Monday, July 31, 2023

Happy B'day Dhanush : साई पल्लवी ते राशी खन्नापर्यंत साऊथच्या अभिनेत्रींना धनुषची का आहे भूरळ?


 https://pudhari.news/latest/603898/happy-birthday-dhanush-pudhari-online-blog/ar

Last Updated: July 28, 2023, 9:24 AM

साऊथ स्टार धनुषचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. (Happy B’day Dhanush) दक्षिणेत तर धनुषला प्रेक्षक चाहत्यांना अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं आहे. केवळ चाहतेच नाही तर त्याच्यासोबत अभिनय करणाऱ्या महिला सहकलाकार अभिनेत्रींनाहीदेखील त्याची भूरळ आहे. मग ती साई पल्लवी असो वा राशी खन्ना. धनुष किती मेहनती अभिनेता आहे, हे अभिनेत्री भरभरून सांगत असतात. तो सेटवर किती उत्साहाने, जोशपूर्ण काम करतो, आपल्या कामाबाबत किती गंभीर आणि दक्ष असतो, अनेक कौतुकाचे गोडवे अभिनेत्री गात असतात. (Happy B’day Dhanush)

असूर असो वा बॉलिवूडपट ‘रांझना’ मनाला भिडणारे चित्रपट देण्यात धनुषचा हातखंडा आहे. चित्रपटांतील भावस्पर्शी कथानकामुळे धनुषच्या अभिनयाला जोड मिळते. अनेकजण म्हणतात की, धनुष दिसायला खास नाही. म्हणून तो डल दिसणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत बसतो. पण, साऊथच्या प्रेक्षकाला दिसण्याशी काही संबंध नाही. कारण, धनुषकडे सुंदर दात आणि मनमोहक हास्य आहे. या द्वयींवर तो आपल्या व्यक्तीमत्त्वाचा सर्वांवर प्रभाव टाकतो.

एक प्रतिभावान, कष्टाळू अभिनेता जर प्रेक्षकांच्या समोर असेल तर त्यांना कशाचीच परवा नसते की, तो कसा दिसतो? काही चाहते तर म्हणतात की, त्याचे चित्रपट हिट होणार की नाही हे मला माहिती नसते, पण फक्त त्याच्यासाठी मी त्याचे सिनेमे पाहतो. कारण त्याचे कौशल्य आणि भव्य हास्यासमोर सर्व गोष्टी मागे पडतात. सुंदर तो आहे, जो सुंदर काम करतो. आणखी काही चाहते म्हणतात की, त्याचा चेहरा आकर्षक आहे, नाक, डोळे रेखीव आहेत. तो बॉलिवूडच्या नायकांच्या तुलनेत देखणा दिसतो. त्याच्या गडद कायामुळे तो आणखी उठावदार दिसतो.

वास्तवात, अभिनेत्याचे दिसणे तितकं महत्त्वाचे ठरत नाही. कारण, अगदीच सावळे आणि दिसायलाही फार सुंदर नसलेले अभिनेते प्रेक्षकांनी स्वीकारलेले आहेतच की! मुळात त्याच्याकडे अभिनय कौशल्य किती आहे, हे प्रेक्षक पाहतात. मग इतर गोष्टी गौण ठरतात.

धनुषने अन्य अभिनेत्यांप्रमाणे शरीरयष्टी बनवलेली नाही. तो मुळात जसा दिसतो, तसाच पडद्यावरही दिसतो. दक्षिणेत धनुष एक महान रोल मॉडल आहे. तो सुपरस्टार असूनही कोणत्याही महागड्या वस्तू वापरताना दिसत नाही. कपड्यांचेच उदाहरण घ्या. तो नेहमीच कॅज्युअल लूकमध्ये दिसतो.

असं म्हटलं जातं की, तो शाकाहारी आहे. त्याला फुटबॉल खेळणं खूप आ‍वडतं. कमी वयात राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा धनुषच आहे. अभिनेता गायक, आणि चित्रपट निर्माता म्हणून त्याने चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडलीय. ‘व्हाय धीस कोलावेरी डी’ या गाण्याला आवाज दिल्यानंतर धनुष प्रकाशझोतात आला होता.

