Tuesday, November 27, 2018

आजपर्यंत रिलीज झाले नाहीत SRK चे 'हे' ५ सिनेमे

बादशाह शाहरुख खानला सिने इंडस्‍ट्रीत २५ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. 'रोमान्‍स ऑफ द किंग' शाहरुख आज ५३ वर्षांचा झाला आहे. रोमँटिक चित्रपटाची सुरुवात शाहरुखने केली असल्‍याचे म्‍हटले जाते. शाहरुखने बॉलिवूडला एकापेक्षा एक चित्रपट दिले. असे काही चित्रपट आहेत, ज्‍यामध्‍ये शाहरुखने काम केलं; परंतु, ते आजपर्यंत रिलीज झाले नाहीत. 
शाहरुखचे असे ५ चित्रपट जे आजपर्यंत रिलीज होऊ शकले नाहीत. 

एक्‍स्‍ट्रीम सिटी (२०११) 
शाहरुखनच्‍या बद्‍दल ही माहिती खूप कमी लोकांना माहिती आहे की, त्‍याने हॉलिवूडमध्‍येही काम केलं आहे २०११ मध्‍ये शाहरुख हॉलिवूड चित्रपट एक्‍स्‍ट्रीम सिटी चित्रपटाचे शूटिंग करत होते. परंतु, काही कारणास्‍तव हा चित्रपट रिलीज होऊ शकणार नाही. हा चित्रपट हॉलिवूडचा प्रसिध्‍द दिग्‍दर्शक मार्टिन स्‍कोर्सेस दिग्‍दर्शित करत होता. त्‍यामध्‍ये टायटॅनिक फेम लियोनार्डो डिकैप्रियो मुख्‍य भूमिकेत होते. 
Image result for shahrukh khan film extream city
रश्‍क (२००१) 
चित्रपट 'रश्‍क'चे शूटिंग २००१ मध्‍ये सुरू झालं होतं. त्‍यात शाहरुख खानसोबत अमिताभ बच्‍चन आणि जूही चावला यांच्‍याही मुख्‍य भूमिका होत्‍या. हा चित्रपट का रिलीज होऊ शकला नाही, हे आजपर्यंत समजलेलं नाही. 
Related image
अहमक (१९९१) 
शाहरुख खानचा तिसरा चित्रपट 'अहमक' देखील रिलीज होऊ शकला नाही. चित्रपटाचे दिग्‍दर्शन मणि कौल करत होते. शाहरुख सोबत अयूब खान आणि मीता वशिष्‍ठ मुख्‍य भूमिकेत होते. चित्रपट पूर्ण झाला होता. २०१५ मध्‍ये चित्रपट महोत्‍सवात दाखवण्‍यात आला होता. परंतु, चित्रपटगृहापर्यंत पोहोचला नाही. 
Related image
शिखर (१९९५) 
दिग्‍दर्शक सुभाष घई यांनी शाहरुख खान आणि माधुरीला चित्रपट 'शिखर'साठी ऑफर दिली होती. परंतु, या चित्रपटात थोडा बदल व्‍हावा, असं शाहरुखला वाटत होतं. सुभाष घई त्‍यासाठी तयार होत नव्‍हते. त्‍यामुळे शाहरुखने चित्रपट सोडला. त्‍यानंतर सुभाष यांनी चित्रपटाचे नाव बदलून ताल असं केलं. आणि ऐश्‍वर्या रायसोबत अभिनेता अक्षय खन्‍नाला मोठ्‍या पडद्‍यावर आणलं. हा चित्रपट सुपरहिट ठरला. 
Image result for shahrukh khan film shikhar madhuri
किसी से दिल लगा के देखो (१९९६) 
शाहरुखचा पाचवा चित्रपट 'किसी से दिल लगाके न देखो' हा चित्रपट १९९६ मध्‍ये कल्‍पतरु दिग्‍दर्शित करत होते. त्‍यात शाहरुख शिवाय आयेशा जुल्‍का आणि मधु यांच्‍या मुख्‍य भूमिका होत्‍या. 
Image result for shahrukh khan film kisi se dil laga ke dekho

