Friday, August 24, 2018

आयुष्‍यात पुन्‍हा उभा राहणारा नागराज मंजुळे


मराठी सिनेसृष्‍टीत यशस्‍वी दिग्दर्शक म्‍हणून नागराज मंजुळे यांना ओळखले जाते. एक निर्माता आणि पटकथा लेखक असणारे नागराज पोपटराव मंजुळे यांचा आज वाढदिवस. आयुष्‍यात येणार्‍या चढ-उतारांना मात करत यशाची उंची गाठणार्‍या नागराज यांच्‍याबद्‍दल थोडक्‍यात जाणून घेऊयात. 


'फँड्री,' 'सैराट' आणि त्‍यांचा पहिला लघु चित्रपट फिल्म 'पिस्तुल्या' यासारखे मराठी सिनेसृष्‍टीला आशयघन चित्रपट देणारे नागराजच आहेत. 'सैराट' हा मराठीतील पहिला १०० कोटी कमाई केलेला चित्रपट आहे. त्‍यात आर्ची अर्थातच रिंकू राजगुरू आणि परशा म्‍हणजेच आकाश ठोसर या नव्‍या चेहर्‍यांना संधी देण्‍यात आली होती. या नव्‍या कलाकारांनी संधीचं सोनं करून दाखवलं. 'फँड्री' या चित्रपटापेक्षाही 'सैराट'ने नागराज यांचं नाव एका वेगळ्‍या उंचीवर नेलं.  
नागराज हे सोलापूर जिल्‍ह्‍यात करमाळा तालुक्यातील जेऊर गावचे आहेत. त्‍यांच्‍या समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी होते. नागराज यांना शिक्षणाची ओढ होती. शाळा बुडवून ते चित्रपट पहायला जायचे. नागराज यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण जेऊर येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ते पुणे विद्यापीठात शिकायला गेले. मराठी विषयात एम. ए. केलं. एम.फिल करत चित्रपटाचे वेड त्‍यांच्‍या डोक्यात घट्ट बसलेलं होतं.
नगराज मंजुळे १८-१९ वर्षांचे होते, त्‍यावेळी ते विवाहबद्ध (१९९७) झाले.  त्यावेळी ते बारावीमध्ये शिकत होते. नंतर त्‍यांनी घटस्‍फोट घेतला. 
नागराज पोपटराव मंजुळे यांचा 'उन्हाच्या कटाविरुद्ध' हा काव्य संग्रह देखील आहे.
पहिला लघुपट आणि चित्रपट 
'पिस्तुल्या' हा त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार विजेता लघुपट आहे. तर त्यांचा पहिला मराठी चित्रपट फँड्री फेब्रुवारी २०१४ मध्ये रिलीज झाला होता. यानंतर आलेला सैराट या मराठी चित्रपटाची ६६व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्‍सवासाठी निवड झाली होती. सैराटमधील गाणीही प्रेक्षकांच्‍या मनात रुंजी घालणारी होती. आजही सैराटमधल्‍या आर्ची-परशाचं वलय कायम आहे. त्‍यांचं स्‍टारडम अजूनही कमी झालेलं नाही. 
पावसाचा निबंध 
दरम्‍यान, 'सैराट' चित्रपटाच्‍या उत्तुंग यशानंतर दिग्‍दर्शक नागराज मंजुळेंनी नवी शॉर्टफिल्‍म 'पावसाचा निबंध' आणली. या शॉर्टफिल्‍मचा टीझर यु-ट्‍यूबवर रिलीज झाला होता. 'आटपाट प्रॉडक्‍शन्‍स'ची निर्मिती असलेल्‍या या शॉर्टफिल्‍मची कहाणी नागराज यांनीच लिहिली आहे. नागराज मंजुळे यांनी या शॉर्टफिल्‍मबद्‍दलची माहिती फेसबुकवरून दिली होती. 'खूप दिवसांपासून ही गोष्ट सांगायची होती पण काही कारणांनी पुढे ढकलली जात होती,’ अशी पोस्‍ट लिहित त्‍यांनी शॉर्टफिल्‍मचा टीझर शेअर केला होता.
नागराज यांचा येतोय नवा सिनेमा?
मध्‍यंतरी नागराज यांनी सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून एक व्‍हिडिओ पोस्‍ट केला होता. हा व्‍हिडिओ आटपाट प्रोडक्‍शनच्‍या यू-ट्‍यूब चॅनलवरदेखील अपलोड करण्‍यात आला होता. या व्‍हिडिओत 'फँड्री', 'सैराट'चा उल्‍लेख आहे आणि शेवटी 'लवकरच...' असा उल्‍लेख करण्‍यात आला आहे. हा व्‍हिडिओ नागराज यांनी फेसबुक पेजवरही पोस्‍ट केला होता. या व्‍हिडिओने प्रेक्षकांची उत्‍कंठा वाढवली. कारण, नागराज यांनी व्‍हिडिओतून नव्‍या चित्रपटाबद्‍दल सांगायचा प्रयत्‍न केला होता. तसा इशारा त्‍यांनी या व्‍हिडिओच्‍या माध्‍यमातून दिला होता. त्‍यामुळे नागराज नवं काही तरी घेऊन येणार, याची फॅन्‍सना प्रतीक्षा लागून राहिलीय.  

'मोरूची मावशी'ची एक्‍झिट


दीर्घ काळ आजारी असलेले विजय चव्हाण यांचं मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात शुक्रवारी निधन झालं. आपल्‍या विनोदी अभिनयाने पोट धरून हसायला लावणार्‍या या मोरूशी मावशी अर्थातच अभिनेते विजय चव्‍हाण आपल्‍यासोबत या जगात नाहीत. 

