Thursday, March 11, 2021

शिरोड्याला जाताय? मग, तुम्ही न पाहिलेल्या 'या' ठिकाणांना भेट नक्की द्या

 गोवा पाहून कंटाळा आलाय? तर मग शिरोड्याला जा!. तुम्ही म्हणाल, आम्ही शिरोड्यालादेखील जाऊन आलोय. पण, शिरोड्याला पुन्हा एकदा जा, असं आम्ही आपल्याला सूचवू. कारण, शिरोडा बीचशिवाय, या परिसरातील काही अन्य स्थळे पाहण्यासारखी आहेत. कदाचित ही स्थळे तुम्ही कदाचित पाहिली नसतील. ती कोणकोणती स्थळे आहेत आणि तेथे कसे जाता येते, याविषयीची माहिती आम्ही येथे देत आहोत. 

May be an image of outdoors

शिरोडा हे महाराष्ट्रातील दक्षिण कोकणातील एक ठिकाण आहे. हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव असून सुंदर समुद्रकिनारा लाभलेले प्रेक्षणीय स्थळ आहे. बीचवर किंवा समुद्री किनारी जायचं म्हटलं की, किती उत्साह असतो आपला! मासे, वडा कोंबडा, सी-फूड, घावण, सोलकडी विथ चिकण....मस्तचं...खायला मिळणार. मग, बोटींग, पॅराग्लायडींग करत समुद्राची सफारी त्याशिवाय खळखळत्या समुद्राच्या लाटांवर पोहायचं!...किती किती त्या इच्छा. समुद्राबरोबरचं जर तुम्हाला आणखी काही प्रेक्षणीय ठिकाणं पाहायला मिळाली तर? मग चला तर जेव्हा तुम्ही शिरोडा बीचवर जा, तेथून अगदी जवळ काही अंतरावर अनेक सुंदर ठिकाणं आहत, जे तुम्हाला पाहता येतील. फार वेळ आणि पैसाही खर्चिक होणार नाही. पण, विलोभनीय आणि आकर्षक अशी ही स्थळ तुम्हाला शिरोड्यात गेल्यानंतर पाहता येतील आणि त्याचा मनमुराद आनंद लुटता येईल.   

May be an image of sky, beach and ocean

May be an image of food

शिरोडा बीच : 

येथे समुद्रकिनारी राहायला तुम्हाला नक्कीच आवडेल. छोट्या - छोट्या खोल्या किंवा लाकडाची घरं तेही समुद्रासमोर तसेच आजूबाजूच्या परिसरात राहायला हॉटेल्स, रेस्टाॅरंटचीही व्यवस्था आहे. त्यामुळे राहण्याचा, जेवण खाण्याचाही प्रश्न मिटतो. सायंकाळी सूर्यास्त होताना आकाशी पसरलेली सूर्यकिरणे, लाल-केशरी-पिवळ्या रंगछटा आणि मंद वारं ही निसर्गाची उधळण तुम्ही अनुभवायला हवी. त्याचबरोबर येथे समुद्र सफारीही करता येते. बोटीतून समुद्रात जाणे आणि पॅराग्लायडिंगचा येथे अनुभवही येथे घेता येतो. हे फार खर्चिक नसून आपल्याला परवडण्यासारखे आहे.

May be an image of food

May be an image of food

No photo description available.

रेडीचा गणपती :

रेडी गणेश मंदिर हे रेडी बंदराजवळच आहे. रेडी गावातील लोह खनिजाच्या खाणीत १८ एप्रिल, १९७६ रोजी स्वयंभू श्री गणेशाची द्विभुजा मूर्ती सापडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ला तालुक्यातील रेडी हे प्रसिध्द ठिकाण. उंच उंच माडाची झाडे, निसर्ग आणि समुद्रकिनाऱ्यालगत असलेलं हे रेडीचा गणेश मंदिर. जागृत देवस्थान अशी ख्याती असल्याने भाविकांचा मोठा ओघ येथे येत असतो. या मंदिरात गणेशाची सुंदर, मनमोहक मूर्ती पाहायला मिळते. शिवाय रेडीचा समुद्रकिनारा स्वच्छ आणि सुंदर आहे. 

No photo description available.

