Saturday, May 24, 2025

कोराकरी – कोल्हापुरी चपलांची आधुनिक कारागिरी

"ओ कोराकरी!" – हे नाव जरी आज एक फॅशन ब्रँड म्हणून ओळखलं जात असलं, तरी त्यामागे दडलेली गोष्ट एका बाप-लेकाच्या गोड आठवणींतून सुरू झालेली आहे. डॉ. दिलीप मोरे यांचा मुलगा कोल्हापुरात चप्पल बनवताना चप्पलांचा ढिग पाहतो आणि तो वडिलांना विचारतो, " पप्पा, हे काय आहे?" त्यावेळी वडील उत्तर देतात – "कोल्हापुरी चप्पल." आणि बोबड्या स्वरात मुलगा म्हणतो – "ओ कोराकरी!"हेच नाव पुढे एक बुटीक स्टाईल ब्रँड झालं – कोल्हापूरच्या परंपरेला आधुनिकतेची जोड देणारा ‘कोराकरी’ ब्रँड आज नावारुपास आला. कोराकरी ही केवळ चप्पलांची गोष्ट नाही – ती आहे कौटुंबिक वारसा, भारतीय परंपरा, आणि ग्रामीण कारागिरांच्या कलेला दिलेलं ग्लोबल व्यासपीठ. २०१४ पासून या व्यवसाय सुरूवात झालीय.