आचार्य अत्रे यांनी लिहिलेल्‍या 'मोरुची मावशी' या नाटकातली विजय चव्‍हाण यांची भूमिका प्रचंड गाजली. या नाटकाचे तब्बल दोन हजारहून अधिक प्रयोग झाले होते. या नाटकातील विजय चव्‍हाण यांचं स्‍त्री पात्र रसिकांनी अक्षरश: डोक्‍यावर घेतलं. विजय चव्‍हाण याचा आवाज गाणे गाण्‍यासाठी फारसा चांगला नव्‍हता. परंतु, नाटकात एक गाणे म्‍हणताना विजय यांच्‍या आवाजातील लयबध्‍दता पाहून त्‍यांना गाणे गाण्‍यास सांगितले. यासंदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलताना संगीतकार अशोक पत्‍की म्‍हणाले, 'विजय चव्‍हाण यांच्‍या मोरूची मावशीला वन्‍स मोअर मिळत आहे, असा मॅसेज एका व्‍यक्‍तीकडून आला. त्‍यावेळी मला पटलचं नाही. वन्‍स मोअर आणि विजय चव्‍हाण या विचारात मी पडलो होतो.' 
विजय चव्हाण यांनी 'टूर टूर' या नाटकातर्फे व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. त्‍यानंतर 'मोरूची मावशी' या नाटकाने त्‍यांना प्रेक्षकांच्‍या गळ्‍यातलं ताईत बनवलं. 'अशी ही फसवाफसवी,' 'तू तू मी मी' ही त्यांची नाटकंही गाजली. 
विजय यांनी अनेक एकांकिका, नाटकांतून काम केलं होतं. सहाय्‍यक कलाकार म्‍हणूनही तितकाच दर्जेदार अभिनय त्‍यांनी पडद्‍यावर साकारला. जवळपास चारशे चित्रपटांतून वेगवेगळ्‍या भूमिका केल्‍या. एक विनोदी अभिनेता म्‍हणून त्‍यांची ख्‍याती असली तरी संवेदनशील भूमिकाही त्‍यांनी तेवढ्‍या सहजतेने पार पाडल्‍या होत्‍या. 
Image result for vijay chavan
१९८५मध्ये 'वहिनीची माया' या चित्रपटातून त्‍यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. 'वहिनीची माया,' 'घोळात घोळ,' 'माहेरची साडी,' 'एक होता विदूषक,' 'छकुला,' 'झपाटलेला,' थरथराट,' 'शेम टू शेम,' 'चिकट नवरा,' 'सत्वपरीक्षा,' 'चिमणी पाखरं,' 'पछाडलेला,' 'जत्रा,' 'खबरदार,' 'शुभमंगल सावधान,' 'श्रीमंत दामोदर पंत,' 'नाना मामा,' 'झपाटलेला १ आणि २,' 'अगं बाई अरेच्चा,' 'जबरदस्त,' 'सांगतो ऐका,' 'जिगर,' 'नो प्रॉब्लेम,' 'बलिदान,' 'नाथा पुरे आता,' 'चल लवकर,' 'सावट,' 'मुंबईचा डबेवाला' अशा तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं.
अशोक सराफ आणि लक्ष्‍मीकांत बेर्डे, प्रशांत दामले यांच्‍यासोबत विजय चव्‍हाण यांनी काम केलं होतं. अशोक सराफ आणि लक्ष्‍मीकांत बेर्डे यांच्‍या विनोदी भूमिकेबरोबरच विजय चव्‍हाण यांचेही नाव विनोदी सहकलाकार म्‍हणून घेतलं जातं.  
एप्रिल २०१८ मध्ये झालेल्या राज्य चित्रपट सोहळ्यात विजय चव्‍हाण यांचा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारानं गौरव करण्यात आला होता.

...म्‍हणून आई बनू शकल्‍या नाहीत सायरा बानो






बॉलिवूडची  दिग्गज अदाकारा सायरा बानो यांचा आज ७४ वा वाढदिवस. सायरा इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्रींपैकी एक. ६०-७०च्‍या दशकात आपल्‍या अभिनयाने त्‍यांनी प्रेक्षकांवर अधिराज्‍य गाजवलं. सिनेरसिक त्‍यांच्‍या सौंदर्याचे वेडे होते. सायरा बानो यांच्‍या जन्‍मदिनी जाणून घेऊयात त्‍यांच्‍या आयुष्‍यातील खास गोष्‍टी.

२३ ऑगस्ट १९४४ मध्‍ये सायरा बानो यांचा जन्‍म झाला. सायरा हिंदी अभिनेत्री नसीम बानो यांची कन्‍या. सायरा यांचं बालपण लंडनमध्‍ये गेलं. पण, १९६० मध्‍ये त्‍या मुंबईत आल्‍या. त्‍यावेळी त्‍यांची भेट निर्माता-दिग्‍दर्शक शशधर मुखर्जी यांच्‍याशी झाली. येथून त्‍यांच्‍या करिअरला सुरूवात झाली. 
Related image
'जंगली'मधून डेब्‍यू
१९६१ मध्‍ये त्‍यांनी बॉलिवूडमध्‍ये चित्रपट 'जंगली'मधून डेब्यू केलं. त्‍यात शम्मी कपूर यांची मुख्य भूमिका होती. चित्रपटात सायरा एका काश्मीरी तरुणीच्‍या भूमिकेत दिसल्‍या. हा चित्रपट हिट ठरला होता. सायरा या चांगल्‍या अभिनेत्री म्‍हणून ओळख असली तरी त्‍या त्‍यांच्‍या लव्‍हस्‍टोरीमुळे ओळखल्‍या जातात. 
Image result for saira banu and dilip kumar
सायरा बानो १२ वर्षांच्‍या असताना त्‍यांना सुपरस्टार दिलीप कुमार आवडायचे. एक फॅन ते एक पत्नी होण्‍यापर्यंतचा त्‍यांचा प्रवास इंटरेस्‍टिंग आहे. सायरा बानो यांनी एका मुलाखतीत म्‍हटले होते की, '१२ वर्षांची असल्‍यापासून ट्रेजडी किंग दिलीप कुमार मला आवडयचे.' 
Related image
सायरा यांनी पहिल्‍यांदा दिलीप कुमार यांना १९५२ मध्‍ये 'आन' चित्रपटात पाहिलं होतं. तेव्‍हाच त्‍यांना दिलीप कुमार यांच्‍याशी प्रेम झालं. १९६६ मध्‍ये सायरा यांनी अभिनेता दिलीप कुमार यांच्‍याशी विवाह केला. त्‍यावेळी सायरा २२ वर्षांच्‍या तर दिलीप कुमार ४४ वर्षांचे होते. लग्‍नानंतर दोघांच्‍याही जीवनात अनेक चढ-उतार आले. दिलीप कुमार यांनी दुसरं लग्‍न देखील केलं. दिलीप कुमार यांनी आसमा नावाच्‍या महिलेशी लग्‍न केलं होतं. सायरा बानो आई होऊ शकत नव्‍हत्‍या, म्‍हणून दिलीप यांनी हे लग्‍न केल्‍याचं म्हटलं जातं. परंतु, हे लग्‍न फार काळ टिकू शकलं नाही. दिलीप पुन्‍हा सायरा यांच्‍याकडे आले. 
Image result for saira banu and dilip kumar
सायरा का आई बनू शकल्‍या नाहीत; दिलीप यांचा खुलासा
अभिनेता दिलीप कुमार यांनी आपल्‍या पुस्‍तकात 'द सब्सटेंस ॲण्‍ड द शॅडो'मध्‍ये सायरा बानो यांच्‍याशी लग्‍न केल्‍याचं म्‍हटलं होतं. १९७२ मध्‍ये सायरा प्रेग्नेंट होत्‍या, हा खुलासाही खुद्‍द दिलीप यांनी केला होता. दिलीप कुमार यांनी पुस्‍तकात म्‍हटलं होतं की, 'प्रेग्नेंसीच्‍या आठव्‍या महिन्‍यात सायरा बानो यांना हाय ब्‍लड प्रेशरचा त्रास होता. त्‍याचदरम्‍यान, आम्‍ही आमचं बाळ गमावलं. नंतर आम्‍हाला कळालं की, मुलगा होता. आम्‍ही त्‍याला वाचवू शकलो नाही. त्‍यानंतर सायरा कधी आई बनू शकल्‍या नाहीत.'
असे असले तरी सायरा आणि दिलीप कुमार यांची जोडी कायम आहे. 
Related image
सायरा यांच्‍यासाठी १९६४ हे साल खुपच खास 
सायरा बानो १९६४ हे वर्ष खूपच खास ठरलं. यावर्षी त्‍यांचे 'दूर की आवाज', 'आओ प्यार करें', 'आई मिलन की बेला' आणि 'एप्रिल फूल' यसारखे चित्रपट आले. हे चित्रपट गाजले. 
Related image

प्रियांकाच्‍या आधी निकचं 'या' ७ सेलेब्‍ससोबत डेटिंग




नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 
मध्‍यंतरी सोशल मीडियावर प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक  निक जोनस यांच्‍यातील तथाकथित अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. गेल्‍या काही दिवसांपूर्वी दोघांचे फोटोही समोर आले होते.  प्रियांका आणि निक या दोघांची मैत्री इतकी खास आहे की, त्‍यांच्‍याबद्‍दल रोज एक वृत्त येत होते. प्रियांकाच्‍या आधी २५ वर्षांच्‍या  निक जोनसच्‍या आयुष्‍यात सात जणी (सुंदर्‍या) आल्‍या होत्‍या. निकच्‍या आयुष्‍यातील गर्लफ्रेंड, त्‍याची डेटिंग हिस्‍ट्री आणि ब्रेकअपची कारणे पाहिलीत तर आवाक राहाल. 