अभिनेत्री नूतन यांनी संजीव कुमार यांच्‍या लगावली होती श्रीमुखात

पुण्‍यतिथी निमित्त

* ९ जुलै, १९३८ रोजी जन्‍मलेले अभिनेते संजीव कुमार यांचं खरं नाव हरीहर जेठालाल जरीवाला असं होतं. 
* सूरतमध्‍ये त्‍यांचा जन्म झाला. सुरुवातीला ७ वर्षे तेथे राहिल्‍यानंतर त्‍यांचे कुटुंबीय मुंबईला आले. 
*संजीव कुमार यांनी स्टेजवर अभिनय करण्‍यास सुरुवात केली. त्‍यानंतर ते इंडियन नॅशनल थिएटरशी जोडले गेले. 
*हम हिंदुस्तानी (१९६०) संजीव कुमार यांचा पहिला चित्रपट होता. त्‍यांनी अनेक चित्रपटात छोट्‍या-मोठ्‍या भूमिका केल्‍या. या भूमिकेतूनच त्‍यांना अभिनेता म्‍हणून ओळख मिळाली. 
*१९६८ मध्‍ये रिलीज झालेला 'राजा और रंक' या चित्रपटाच्‍या यशानंतर संजीव कुमार बॉलिवूडमध्‍ये मागे वळून पाहावे लागले नाही. 
*संघर्ष (१९६८) मध्‍ये ते दिलीप कुमार यांच्‍यासोबत एका छोट्‍या भूमिकेत दिसले. परंतु, या चित्रपटात त्‍यांनी आपल्‍या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्‍याबरोबरच दिलीप कुमार यांचंही मन जिंकलं. 
Related image
* संजीव कुमार वृध्‍द व्‍यक्‍तीची भूमिका साकारण्‍यासाठी ओळखले जायचे. २२ वर्षांचे असताना त्‍यांनी एका नाटकात वृध्‍द व्‍यक्‍तीची भूमिका साकारली होती. 
* १९७२ मध्‍ये गुलजार यांनी संजीव कुमार यांचा 'सुबह-ओ-शाम' हा चित्रपट पाहिला. गुलजार यांना संजीव यांचा अभिनय आवडला होता. त्‍यानंतर गुलजार आणि संजीव कुमार यांनी मिळून (१९७३),
आंधी (१९७५), मौसम (१९७५), अंगूर (१९८०), नमकीन (१९८२) यासारखे चांगले चित्रपट केले. 
Image result for sanjeev kumar
*'नया दिन नई रात' (१९७४) मध्‍ये संजीव कुमार यांनी ९ भूमिका करून आपल्‍या अभिनयाची छाप सोडली. संजीव कुमार यांनी आपल्‍या करिअरमध्‍ये प्रत्‍येक प्रकारच्‍या भूमिका केल्‍या. 
* संजीव कुमार यांच्‍या फॅमिलीत कुठलाही पुरुष ५० वर्षांपेक्षा अधिक आयुष्‍य जगू शकला नाही. संजीव यांनाही नेहमी वाटायचं की, आपणही अधिक वर्षे जगू शकणार नाही. त्‍यांचा लहान भाऊ नकुल यांचा मृत्यू संजीव यांच्‍याआधीच झाला होता. नंतर ६ महिन्‍यांनी त्‍यांचे मोठे भाऊ किशोर यांचे निधन झालं. संजीव कुमार यांचंदेखील वयाच्‍या ४७ व्‍या वर्षी निधन झालं. ६ नोव्‍हेंबर १९८५ ला त्‍यांनी जगाचा निरोप घेतला. 