कोल्हापूरची कारागिरी म्हणजे कोराकरी. याचे उद्योजक हे डॉ. दिलीप मोरे आहेत. मुळचे म्हाळुंगे (ता. करवीर) गावातील.  B.E. (Mechanical Engg.), M.Tech (IIT Dhanbad), PhD (IIT Bombay). Ex. Faculty- IIM Calcutta येथून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं.
रंजक इतिहास
त्यांचे आजोबा हे चप्पल बनवायचे. म्हाळुंगे गावी त्यांची ४० जणांची को-ऑपरेटिव्ह संस्था होती. त्यावेळी डॉ. दिलीप हे पाच ते सहा वर्षांचे होते. चप्पला कशा बनवल्या जातात, हे सगळे काम बघत होते. एकदा काळम्मावाडीच्या धरणाला भेट द्यायला इंदिरा गांधी आल्या होत्या. त्यावेळी आजोबांनी त्यांना भेटवस्तू म्हणून कोल्हापुरी चप्पल दिली होती. ती त्यांना इतकी आवडली की, इंदिरा गांधींनी त्यांना निधनापर्यंत पेन्शन सुरू ठेवली. हा व्यवसाय पुढच्या पिढीने कुणी फारसा केला नाही. पण दिलीप यांनी तो पुढे नेला.
ऑनलाईन बिझनेसच भारी
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कलकत्ता येथे प्रोफेसर म्हणून काम करत असताना त्यांनी कोल्हापुरी चप्पलांचे ट्रेडिंग सुरू केले. सुरुवातीला ते दुकानदारांकडून घेऊन ऑनलाईन विकत असत. पण क्वालिटीची समस्या निर्माण झाल्याने त्यावर अभ्यास करून दिलीप यांनी स्वत:चा बिझनेस सुरु केला. पुढे कारागीर घेऊन कामाला सुरुवात केली. सुरुवातीपासून ते आतापर्यंत कोराकरीचा ऑनलाईन बिझनेस सुरु आहे
झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये व्यवसायाला सुरुवात
या चपला घरोघरी बनवल्या जातात. त्यामुळे फॅमिली बिझनेस म्हणून याकडे पाहिलं जातं. त्याकाळी कारागीर चप्पल बनवून द्यायला तयार व्हायचे नाहीत. पण, दिलीप यांना उत्तम दर्जाचे लेदर वापरून बिझनेस उभा करायचा होता. म्हणून कोल्हापुरातील आर के नगर येथे त्यांनी चार-पाच कारागीरांना हाताशी घेऊन झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये बिजनेस सुरू केला. ऑनलाईन व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर मागणी वाढली, त्यांनी 40 ते 50 लाखांची गुंतवणूक केली.
कंदलगाव येथे उभारला मोठा कारखाना
कंदलगान (तालुका करवीर) येथे दिव्यम लेदर क्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड नावाने कारखाना सुरू केला. या कंपनीत पार्टनर कम इन्वेस्टर म्हणून अमित कुमार त्यांना जॉईन झालेले आहेत. त्यांनी 55 लाखांची गुंतवणूक या बिजनेसमध्ये केलेली आहे.
चेन्नईवरून आणला जातो माल
चेन्नईवरून लेदर आणलं जातं.  स्टूल, रापी, पॉलिश, आयर्न असा कच्चा माल लागतो. मोजे कुरुंदवाडी, कापशी, शाहू, असे विविध प्रकारचे कोल्हापुरी चपला याठिकाणी तयार केल्या जातात. खास म्हणजे पूर्वीच्या विंटेजची चपलांना आधुनिकतेचीजोड देऊन जनरेशन झेडला देखील वापरता येईल असे, कम्फर्टेबल, अट्रॅक्टिव्ह, फॅशनेबल चपला बनवल्या जातात. फिनिश लेदर चेन्नई वरून आणतात, ज्यामुळे चप्पल टिकाऊ बनतं. एकावेळी आठ ते दहा लाखांचं मटेरियल मागवलं जातं.
१००० हून अधिक डिझाईन्स
स्वतः मोरे डिझाईनचं स्केच तयार करतात. नंतर इतर प्रोसेस प्रोडक्शनमध्ये तयार होते. आतापर्यंत त्यांनी 1000 हून अधिक डिझाईन तयार केलेले आहेत. सर्व कारागीर हँडमेड चप्पल बनवतात. थोड्या प्रमाणात हायड्रोलिक मशीनवर सोल कट केलं जातं. शंभरहून अधिक कारागीर त्यांच्याकडे काम करतात. चेन्नईवरून आणलेले १९ लाखांचे आठ ते दहा मशीन्स आहेत. त्या मशीन्सवर कटिंग, शिलाई, एम्बुस (चपलांची अप्पर डिझाईन बनवले जाते) केले जाते.
खासियत कोराकरी चपलांची
कोराकरी चपला कम्फर्टेबल, मऊ, टिकाऊ आहेत. जखम होण्यासारखे किंवा त्वचा निघण्यासारखे प्रकार होत नाहीत.  काही चपलांच्या टाचांना विमान किंवा रबरी सोल लावले जाते. काही चपलांना पूर्ण टीपीआर लावलं जाते. टीपीआर हे एक लेदर असतं ज्यामुळे स्लीप होत नाही.
२०१४ मध्ये त्यांनी https://www.korakari.com नावाची वेबसाईट सुरू केली. यामाध्यमातून प्रोडक्ट विकले जातात. ॲमेझॉन, नायका, मिंत्रा, फ्लिपकार्ट अशा ई-कॉमर्स वेबसाईटवरूनह माल विकला जातो. आता फॅब इंडिया आणि मिंत्रा- हाऊस ऑफ पतौडी ब्रँडसाठी काही डिझाईन प्रोडक्शन करून दिले जाते.
मोठमोठ्या ब्रँड कंपनीचे सीईओ यांच्याशी नेटवर्क बनवलं गेलं. त्यासाठी मोरे यांना त्यांच्या उच्च शिक्षणाचा फायदा झाला. मिंत्राचे मोठे ऑर्डर मिळाल्यानंतर त्यांच्या व्यवसायाला गती आली. नीरज मथाने यांनी त्यांना पाठिंबा दिल्यामुळे मोठ्या ऑर्डर्स त्यांना मिळत गेल्या आणि उद्योग साकारण्याचं स्वप्न पूर्ण झालं.
डी टू सीचा फंडा
डी टू सी (डायरेक्ट टू कस्टमर) हा फंडा वापरून सर्व माल वेबसाईटच्या माध्यमातून आणि ऑनलाईन ई-कॉमर्सच्या माध्यमातून जगभरात विकला जातो. ऑर्डर प्लेस केल्यानंतर कुरियर एजंटच्या माध्यमातून चपला निश्चित स्थळी पोहोच केल्या जातात. आतापर्यंत यूएसए , ऑस्ट्रेलिया या ठिकाणी कोराकरी चप्पल निर्यात केले आहेत.
4500 पर्यंत किंमतीचे चप्पल
850 पासून 4500 पर्यंतचे चप्पलचे किमती आहेत. एक चप्पल बनवण्यासाठी साधारण दोन तास लागते आणि अवघड असेल तर ते चार ते पाच दिवस लागतात. खूप वर्क असणारे चप्पल चार हजार पाचशे रुपये किंमतीला जाते.
चप्पल बनवण्याची कला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी
म्हणजे कारागीरांना मजुरी मिळत नाही, या लोकांकडे फारसे साहित्य उपलब्ध होत नाही. पावसाळ्यात तर पूर्ण व्यवसाय बंद राहतो. तसेच या इंडस्ट्रीमध्ये लीडर कोणीही नाही जो कारागिरांना मार्गदर्शन करेल, अशा खूप सार्‍या समस्या आहेत. त्यामुळे या व्यवसायाकडे अधिक करून कुणी वळत नाही. ही कला पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी आता मोरे यांनी कारागिरांनाही प्रोत्साहन, प्रेरणा देण्यास सुरुवात केली आहे. हे चप्पल बनवण्याची कला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली तरच कोल्हापुरी चप्पल अस्तित्वात राहील. त्यामुळेच डॉक्टर मोरे या व्यवसायाकडे वळले आहेत.
डॉ. दिलीप मोरे - 7558581451, 9822950246