मिली सायरस
तेरा वर्षांचा असताना निक जोनसला मिली सायरसशी प्रेम झालं होतं.  मिली ही निकची पहिली गर्लफ्रेंड असल्‍याचं म्‍हटलं जातं. हे दोघे पहिल्‍यांदा २००६ मध्‍ये एका चॅरिटी इव्‍हेंटमध्‍ये भेटले होते. हा इव्‍हेंट एका चॅनेलने आयोजित केलं आहे. तेथून हे एकमेकांना डेट करू लागले. परंतु, हे प्रेम फार काळ टिकलं नाही. १ वर्षांनंतर म्‍हणजेच २००७ मध्‍ये त्‍यांचं ब्रेकअप झालं. 
Related image
सेलेना गोमेज
मिली सायरसशी वेगळं झाल्‍यानंतर २००८ मध्‍ये निकने सेलेना गोमेजला डेट केलं. यावर्षी 'बर्निंग अप' सॉन्गमध्‍ये सेलेना गोमेज आणि निक जोनसने एकत्र स्टेज शेअर केलं होतं. त्‍यावेळी निक १५ वर्षांचा होता. हे डेटिंग एक वर्षच राहिलं.  ब्रेकअपनंतरही दोघे एकमेकांना भेटत असत, असे म्‍हटले जायचे. ही भेट पुन्‍हा २०१० मध्‍ये रोमान्‍समध्‍ये बदललं. परंतु, पुन्‍हा त्‍यांचं प्रेम टिकलं नाही. दोघांनी ब्रेकअप केलं. 
Related image
डेल्टा गुड्रम
फेब्रुवारी २०१२ पर्यंत निकने डेल्टा गुड्रमला डेट केलं आणि काही कारणाने त्‍यांच्‍यात ब्रेकअप झाला. त्‍यांच्‍या ब्रेकअपमागे कुठलेही खास कारण समोर आले नाही. 
Related image
केंडाल जेनर
एक न्यूज पोर्टलच्‍या सूत्रांच्‍या हवाल्‍याने माहिती मिळाली होती की, निक आणि केंडाल जेनरने २०१५ म्‍ये एकमेकांना डेट करणं सुरू केलं होतं. 
जॉर्जिया फॉलर
गतवर्षी असे वृत्त समोर आले होते की, 'व्‍हिक्टोरिया सीक्रेट' मॉडल जॉर्जिया फॉलरसोबत निक डेट करत आहे. ही गोष्‍ट तेव्‍हाची आहे जेव्‍हा निक त्‍याचा भाऊ जोच्‍या साखरपुड्‍याच्‍या पार्टीत जॉर्जियासोबत दिसला होता. तर दोघेही कॅज्‍युअली डेटिंग करत असल्‍याचेही वृत्त होते. 
ओलिविया कल्पो
ओलिविया कल्पो
ओलिविया आणि निक यांचं रिलेशनशीप बरेच दिवस टिकलं. निकच्‍या आयुष्‍यात कुठलीही मुलगी १ वर्षांपेक्षा जास्‍त काळ टिकत नाही, असं म्‍हटलं जातं. मात्र, याबाबत ओलिविया सर्वांत लकी ठरली. निक-ओलिवियाचं रिलेशनशीप २०१३ मध्‍ये सुरू झालं होतं. २ वर्षांनंतर दोघेही २०१५ मध्‍ये वेगळे झाले. 
Image result for singer nick girlfriend olivia culpo
लिली कॉलिन्स
सेलेनाशी ब्रेकअप केल्‍यानंतर निकच्‍या आयुष्‍यात ब्रिटिश अभिनेत्री लिली कॉलिन्सने एन्‍ट्री घेतली. असं म्‍हटलं जात की, सेलेना गोमेज आणि निकमध्‍ये दुरावा निर्माण होण्‍याच कारण लिली होती, असं म्‍हटलं जात होतं. परंतु, नंतर ट्विटरवर निकने स्‍वत: लिलीसोबतच्‍या रिलेशनशीपला नकार दिला. 
Image result for singer nick girlfriend lily collins
प्रियांका चोप्रा
निक आणि बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राचं नाव जोडलं गेलं काही दिवसांपूर्वी निक जोनस प्रियांकासोबत भारतात आला होता. गोव्‍यात एन्‍जॉय केल्‍यानंतर त्‍यांनी आकाश अंबानीच्‍या फंक्‍शनलाही हजेरी लावली होती. शिवाय, प्रियांकाने निकला आपल्‍या आईशी भेटवल्‍याचेही वृत्त होते. आता निक आणि प्रियांकाची मैत्री किती काळ टिकते, हे पाहावे लागेल.
Image result for singer nick and priyanka

प्रियांकालाच नाही; 'या' देसी गर्ल्सनाही मिळाला 'विलायती बाबू'




मुंबई : पुढारी ऑनलाईन 
बॉलिवूडमध्‍ये अनेक सेलेब्‍सच्‍या जोड्‍या जमल्‍या. बॉलिवूडमधल्‍या काही 'देसी गर्ल्स'ना त्‍यांचा जोडीदार परदेशातील मिळाला आहे. काही अभिनेत्री अशा आहेत, ज्‍यांनी परदेशातील व्‍यक्‍तीशी लग्‍न केले आहे. तर काही जणी रिलेशनशीपमध्‍ये आहेत. या देसी गर्ल्सच्‍या परदेशी जोडीदारांपैकी काही जण खेळाडू आहेत तर कुणी हॉलिवूड अभिनेता. कुणी उद्‍योगपती आहे तर काहींना अभिनयात इंटरेस्ट आहे. बॉलिवूडच्‍या ७ अभिनेत्री अशा आहेत, ज्‍यांनी सातासमुद्रापार असलेल्‍या व्‍यक्‍तींशी प्रेम केलं. 

