही ते विनोदात्‍मक पध्‍दतीने सादर करणे, हे त्‍यांना सहजरित्‍या जमले होते. या चित्रपटातील त्‍यांचा 'यम है हम' हा संवाद फेमस झाला होता.  
राजा बाबू 
या चित्रपटात अभिनेता गोविंदाच्‍या वडिलांची भूमिका कादर यांनी निभावली होती. राजा बाबू चित्रपट हिट ठरला. 
Image result for kader khan
हिरो नं  १
या चित्रपटातदेखील कादर खान यांनी गोविंदाच्‍या वडिलांची भूमिका साकारली होती. हिरो नंबर १ मध्‍ये त्‍यांनी गोविंदासोबत अभिनय करून मोठ्‍या पडद्‍यावर धुमाकूळ घातला.  
आंटी नं १
कादर खान आणि गोविंदा यांची जोडी लोकप्रिय ठरली. आंटी नंबर १ मध्‍येदेखील दोघांची जोडी हिट ठरली. 
मिस्टर ॲण्ड मिसेज खिलाडी
मिस्टर ॲण्ड मिसेज खिलाडीमध्‍ये अभिनेत्री जुही चावला प्रमुख भूमिकेत होती. जुही चावलाच्‍या स्ट्रिक्ट वडिलांची भूमिका कादर खान यांनी साकारली होती. 
Image result for kader khan
बाप नंबरी बेटा दस नंबरी 
बाप नंबरी बेटा दस नंबरीमध्‍ये कादर यांच्‍यासोबत शक्ती कपूर मुख्‍य भूमिकेत होते. दोघांनी मिळून प्रेक्षकांना खळखळून हसायला लावले. 
 

Wednesday, October 16, 2019

नानासोबत 'शिवगामी'ने किसिंग सीन देऊन घातलेला धुमाकूळ

'पॉर्न स्टार' बनण्यासाठी द्यावे लागले ३७ रिटेक्स



'बाहुबली' चित्रपटात राजमाताची भूमिका साकारणारी शिवगामी देवी अर्थातच राम्या कृष्णनचा १५ सप्टेंबरला वाढदिवस. अनेक हिंदी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर 'बाहुबली'मधून तिची लोकप्रियता वाढली. शिवगामीचे खरे नाव राम्या कृष्णन आहे. 
Image result for ramya krishna hd
राम्याने वयाच्या १३व्या वर्षी चित्रपटांमध्ये काम केले होते. १९९८मध्ये आलेला डेविड धवनचा चित्रपट ‘बडे मियां छोटे मियां’मध्ये राम्या अमिताभ बच्चन आणि गोविंदासोबत दिसली होती. यावर्षी राम्याचा आणखी एक चित्रपट 'वजूद' रिलीज झाला. यामध्ये नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित यांची मुख्य भूमिका होती. या चित्रपटामध्ये नाना पाटेकर आणि राम्याच्या किसिंग सीनने धुमाकूळ घातला होता. राम्याने आपल्यापेक्षा मोठ्या स्टारसोबत किसिंग सीन दिले होते. 
राम्या कृष्णन
राम्याने शाहरुखसोबत 'चाहत'मध्ये रोमान्स केला होता. या चित्रपटामध्ये शाहरुख आणि पूजा भट्टची भूमिका होती. या चित्रपटामधील गाणे 'दिल की तनहाई' सुपरहिट झाले होते. चित्रपटातील राम्याची भूमिकाही सर्वांच्या पसंतीस उतरली होती. 
Image result for ramya krishna
राम्याची अशी आहे लाईफस्टाईल
राम्याकडे मर्सिडीज बेंज एस३५० सारख्या अनेक लक्झरी कार आहेत. राम्या सध्या आपल्या परिवारासोबत चेन्नईतील इंजमबक्कममध्ये राहते. येथे तिचा बंगला आहे. २०१२ मध्ये राम्याच्या मेडने जवळपास १० लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती. 
Image result for ramya krishna
२००३ मध्ये राम्याने तेलुगु फिल्ममेकर कृष्णा वामसीशी विवाह केला. त्यांना एक मुलगा आहे. आपल्या चित्रपट करिअरमध्ये राम्याने अनेक मोठ्या बॉलिवूड स्टार्ससोबत काम केले आहे. राम्याने अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, नाना पाटेकर आणि शाहरुख खान यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे. 
Image result for ramya krishna
राम्या तमिळ भाषेतील चित्रपट 'सुपर डीलक्स'मध्ये दिसली होती. चित्रपटामध्ये राम्याने एका पॉर्नस्टारची भूमिका साकारली होती. त्यागराजन कुमारराजाने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, कुमारराजामुळे राम्याला एका खास सीनसाठी २ दिवसांत ३७ वेळा रिटेक घ्यावे लागले होते. 