Monday, May 19, 2025

आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग भारतातील 'नवलाईची हायड्रोपोनिक शेती'


मातीविना शेतीची नवी क्रांती : अक्षय थोरात यांचा प्रेरणादायी प्रवास


आजच्या धकाधकीच्या युगात, शिक्षण घेतल्यानंतर चांगली नोकरी मिळवणे, आणि ती सांभाळत आयुष्य काढणे हीच तरुणांची ठरलेली वाट आहे. मात्र, काही धाडसी आणि दूरदृष्टी असलेले तरुण या चौकटीबाहेर विचार करून स्वतःचा वेगळा मार्ग निवडतात. वाळवा (जि. सांगली) येथील अक्षय रामचंद्र थोरात हा असाच एक तरुण, ज्याने मातीशिवाय शेती करून कृषी क्षेत्रात नाव कमावले आहे.

अक्षय थोरातचा जन्म वाळव्याच्या अहिर गल्लीत एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांनी हुतात्मा किसन अहिर विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण करून, इस्लामपूरमधील विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे त्याने संजय घोडावत युनिव्हर्सिटीमधून बी.टेक पदवी प्राप्त केली. शिक्षणाच्या काळात उद्योगपती संजय घोडावत यांची व्याख्याने ऐकून ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचारसरणी त्याच्या मनात खोलवर रुजली.

परदेशातून मागवल्या जातात विविध बिया 

पदवी घेतल्यानंतर अक्षयने टीसीएस कंपनीत नोकरी स्वीकारली. मात्र, ही नोकरी त्याच्या मनातील विचारांना पुरेशी वाटली नाही. त्याला काहीतरी वेगळं करायचं होतं. याच दरम्यान त्याला ‘हायड्रोपोनिक शेती’ म्हणजेच मातीविना शेती विषयी माहिती मिळाली. या आधुनिक शेतीत मातीऐवजी पाण्यात पोषकद्रव्यांच्या साहाय्याने भाजीपाला, फळे, आणि औषधी वनस्पतींचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये अक्षय lettuce (लेट्युस) जे सलाडमध्ये वापरतात आणि curly kail  - (कर्ली केल) - ब्युटी प्रोडक्ट वापरतात, याचे उत्पन्न घेतात. यासाठी विविध बिया परदेशातून मागवल्या जातात आणि त्याची रोपे याठिकाणीचं स्वत: तयार केली जातात. या शेतीसाठी घरातील सदस्यच राबतात. 

हायड्रोपोनिक शेती भारतात अजूनही नवलाईची गोष्ट 

हायड्रोपोनिक शेती ही भारतात अजूनही नवलाईची गोष्ट आहे, विशेषतः ग्रामीण भागात. पण अक्षयने धाडसी निर्णय घेतला. मु. पो. बावची, ता. वाळवा, (जि. सांगली) येथे त्याच्याकडे असलेल्या वडिलोपार्जित जमिनीपैकी १५ गुंठे जमीनीत पॉलिहाऊस उभारण्याचे ठरवले. एकूण ३०-३५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. यासाठी त्याने ‘हुतात्मा बँक’ आणि काही मित्रांकडून मदत घेतली. आर्थिक आव्हानांवर मात करत त्याने २०२४ मध्ये शेतीत पहिले पाऊल टाकले. 