* 'शोले' चित्रपटात संजीव कुमार यांनी ठाकुरची भूमिका केली होती. ही भूमिका धर्मेंद्र यांना करायची होती. दिग्‍दर्शक रमेश सिप्पी हे विचारात पडले. त्‍यावेळी धर्मेंद्र हे हेमा मालिनी यांच्‍या प्रेमात होते. त्‍याचबरोबर संजीव कुमार देखील हेमा यांच्‍यावर प्रेम करत होते. रमेश सिप्पी धर्मेंद्र यांना म्‍हणाले, 'तुला वीरूची भूमिका करताना जास्‍तीतजास्‍त हेमासोबत रोमान्‍स करण्‍याची संधी मिळेल. जर तू ठाकुरची भूमिका केली तर मी संजीव कुमारला वीरूची भूमिका देईन.' त्‍यामुळे धर्मेंद्र यांनी ठाकुरची भूमिका सोडली. ठाकुरच्‍या भूमिकेमुळेच संजीव कुमार यांना आज देखील स्‍मरणात आहेत. 
Related image
* संजीव कुमार यांना हेमा मालिनी आवडायच्‍या. परंतु, हेमा यांच्‍या आयुष्‍यात धर्मेंद्र आले. दरम्‍यान, संजीव यांचं नाव सुलक्षणा पंडितशी जोडलं गेलं. त्‍यांच्‍या अफेअरची चर्चा होऊ लागली. 
* एक अभिनेता म्‍हणून संजीव कुमार यांचा धाक होता. त्‍यांच्‍यासोबत काम करणार्‍या अनेक कलाकारांचं म्‍हणणं होतं की, त्‍यांच्‍यासोबत काम करणं कठीण आहे. असं म्‍हटलं जातं की, 'विधाता' चित्रपटात दिलीप कुमार हे संजीव कुमार यांच्‍यासोबत शॉट देण्‍यासाठी लवकर तयार व्‍हायचे नाहीत. 
* शत्रुघ्न सिन्हा, सचिन आणि अमिताभ बच्चन यांच्‍याशी संजीव कुमार यांची चांगली मैत्री होती. 
* संजीव कुमार यांना दोन वेळा सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्‍याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 'दस्तक' (१९७१) आणि 'कोशिश' (१९७३) या चित्रपटासाठी हे पुरस्‍कार मिळाले होते. १४ वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी ते नॉमिनेट झाले होते. दोन वेळा उत्‍कृष्‍ट अभिनेता (आंधी-१९७६ आणि अर्जुन पंडित-१९७७) आणि एक वेळ उत्‍कृष्‍ट सहाय्‍यक अभिनेता (शिकार-१९६९) चा ॲवॉर्ड जिंकला होता. 
Related image
*एकदा अभिनेत्री नूतन यांनी संजीव कुमार यांच्‍या श्रीमुखात लावली होती. त्‍यावेळी नूतन आणि संजीव यांच्‍याबद्‍दल अफेअरचे वृत्त पसरले होते. त्‍यामुळे नूतन यांच्‍या वैवाहिक आयुष्‍यात वादळ आलं होतं. नूतन यांना वाटलं की, या सर्व गोष्‍टी संजीव पसरवत आहेत. ते आमने-सामने आल्‍यानंतर नूतन यांनी संजीव यांच्‍या श्रीमुखात लगावली. 
Related image
*सूरतमध्‍ये एक रस्‍त्‍याचे नाव आणि एका शाळेचे नाव संजीव कुमार यांच्‍या नावाने ठेवण्‍यात आलं होतं. २०१३ मध्‍ये एक टपाल तिकिट देखील संजीव कुमार यांच्‍या स्‍मरणार्थ काढण्‍यात आले होते. 
*संजीव कुमार हे आपला दमदार अभिनय आणि त्‍यातील विविधतेसाठी ओळखले जात होत. त्‍यांनी आपल्‍या करिअरमध्‍ये आव्‍हानात्‍मक भूमिका केल्‍या. रोमँटिक, हास्य आणि गंभीर भूमिका त्‍यांची खासियत होती. 