बॉलिवूडची खल्लास गर्ल 'ईशा कोप्पिकर'


बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री खल्लास गर्ल 'ईशा कोप्पिकर'चा आज १९ सप्टेंबरला वाढदिवस आहे. ईशा कोप्पिकरचा जन्म १९ सप्टेंबर, १९७६ रोजी मुंबईतील माहिममध्ये कोकणी कुटुंबात झाला. तिने लाईफ सायन्समध्ये पदवीचे शिक्षण घेतले आहे. 

dinsta
सुरूवातीपासूनच तिला मॉडलिंगमध्ये करिअर करायचे होते. कॉलेजमध्ये शिकत असताना तिने आपला एक फोटोशूट केला होता. ईशाने आधी जाहिरातींमध्ये काम केले. तिने आपल्या करिअरची सुरुवात एका तमिळ चित्रपटातून केली होती. ईशाने १९९८ मध्ये आपल्या करिअरला सुरूवात केली होती. 
dinsta
ईशा कोप्पिकरने १९९५ मध्ये मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता. तिने मिस इंडिया स्पर्धा जिंकली होती. बॉलिवूडमध्ये ईशा कोप्पिकरचा पहिला हिंदी चित्रपट 'फिजा' होता. या चित्रपटामधून ईशाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. या चित्रपटात तिच्यासोबत रितिक रोशन आणि करिश्मा कपूर यांच्याही भूमिका होत्या. ईशाने आतापर्यंत ४५ चित्रपटांमध्ये काम केले आहे. यानंतर तिने 'प्यार, इश्क और मोहब्बत', 'आमदनी अठन्नी और खर्चा रुपैया', कंपनी', 'कांटे', 'दिल का रिश्ता', 'हेल्लो', 'एक विवाह ऐसा भी' यासारखे चित्रपट केले.  
dinsta
ईशाने दमदार चित्रपट केले. या चित्रपटांपैकी एक फिल्म ‘एक विवाह ऐसा भी’मध्ये ईशाने चांगली भूमिका साकारली होती. ईशाने ‘क्या कुल है हम’,’कंपनी’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ईशाने सलमान खानसोबत ‘मैने प्यार क्यों किया’मध्येही काम केले आहे. ‘डॉन’ आणि ‘सलाम-ए-इश्क’ चित्रपटांमधील तिच्या अभिनयाचे कौतुकही झाले होते. 
dinsta
दाक्षिणात्य चित्रपटांत काम 
dinsta
१९९८ मध्ये तेलुगु चित्रपट 'चंद्रलेखा'मधून तिने आपला चित्रपटाचा प्रवास सुरू केला. या चित्रपटांनंतर तिने एकानंतर एक असे अनेक तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मराठी चित्रपट केले. 
तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट 
ईशा तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट आहे. न्यूमरोलॉजीमध्ये तिचा विश्वास आहे. तिने दोन वेळा आपल्या नावाचे स्पेलिंग देखील बदलले आहे. 
dinsta
टिम्मी नारंगशी विवाह 
ईशा कोप्पिकरने २००९ मध्ये टिम्मी नारंगशी विवाह केला होता. ईशाला एक मुलगी आहे-तिचे नाव आहे रियाना नारंग. टिम्मीशी लग्न केल्यानंतर ईशाने चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले. लग्नाआधी तिने ‘राख’ चित्रपटांत काम केले होते. 
dinsta
dinsta

‘अशी ही बनवाबनवी’ची ३१ वर्षे


कितीवेळाही पाहा - ‘अशी ही बनवाबनवी’ पुन्हा पुन्हा पाहावसं वाटणार. सदाबहार ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाला आज ३१ वर्षे पूर्ण झाली. २३ सप्टेंबर, १९८८ रोजी हा चित्रपट रुपेरी पडद्यावर आला होता. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि सिध्दार्थ (शंतनू) यांच्या चौकट जोडीने धमाल उडवून दिली होती. 