करिअरच्या सुरुवातीला धनुषला पाहून अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली. सडपातळ, दिसायला गडद आणि त्याच्या चेहऱ्यावर काहींनी हसत टीका केली. पण त्याने काही व्यावसायिक चित्रपट केले. यामध्ये ‘सुलान’ चित्रपटाचे उदाहरण घेता येईल जे, २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याला मिळालेल्या यशानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. ‘पोलाधवन,’ ‘पदिकथवन,’ ‘राऊडी बेबी,’ ‘अदुकलाम,’ ‘वाडा चेन्नई,’ ‘असुरन,’ ‘थिरूविलेयादल आरंबम,’ ‘कॅप्टन मिलर,’ ‘काधाल कोंडेन’ चित्रपटांनी त्याला मोठं केलं. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर त्याची गणना सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये होऊ लागली. ५८ व्या आणि ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्तम अभिनेता हा पुरस्कार मिळाला. धनुषने आनंद एल. राय दिग्दर्शित ‘रांझना’ चित्रपटाद्वारे हिंदी सृष्टीमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडमध्ये त्याला फारसे यश मिळाले नसले तरी दाक्षिणात्य प्रेक्षकांसाठी मात्र तो ‘सिनेमाचा सर्वस्वी हिरो’चं आहे.

Reena Madhukar : 'ही' अभिनेत्री आहे सलमान खानची मोठी फॅन


 


https://pudhari.news/soneri/74096/exclusive-interview-actress-reena-madhukar-on-pudhari-online/ar 


Last Updated: November 26, 2021, 5:07 PM


सध्या मन उडू उडू झालं मालिकेतील अभिनेत्री रीना मधुकर हिची चर्चा होतेय. रीना मधुकर (Reena Madhukar) हिने अनेक मालिका, हिंदी चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये काम केलंय. अजिंठा या चित्रपटातून मराठी सिनेविश्वात पदार्पण करणारी सुंदर रीनाची मन उडू उडू झालं ही पहिली मालिका आहे. तिचा (Reena Madhukar) इथवरचा प्रवास आणि तिच्या अभिनयाविषयी ‘पुढारी ऑनलाईन’शी तिने बातचीत केली.

हिंदीनंतर मराठीत काम करतेय, काय नवीन अनुभवायला मिळतंय?

रीना : माझी सुरुवातचं मराठी चित्रपट अजिंठामधून झाली होती. नितीन देसाईंच्या या चित्रपटात सोनाली कुलकर्णी सोबत काम केलं. यामध्ये माझी कमला नावाची भूमिका होती. येथून माझ्या करिअरची सुरुवात झाली. पुढे हिंदीमध्ये काम केलं. पण, मराठी कधीचं सोडलं नव्हतं. मराठी माझं माहेर असल्यासारखं आहे. चांगल काम मला करायचं होतं. त्यात चित्रपट, मालिका, वेबरीरीज अशी कुठलीही माध्यमं असो. चांगल्या भूमिका कुठल्याही भाषेतील असल्या तरी त्या भूमिका मी स्वीकारते.

एखाद्या भूमिकेसाठी वजन वाढवायचं आहे, तर होकार देशील का?

रीना : जर स्क्रिप्टची गरज असेल तर नक्कीचं वजन वाढवेन. अजिंठामध्ये एका आदिवासीची भूमिका केलीय. झाला बोभाटामध्ये एका गावकरीची भूमिका मी केलीय. ३१ दिवस चित्रपटात अंध मुलीची भूमिका केली. एक अभिनेत्री म्हणून मी फिट राहते. असं नाहीये. माझं हे पहिल्यापासूनचं रुटीन आहे. वेगवेगळं आयुष्य जगताना आम्हाला वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात.

आवडता कलाकार कोणता? एखादी आठवण सांगशील?

रीना : सलमान खान माझा आवडता अभिनेता आहे. त्याला मी भेटलेय. जेव्ही मी पहिल्यांदा सलमानला समोर भेटले. त्यावेळी मला विश्वास बसत नव्हता की तो माझ्या समोर आहे. ज्यावेळी मी सलमानला पहिल्यांदा भेटले, तेव्हा मी त्याला असं म्हटलं होतं की- प्लीज तुम्हाला टच करून पाहू का? तेव्हा खरंच मी त्याला बोटाने टच करून पाहिलं होतं. अजुनही मी त्याला भेटले की, माझी बोलती बंद होते.

तुला ट्रॅव्हल करायला आवडतं. मग, ट्रॅव्हलर ब्लॉग सुरू करावा, असं वाटलं का?

रीना : मला मनात बऱ्याचं वेळेला आलं की, ट्रॅव्हलिंग ब्लॉग सुरू करावं. पण, जेव्हा ब्लॉगर व्हायचं म्हटलं तर तो अनुभव घेणं, निसर्ग पाहणं होतं. हे सर्व करताना ब्लॉगर म्हणून मी काम करू शकले नसते. त्यामुळे एक ब्लॉगर म्हऩून काम करताना ती मजा, तो अनुभव मला घेता आला नसता.