*संजीव कुमार यांच्‍या निधनानंतर १० पेक्षा अधिक त्‍यांचे चित्रपट रिलीज झाले. काही चित्रपटांचे शूटिंग अपूर्ण राहिले. नंतर कथेत फेरबदल करून ते चित्रपट प्रदर्शित करण्‍यात आले. १९९३ मध्‍ये  संजीव कुमार यांचा शेवटचा चित्रपट 'प्रोफेसर की पडोसन' प्रदर्शित झाला होता. 

एका फोटोशूटमुळे चर्चेत आला होता मिलिंद सोमण


सुपरमॉडल, अभिनेता मिलिंद सोमणचा ४ नोव्‍हेंबरला वाढदिवस. गेल्‍या काही वर्षांपासून मिलिंद एंटरटेनमेंट बिजनेसमध्‍ये आहे. मिलिंदच्‍या लुक्स, पर्सनॅलिटीबरोबरच चर्चा झाली ती, त्‍याच्‍या दुसर्‍या विवाहाची. तुम्‍हाला मिलिंद सोमण याच्‍या आयुष्‍यातील या खास गोष्‍टी वाचायला नक्‍कीच आवडतील! 

मिलिंदचा जन्म ४ नोव्‍हेंर १९६५ रोजी स्कॉटलंड-ग्लासगोमध्‍ये झाला. मिलिंदची सुपर मॉडल म्‍हणून भारतात ओळख निर्माण झाली. इंजिनियरिंगचं शिक्षण घेणार्‍या मिलिंदने मॉडलिंगमध्‍ये करिअर केलं. १९८८ पासून त्‍याने मॉडलिंगला सुरुवात केली. आजदेखील मिलिंद रॅम्‍पवर आल्‍यानंतर भले भले मॉडल्‍स त्‍याच्‍यासमोर मागे पडतात.  
इंडस्ट्रीतला पहिला सुपरमॉडल म्‍हणून मिलिंदला ओळखले जाऊ लागले. तो पहिल्‍यांदा गायिका अलीशा चिनॉयसोबत एका म्युझिक व्‍हिडिओमध्‍ये दिसला. 'मेड इन इंडिया' हा म्‍युझिक व्‍हिडिओ चांगला गाजला. मिलिंद 'बाजीराव मस्तानी'मध्‍ये दिसला होता. त्‍याने अंबाजी पंतची भूमिका साकारली होती. 
एका फोटोशूटमधुळे चर्चेत आला होता मिलिंद
१९९५ मध्‍ये मिलिंदने मधु सप्रे (एक्‍स गर्लफ्रेंड) सोबत न्यूड फोटोशूट केला होता. ज्‍यामुळे तो खूप चर्चेत आला. या फोटोशूटमुळे वाद देखील निर्माण झाला होता. १४ वर्षे कायदेशीर संघर्ष करून शेवटी २००९ मध्‍ये कोर्टाने निर्णय दिला होता. या फोटोशूट विरोधात काही ठिकाणी निदर्शने झाली तर काही ठिकाणी मोर्चे काढण्‍यात आले होते. त्‍याने पहिल्‍यांदाच टीव्‍ही शो 'कॅप्टन व्योम'मध्‍ये काम केलं होतं. 
मिलिंदचं फिटनेस
मिलिंद फिटनेसबद्‍दल सजग आहे. २ वर्षांपूर्वी त्‍याने अल्ट्रामॅनचा किताब जिंकला होता. हा जगातील सर्वांत कठीण मॅरेथॉन होतं. या स्‍पर्धेत मिलिंदने ३ दिवसांत ५१७ किमी. धावून हा किताब आपल्‍या नावे केला होता. त्‍याने २०१५ रोजी त्‍याने आयर्नमॅन चॅलेंज पूर्ण केलं होतं. या चॅलेंजमध्‍ये त्‍याने 'आयर्नमॅन ऑफ इंडिया'चा किताब जिंकला होता. हे चॅलेंज मिलिंदने ५ तास १९ मिनिटात पूर्ण केले होते. 
अंकिता कोनवारशी विवाह 
मिलिंदच्‍या खासगी आयुष्‍याबद्‍दल सांगायचं झालं तर २००६ मध्‍ये 'वॅली ऑफ फ्लॉवर्स'ची त्‍याची फ्रेंच को-स्‍टार मॅलेन जाम्‍पनोईशी विवाह केला होता. परंतु, दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. २००९ मध्‍ये दोघांनी घटस्‍फोट घेतला. त्‍यानंतर मिलिंदने अभिनेत्री सहाना गोस्‍वामीला डेट केलं. सहाना मिलिंदपेक्षा २१ वर्षांनी लहान होती. मिलिंदचं सहानासोबतचे रिलेशनशीप ४ वर्षे होतं. त्‍याने अंकिता कोनवारशी दुसर्‍यांदा विवाह केला आहे. 