चित्रपटाला आज इतकी वर्षे झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता कायम आहे. लक्ष्या जरी या जगात नसला तरीही त्याची आठवण या चित्रपटामुळे कायम लक्षात राहिली आहे.  
Related image
बनवाबनवी चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहे. या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे आणि सिद्धार्थ रे यांच्या मुख्य भूमिका होत्या. 
हा चित्रपट ‘बीवी और मकान’ या हृषिकेश मुखर्जी यांच्या प्रसिद्ध चित्रपटाचा रिमेक आहे.
Image result for ashi hi banvabanvi
या कलाकारांनी साकारल्या या व्यक्तिरेखा -
लक्ष्मीकांत बेर्डे - परशुराम
अशोक सराफ - धनंजय माने
सुशांत रे - शंतनू माने
सचिन पिळगावकर - सुधीर
सुप्रिया पिळगावकर - मनीषा
निवेदिता जोशी - सुषमा
प्रिया बेर्डे - कमळी
अश्विनी भावे - माधुरी
सुधीर जोशी - विश्वास सरपोतदार
नयनतारा - लीलाबाई काळभोर
विजू खोटे - बळी
अनेक उपद्व्यापानंतर शेवटी घरमालकाने घरातून हाकलून दिल्यावर नवीन जागा भाड्याने मिळवण्यासाठी चार मित्रांना काय काय प्रताप करावे लागले याची मजेदार गोष्ट म्हणजे 'अशी ही बनवाबनवी'. या चित्रपटातील सर्व कलाकार हे उत्तम विनोदी अभिनेते असल्याने हा चित्रपट खूप विनोदी आहे.
Image result for ashi hi banvabanvi
स्त्री पात्र -
या चित्रपटात सचिन आणि लक्ष्याने साकारलेले स्त्री पात्र उत्तम होतेय खासकरून लक्ष्याने साकारलेली भूमिका. मग, तिचे झालेले डोहाळे जेवण आणि डोहाळे जेवणाच्या सोहळ्यात गायलेले कुणीतरी येणार येणार गं... हे गाणे अप्रतिमच आहे. 
Image result for ashi hi banvabanvi
या चित्रपटातील गाणी अशी -
* हृदयी वसंत फुलताना
* ही दुनिया मायाजाल
* अशी ही बनवाबनवी
* कुणीतरी येणार येणार गं

मादक अदाकारा 'सिल्क स्मिता'