सर्व तांत्रिक बाबी समजून घेतल्या 

सकाळ मीडिया समूहाच्या माध्यमातून पुण्यातील "लँड क्राफ्ट ऍग्रो" कंपनीशी संपर्क साधून अक्षय घोरपडे यांच्या मदतीने पूर्ण तांत्रिक माहिती मिळवली. यानंतर त्याने आपल्या पॉलिहाऊसमध्ये २७ रॅक्स उभे केले आणि भाजीपाला उत्पादनास सुरुवात केली. विशेष बाब म्हणजे, त्याने आधी बाजारपेठ निश्चित केली आणि मग उत्पादन सुरू केलं – जे पारंपरिक शेतीपेक्षा वेगळं आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून योग्य होतं.

हार कधीच मानली नाही 

वाळवा, आष्टा आणि इस्लामपूर येथून फारसा प्रतिसाद न मिळाल्याने अक्षयने थेट मुंबई, पुणे आणि गोवा येथील मोठमोठ्या मॉलना भेटी दिल्या. त्याने “जय किसान हायड्रोपोनिक” या नावाने स्वतःचा ब्रँड तयार केला आणि नामवंत मॉल्समध्ये उत्पादन पोहोचवलं. मायक्रो ग्रीन्स, मशरूम, आणि केमिकल फ्री भाजीपाला यासारख्या उत्पादनांना चांगली मागणी मिळू लागली. वेळोवेळी आई जयश्री, वडील - रामचंद्र थोरात आणि पत्नी रुचिता यांची मदत आणि पाठिंबा मिळाला आहे. 

महिन्याला सव्वा ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न 

आज अक्षय हायड्रोपोनिक शेतीतून दर महिन्याला सव्वा ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. एक भाजीपाला उगवण्यासाठी ४५ दिवस लागतात. असे २७ सायकल निर्माण केल्याने दररोज विशिष्ट असे उत्पादन मिळते. हे उत्पनेन भाजीपाला योग्य पद्धतीने पॅकिंग करून तो पुणे, मुंबई, गोवा याठिकाणी पाठवला जातो.

हायड्रोपोनिक शेतीचे प्रशिक्षण 

जर या शेतीची कुणाला आवड असेल तर त्याला प्रशिक्षणही देण्याचे उत्तम काम अक्षय थोरात करतात.

 अक्षयचा प्रवास केवळ आर्थिक यशापुरता मर्यादित नाही. त्यांनी पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी अन्ननिर्मितीचा ध्यास घेतला आहे. विषमुक्त आणि नैसर्गिक उत्पादन देण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. आज अनेक तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत वेळ घालवत असताना, अक्षयने स्वावलंबनाचा मार्ग निवडून इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे. सकस आहार किट तयार करून ते देश-विदेशात निर्यात करण्याच्या विचारात अक्षय आहे. २०२४ मध्ये त्याने १५ लाखांचे  उत्पन्न मिळवले आहे. आता येत्या वर्षात कर्ज फेडून १ कोटींचा बिझनेस करण्याचे उद्दिष्ट अक्षय थोरातने ठेवले आहे. 

- अक्षय थोरात. मो. क्र- ९८६०७१८१६२ 


Friday, May 16, 2025

लाकूड व्यावसायिक - विजय मेस्त्री आणि बंधू

एक काळ होता, जेव्हा न्यू पॅलेसच्या कामासाठी कोकणातून खास कारागीर बोलावले. याच प्रवासात भला मेस्त्री हे कोल्हापुरात आले आणि आज त्यांचीच पुढची पिढी 'मेस्त्री बंधू' कोल्हापुरातचं वास्तव्यास असून आजोबा  भला मेस्त्री यांचा लाकूड व्यवसायाचा वारसा पुढे चालवत आहेत. एक लाकूड व्यावसायिक म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात त्यांची ख्याती आहे. ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तू हवी तशी नक्षी, डिझाईनमध्ये करून देण्यात 'मेस्त्री बंधूं'चा हातखंडा आहे.   