प्रियांका आणि निक जोनस : 
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा विधीवत साखरपुडा पार पडला आहे. निक जोनस गायक असून तो प्रियांकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. त्‍यांची भेट मेट गाला येथे २०१७ मध्‍ये झाली होती. त्‍यानंतर प्रियांकाने निकच्‍या कझिनच्‍या लग्‍नाला हजेरी लावली होती. प्रियांका आणि निकचा १८ ऑगस्ट २०१८  ला साखरपुडा झाला. 
आता मीडिया रिपोर्टनुसार, बॉलिवूड-हॉलिवूड ही जोडी ऑक्‍टोबरमध्‍ये लग्‍न करू शकते. हे लग्‍न परदेशात होऊ शकते, असे म्‍हटले जात आहे. 
Related image
तापसी पन्नू आणि मॅथिस बोए : 
दाक्षिणात्‍य चित्रपटानंतर बॉलिवूडमध्‍येही आपली वेगळी प्रतिमा निर्माण करणार्‍या  तापसी पन्नू बॅडमिंटन खेळाडू मॅथिस बोएलाला डेट करत आहे. डेनमार्कचा मॅथिस  गेल्‍या ४ वर्षांपासून तापसीला डेट करत असून २०१३ मध्‍ये झालेल्‍या इंडियन बॅडमिंटन लीग दरम्‍यान, दोघांची भेट झाली होती. ऑगस्ट २०१८ मध्‍ये दोघेही लंच डेटवर स्पॉट झाले होते. दोघांनीही आपले रिलेशनीपबद्‍दल उघडपणे सांगितलेले नाही. 
Related image
प्रीति झिंटा आणि जेन गुडनॉफ :
प्रीति जिंटाला तिचं प्रेम यूएसमध्‍ये मिळालं. इन्‍व्‍हेस्टमेंट बँकर असलेला जेन गुडनॉफसोबत प्रीती रिलेशनशीपमध्‍ये होती. त्‍यानंतर तिने २०१६ मध्‍ये जेनशी लग्‍न केलं. हा लग्‍नसोहळा लॉस एंजिल्समध्‍ये भारतीय पारंपरिक पध्‍दतीने पार पडला होता. 
लवकरच प्रीति बॉलिवूडमध्‍ये 'भैय्‍या जी सुपरहिट' या चित्रपटातून परत येतेय. चित्रपटात सनी देओल आणि अरशद वारसी यांच्‍याही भूमिका आहेत. 
Related image
श्रुती हासन आणि मायकल कॉर्सेल : 
लंडनमधील थिएटर आर्टिस्ट मायकल कॉर्सेल हा श्रुती हासनचा बॉयफ्रेंड आहे. दोघांची भेट लंडनमध्‍ये झाली होती. डिसेंबर २०१७ मध्‍ये श्रुती, मायकल आणि दाक्षिणात्‍य सुपरस्‍टार कमल हासन यांना एकत्र एका लग्‍न सोहळ्‍यात पाहण्‍यात आले होते.  मध्‍यंतरी, श्रुती आणि मायकल यांनी लग्‍न केल्‍याची चर्चा होती. परंतु, श्रुतीने हे वृत्त खोटे असल्‍याचे म्‍हटले. 
Related image
सेलिना जेटली आणि पीटर हॉग: 
दुबईत झालेल्‍या भेटीनंतर पीटर हा सेलिना जेटलीच्‍या फॅमिलीला भेटण्‍यासाठी भारतात आला होता. २०११ मध्‍ये सेलिनाने पीटरशी लग्‍न केलं. ऑस्ट्रियन उद्‍योगपती पीटर हॉगचे दुबई आणि सिंगापुरमध्‍ये हॉटेल्स आहेत. सेलिना जेटलीला विंसटन आणि विराज अशी जुळी मुले आहेत. दुसर्‍यांदा २०१७ मध्‍ये देखील सेलिनाला जुळी मुले झाली होती. त्‍यातील एक मुल जिवंत राहू शकले नाही. 
Image result for celina jaitley and her husband
इलियाना डिक्रूज आणि एंड्रयू नीबोन :
ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर एंड्रयू आणि अभिनेत्री इलियाना डिक्रूज गेल्‍या ४ वर्षांपासून रिलेशनशिपमध्‍ये आहेत. दोघांनी सीक्रेट मॅरिज केल्‍याचं मध्‍यंतरी वृत्त होतं. परंतु, इलियानाकडून याबाबतची कुठलीही माहिती समोर आली नाही. 
इलियानाचा आगामी चित्रपट 'अमर अकबर ॲन्‍थोनी' ऑक्‍टोबर २०१८ ला रिलीज होणार आहे. 
Image result for ileana d'cruz and andrew kneebone
श्रिया सरन आणि आंद्रेई कोश्चीव : 
श्रियाचा जोडीदार आंद्रेई रशियन टेनिस खेळाडू आहे. मार्च २०१८ मध्‍ये दोघांनी उदयपूरमध्‍ये लग्‍न केलं होतं. याआधी मुंबईत श्रियाच्‍या घरी सीक्रेट वेडिंग सोहळा पार पडला होता.  
Image result for shriya saran and her husband
राधिका आपटे आणि बेनडिक्ट टेलर :
युके बेस्ड बेनडिक्ट संगीतकार आहे. राधिका-बेनडिक्ट दांची भेट लंडनमध्‍ये झाली होती. राधिका लंडनमध्‍ये कंटेम्परेरी डान्‍स ट्रेनिंगसाठी गेली होती. लिव्‍हइन रिलेशनशीपमध्‍ये राहिल्‍यानंतर सप्‍टेंबर २०१२ मध्‍ये राधिका-बेनडिक्टने कोर्ट मॅरेज केलं होतं. राधिकाचा जवळचा मित्र सारंग साठ्येने बेनडिक्ट-राधिकाच्‍या लग्‍नाबद्‍दल सांगितलं होतं. तोपर्यंत कुणालाही माहित नव्‍हतं की, राधिका विवाहित आहे.  
Related image

गुलजार जन्‍मदिवस विशेष : आओ तुमको उठा लूँ कंधोंपर, तुम उचककर शरीर होठों से चूम लेना


मायूसी की झिल्ली आँखों से उतरी कुछ लम्हों को--
फिर तेरी आवाज को, आखरी बार "खुदा हाफिज"
कल्पनांच्‍या पलीकडे जाऊन शब्दांची रचना करणार्‍या गुलजार यांचा आज जन्मदिवस. फाळणी आधीच्‍या भारतातल्‍या झेलम जिल्‍ह्‍यात १८ ऑगस्‍ट, १९३४ त्‍यांचा जन्‍म झाला. हा भाग आता आता पाकिस्तानात आहे. त्‍यांनी कमी वयात लेखनाची सुरूवात केली होती. बालपणीच त्‍यांच्‍या आईचे निधन झाले. 
एक प्रतिभावंत कवी, शायर आणि गीतकार म्‍हणून गुलजार यांची ख्‍याती. त्यांच्या अनेक रचनांनी कविता, साहित्‍यातच नाही तर हिंदी सिनेसृष्‍टीत स्‍थान मिळवलं. हिंदी सीनेसंगीत जगतातील त्‍यांची गाणी आजही आठवतात. 'तुझसे नाराज नही...'पासून ते 'बिडी जलायले...'पर्यंतच्या त्यांच्या गाण्‍यांचा नजराणा बॉलिवूडमध्‍ये समृध्‍द आहे. 'मासूम' चित्रपटातील 'तुझसे नाराज नही जिंदगी...' या गाण्‍याने संगीत रसिकांच्‍या मनावर गारूड केलं. आर. डी. बर्मन यांनी गुलजार यांच्या या शब्दांना संगीत दिलं होतं. आजदेखील हे गाणे तितक्‍याच ताकदीने कुणाला गाता आलेले नाही. 