येथे मॅगनीजच्या खाणीही प्रसिद्ध आहेत. त्यामुळे लाल मातीचे डोंगर, लाल मातीचे कच्चे रस्ते, नारळ आणि पोफळीच्या बागा आणि यातून वाट काढत गेल्यानंतर रेडी गावात सागरकिनार्‍यालगत यशवंतगड किल्ला मोठ्या डौलाने उभा आहे. अनेक पर्यटकांना माहिती नसतं की, रेडीच्या गणपतीचे दर्शन घेऊन तुम्ही थेट यशवंतगड किल्ल्याला जाऊ शकता. त्याचबरोबर पणजी येथून जवळ आहे. त्यामुळे तुम्हाला आणखी थोडं फिरायचे असल्यास शिरोड्यातून तुम्ही गोव्यात कमी वेळेत पोहोचू शकता.    

May be an image of nature, ocean, palm trees and beach

यशवंतगड किल्ला : 

मंदिरात दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर जवळपास २ -३ कि.मी अंतरावर यशवंतगड हा किल्ला समोर दिसतो. अगदी छोट्या छोट्या वाटेतून समुद्रालगत असणाऱ्या गिरिदुर्ग प्रकारातील या किल्ल्याच्या पायथ्याशी जाता येते. तसेच चारचाकीदेखील किल्ल्यापर्यंत जाते. येथे पार्किंगसाठी थोडी जागा देखील आहे. महत्त्वाचं म्हणजे हा किल्ला वर चढावा लागत नाही किंवा दमछाक होत नाही. त्यामुळे अगदी लहानांपासून वृध्दापर्यंत हा किल्ला तुम्हाला पाहता येतो. सुरुवातीला एन्ट्री केल्यानंतर टेहळणी बुरूज आणि काही पायऱ्यांशिवाय येथे काहीचं नाही, असं वाटतं. पण, थोडं लांब पाहिलं की, एक मोठं मैदान दिसतं. या मैदानावर मोठ्या प्रमाणात झाडंझुडपं असल्याने पलिकडचा महत्त्वाचा किल्ला दिसत नाही. झाडंझुडपं असले तरी किल्ल्यावर जायला मुख्य रस्ता आहे.  

May be an image of brick wall, castle, outdoors and monument

May be an image of outdoors

May be an image of brick wall, outdoors and tree

May be an image of outdoors

हा किल्ला लवकर निदर्शनास पडत नाही. कारण आतील परिसर झाडाझुडपांनी वेढलेला आहे. किल्ल्याच्या बाजूंनी खंदक खोदलेले आहे. पण, तटदरवाज्यातून आत गेल्यानंतर बालेकिल्ला लागतो. सुरूवातीला केवळ किल्ल्याचे अवशेष दिसणारे आत गेल्यानंतर लाल रंगाचा किल्ला लक्ष वेधून घेतो. येथे वाड्याचे अवशेषही आहेत. परंतु, पाण्याचा साठा कुठे दिसत नाही.. शिवाय एक छोटे मंदिरदेखील आहे. हा किल्ला रेडीचा यशवंतगड म्हणून ओळखला जातो. हा किल्ला पाहण्यासारखा आहे. आतून किल्ल्याचा परिसर खूप मोठा आहे. आपण, याआधी एखाद्या किल्ल्यावर इतकी मोठी जागा कधीही पाहिली नसेल, अशी रचना येथील आहे. येथे  इ. स. १६३२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्याला ‘यशवंतगड’ असे नाव दिल्याची इतिहासात नोंद सापडते. 

May be an image of outdoors

May be an image of outdoors and tree

तेरेखोल किल्ला - 

तेरेखोल किल्ला हा गोवा राज्यातील एक किल्ला आहे. पण, तो शिरोड्यापासून अगदी जवळ आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा यांच्या सीमेवरील या किल्ल्याचे रुपांतर हेरिटेज रिसॉर्टमध्ये केले गेले आहे. त्यामुळे किल्ल्याचे संवर्धन झाले आहे. किल्ल्यावर हॉटेल जरी झाले असले तरी पर्यटकांना किल्ला पाहण्यासाठी हॉटेलमध्ये जाता येते. तटबंदी दुरुस्त करून येथे रंगरंगोटी करण्यात आली आहे. किल्ल्यामध्ये सेंट अँथोनी चर्च सुस्थितीत आहे. तेरेखोलच्या खाडीच्या तीरावर सावंतवाडीच्या राजाने या किल्ल्याचे बांधकाम केले. त्यानंतर १७४६ मध्ये पोर्तुगीजांनी डॉम पेड्रो डी अलमेडाच्या नेतृत्वाखाली हा किल्ला जिंकून घेतला आणि त्यात काही बदल केले. त्यानंतर मराठे आणि नंतर पुन्हा पोर्तुगीजांनी या किल्ल्याचा ताबा घेतला. किल्ल्याच्या तटबंदीवरुन तेरेखोलच्या खाडीचे आणि पलीकडे असणाऱ्या गोव्याच्या माडबनांचे विहंगम दृश्य दिसते. 