विजय गुंडोपंत मेस्त्री (वय ६७) यांच्यासह अन्य तिघे भावंडे लाकूड व्यवसायात आहेत.  मोठे बंधू रत्नाकर, विजय, सुनील,  दिलीप मेस्त्री ही चार भावंडे मूळचे हातखंबा (रत्नागिरी) येथील आहेत. पुढे त्यांनी मोर्वी (पावसच्या पुढे, जि. रत्नागिरी) येथे स्थलांतर केलं. गेले ४० वर्षे विजय मेस्त्री या व्यवसायात आहेत. आज मेस्त्री बंधूंचा 'नावेचा कारखाना' या नावाने लाकूड व्यवसाय सुरु आहे. 

विजय यांचे आजोबा भला मेस्त्री यांनी कोकणात लाकूड व्यवसायाला सुरुवात केली. त्यावेळी कोल्हापुरातील न्यू पॅलेसच्या कामासाठी भला मेस्त्री आणि आणखी दोघा-तिघांना कोल्हापुरातून आमंत्रण आलं. त्यावेळी कोकणात लाकडी कामे करणारी माणसे भेटत असत. त्यामुळे २-३ काष्ठशिल्पींना कोल्हापुरात आणण्यात आले आणि न्यू पॅलेसचे नक्षीदार दरवाजे, लाकडी कामे या काष्ठशिल्पींनी केले. त्यानंतर कोल्हापूरमध्ये हे मेस्त्री कुटुंब कायमचे स्थायिक झाले.

 'नावेचा कारखाना' म्हणून कोल्हापुरात प्रचलित

विजय यांचे वडील गुंडोपंत यांनी १९५२-५३ च्या जवळपास रत्नाकर बोट अँड फर्निचर वर्क्स नावाने जुना बुधवार पेठ, कोल्हापूर येथे कारखाना उभारला. हाच कारखाना आता 'नावेचा कारखाना' म्हणून ओळखला गेला. मेस्त्री भावंडांचे घर आणि कारखाना एकाच ३ गुंठ्यामध्ये विस्तारले आहे. सुरुवातीला वडील पुराच्या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या लकडाच्या बोटी बनवत असत. कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून या बोटींना मागणी असायची.  तसेच दरवाजे, टेबल, खुर्च्या, किरकोळ फर्निचर ते बनवू लागले. पूर्वी वडील घरोघरी जाऊन फर्निचरची कामे करत होते. १९८६ साली वडिलांचा मृत्यू झाला. त्यांनी ५० वर्षे हा लाकूड व्यवसाय केला.

 वडिलांनंतर व्यवसायाची जबाबदारी त्यांचे मोठे भाऊ रत्नाकर यांच्याकडे आली होती. सोबतच छोटी भावंडे देखील व्यवसायात मदत करू लागली. सुरुवातीला लाकूड कितीला आणायचे, वस्तू किती किंमतीला विकायच्या, यात अडचणी आल्या. पण मोठे बंधू हुशार असल्यामुळे त्यांनी जबाबदारी पेलून नेली. रत्नाकर, विजय, सुनील, दिलीप या चार भावंडांनी हा व्यवसाय पुढे नेला. सोबतच त्यांची आई शांताबाई यांची मोलाची साथ मिळाली. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन वयाच्या ११-१२ व्या वर्षांपासून मेस्त्री बंधूंनी लाकूड व्यवसाय करण्यासाठी लागणारे विविध कौशल्य शिकले. काही महिन्यांपूर्वी मोठे बंधू रत्नाकर यांचे निधन झालं होतं. आता विजय, सुनील, दिलीप हे तिघेजण काम पाहतात.

 

मागणी तसा पुरवठा  


विविध वस्तू बनवण्यासाठी टिंबर मार्केटमधून लाकूड आणलं जातं. सर्व वस्तू सागवानमध्ये बनवल्या जातात. क्वचितच किरकोळ वस्तू जंगली लाकडांचा वापर करून केला जातो. सागवान हे टिकाऊ आणि फिनिशिंगसाठी चांगले असते. ऑर्डर येईल तसे काम घेतले जाते. टिंबर मार्केटमध्ये लाकडांची साईज आणि कोणत्या वस्तूसाठी लाकूड हवाई ह्याचं माप दिलं जातं. त्यानंतर लाकूड कटिंग करून मिळते. पुढे त्याची वेगवेगळ्या मशीनवर प्रक्रिया केली जाते. त्यांच्याकडे साधारणतः तीन-चार लाख रुपयांचे  रंधा मशीन, टर्निंग मशीन, झिगझॅग मशीन आणि ड्रिल मशीन आहेत, जे गुजरातमधून आणण्यात आले आहेत.