'आनंद' चित्रपट 
'आनंद' चित्रपट म्‍हटलं की, आठवतात ते राजेश खन्ना. याच चित्रपटातील 'मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने...' हे प्रसिध्‍द गाणं. गुलजार यांचीच ही रचना. ओठांवर रूळणारं हे गाणं विसरता येत नाही.  
'मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है...' केवळ शब्‍द असणारी ही रचनेला गीत रुप देणे, आव्‍हानात्‍मकचं. या रचनेतील जितके सुंदर शब्‍द तितकेच या गाण्‍याला स्‍वरबध्‍द करण्‍यात आलं आहे.  
'घर' चित्रपट
गुलजार यांची 'आप की आँखों मे कुछ महके हुए से राज है',  'आपसे भी खुबसुरत आपके अंदाज है...' ही रचना आणि त्‍याचं संगीत देखील अप्रतिम आहे. 
'गोलमाल' चित्रपट
अमोल पालेकर यांच्या 'गोलमाल' चित्रपटातील 'आनेवाला पल जानेवाला है...' हेही असंच एक सुंदर गीत. 
'माचिस' चित्रपट
या चित्रपटातलं 'चप्पा चप्पा चरखा चले...' या गाण्‍याने तर तरुणांना वेड लावलं. 
बदलत्या काळाला अनुसरून गुलजार यांनी उडत्‍या चालीची गाणीही लिहिली. 'बिडी जलायले जिगर से पिया...' हे गाणं हिट ठरलं. 
अनेक फिल्मफेअर आणि ग्रॅमी अॅवार्ड मिळवणारे गुलजार यांच्‍या या खास कविता -

इक सन्नाटा भरा हुआ था,
एक गुब्बारे से कमरे में,
तेरे फोन की घंटी के बजने से पहले.
बासी सा माहौल ये सारा
थोड़ी देर को धड़का था
साँस हिली थी, नब्ज़ चली थी,
मायूसी की झिल्ली आँखों से उतरी कुछ लम्हों को--
फिर तेरी आवाज़ को, आखरी बार "खुदा हाफिज़"
कह के जाते देखा था!
इक सन्नाटा भरा हुआ है,
जिस्म के इस गुब्बारे में,
तेरी आखरी फोन के बाद--!!


मैं कुछ-कुछ भूलता जाता हूँ अब तुझको,
तेरा चेहरा भी अब धुँधलाने लगा है अब तखय्युल में,
बदलने लग गया है अब यह सुब-हो-शाम का
मामूल,जिसमें,
तुझसे मिलने का ही इक मामूल शामिल था!
तेरे खत आते रहते थे तो मुझको याद रहते थे
तेरी आवाज़ के सुर भी!
तेरी आवाज़ को कागज़ पे रख के,मैंने चाहा
था कि 'पिन' कर लूँ,
वो जैसे तितलिओं के पर लगा लेता है कोई
अपनी अलबम में--!
तेरा 'बे'को दबा कर बात करना,
"वाव" पर होठों का छल्ला गोल होकर घूम
जाता था--!
बहुत दिन हो गए देखा नहीं,ना खत मिला कोई--
बहुत दिन हो गए सच्ची !!
तेरी आवाज़ की बौछार में भीगा नहीं हूँ मैं!


मैं दीवार की इस जानिब हूँ .
इस जानिब तो धूप भी है हरियाली भी !
ओस भी गिरती है पत्तों पर,
आ जाये तो आलसी कोहरा,
शाख पे बैठा घंटों ऊँघता रहता है.
बारिश लम्बी तारों पर नटनी की तरह थिरकती,
आँखों से गुम हो जाती है,
जो मौसम आता है,सारे रस देता है !
लेकिन इस कच्ची दीवार की दूसरी जानिब,
क्यों ऐसा सन्नाटा है
कौन है जो आवाज नहीं करता लेकिन--
दीवार से टेक लगाए बैठा रहता है.


ठंडी साँसे ना पालो सीने में
लम्बी सांसों में सांप रहते हैं
ऐसे ही एक सांस ने इक बार
डस लिया था हसी क्लियोपेत्रा को
मेरे होटों पे अपने लब रखकर
फूँक दो सारी साँसों को 'बीबा'
मुझको आदत है ज़हर पीने की

.
आओ तुमको उठा लूँ कंधों पर
तुम उचककर शरीर होठों से चूम लेना
चूम लेना ये चांद का माथा
आज की रात देखा ना तुमने
कैसे झुक-झुक के कोहनियों के बल
चांद इतना करीब आया है

सीता और गीता शिवाय, 'हे' चित्रपट, गाणीही आवडती


साहित्य, कवितांबरोबरच चित्रपटांशीही त्‍यांचं खास नातं होतं. काही चित्रपट, गाणीही त्‍यांना आवडायची. अभिनेत्री हेमा मालिनी यांचा सीता और गीता (१९७२) हा चित्रपट त्‍यांना इतका आवडला की, यांनी तो २५ वेळा पाहिला होता. या गोष्‍टीचा खुलासा खुद्‍द हेमा मालिनी यांनी केलं होतं. सीता और गीता याशिवाय, अटलजींना आवडलेला चित्रपट म्‍हणजे 'तिसरी कसम'.


प्रसिद्ध साहित्यकार फणीश्वर नाथ रेणु यांची कहाणी मारे गए गुलफाम वर आधारित 'तिसरी कसम' चित्रपट १९६६ मध्‍ये आला होता. चित्रपटाच्‍या माध्‍यमातून या कथेतील प्रेम कहाणी मोठ्‍या पडद्‍यावर दाखवण्‍यात आली होती. राज कपूर आणि वहीदा रहमान यांच्‍यावर हा चित्रपट चित्रीत करण्‍यात आला होता. 'तिसरी कसम' हिंदी सिनेसृष्‍टीतील मैलाचा दगड ठरला होता. बासु भट्टाचार्य दिग्‍दर्शित या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध गीतकार शैलेन्द्र होते. हा चित्रपट अटलजींना आवडला होता. या चित्रपटाला १९६७ मध्‍ये ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’मध्‍ये सर्वोत्‍कृष्‍ट हिंदी फीचर चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता.
त्‍याचबरोबर अटलजींना देवदास आणि बंदिनी यांचा चित्रपट आवडला होता. त्‍याचबरोबर अमिताभ आणि राखी यांच्‍यावर चित्रीत करण्‍यात आलेलं गाणं  'कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है...'देखील आवडतं होतं. हे गाणं १९७६ मध्‍ये आलेला 'कभी कभी' या चित्रपटातील आहे. 

जगजीत सिंह यांच्‍या आवाजात अटलजींच्‍या कविता (Video)






माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्‍या कविता प्रसिध्‍द आहेत. त्‍यांच्‍या कवितांना अनेक बॉलिवूड गायकांनी आपला जादुई आवाज दिला आहे. ज्‍यावेळी अटलजी पंतप्रधान होते, त्‍यावेळी त्‍यांच्‍या कवितांवर म्युझिक अल्बम बनवण्‍यात आले होते. या अल्‍बमला लता मंगेशकर, गझल गायक जगजीत सिंह, हरिहरन, पद्मजा जग आणि शंकर महादेवन यांनी आवाज दिला होता. 