विवाहित अभिनेत्रीच्‍या प्रेमात होते आशुतोष राणा

बॉलिवूड इंडस्ट्रीला 'जख्म', 'दुश्मन' आणि 'संघर्ष' यासारखे एकापेक्षा एक चित्रपट देणारे अभिनेते आशुतोष राणा यांचा आज ५० वा वाढदिवस.  आशुतोष वेगळ्‍या भूमिका करणारे अभिनेते म्‍हणून ओळखले जातात. 
Image result for ashutosh rana
टीव्‍ही मालिका 'स्वाभिमान'मधून आपल्‍या करिअरची सुरुवात करणारे आशुतोष मध्य प्रदेशचे राहणारे आहेत. चित्रपट 'दुश्मन'मध्‍ये सायको किलरची भूमिका साकारून त्‍यांनी आपली ओळख निर्माण केली. 
इंडस्ट्रीला 'जख्म', 'दुश्मन', 'संघर्ष' असे एकापेक्षा एक चित्रपट दिले. 
Related image
आशुतोष शिवभक्त आहेत. त्‍यांनी एका मुलाखतीत म्‍हटले होते, ते त्‍यांच्‍या गुरूंच्‍या म्‍हणण्‍यानुसार, सिनेजगतात आले होते. 
त्‍यांनी आतापर्यंत ३० हून अधिक चित्रपट आणि टीव्‍ही मालिकांमध्‍ये काम केलं आहे. 
Related image
आशुतोष यांच्‍या आयुष्‍यात असा एक दिवस आला होता की, ज्‍यावेळी त्‍यांना एका चित्रपटाच्‍या सेटवरून बाहेरचा रस्‍ता दाखवण्‍यात आला होता. आशुतोष यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, एकदा ते चित्रपट निर्माते-दिग्‍दर्शक महेश भट्ट यांना भेटायला गेले होते. भारतीय परंपरानुसार, त्‍यांनी महेश भट्ट यांचे आशीर्वाद घेतले. त्‍यानंतर महेश भट्‍ट भडकले. कारण, पाया पडणारे व्‍यक्‍ती त्‍यांना आवडत नाहीत. त्‍यावेळी महेश भट्‍ट यांनी सेटवरून आशुतोष यांना बाहेरचा रस्‍ता दाखवला. इतकचं नाही तर ते 'हा व्‍यक्‍ती सेटवर कसा आला?' असं म्‍हणत सहाय्‍यक दिग्‍दर्शकावर देखील संतापले होते. इतक्‍या अपमानानंतर देखील हार मानली नाही. ज्‍या-ज्‍यावेळी ते महेश भट्ट यांना भेटायचे किंवा पाहायचे, त्‍यांचा आशीर्वाद घ्‍यायचे. अखेर महेश भट्ट यांनी एक दिवस त्‍यांना विचारलं की, मला पाया पडणे आवडत नसतानाही तू असं का करत आहेस? 
Related image
त्‍यानंतर आशुतोष म्‍हणाले, 'मोठ्‍या लोकांचा आशीर्वाद घेण्‍यात संस्कार आहेत. हे संस्‍कार मी सोडू शकत नाही.' त्‍यावेळी महेश भट्ट यांनी आशुतोष यांची गळाभेट घेतली आणि टीव्‍ही मालिका 'स्वाभिमान'मध्‍ये गुंडाची भूमिका दिली. ही आशुतोष यांची पहिलीच भूमिका होती. नंतर आशुतोष यांनी महेश भट्ट यांच्‍यासोबत अनेक चित्रपटात काम केलं. त्‍यामध्‍ये 'जख्म', 'दुश्मन' हे महत्त्‍वाचे चित्रपट आहेत. 
आशुतोष राणा एनएसडीचे विद्‍यार्थी होते. एलएलबीनंतर ते वकील होणार होते. प्रशिक्षणानंतर त्‍यांना एनएसडीमध्‍ये नोकरीची ऑफर मिळाली. परंतु, त्‍यांनी सिनेजगतात येण्‍याचा निर्णय घेतला.  
Image result for ashutosh rana
शूटिंगमध्‍ये कितीही बिझी असले तरी जेव्‍हा त्‍यांचे गुरु सव्‍वा कोटी पार्थिव शिवलिंग निर्माण महारुद्र यज्ञासाठी बोलावल्‍यानंतर आशुतोष हातातली सर्व कामे सोडून जातात. 
रेणुका शहाणेसोबत विवाह
dinsta
अभिनेत्री रेणुका आणि आशुतोष यांची पहिली भेट चित्रपट 'जयति'च्‍या शूटिंगवेळी झाली होती. त्‍यानंतर अनेक महिने दोघांच्‍यात कुठलीही चर्चा झाली नाही. ऑक्टोबर १९९८ मध्‍ये आशुतोष यांनी रेणुकाला फोन करून दिवाळीच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. त्‍यानंतर दोन-तीन दिवसांनी त्‍यांनी रेणुकाला फोन केला. एक दिवस रेणुकाने आशुतोष यांना फोन केला आणि १ तास बोलली. त्‍यानंतर ३ महिने दोघेही फोनच्‍या माध्‍यमातून बोलत होते. रेणुका यांचं लग्‍न फार काळ टिकलं नव्‍हतं. ही गोष्‍ट आशुतोष यांना माहिती होती. तरीही त्‍यांनी रेणुकाशी विवाह करण्‍याचा निर्णय घेतला.
dinsta
आता या जोडीला शौर्यमन आणि सत्येंद्र ही दोन मुले आहेत.
dinsta
dinsta

तुम्‍हीही काढू शकता 'या' सेलेब्‍ससारखे टॅटूज

आज तरुणाईमध्‍ये टॅटू फेमस आहे. मग ते एक हौस म्‍हणून असो किंवा प्रेम व्‍यक्‍त करण्‍यासाठी असो. काही जण आपल्‍या शरीरावर वेगवेगळ्‍या प्रकारचे टॅटूज काढतात. त्‍यात बॉलिवूड सेलेब्सदेखील मागे नाहीत. काही सेलिब्रिटी असे आहेत, ज्‍यांनी आपलं प्रेम व्‍यक्‍त करण्‍यासाठी आपल्‍या पार्टनरचं नाव टॅटूने गोंदवलं आहे. या यादीत दीपिका पादुकोणपासून प्रतीक बब्बरपर्यंत नावे आहेत. आता त्‍यात आणखी एका नावाची भर पडली आहे, ते म्‍हणजे सपना चौधरी. सपनाने काही तासांपूर्वी एक टॅटू काढला आहे. त्‍याचबरोबर कोणकोणत्‍या बॉलिवूड स्टार्सनी टॅटू काढले आहेत, ते पाहा. 