या लाकडी वस्तूंना अधिक मागणी

 

टेबल, खुर्च्या, पालखी देवघर, डायनिंग टेबल, ऑफिस चेअर, अशा वस्तू तयार केल्या जातात. पालखी आणि देव्हाराला अधिक मागणी आहे. खुर्च्यांचे कुशन, ऑफिस टेबल, सनमाईक लाकडाचे काम करून हवे असेल तर तेही करून दिलं जातं. हवी तशी डिझाईन्समध्ये वस्तू बनवून देणं, हा त्यांचा हातखंडा आहे.

सकाळी साडेनऊ ते दुपारी एक पर्यंत आणि दुपारी अडीच ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत कारखाना सुरू असतो.

 

अशी केली जाते प्रक्रिया


टिंबर मार्केटमधून हव्या त्या साईचे लाकूड आल्यानंतर पुढे रंधा मशीनवर साईज करावी लागते. त्यानंतर नक्षी किंवा हवे तसे डिझाईन मशीनवर बनवले जाते. पुढे फिटिंग केलं जातं. यासाठी स्क्रू, फेविकॉल, स्पिरिट लाख, पेपर, पॉलिश अशा वस्तू लागतात. पॉलीश दोन कलरमध्ये उपलब्ध असतात. एक लाकडाचा ओरिजनल कलर जो नॅच्युरल असतो आणि दुसरा शिसम. (काळपट रंग) असतो. ग्राहकांना या दोन्हीपैकी जसे हवा तशा कलरमध्ये वस्तू तयार करून दिल्या जातात. कोल्हापूर जिल्हा आणि पंचक्रोशीतून ग्राहक येतात.

 

एक खुर्ची तयार करायला तीन दिवस लागतात. पालखी दोन महिने. दरवाज्याची चौकट दोन दिवसात तयार होते. जर नक्षीदार दरवाजे असतील तर चार ते आठ दिवस लागतात. देवघर बनवण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतात. एक देव्हारा १५ ते १७ हजार रु. ना विकला जातो. पालखी २५ ते ३० हजारांच्या पुढे, चौकट ७ ते ८ हजारांच्या पुढे, दरवाजा १० हजारांच्या च्या पुढे, टेबल ८ हजार, एक खुर्ची (ऑफिस) ८ हजार,  डायनिंग खुर्च्या ७ ते ८ हजारांना विकले जातात.


व्यवसायात हा ठरला टर्निंग पॉईंट

 

कोल्हापूर जि. प.ने सागवानाच्या बोटी घेणे बंद केल्यामुळे व्यवसायात वेगळेपण आलं. लाकडाची जागा फायबर आणि प्लायवूडने घेतली. दरवाजे, चौकटी, टेबल, खुर्च्या प्लास्टिकमध्ये मिळत असल्यामुळे हा व्यवसाय कमी झाला. शिवाय, लाकडाच्या किंमती दुप्पट-तिपटीने वाढल्या.

 

मेस्त्री बंधूंची हिच खासियत

ग्राहकांनी जरी कमी पैसे दिले असले तरी उत्तम लाकूड आणि चांगल्या प्रतीच्या वस्तू तयार करून देणं हीच मेस्त्री बंधूंची खासियत आहे. 

- विजय मेस्त्री - ९८२३४३१८३८


Friday, May 9, 2025

अदिती टोपकर-कुलकर्णी

अदिती टोपकर-कुलकर्णी सध्या कोल्हापुरात आपल्या सेंद्रीय खतांच्या उद्योगात आहेत. बी.कॉम, एलएलबीमधून शिक्षण घेतलेल्या अदिती सध्या डिप्लोमा इन गार्डनिंग अँड नर्सरी मॅनेजमेंट करत आहेत. तर एमबीएमधून ॲग्रीकल्चर ऑपरेशन मॅनेजमेंटमधूनही शिक्षण घेतले आहे. पुण्यात सीए करत असताना कोविड काळात त्या कोल्हापुरात परतल्या. त्याचवेळी सेंद्रीय खतांचे उत्पादन करण्याची कल्पना त्यांना सुचली. त्यांच्या आई शैला शरद टोपकर सायकॉलॉजिस्ट आहेत. त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांसाठी रमाई एन्टरप्रायझेसच्या माध्यमातून खतांचे उत्पादन करायच्या. त्यामुळे अदिती यांना खतांचे प्राथमिक ज्ञान आपल्या आईकडून मिळाले.