जगजीत सिंह यांनी अटलजी यांच्‍या कवितांवर 'नई दिशा' हा अल्‍बम आणला होता. १९९९ मध्‍ये आलेल्‍या या अल्‍बमला बेस्ट नॉन फिल्म लिरिक्‍स कॅटेगरीत स्क्रीन अॅवॉर्ड दिला होता. अटलजी नेते असताना मनोरंजन जगतात हा अॅवॉर्ड मिळवणारे पहिले व्यक्ती होते. परंतु, वेळेच्‍या अभावी ते या ॲवॉर्ड सोहळ्‍यात सहभागी होऊ शकले नाहीत. नंतर त्‍यांना त्‍यांच्‍या निवासस्‍थानी सन्‍मानित करण्‍यात आले. 
यानंतर २००२ मध्‍ये जगजीत यांनी 'संवेदना' अल्‍बममध्‍ये अटल बिहारी यांच्‍या कवितांना आपला आवाज दिला. हा अल्‍बम यश चोप्रा यांनी दिग्‍दर्शित केला होता. शाहरुख खानचा त्‍यात भूमिका होती. जगजीत यांनी अल्‍बममध्‍ये ८ कवितांना स्‍वरसाज चढवला. अटल बिहारी यांचा कविता संग्रह 'मेरी इक्यावन रचनाएं' यातील काही कविता या लता मंगेशकर यांनी स्‍वरबध्‍द केल्‍या होत्‍या. या अल्‍बमने जगजीत सिंह, जावेद अख्तर, अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि यश चोप्रा यांना एकाच व्‍यासपीठावर एकत्र आणलं होतं. 'संवेदना'ची प्रस्तावना जावेद अख्तर यांनी लिहिली होती. तर आवाज अमिताभ बच्चन यांनी दिला होता. शाहरुखने 'क्या खोया क्या पाया' या कवितेवर अभिनय केला होता. 


लताजींनी जागवल्‍या अटलजींच्‍या आठवणी






अटल बिहारी वाजपेयी फक्‍त नेतेच नाही तर ते उत्तम कवी, लेखक होते. त्‍याचबरोबर बॉलिवूडशी त्‍यांचं खास नातं होतं. अटल बिहारी वाजपेयी हे गायि‍का लता मंगेशकर यांच्‍याशीही खास नातं होतं. लता मंगेशकर यांनी अटलजी यांच्‍या निधनानंतर दु:ख व्‍यक्‍त केलं आहे. त्‍यांनी एका वेबसाईटशी बोलताना आपल्‍या आठवणी सांगितल्‍या आहेत. 

लता मंगेशकर म्‍हणाल्‍या, 'मला वाटतयं की, भारतमधून एक साधु पुरुष गेला. ते खूप उत्तम लेखक आणि कवी होते. अटलजी यांच्‍या भाषणात सर्व काही सत्‍य असायचं, ते चांगले व्‍यक्‍ती होते. त्‍यांनी कुणाचं कधीही मन दुखावलं नाही. मी त्‍यांना माझ्‍या वडिलांप्रमाणे मानत होते. जेव्‍हा मी त्‍यांना म्‍हणाले, मी आपल्‍याला माझ्‍या वडिलांप्रमाणे मानते. हे ऐकून ते म्‍हणाले होते की, मी देखील आपल्‍याला माझी मुलगी मानतो. त्‍यानंतर मी त्‍यांना दद्‍दा म्‍हणू लागले. ते माझ्‍या प्रेम करत होते. ते सगळ्‍यांवर प्रेम करत होते.'  
Related image
'१९४२ मध्‍ये माझ्‍या वडिलांचा मृत्‍यू झाला होता, आज तितकाच मोठा धक्‍का मला बसला आहे,' असे लताजी म्‍हणाल्‍या. 
लता मंगेशकर यांनी एक आठवण सांगितली की, 'ज्‍यावेळी आम्‍ही आमच्‍या वडिलांच्‍या नावे एक हॉस्‍पिटल उभारले होते. त्‍यावेळी हॉस्‍पिटलच्‍या उद्‍घाटनाला अटल बिहारी वाजपेयींना आमंत्रित केलं होतं. उद्‍घाटन समारंभाच्‍या शेवटी त्‍यांनी भाषण केलं होतं. ते म्‍हणाले होते, आपलं हॉस्‍पिटल चांगले चालावे, अशा शुभेच्‍छा मी देणार नाही. कारण, अशा शुभेच्‍छा देण्‍याचा अर्थ लोक आजारी पडू देत असा होईल. हे ऐकून मी पुढे काही बोलू शकले नाही.'
लता मंगेशकर यांनी ट्‍विटरवर लिहिलं होतं की, 'अटलजी यांच्‍या निधनाचे वृत्त ऐकून असं वाटलं की, डोंगर कोसळला. ईश्वर त्‍यांच्‍या आत्म्‍याला शांती देवो.'  

'या' अल्बमसाठी अटलजींना मिळाला होता स्क्रीन अॅवॉर्ड






माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्‍या कविता प्रसिध्‍द आहेत. त्‍यांच्‍या कवितांना अनेक बॉलिवूड गायकांनी आपला जादुई आवाज दिला आहे. ज्‍यावेळी अटलजी पंतप्रधान होते, त्‍यावेळी त्‍यांच्‍या कवितांवर म्युझिक अल्बम बनवण्‍यात आले होते. या अल्‍बमला लता मंगेशकर, गझल गायक जगजीत सिंह, हरिहरन, पद्मजा जग आणि शंकर महादेवन यांनी आवाज दिला होता. 

अल्‍बम 'नई दिशा' मिळाला होता स्क्रीन अॅवॉर्ड
जगजीत सिंह यांनी अटलजी यांच्‍या कवितांवर 'नई दिशा' हा अल्‍बम आणला होता. १९९९ मध्‍ये आलेल्‍या या अल्‍बमला बेस्ट नॉन फिल्म लिरिक्‍स कॅटेगरीत स्क्रीन अॅवॉर्ड दिला होता. अटलजी नेते असताना मनोरंजन जगतात हा अॅवॉर्ड मिळवणारे पहिले व्यक्ती होते. परंतु, वेळेच्‍या अभावी ते या ॲवॉर्ड सोहळ्‍यात सहभागी होऊ शकले नाहीत. नंतर त्‍यांना त्‍यांच्‍या निवासस्‍थानी सन्‍मानित करण्‍यात आले. 
यानंतर २००२ मध्‍ये जगजीत यांनी 'संवेदना' अल्‍बममध्‍ये अटल बिहारी यांच्‍या कवितांना आपला आवाज दिला. हा अल्‍बम यश चोप्रा यांनी दिग्‍दर्शित केला होता. शाहरुख खानचा त्‍यात भूमिका होती. जगजीत यांनी अल्‍बममध्‍ये ८ कवितांना स्‍वरसाज चढवला. अटल बिहारी यांचा कविता संग्रह 'मेरी इक्यावन रचनाएं' यातील काही कविता या लता मंगेशकर यांनी स्‍वरबध्‍द केल्‍या होत्‍या.

'या' अभिनेत्रीचे फॅन होते अटल बिहारी वाजपेयी






माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाले. एक नेते, कवी, लेखक म्‍हणून त्‍यांची ख्‍याती. इतकेच नाही तर अटल बिहारी वाजपेयी हे अभिनेत्री हेमा मालिनी यांचे मोठे फॅन होते. त्‍यांना हेमा मालिनी यांचा १९७२ मध्‍ये रिलीज झालेला चित्रपट 'सीता और गीता' इतका आवडला होता की, त्‍यांनी हा चित्रपट २५ वेळा पाहिला होता. खुद्‍द हेमा मालिनी यांनी ही माहिती दिली होती. चित्रपट 'सीता और गीता'मध्‍ये हेमा मालिनी यांची दुहेरी भूमिका होती. त्‍या चित्रपटाचे दिग्‍दर्शक रमेश सिप्पी होते. या चित्रपटात हेमा मालिनी सोबत धर्मेंद्र आणि संजीव कुमार यांच्‍यादेखील मुख्‍य भूमिका होत्‍या. या चित्रपटात हेमा मालिनी यांना फिल्मफेअर सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता.  