सपना चौधरी 
सध्‍या डान्‍सर आणि बिग बॉस कंटेस्‍टेंट सपना चौधरीचा एक फोटो व्‍हायरल झाला आहे. या फोटोमध्‍ये सपनाच्‍या पाठीवर टॅटू काढलेला दिसत आहे. सपनाने आपल्‍या पाठीवर एक टॅटू गोंदवला आहे, त्‍यात लिहिलयं की, 'देसी क्वीन.' या फोटोला आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांनी पसंत केलं आहे. सोशल मीडिया यूजर्स या फोटोवर कॉमेंट करत आहेत. सपनाने १७ तासांपूर्वी हा फोटो पोस्ट केला आहे. एका यूजरने सपनाच्‍या या फोटोवर कॉमेंट करत लिहिलयं की, 'प्लीज सपना माझ्‍याशी लग्‍न कर.' तर दुसर्‍या यूजरने सपनाला सल्‍ला देताना लिहिलयं की, 'देसी क्वीनच्‍या जागी देसी छोरी असं हवं होतं.' 
dinsta
दीपिका पादुकोण
दीपिका पादुकोण ज्‍यावेळी रणवीर कपूरसोबत रिलेशनशीपमध्‍ये होती. त्‍यावेळी मानेवर तिने RK कावाचा टॅटू काढला होता. ब्रेकअपनंतर तिने हा टॅटू हटवला. त्‍यानंतरतिने आपल्‍या पायात पैंजण घालण्‍याऐवजी डिझायनर टॅटू गोंदवलं आहे.  
Image result for deepika tattooImage result for deepika foot tattoo
अलिया भट्ट
अलियाने आपल्‍या मानेवर बॅक साईडवर 'पटाका' लिहिलेला टॅटू काढला आहे. 
Image result for alia bhatt tattoo
सैफ अली खान
सैफ अली खानने आपल्‍या हातावर 'करीना' असे लिहिलेलं टॅटू गोंदवलं आहे. 
Image result for saif ali khan tattoo
अजय देवगन
अजय देवगनने आपल्‍या चेस्टमध्‍ये शिवशकंरचा टॅटू गोंदवला आहे. त्‍याचबरोबर आपल्‍या मुलीच्‍या नावाचा टॅटू मानेवर गोंदवलं आहे. 
Image result for ajay devgan tattoo
राखी सावंत
राखी सावंतने आपल्‍या पोटाजवळ फुलपाखरूचे टॅटू काढले आहे. 
Image result for rakhi sawant tattoo
संजय दत्त 
संजय दत्तच्‍या उजव्‍या खांद्‍यावर वरच्‍या बाजूला 'आग ओकणारा ड्रॅगन'चा टॅटू काढला आहे. 
sanjay dutt right arm tattoo
रणबीर कपूर
रणबीर कपूरने आपल्‍या मनगटावर टॅटू गोंदवला असून त्‍यात 'आवारा' असं लिहिलं आहे. 
Image result for ranbir kapoor tattoo
प्रतीक बब्बर
प्रतीक बब्बरने एमी जॅक्सनसाठी 'Mera Pyar Meri Amy' टॅटू असं लिहिलें दिसतं तर ॲमी जॅक्सनच्‍या हातावर प्रतीक बब्बरसाठी 'Mera Pyar Mera Prateik' नावाचा टॅटू काढला आहे. 
Image result for prateik babbar tattoo
अक्षय कुमार 
अक्षय कुमार त्‍याची पत्‍नी ट्‍विंकलवर खूप प्रेम करतो. त्‍याचं प्रूफ आहे, अक्षय कुमारचा टॅटू. अक्षयने हा टॅटू आपल्‍या खांद्‍यावर काढून घेतला आहे. अक्षयने खांद्‍यावर ट्विंकल नावाचा टॅटू 'टीना' हे नाव गोंदवलं आहे. ट्विंकलचं उर्फ नाव टीना आहे. त्‍याचबरोबर, अक्षयने पाठीवर त्‍याचा मुलगा 'आरव'चे नाव गोंदवून घेतले आहे.
dinsta
Image result for imran khan tattoo
कंगना राणावत 
कंगना राणावतने मानेवर टॅटू काढला आहे. 
Image result for कंगना राणावत का टॅटू
सुष्‍मिता सेन 
सुष्‍मिता सेनने हाताबरोबरच कमरेवर देखील टॅटू काढला आहे. 
Image result for सुष्मिता सेन का टैटू
Image result for सुष्मिता सेन का टैटू
सूरज पांचोली 
सूरज पांचोलीने आपल्‍या पाठीवर नावाचा 'सूरज' असा इंग्‍लिशमध्‍ये टॅटू गोंदवला आहे. त्‍याने हा टॅटू १४ वर्षांचा असताना काढला आहे. 
Related image
इम्रान खान 
अभिनेता इम्रान खानने चेस्‍टवर त्‍याच्‍या बाळाच्‍या तळपायाचा टॅटू काढला आहे. 
Related image
सोनाक्षी सिन्‍हा 
सोनाक्षीने आल्‍या गळ्‍याजवळ 'चांदणी' काढली आहे. तिने तिच्‍या २७व्‍या वाढदिवसादिवशी हा टॅटू काढला आहे. 
Image result for sonakshi sinha tattoo
बानी जे.
मॉडल, अभिनेत्री बानी जे च्‍या हातावरील टॅटू लक्षवेधी आहे. 
bani j
अर्जुन कपूर 
अर्जुन कपूरने आपल्‍या हातावर 'माँ' असा हिेंदीत टॅटू गोंदवला आहे. 
Arjun Kapoor
श्रुती हसन 
सुपरस्‍टार कमल हसन यांची मुलगी अभिनेत्री श्रुती हसनने आपल्‍या पाठीवर तिचं निक नेम काढलं आहे. 
Related image