सुरुवातीलाशेतकऱ्यांना खते पुरवठा केला जायचा. पुढे Urban Line सुरु केली. त्यामध्ये फळझाडे, फळबागा, छोटी झाडे त्यांच्यासाठी सेंद्रीय खते उपलब्ध करून देण्यात आली. (Land Scaping, Home Home gardenings) यासाठी त्यांनी वेबसाईट सुरु केली. सोशल मीडिया टीम, मार्केटींग टीम उभारली. सेंद्रीय खतांचे दोन प्लँट उभारण्यात आले. एक हमीदवाडा (ता. कागल, जि. कोल्हापूर) आणि दुसरा जयसिंगपूर (कोल्हापूर)

साडे तीन ‍वर्ष ते या सेंद्रीय शेणखत उद्योगात आहेत. त्यांनी गार्डनिंग अँड नर्सरी मॅनेजमेंट (शिवाजी विद्यापीठ) येथून प्रशिक्षण घेतले आहे.  फर्टीलायझर कंट्रोल ऑर्डर अंतर्गत शासनाचे लायसन (उत्पादनाचे) त्यांच्याकडे आहे. त्यांची उद्योगातील टीम देखील कुशल आणि चांगली असल्यामुळे सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. अदिती यांच्याकडे १० फिक्स कामगार आहेत. प्रोडक्शन टीममध्ये पाच ते सहा लोक काम करत आहेत. दोन ऑफिस स्टाफ, एक टेक्निकल एक्सपर्ट आणि एक मार्केटिंग हेड असे लोक आहेत. मोठे ऑर्डर असेल तर अधिकचे कामगार डेली बेसिसवर घेतले जातात.

प्रोडक्ट लाईनमध्ये शेणखत (देशी गायीचे शेण) कंपोस्ट बाय प्रॉडक्ट म्हणून वापरतात. डी कंपोझिंग कल्चरमध्ये घरातील ओला कचरा असतो. नंतर गोमूत्र निमपेड वापरून कच्च्या मालापासून खते तयार केले जाते.

सुरुवातीला पाच ते सात लाखांची गुंतवणूक करण्यात आली.

एकूण सात प्रकारची उत्पादने आहेत. यामध्ये लिक्विड स्वरूपात ४ आहेत. (गार्डन मॅन्युअल, enriched वर्मी कंपोस्ट) व  पोट मिक्स-३ इत्यादी. टोपकर यांची काही प्रसिद्ध उत्पादने आहेत. यामध्ये जीवामृत लिक्विड टॉनिक, दशपर्णी अर्क, बायो ॲक्टिव्ह.

जीवामृत -जीवामृत लिक्विड टॉनिकला चांगली मागणी आहे. झाडांच्या संपूर्ण वाढीसाठी हे वापरतात. जीवामृत हे १५ ते १८ महिने कालावधीपर्यंत टिकतात. यामध्ये गोमूत्र, काळा गुळ वापरले जाते.

दशपर्णी अर्क- हे लिक्विड दुर्मीळ उत्पादन आहे. झाडांना, प्राण्यांना यापासून कोणतीही हानी नाही. शिवाय घरातल्या मुलांना सुद्धा यापासून कोणतेही नुकसान नाही. गुलाब, जास्वंद झाडांसाठी बुरशी लागू नये म्हणून हे वापरले जाते.