Image result for hema malini
हेमा मालिनी म्‍हणाल्‍या होत्‍या की, 'मला आठवतयं की, ज्‍यावेळी मी पदाधिकार्‍यांना म्‍हणाले होते की, मी माझ्‍या भाषणात अटल बिहारी वाजपेयी यांचा उल्‍लेख करते. परंतु, मी त्‍यांना कधी भेटलेले नाही. त्‍यानंतर माझी अटलजी यांच्‍याशी भेट झाली.  या भेटीत अटल बिहारी वाजपेयी माझ्‍याशी बोलले नाहीत. मग तेथे उपस्‍थित असलेल्‍या एका महिलेला मी विचारलं की, अटलजी माझ्‍याशी का बोलत नाहीत? तर ती महिला म्‍हणाली, अटलजी आपले खूप मोठे फॅन आहेत. त्‍यांनी १९७२ मध्‍ये आलेला चित्रपट 'सीता और गीता' हा २५ वेळा पाहिला आहे.'

'या' चित्रपटात अटलजींची महत्त्‍वाची भूमिका





माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती नाजूक आहे. याचदरम्‍यान, एक फोटो व्‍हायरल होत आहे. हा फोटो माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्‍यावर आयुष्‍यावर येणारा चित्रपट 'द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'मधला आहे. 

या चित्रपटात मनमोहन सिंह यांची भूमिका अनुपम खेर साकारत आहेत.  अभिनेता राम अवतार भारद्वाज हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा एक फोटो अनुपम खेर यांनी ट्‍विट करुन या चित्रपटातील कलाकारांबद्‍दल माहिती दिली होती. 
द एक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट डॉ. मनमोहन सिंह यांचे तत्‍कालीन  मीडिया सल्‍लागार संजय बारू यांचं पुस्‍तक ‘The Accidental Prime Minister: The Making And Unmaking of Manmohan Singh’ यावर आधारित आहे. हा चित्रपट विजय रत्नाकर गुट्टे दिग्‍दर्शित करत आहेत. या चित्रपटातून विजय रत्नाकर गुट्टे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. चित्रपट २१ डिसेंबरला रिलीज होणार आहे.
dinsta
हंसल मेहता या चित्रपटाचे क्रिएटिव्‍ह निर्माते आहेत. अक्षय खन्ना संजय बारू यांच्‍या तर जर्मन अभिनेत्री सुजैन बर्नर्ट या सोनिया गांधी यांच्‍या भूमिकेत दिसणार आहे. राहुल गांधी यांची भूमिका अर्जुन माथुर साकारत आहेत. 

वाजपेयींनी दिलेली अणुचाचणीची माहिती, 'परमाणु'ने दाखवला सीन







माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच नाव राजकारणात मोठं आहे. भाजप पक्षाचे अध्‍यक्ष ते पंतप्रधान असा त्‍यांचा राजकीय प्रवास मोठा आहे. १९९८ मध्‍ये ज्‍यावेळी वाजपेयी पंतप्रधान होते. त्‍यावेळी त्‍यांच्‍या नेतृत्‍वाखाली भारताने अणुचाचणी केली होती. अणुचाचणीने जगभरात खळबळ माजली होती. 

ही घटना जॉन अब्राहमचा चित्रपट 'परमाणु'मध्‍ये दाखवण्‍यात आली आहे. सत्य घटनेवर आधारित परमाणु चित्रपटात जॉनने IAS अधिकारी रैनाची भूमिका साकारली आहे. 
१९९८ साली भारताने एकूण ५ चाचण्या केल्या होत्या.११ मे १९९८ ला राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातल्या पोखरण शहरात तीन अणुचाचण्या केल्या. मग दोन दिवसांनी १३ मे राजी आणखी दोन चाचण्या केल्या. या तीन अणुचाचण्‍यांनी सगळ्या जगाला आश्चर्याचा धक्काच बसला. न्‍यूक्‍लियर राष्‍ट्रांच्‍या यादीत भारताचे नाव समाविष्‍ट झाले. ही घटना देशासाठी अभिमानाची होती. या अणु चाचण्यांनंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २० मे ला पोखरणला भेट दिली होती. 
अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना न्यूक्लियर स्टेटला हिरवा कंदील दाखवला होता. ११ मे ला दुपारी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सरकारी घर ७ रेस कोर्समध्‍ये एक पत्रकार परिषद बोलावली होती. या परिषदेत त्‍यांनी अणुचाचणी योजनेची माहिती माध्‍यमांना दिली होती. 
अटल बिहारी वाजपेयी हे या अणुचाचण्‍यांचे श्रेय माजी पंतप्रधान पी. व्‍ही. नरसिंह राव यांना देतात. राव यांना श्रद्धांजली देताना अटल यांनी म्‍हटलं होतं की, ‘मे १९९६ मध्‍ये राव यांच्‍यानंतर मी पंतप्रधानपदाची खुर्ची सांभाळली. त्‍यावेळी राव मला म्‍हणाले होते की, बॉम्‍ब तयार आहे.’ 
तसेच अनेक भाषणांमध्‍ये वाजपेयी यांनी अणुचाचणीचे श्रेय ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर. चिदंबरम आणि एपीजे अब्‍दुल कलाम यांना दिलं होतं.  

Thursday, August 16, 2018

शिल्‍पकलेचा अप्रतिम नमुना : खिद्रापूरचे कोपेश्‍वर मंदिर





शिरोळ तालुक्‍यातील खिद्रापूर येथील प्राचीन कोपेश्‍वर मंदिर. चालुक्‍य शिल्‍प स्‍थापत्‍यशैली दर्शन यातून घडते. मंदिर सद्‍यस्‍थितीत सुस्‍थितीत असले तरी पावसाळ्‍यात या मंदिरातील पडझड झालेल्‍या स्‍तंभांना, कमानीला धोका पोहोचण्‍याची शक्‍यता आहे. कलेचा अप्रतिम नमुना असलेल्‍या मंदिराचे संरक्षण, संवर्धन अपरिहार्य बनले आहे. त्‍यामुळे पर्यटन विभागाने या परिसराच्‍या विकासाकडे लक्ष देण्‍याची तर पुरातत्‍व विभागाने या मंदिराची देखभाल करण्‍याची आवश्‍यकता आहे. 