स्मृतिदिनानिमित्त 

दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीतील एकमेव अशी अभनेत्री जिचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक तिकिट खिडकीवर तुटून पडायचे. या अभिनेत्रीचे नाव विजयलक्ष्मी वदलापति. तिला सिनेजगतात 'सिल्क स्मिता' नावानेही ओळखले जाते. 
१९९० च्या सुरूवातीपासून सिल्क स्मिताची जादू चालली. बोल्ड स्मिता अशी तिची ओळख. सिल्कने अनेक बी ग्रेड चित्रपट आणि सॉफ्ट पोर्न चित्रपट केले. त्याकाळी रजनीकांत आणि कमल हासन यासारखे स्टारदेखील सिल्कची लोकप्रियता पाहून थक्क झाले होते. 
रजनीकांत आणि सिल्क स्मिताने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. यामध्ये १९८३ मध्ये आलेला चित्रपट 'जीत हमारी हुई,' १९८३ मध्ये आलेला चित्रपट 'थंगा मगन,' पायम पुली' आणि 'सिवाप्पु सूर्या' यांचा समावेश आहे. या चित्रपटांमधील त्यांचे डान्स मूव्ह्ज वादग्रस्त ठरले. 
सिल्कचा बोल्डनेस पाहून चित्रपट आणि निर्मात्यांची लाईन लागली. एकापेक्षा एक हिट चित्रपट दिल्यानंतर सिल्कचा एक डान्स नंबर चित्रपटात असायला हवाच, हे सूत्रच ठरले. 
गरिबीत गेलं बालपण 
२ डिसेंबर, १९६० रोजी आंध्र प्रदेशातील एलुरूजवळील एका गावात सिल्क स्मिताचा जन्म झाला होता. बालपणापासून पाहिलेल्या गरिबीतून तिला मुक्त व्हायचं होतं. तिच्या आईने एका बैलगाडीवाल्यासोबत तिचे लग्न ठरवले. सिल्क आपल्या शहरामध्ये येणाऱ्या चित्रपटांचे पोस्टर पाहायची. एक दिवस सकाळी सिल्कने मद्रासला जाण्यासाठी रेल्वे पकडली आणि कॉलिवूड निर्मात्यांकडे गेली. 
Image result for silk smitha
मोलकरीण ते मेकअप असिस्टंट
सिल्क एका अभिनेत्रीच्या घरात मोलकरीण म्हणून काम करत होती. त्यानंतर ती तिची मेकअप असिस्टंट बनली. एक दिवस एक चित्रपट निर्माता आपल्या चमचमत्या कारमधून त्या अभिनेत्रीच्या घरात आला. सिल्क त्या कारला पाहतच राहिली आणि एक दिवस अशाच कारमध्ये बसण्याचे स्वप्न पाहू लागली. 
सिल्कची बिनधास्त इमेज 
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर सिल्कने बी-टाउनमध्ये नशीब आजमावले. 'सदमा' या चित्रपटात तिने साकारलेली भूमिका आजदेखील लक्षात राहण्यासारखी आहे. सिल्कचे अनेक चित्रपट हिंदीमध्ये डब करण्यात आले आहेत. 
रजनीकांत आणि स्मिताचे अफेअर? 
असे म्हटले जाते की, रजनीकांत आणि सिल्क स्मिताचे अफेअर होते. रजनीकांत यांनी सिगारेटने सिल्कच्या शरीरावर डाग बनवले असल्याचा आरोप झाला होता. परंतु, याला कोणताही पुरावा नाही. 
एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट!
१९७९ मध्ये रिलीज झालेला तमिळ चित्रपट 'वंदीचक्रम'मध्ये सिल्कच्या भूमिकेने धुमाकूळ घातला. या भूमिकेमुळे तिला मोठा ब्रेक मिळाला.
Image result for silk smitha
१७ वर्षांचे करिअर
१७  वर्षांच्या मोठ्या करिअरमध्ये तिने ४५० हून अधिक तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. 
सॉफ्ट पोर्न भूमिका 
तिला एकाच प्रकारच्या भूमिका मिळत गेल्या. त्याला 'सॉफ्ट पोर्न' असं म्हटले जाऊ लागले.  
रहस्यमयी मृत्यू 
२३ सप्टेंबर, १९९६ रोजी विजयलक्ष्मी उर्फ सिल्क स्मिताचा मृतदेह आपल्या राहत्या घरात पंख्याला लटकलेला आढळला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना हत्या की आत्महत्या याबाबत कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाही. फॉरेन्सिक तपासातही काही निष्पन्न झाले नाही. तेलुगुमध्ये एक सुसाईड नोट मिळाले होते. परंतु, त्यावरूनही काही समजले नाही. अखेर तिचा मृत्यू एक रहस्य बनून राहिले. चेन्नई पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे सांगत केसची फाईल बंद केली. काही लोक आजदेखील ही हत्या असल्याचे मानतात. 
Related image
२०११ मध्ये विद्या बालनने 'डर्टी पिक्चर' हा चित्रपट केला. हा चित्रपट सिल्क स्मि‍ताच्या आयुष्यावर आधारित होता

त्याने' जीनतला आलिंगन दिलं आणि...