कमल हसन यांचे सिनेमे पाहायला बुरखा घालून जायच्‍या श्रीदेवी

आज अभिनेते कमल हसन यांचा वाढदिवस. कमल हसन आणि श्रीदेवी यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडायची. परंतु, कमल हसन श्रीदेवी यांना आपली  बहिण मानायचे. कमल हसन यांच्‍या वाढदिवसानिमित्त जाणून घ्‍या या खास गोष्‍टी. 

Image result for sridevi and kamal hassan
दाक्षिणात्‍य चित्रपट सृष्‍टीचे सुपरस्टार कमल हसन ७ नोव्‍हेंबरला आपला ६४ वा वाढदिवस साजरा करत आहेत.   वयाच्‍या ६ वर्षी कमल यांनी आपल्‍या करिअरची सुरुवात केली. (१९५९).  
Image result for sridevi and kamal hassan
मोठ्‍या पडद्‍यावरील कमल हसन आणि श्रीदेवी यांची जोडी प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरली होती. कमल हसन श्रीदेवी यांना बहिण मानायचे. श्रीदेवी यांच्‍या निधनानंतर  एका कार्यक्रमात कमल हसन यांनी म्‍हटलं होतं की, 'मी जेव्‍हा श्रीदेवीला भेटलो, तेव्‍हा ती १५-१६ वर्षांची होती. आम्‍हाला दोघांना कपल म्‍हणून कास्‍ट करण्‍यात आलं होतं. परंतु, रिअल लाईफमध्‍ये आम्‍ही भाऊ-बहिणीसारखे मोठे झालो. आम्‍हाला रोमँटिक चित्रपटात कास्‍ट करण्‍यात आल्‍यानंतर आम्‍ही पोट धरून हसलो. आम्‍ही एकाच कुटुंबातील सदस्‍य आहोत, असं आम्‍हाला वाटायचं.' 
Related image
श्रीदेवी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'एकदा मी कमल हसन यांच्‍या एका चित्रपटाची स्क्रीनिंग मिस केली होती. त्‍यामुळे तो चित्रपट थिएटरमध्‍ये पाहण्‍यासाठी मी बुरखा घातला होता. पब्लिकमध्‍ये जाताना हे करावं लागलं. मी खूप कमी वेळा चित्रपट पाहण्‍यासाठी थिएटरमध्‍ये जात होते. चित्रपटांचे स्पेशल स्क्रीनिंगचं मी पाहायला जात असे.' 
Related image
श्रीदेवी यांना प्रसिध्‍दी मिळाली ती डायरेक्टर भरतराजा यांच्‍या 'पथिनारू वयाधिनाइल' या चित्रपटामुळे. या चित्रपटात कमल हसन आणि रजनीकांत होते. कमल हसन आणि श्रीदेवी यांची जोडी 'कॉलीवुड'मध्‍ये हिट मानली जाते. दोघांनी जवळपास ४० चित्रपटात एकत्र काम केलं. 
Image result for sridevi and kamal hassan
‘सदमा’ हा चित्रपट कमल आणि श्रीदेवी यांच्‍या अभिनय कारकिर्दीतलं सर्वोच्च शिखर. हा चित्रपट ज्यांनी पाहिला त्यांना श्रीदेवीतली अभिनेत्री कळाली. सदमामध्‍ये कमल यांची प्रमुख भूमिका होती. कमल यांनी श्रीदेवी यांच्‍यासोबत सदमा, आखिरी संग्राम यासह अनेक तमिळ चित्रपटात काम केलं. बालू महेंद्र यांच्‍या दिग्‍दर्शनाखाली बनलेला 'सदमा' हा तमिळ चित्रपट 'मूंदरम पिरई'चा रीमेक होता. 
Related image
श्रीदेवी यांनी एकदा एका मुलाखतीत म्‍हटलं होतं, 'माझी मुलगी जान्‍हवीने सदमा चित्रपट पाहिल्‍यानंतर ती चिंतेत होती. ती केवळ ६ वर्षांची होती. त्‍यावेळी जान्‍हवी माझ्‍यासोबत ३ दिवस बोलली नव्‍हती. कारण मी, सदमा चित्रपटात कमल हसन यांना सोडून गेले होते. चित्रपट पाहिल्‍यानंतर जान्‍हवी मला म्‍हणाली होती, तू वाईट मम्मा आहेस. तुम्‍ही त्‍यांच्‍यासोबत वाईट वागलात.' 
Image result for sridevi and kamal hassan