Image result for khidrapur
कोपेश्‍वर मंदिराला केंद्रीय पुरातत्‍व विभागाने २ जानेवारी १९५४ रोजी महाराष्‍ट्रातील राष्‍ट्रीय संरक्षित स्‍मारक म्‍हणून घोषित केले. कोपेश्‍वर मंदिर अप्रतिम स्‍थापत्‍यशैलीसाठी प्रसिध्‍द आहे. बेसॉल्‍ट आणि ग्‍लास पॉलिशिंग केल्‍याप्रमाणे या मंदिराचे बांधकाम आहे. पावसाळ्‍यात ऊबदारपणा आणि उन्‍हाळ्‍यात गारवा टिकून राहावा, त्‍यादृष्‍टीने तत्‍कालीन स्‍थापत्‍य विशारदांनी केलेला प्रयत्‍न येथे दिसून येतो. 
कोपेश्‍वर मंदिराची वैशिष्‍ट्‍ये
या मंदिराचे वैशिष्‍ट्‍ये म्‍हणजे गजपट्‍ट असणारे हे भारतातील एकमेव मंदिर आहे. 
उत्‍कृष्‍ट शिल्‍पकलेचा अविष्‍कार पाहता या मंदिराची तुलना खजुराहोच्‍या मंदिराशी केली जाते. या स्‍थानाचे मूळ नाव कोप्‍पम किंवा कोप्‍पद होते. पण, मोगल सरदार खिद्रखान मोकाशीने कोप्‍पम जिंकल्‍यानंतर त्‍याच्‍या नावावरून खिद्रापूर असे नाव त्‍याला मिळाले. येवूर (जि. विजापूर) येथील शिलालेखात कोपेश्‍वराचा उल्‍लेख मिळतो. तसेच एका ताम्रपटातही या मंदिराचा उल्‍लेख सापडतो.
Image result for khidrapur
मंदिरात २ शिवलिंग
गाभार्‍यात कोपेश्‍वर (महेश) आणि धोपेश्‍वर (विष्‍णू) अशी दोन शिवलिंगे आहेत. याला लागूनच सभामंडप आहे. सभामंडपावर सहा दगडी गवाक्ष असून हे वैशिष्‍ट्‍य असणारे हे असे एकमेव मंदिर आहे. या मंदिरात नंदी नाही, हे त्‍याचे दुसरे वैशिष्‍य होय. मंदिराचे वेगळेपण म्‍हणजे स्‍वर्गमंडपाची रचना. या मंडपाबाहेर २४ हत्तींची मूळ रचना होती. पैकी ११ हत्ती येथे पाहावयास मिळतात. चार प्रवेशद्‍वार आणि ४८ खांबांवर हे मंदिर उभारलेले असून मंदिराच्‍या दर्शनी भागात आकाशाच्‍या दिशेने १३ फूट व्‍यासाचे गवाक्ष आहे. त्‍याच मापाची खाली रंगशिला (गोलाकार दगडासारखी) असून त्‍याभघेवती १२ खांब वर्तुळाकृती आढळतात. मंदिरावर नर्तिका, वादक, शस्‍त्रधारी द्‍वारपाल, सप्‍तमातृकांच्‍या प्रतिमा आहेत. यावरून, तत्‍कालीन समाजातील स्‍त्रियांना असणारे उच्‍च स्‍थान समजते. 
Related image
मंदिर परिसरात १२ शिलालेख
मंदिर परिसरात १२ शिलालेख असून त्‍यातील ८ शिलालेख कन्‍नड भाषेतील आहेत. त्‍यापैकी एक संस्‍कृतमध्‍ये, दुसरा देवनागरीत आहे. पहिला शिलालेख नगारखान्‍याच्‍या दक्षिण बाजूच्‍या विरगळावर जुन्‍या कन्‍नड भाषेत लिहिले आहे. आणखी एका शिलालेखात कोपश्‍वराची स्‍थिती, कुसुमेश्‍वर, कुटकेश्‍वर या नावांचा उल्‍लेख मिळतो. 
दक्षिण स्‍थापत्‍यशैलीचा प्रभाव
मंदिरात प्रवेश करताना नगारखाना, स्‍वर्गमंडप, सभामंडप, अंतराळ, गाभारा असे बांधकाम दिसते. मंदिराच्‍या पायथ्‍याशी खुरशिला, गजपट्‍ट त्‍यावर नरपट्‍ट आणि त्‍यावरील देवकोष्‍ट (चौकट असल्‍यासारखे) आणि नक्षीकाम अशी रचना दिसते. मंदिराचे शिखर गोपुरासारखे असल्‍याने दक्षिणेतील स्‍थापत्‍यशैलीचा प्रभाव दिसतो. 
मंदिरावरील भवानी, काळभैरव, विष्‍णू, ब्रम्‍हदेव, चामुंडी, गणपतीची मूर्ती ही हिंदू देवदेवता, पंचतंत्रातील कथा तर उत्तरेच्‍या बाजूस घंटा वादिका, अहिनकुल (साप-मुंगुस), मिथून शिल्‍प आदी शिल्‍पे जैन मंदिराची वैशिष्‍ट्‍ये दशर्वणारी आहेत.  
Image result for khidrapur
मंदिरात आढळते आखाती शिल्‍प 
मंदिरावर इराणी किंवा आखाती व्‍यक्‍तीचे शिल्‍प आहे. इराणचा बादशहा  दुसरा खुस्रो याने राजदुतामार्फत चालुक्‍य दरबारी नजराणा पाठवला होता, असे जाणकार सांगतात. यावरून, चालुक्‍यांचे इराणशी संबंध होते, असे दिसते. या भेटीचे प्रतिक म्‍हणून त्‍या इराणी राजदुताचे शिल्‍प कोरले असावे. 
Image result for khidrapur
सप्‍टेंबर, १७०२ मध्‍ये मोगल बादशाह औरंगजेबने केलेल्‍या आक्रमणात येथील मूर्तींची मोडतोड केली. २००५ साली आलेल्‍या महापुरातदेखील मंदिर सुस्‍थितीत राहिले होते. मध्‍यंतरी, स्‍वर्गमंडप, काही स्‍तंभाची पडझड झाली होती. पुरातत्‍व विभागाने त्याची डागडुजी केली होती. आता आर्किलाजिकल सर्वे ऑफ इंडियाचे मंदिराच्‍या भोवती तटबंदीचे काम सुरू झाले असून हे बांधकाम पूर्ण होत आले आहे. हे काम गेली १० वर्षे सुरू होते. 
पर्यटन केंद्र म्‍हणून आजही दुर्लक्षित 
‘‘धार्मिक पर्यटन  केंद्र म्‍हणून आजही खिद्रापूर विकसित झालेले नाही. येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. परंतु, पर्यटकांसाठी येथे निवासाची सोय नाही. हॉटेल्‍स नाहीत. महिलांसाठी प्रसाधनगृह नाहीत. या सोई येथे होणे आवश्‍यक आहे.  पुरातत्‍व खात्‍याने मंदिरात आणि मंदिर परिसरात प्रकाश व्‍यवस्‍था करण्‍याची गरज आहे.’’ 
- प्रा. शशांक रामचंद्र चोथे (इतिहास संशोधक)

Image result for khidrapur














खिद्रापूरला जाण्‍याचा मार्ग 
 एसटीने पुढील तीन मार्गाने खिद्रापूर (ता. शिरोळ, जि. कोल्‍हापूर) येथे जाता येते. 
 हातकणंगले-शिरोळ-नृसिंहवाडी-कुरुंदवाड-अकिवाट-खिद्रापूर
कोल्‍हापूर-इचलकरंजी-कुरूंदवाड-अकिवाट-खिद्रापूर 
 कोल्‍हापूर-हुपरी-रेंदाळ-बोरगाव-दत्तवाड-सैनिक टाकळी-खिद्रापूर

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...