तुला आजही आठवते ती आठवण कोणती?

रीना : आठवणी खूप साऱ्या आहेत. शाळेतील भरपूर आठवणी आहेत. शाळेत असताना मी खूप मस्तीखोर होते. तो शाळेचा ड्रेस घालून पुन्हा बेंचवर जाऊन बसावं. मस्ती करावी. बालपण पुन्हा परत यावं, अनुभवावं असं वाटतंय. बालपणाचं आयुष्य बेफिकिरीवालं असतं. जगाची चिंता नसते. सर्वजण आपापल्या जीवनात आहेत. काही जण परदेशात आहेत. त्यामुळे मित्रमंडळींशी फारसा संपर्क नसतो.

मला नेहमीचं डान्सिंग हे डोळ्यासमोर आहे. मी राजस्थानी फोक डान्सर आहे. त्यामध्ये मी मास्टर केलंय. अभिनयात आल्यापासून मी सध्या डान्सपासून दूर आहे. जेव्हा मला वेळ मिळेल, तेव्हा मला डान्स करायचं आहे. मी मुळची पुण्याची आहे. माझा जन्म, शिक्षण पुण्यातील आहे. माझा डान्स क्लासही पुण्यात होता.

अभिनयाव्यतिरिक्त आणखी काय करावसं वाटतं?

रीना : डान्सिंगमध्येचं मला करिअर करायचं होतं. अभिनयात यायचं असं काही ठरवलं नव्हतं. शिक्षण घेऊन मला एखादी नोकरी करायची नव्हती. लहानपणापासून एअर होस्टेस व्हायचीही इच्छा होती. एकदा पुण्यात जेट एअरवेजच्या मुलाखती सुरू होत्या. तेव्हा मी मुलाखतीसाठी गेले होते. साडेआठशे मुलींमधून तीन मुली निवडल्या गेल्या. निवडलेल्यांपैकी मी एक होते. मी मुंबईत आले. जेट एअरवेजचं काम सुरू असताना अभिनयात आवड निर्माण झाली.

अभिनय क्षेत्रात कसे पदार्पण झाले?

दिग्दर्शक नितीन देसाई भेटले. अजिंठामधील भूमिका माझ्या डान्सिंग स्किलमुळे मिळाली. तेव्हा असं ध्यानी-मनीदेखील नव्हतं की, मला अभिनय करायचा आहे.

जर अभिनेत्री झाली नसतीस तर कोणतं क्षेत्र निवडलं असतंस?

जर अभिनेत्री झाले नसते तर मी डान्सर झाले असते. मला डान्स शिकवायला खूप आवडतो. ज्यांना डान्स करायला येत नाही किंवा वेडिंग संगीत कोरिओग्राफीही करते. जर मी अभिनेत्री झाले नसते तर मी वेडिंग संगीतमध्ये असते.

आगामी प्रोजेक्टबद्दल काय सांगशील?

रीना : देव देव्हाऱ्यात नाही हा माझा आगामी चित्रपट आहे. विक्रम गोखले, सुहासिनी मुळये असे दिग्गज कलाकार यामध्ये आहेत. या चित्रपटात माझी मुख्य भूमिका आहे. याचे उरलेले शूटिंग सध्या सुरू आहे. वेबसीरीजच्याही ऑफर आल्या आहेत. पण, सध्या मालिकेतही काम सुरू आहे. त्यामुळे वेळेचं नियोजन करून आगामी प्रोजेक्टकडे लक्ष राहिल.

मराठी मालिका मन उडू उडू झालं याविषयी बोलताना रीना म्हणतेय-

मराठी मालिका मन उडू उडू झालंमध्ये सध्या ती दिसतेय. तिला या मालिकेची ऑफर मिळाली आणि तिने ती स्वीकारली. पँडेमिक काळात ती दोन वर्षे घरात होती. या काळात तिने कुठलेही कामे हाती घेतले नव्हते.

मंदार देवस्थळी यांचा झी मराठीवरील मन उडू उडू झालं मालिका ही तिची पहिली मराठी मालिका ठरलीय. तिने हिंदी मालिका केल्या आहेत. पण, तिला मराठी मालिका करायची इच्छा होती. ती इच्छा आता या मालिकेच्या माध्यमातून पूर्ण झालीय.


R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...