२५ वर्षे @बाजीगर - 'बाजीगर'मध्‍ये शाहरुखच्‍या आधी 'यांना' मिळालेली ऑफर

एकतर शूटिंगसाठी झालेला उशीर आणि नायकाची नेगेटीव्‍ह भूमिका करण्‍यास नकार, यानंतर देखील रिलीज झालेला अब्बास मस्तान यांचा 'बाजीगर' या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली. शाहरूख स्‍टारर चित्रपट ‘बाजीगर’ १२ नोव्‍हेंबर १९९३ मध्‍ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचा क्‍लायमॅक्‍स दोनवेळा शूट करण्‍यात आला होता. शाहरूख, काजोल बरोबरच शिल्पा शेट्टीची देखील त्‍यात प्रमुख भूमिका होत्‍या. 
Image result for baazigar
दिग्‍दर्शक जोडी अब्बास-मस्तान यांच्‍यापैकी, 'मस्तान यांनी एका वृत्तसंस्‍थेशी बोलताना सांगितले की, लोकांना आता देखील हा चित्रपट आवडतो. हे आमच्‍या संपूर्ण टीमसाठी कौतुकास्‍पद आहे. हा चित्रपट रोमँटिक चित्रपट नव्‍हता. चित्रपटाचा हिरो निगेटीव्‍ह भूमिकेत होता. सर्वांनी खूप चांगलं काम केलं.' 
Related image
मस्‍तान म्‍हणाले, 'या चित्रपटाबद्‍दल केवळ देशातच नाही तर जगभरातून चांगल्‍या प्रतिक्रिया मिळाल्‍या. खरंतरं, या चित्रपटाची निर्मिती करणं कठीण होतं. चित्रपटाचा मुहूर्त डिसेंबर १९९२ मध्‍ये होता आणि लवकरच चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार होते. ६ डिसेंबरला बाबरी मस्जिद उद्‍ध्‍वस्‍त झाल्‍यानंतर देशात जागोजागी हिंसा भडकली. त्‍यामुळे चित्रपटाचं काम थांबवण्‍यात आलं. काही दिवस थांबल्‍यानंतर मार्च महिन्‍याच्‍या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग पुन्‍हा सुरू केले. मे-जूनमध्‍ये शूटिंग संपवून दीवाळीत चित्रपट रिलीज करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला.' 
Related image
या चित्रपटाचा शेवट २ वेळा शूट करण्‍यात आला होता. कारण, राखी गुलजार यांचं म्‍हणणं होतं की, शेवटी या चित्रपटाचा क्‍लायमॅक्‍स वेगळा असायला हवा. त्‍याशिवाय, हा चित्रपट प्रेक्षकांना आवडणार नाही. खूप सार्‍या वितरकांनी सांगितलं होतं की, नायक मरतो, हा सीन नसायला पाहिजे. त्‍याऐवजी पोलिस येऊन त्‍याला अटक करतात, हा सीन पाहिजे,' असे मस्‍तान यांनी सांगितले. 
Related image
शाहरुखला या चित्रपटात साईन करण्‍याआधी अभिनेता अनिल कपूर आणि सलमान खान यांना या चित्रपटातील भूमिकेसाठी विचारण्‍यात आले होते. परंतु, दोघांनाही खलनायकाची भूमिका करायची नव्‍हती आणि त्‍यांनी या चित्रपटासाठी नकार दिला. अखेर शाहरुख खानच्‍या झोळीत हा चित्रपट पडला. 

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...