चॉकलेट हिरो देव आनंद यांच्या जन्मदिनानिमित्त 


बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार देव आनंद यांनी आपल्‍या चित्रपटाच्‍या माध्‍यमातून बॉलिवूड इंडस्ट्रीला एका वेगळ्‍या उंचीवर नेले. देव आनंद यांनीच बॉलिवूडला टीना मुनीम आणि जीनत अमान यासारख्‍या सुंदर अभिनेत्री दिल्‍या. चित्रपटांशिवाय, देव आनंद आपल्‍या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत राहिले होते. 

Image result for zeenat aman and dev anand
अनेक अशा अभिनेत्री होत्‍या, ज्‍यांच्‍यावर देव आनंद प्रेम करायचे. परंतु, त्‍यांची प्रेम कहाणी कधी पूर्ण होऊ शकली नाही. आज देव आनंद यांच्‍या अशा एका लव्‍हस्टोरी बद्‍दल जाणून घेऊयात, ज्‍याच्‍याबद्‍दल कदाचित तुम्‍हाला माहिती नसेल. ही लव्‍हस्‍टोरी आहे, देव आनंद आणि जीनत अमान यांची. 
Image result for zeenat aman and dev anand
देव आनंद यांनी चित्रपटात 'हरे रामा हरे कृष्णा'मध्‍ये जीनत अमान यांना कास्ट केलं होतं. चित्रपटात जीनत यांनी देवानंद यांच्‍या बहिणीची भूमिका केली होती. शूटिंग दरम्‍यान, देव आनंद यांना जीनत यांच्‍याशी प्रेम झालं. जीनत यांची प्रत्‍येक गोष्‍ट देव आनंद यांना आवडायची. 
Image result for zeenat aman and dev anand
जीनत यांच्‍या प्रेमात असताना हे वृत्त प्रसारमाध्‍यमांना कळाले. दोघांची मीडियामध्‍ये लिंकअपचे वृत्त यायचे. ते वृत्त वाचून देव आनंद खुश व्‍हायचे. ही माहिती खुद्‍द देव आनंद यांनी खुद्‍द आपले आत्‍मचरित्र 'रोमांसिंग विथ लाईफ'मध्‍ये केले होते.
Image result for zeenat aman and dev anand
एक दिवस देव आनंद यांनी जीनत यांना प्रपोज करण्‍याचा निर्णय घेतला. देवसाहब जीनत यांना हॉटेल ताजमध्‍ये प्रपोज करणार होते. या हॉटेलमध्‍ये देव आणि जीनत डिनरसाठी जात होते. जीनत यांना प्रपोज करण्‍यासाठी देवसाहब यांनी एक छोटी पार्टी ठेवली. या पार्टीत देव आनंद यांनी आपले जवळचे मित्र आणि जीनतला आमंत्रित केलं होतं. परंतु, पार्टीमध्‍ये असा एक प्रसंग घडला, ज्‍यामुळे देव आनंद दुखावले गेले. देवानंद यांनी पाहिलं की, पार्टीत राज कपूर हे जीनत यांच्‍याजवळ आले आणि त्‍यांनी जिनतला आलिंगन दिलं. जीनत यांनीही राज कपूरला आलिंगन दिलं. 
हे सर्व पाहून देव आनंद यांना दु:ख झालं. आधीही राज कपूर आणि जीनत यांच्‍या रोमान्‍सचे वृत्त मीडियात आले होते. राज कपूर यांनी जीनत यांना आपल्‍या चित्रपटात 'सत्यम शिवम सुंदरम'मध्‍ये मुख्‍य भूमिका दिली होती. 
Related image
देव आनंद यांनी राजकपूर आणि जीनत यांच्‍या अफेअरचे वृत्त केवळ एक अफवा म्‍हणून दुर्लक्ष केले होते. या प्रसंगाचा उल्‍लेख देव आनंद यांनी आपल्‍या आत्‍मचरित्रात केला होता. आत्‍मचरित्रात त्‍यांनी म्‍हटलं होतं की, हे सर्व पाहिल्‍यानंतर ते पार्टीतून बाहेर निघून गेले. त्‍यानंतर पुन्‍हा कधीही जीनत यांच्‍याबद्‍दल त्‍यांनी विचार केला नाही. याप्रकारे देव आनंद यांच्‍या लव्‍ह स्टोरीचा शेवट झाला होता. 
Image result for zeenat aman and dev anand