बायो ऍक्टिव्ह- झाडांचे फळे उत्तम येण्यासाठी. बियांचे जर्मिनेशन पूर्ण होण्यासाठी वापर होतो. या प्रोडक्टलाही अधिक मागणी आहे.
कोल्हापूर-गोवा येथे या उत्पादनांना खूप मागणी आहे. ही उत्पादने ॲमेझॉनवर देखील उपलब्ध असल्यामुळे भारतात सगळीकडे वितरण होतं. पुण्यात गिरमे फार्म, मगरपट्टा सिटी गार्डन, जगताप नर्सरी, कोल्हापुरातील शिवाजी युनिव्हर्सिटीला देखील खते पुरवली गेली आहेत. शिवाय सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याला सुद्धा खतांचा पुरवठा केला गेलाय. अनेक इंडस्ट्रीजना हा पुरवठा केला जातो. गोव्यातील २० ते ३० नर्सरीत खते पुरवली जातात. यातून मिळणारे वार्षिक उत्पन्न २५ ते ५० लाखापर्यंत आहे.

कल्चर जे आहे त्या टेक्नॉलॉजी वापरतात मायक्रोबेस यामध्ये तयार केले जातात आणि नंतर जैविक खत म्हणून कल्चरचा वापर होतो
आधी खते गार्डनिंग सोल्युशन्स देखील जात गार्डन्स मेंटेनन्स त्याने सुरू केलेला आहे लँडस्केपिंग साठी सर्व प्रकारच्या गोष्टींचा पुरवठा केला जातो यामध्ये विजिट केलं जातं ठिकाणी त्या त्या ठिकाणी गार्डनचे हेल्थ चेकअप केलं जातं त्यामध्ये मातीचे परीक्षण बुरशी आहे का झाडांची परिस्थिती पाहून त्यांना खते आणि इतर संबंधित गोष्टी पुरवल्या जातात

गार्डन अंडर वन रूप संकल्पना- हा टोकरी यांचा नेक्स्ट प्रोजेक्ट आहे यामध्ये ॲग्री मॉल किंवा ॲग्री शॉपी सुरू करणार आहेत त्यामध्ये झाडे खुरप अवजारे रोपे, कुंड्या मिळतील शिवाय ऑरगॅनिक व्हेजिटेबल्स प्रोजेक्ट सुरू करणार आहेत आणि त्याचबरोबर बुक कॅफे आणि गार्डन शॉपी असा एक प्लांट बेस्ड कॅफे असणार आहे

खते तयार केली गेली की ती लेप टेस्टिंगसाठी पाठवली जातात खतामध्ये एनपीके चे प्रमाण किती आहे म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे तपासले जातात

सेंद्रिय खताबाबत अद्यापही जागरूकता कमी आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यासाठी भरमसाठ रसायनांचा वापर केला जातो पण आज आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या यामुळे उद्भवल्या आहेत त्यामुळे सेंद्रिय खत वापरणं किती गरजेचा आहे भविष्याच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने हे समोर येतं केमिकल्स च्या बडीमारामुळे मातीची क्षमता ही कमी होत आहे व्यावसायिक दृष्ट्या पाहिले तसेच उत्पादने खूप महत्त्वाचे आहेत प्राईस देखील त्याची अधिक असल्यामुळे त्यामध्ये जागृती कमी आहे

ठोकळ्यांचा हम करे सेंद्रिय क्रांती हा टॅगच असून त्यांचा उद्योग करण्याचा पहिल्यांदा विचार नव्हता झाडांवर प्रेम करायला गेल्यानंतर त्यांना कामात देखील ऋची निर्माण झाली आणि रोज सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही म्हणून त्यांनी हा उद्योग स्वीकारलेला आहे

निर्माल्या असेल तुमच्या वेस्ट मॅनेजमेंट मध्ये टिंटन पेक्षा अधिक गोळा केलं गेलं गणपती उत्सवानंतर आणि त्याचं खतात रूपांतर केले गेले हा देखील त्यांचा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट होता या त्यांनी हे निसर्गाबद्दलच प्रेम व्यक्त केलं या प्रोजेक्टच्या माध्यमातून शेत पिके झाडे फळे झाडांनाही खते वापरतात बागा शेतीसाठी सेंद्रिय खते वापरले जातात शेणखत वगैरे नॅनो केमिकल्स असल्यामुळे कशाही प्रकारचे नुकसान होत नाही झाडे आणि मानवी शरीरालाही हानिकारक नाही

सध्या सांगली जत येथे ऑर्गानिक मॅंगो शेतीसाठी काम सुरू आहे एप्रिल मे च्याही लागवड केली जाणार आहे
 Ramaiorganic.com

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...