'एक घर बनाऊंगा, तेरे घर के सामने' : सदाबहार देव आनंद


जन्मदिन विशेष 
'चॉकलेट हिरो' देव आनंद यांनी बॉलिवूडमध्‍ये आपल्‍या करिअरची शुरूआत १९४६ मध्‍ये 'हम एक हैं'मधून केली होती. देव आनंद यांना सदाबहार म्‍हटलं जायचं. नेहमी फ्रेश असणारे देव आनंद कधीच कंटाळलेले नसायचे. पूर्ण जोशाने ते आपलं काम पूर्ण करायचे. 
१९५५ ते १९६५ पर्यंत देव आनंद सर्वात महाग बॉलिवूड अभिनेता होते. देव आनंद यांनी बॉलिवूडमध्‍ये आपल्‍या करिअरची सुरुवात १९४६ मध्‍ये प्रदर्शित झालेला चित्रपट 'हम एक हैं'मधून केली होती. देव आनंद यांचं व्‍यक्‍तिमत्त्‍व इतकं आकर्षक होतं की, अनेक अभिनेत्री त्‍यांच्‍यावर फिदा होत्‍या. देव आनंद यांच्‍या जन्‍मदिनी त्‍यांच्‍या हिट चित्रपटांची सुपरहिट गाणी पाहुया. 
१ जानेवारी १९६३ ला रिलीज झालेला चित्रपट 'तेरे घर के सामने' हा सुपरहिट ठरला होता. हा चित्रपट खुद्‍द देव आनंद यांनी प्रोड्यूस केला होता. चित्रपटाचे दिग्‍दर्शन त्‍यांचे भाऊ विजय आनंद यांनी केले होते. या चित्रपटातील गाणं 'दिल का भंवर करे पुकार...' पाहा.
१९७० मध्‍ये आलेला 'जॉनी मेरा नाम' एक क्राईम ॲक्शन चित्रपट होता. दिग्‍दर्शन विजय आनंद यांनी केलं होतं. 'पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले' हे या चित्रपटातील गाणं प्रसिध्‍द झालं होतं. 
१९७३ मध्‍ये आलेला चित्रपट 'हीरा-पन्ना' देव आनंद यांनी दिग्‍दर्शित केला होता. प्रोडक्शनही त्‍यांनीच केलं होतं. चित्रपटात देव आनंद, जीनत अमान आणि राखी यांच्‍या प्रमुख भूमिका होत्‍या. 
वहीदा रहमान आणि देव आनंद यांचा सुपरहिट चित्रपट 'गाईड' १९६५ मध्‍ये आला होता. विजय आनंद यांनी चित्रपटाचे दिग्‍दर्शन केलं होतं. 'आज फिर जीने की तमन्ना है' हे या चित्रपटातील गाणं लोकप्रिय आहे. 

मेरी आवाज ही, पहचान है...लता मंगेशकर (Video)

'ते' गाणं गुलजारांनी फक्‍त लतादीदींसाठी लिहिलं...



''नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा
मेरी आवाज ही, पहचान है
गर याद रहे
नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा
मेरी आवाज ही, पहचान है
गर याद रहे''
गुलजार यांनी फक्‍त लता मंगेशकर यांच्‍यासाठी एक गाणं लिहिलं होतं. चित्रपट 'किनारा' (१९७७) मधलं गीत 'नाम गुम जाएगा' लता मंगेशकर यांचं आवडतं गाणं आहे. २८ सप्‍टेंबर सुरकोकिळा लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. आजच्‍या दिवशी त्‍यांची अनेक गाणी त्‍यांचे फॅन्‍स शेअर करत आहेत. परंतु, असं एक गाणं आहे की, जे लता मंगेशकर यांचं आवडतं गाणं आहे आणि ते फक्‍त त्‍यांच्‍यासाठी लिहिण्‍यात आलं होतं. चित्रपट किनारा (१९७७)मधलं गाणं 'नाम गुम जाएगा' लता मंगेशकर यांच्‍या आवडत्‍या गाण्‍यांपैकी एक आहे. या चित्रपटाचे निर्माते गुलजार यांनी लतादीदींसाठी गाणं लिहिलं होतं. 'लता सुर-गाथा'चे लेखक यतींद्र मिश्र यांना गुलजार यांनी सांगितलं होतं की, ते गाणं फक्‍त लता मंगेशकर यांच्‍यासाठी लिहिलं होतं. एका कार्यक्रमात लतादीदींनी म्‍हटलं होतं की, 'मी स्‍वत: या गाण्‍याबद्‍दल सांगितलं तर सहगल साहब, मुकेश भैय्‍या आणि किशोर दा यांच्‍यासाठी हे सटीक होईल.' 
त्‍यांच्‍या जन्‍मदिनी त्‍यांच्‍या आवाजातील ही सुंदर गाणी जाणून घेऊयात. सन १९७५ पॉलिटिकल ड्रामा चित्रपट 'आंधी' गुलजार यांनी दिग्‍दर्शित केला होता. चित्रपटात संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांच्‍या मुख्‍य भूमिका होत्‍या. या चित्रपटातील गाणं 'तेरे बिना जिन्दगी से कोई शिकवा' सर्वात अधिक लोकप्रिय गाण्‍यांपैकी एक आहे. 
१९७२ मध्‍ये आलेला चित्रपट मनोज कुमार दिग्‍दर्शित चित्रपट 'शोर'मधलं गाणं 'एक प्यार का नगमा है' लता मंगेशकर यांच्‍या हिट गाण्‍यांपैकी एक आहे.  

'कालिया' बनून विजू खोटेंनी जिंकली होती मने



बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते विजू खोटे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी मराठी चित्रपटांबरोबरच इतर भाषांमध्येही  उल्लेखनीय काम केलं. विजू खोटे यांचे शोले या चित्रपटातील 'कालिया'चे डायलॉग्ज खूप लोकप्रिय ठरले. त्यांचा 'सरदार मैने तुम्हारा नमक खाया है' हा डायलॉग प्रेक्षकांच्या आजही लक्षात राहिला आहे. 

Image
शोलेनंतर त्यांनी आमिर खान-सलमान खानचा चित्रपट 'अंदाज अपना अपना'मध्ये रॉबर्टची भूमिका साकारली होती. विजू खोटे यांनी बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केल्यानंतर मराठी चित्रपट पंथमध्ये निगेटिव्ह भूमिका साकारून हे सिध्द केलं की, ते प्रत्येक भूमिकेसाठी फिट आहेत. 
विजू खोटे यांनी १९६४ पासून सिनेजगतात कार्यरत होते. त्यांनी आपल्या चित्रपट करिअरमध्ये अनेक मराठी आणि हिंदी चित्रटांमध्ये काम केलं होतं. यामध्ये अशी ही बनवाबनवी, आयत्या बिळावर नागोबा अशा चित्रपटांचा समावेश आहे. हिंदी आणि मराठी असे मिळून जवळपास ३०० चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. 
Image
विजू यांची १९९३ मध्ये आलेली टीव्ही मालिका 'जबान संभाल के' लोकप्रिय ठरली होती. त्यांनी थिएटरमध्येही काम केलं आहे. विजू खोटे यांची बहिण शुभा खोटेदेखील अभिनेत्री आहे. शुभा खोटे यांची मुलगी भावना बलसावरदेखील अभिनेत्री आहे. विजू खोटे यांचे वडील नंदू खोटेदेखील स्टेज ॲक्टर होते. 
Image
विजू खोटे यांचा शेवटचा चित्रपट 
विजू खोटे यांचा शेवटचा चित्रपट 'जाने क्यों दे यारो' हा होता. २०१८ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. 

म. गांधी यांच्‍यावरील 'हे' चित्रपट पाहाच



राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज २ ऑक्‍टोबरला जयंती. महात्मा गांधी यांच्‍या आयुष्‍यावर अनेक चित्रपट आले. या चित्रपटांच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांना महात्मा गांधी यांच्‍याविषयी जाणून घेता आले. त्‍यांच्‍या जीवनावरील या महत्त्‍वाच्‍या चित्रपटांविषयी जाणून घेऊयात. 

Image result for film gandhi
महात्मा गांधी यांच्‍या आयुष्‍यावर सर्वात महत्त्‍वाच्‍या चित्रपटाची निर्मिती रिचर्ड एटनबरोने केली. १९८२ मध्‍ये 'गांधी' हा चित्रपट रिलीज झाला होता. चित्रपटात हॉलिवूड कलाकार बेन किंग्जले यांनी गांधीजी यांची व्‍यक्‍तीरेखा साकारली होती. 'गांधी' चित्रपटाला ऑस्कर ॲवॉर्ड देखील मिळाला होता.
Image result for film the making of gandhi
श्याम बेनेगल यांनी महात्मा गांधी यांच्‍या आयुष्‍यावर 'द मेकिंग ऑफ गांधी' चित्रपट आणला. चित्रपटात गांधीजींची व्‍यक्‍तिरेखा रजित कपूर यांनी साकारली होती. चित्रपटात मोहनदास करमचंद गांधी ते महात्‍मा बनण्‍यापर्यंतचा प्रवास दाखवण्‍यात आला. १९९६ मध्‍ये हा चित्रपट रिलीज झाला होता. 
Image result for abbas mastan film gandhi my father
२००७ मध्‍ये फिरोज अब्बास मस्तान यांच्‍या दिग्‍दर्शनाखाली 'गांधी माय फादर' रिलीज झाला. या चित्रपटात महात्मा गांधी यांची व्‍यक्‍तिरेखा दर्शन जरीवाला यांनी साकारली होती. हा चित्रपट महात्मा गांधी आणि त्‍यांचा मुलगा हरीलाल यांच्‍या नात्‍यांवर आधारित होता.
Related image
महात्मा गांधी यांच्‍या हत्येच्‍या प्रसंगावर कमल हासन यांनी 'हे राम' चित्रपट बनवला. चित्रपट २०००मध्‍ये रिलीज झाला होता. चित्रपटात महात्मा गांधी यांची व्‍यक्‍तिरेखा नसीरुद्दीन शाह यांनी साकारली होती. 
Image result for jabbar patel film dr babasaheb ambedkar
जब्बर पटेल यांनी २००० मध्‍ये 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' चित्रपट आणला. चित्रपटात बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि महात्मा गांधी यांच्‍यासोबत असलेलं त्‍यांचं नातं दर्शवण्‍यात आलं होतं. मोहन गोखले यांनी गांधीजींची व्‍यक्‍तिरेखा साकारली होती. 
Related image
राजकुमार हिरानी यांनी २००६ मध्‍ये 'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपट आणला. प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरलेल्‍या या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी म. गांधीजींची व्‍यक्‍तिेरखा साकारली होती.  
Image result for sardar film ketan mehta
सरदार वल्लभभाई पटेल यांच्‍या आयुष्‍यावर आधारित 'सरदार' चित्रपटाची निर्मिती १९९३ मध्‍ये केतन मेहता यांनी केली होती. चित्रपटात गांधी आणि सरदार पटेल यांचं नातं कसं होतं, हे दर्शवण्‍यात आलं. गांधीजींची व्‍यक्‍तिरेखा अन्नू कपूर यांनी साकारली होती. तर सरदार पटेल यांची व्‍यक्‍तिरेखा परेश रावल यांनी साकारली होती. 
Image result for maine gandhi ko nahin mara
'मैंने गांधी को नहीं मारा' या चित्रपटात अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका होती. आपणच गांधीजींची हत्‍या केली आहे, असे त्‍या व्‍यक्‍तीला (अनुपम) वाटत असते, अशी कथा चित्रपटात दाखवण्‍यात आली आहे. २००५ मध्‍ये जहनु बरुआने हा चित्रपट आणला होता. 

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...