May be an image of outdoors

याशिवाय सिध्देश्वर मंदिर, सोनुर्ली मंदिर, तसेच सागरतीर्थ बीच, आरवली बीच ही ठिकाणेदेखील पाहता येतील. 

May be an image of outdoors

कसे जाल : 

शिरोडा : सावंतवाडीतून शिरोडा गावात जाता येते.

रेडीचा गणपती : रेडीला येण्यासाठी वेंगुर्ल्याहून बसची सोय आहे. तसेच मालवणमधून रेडीपर्यंतही जाता येते. 

यशवंतगड : रेडी गावातून तीन-चार किलोमीटर अंतरावर यशवंतगड आहे. रेडी गावातून १५ मिनिटे पायी चालत किंवा थेट गाडीदेखील गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत जाते. 

तेरेखोल किल्ला : तेरेखोलला जाण्यासाठी महाराष्ट्र आणि गोव्यातून दोन मार्ग आहेत. महाराष्ट्रातून जाताना वेंगुर्ले, रेडी मार्गे तेरेखोलला पोहोचता येते. गोव्यातून येताना पणजी, हरमल, केरी मार्गे यावे लागते. 

May be an image of sky, twilight, road and palm trees

               शिरोडा बीचवरील नयनरम्य संध्याकाळ 

May be an image of sky, coast, ocean and beach

न्याहरी निवास योजना - 

न्याहरी निवास योजना ही एमटीडीसीअंतर्गत येते. स्वस्तात मस्त असणाऱ्या या योजनेंतर्गत पर्यटकांसाठी अत्यंत माफक दरात राहण्याची व्यवस्था केली जाते. स्थानिक घरांमधील कुटुंबे पर्यटकांसाठी राहण्याची, जेवणाची सोय करते. यासाठी येथील घरांना परवाना दिला जातो. एमटीडीसी त्याचं मार्केटिंग करतं. लॉज, हॉटेल्सपेश्रा कमी दरात घरगुती पध्दतीचा उत्तम नाष्ता, जेवणाची सोय केली जाते. येथे सुरक्षितता आहे. त्यामुळे पर्यटकांना घरातच झोपण्यासाठी सोय केली जाते. विशेष म्हणजे येथे स्वच्छता असते. त्यामुळे शिरोड्यात गेल्यानंतर हॉटेल शोधण्यासाठी फार धावपळ होत नाही. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५० न्याहरी निवास योजनेची व्यवस्था उपलब्ध आहे.

May be an image of brick wall and outdoors

                       यशवंतगड किल्ल्याचा आतील भाग

May be an image of fruit, tree and outdoors

May be an image of tree and sky

                                        सिध्देश्वर मंदिर 

May be an image of monument and outdoors

जवळचं नातं संपवायला किती कठीण आहे, ब्रेकअप झाल्यानंतर लोक खरंच आजारी पडतात का?


 



ब्रेकअप झाल्यानंतरच्या अनेक विचित्र घटना आपण ऐकल्या, पाहिल्या असतील. ब्रेकअपनंतर कुणी डिप्रेशनमध्ये जातं, तर कुणी निराश राहतं तर कुणी दुसऱ्या जोडीदारांचा शोध घेतात. तर अनेकजण यातून सावरण्यासाठी प्रयत्न करत राहतात. पण, ब्रेकअपनंतर लोक आजारी पडतात का?sad  

असं म्हणतात की, प्रेम हे ब्रेकअपनंतर वेदनादायी असतं. काही जण तर भावूक होऊन त्यातून बाहेर पडतंच नाहीत. कारण, ज्याच्यावर आपण भरभरून प्रेम केलेलं असतं, तिचं व्यक्ती शेवटी दु:ख देते. या भावनिक वेदना आपल्या मेंदूच्या पलीकडच्या असतात. येथे कुणाचे काही चालत नाही. आपलं मनदेखील हे स्वीकारायला तयार नसतं, की खरचं आपलं ब्रेकअप झालं आहे.crying पण, ब्रेकअपच्या जाळ्यातून आपण बाहेर पडलो नाहीच तर? पुढे काय? 

600+ Best Break Up Photos · 100% Free Download · Pexels Stock Photos

यावर अनेक संशोधने झाली आहेत. संशोधक म्हणतात की, ब्रेकअपनंतर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. आणि याचा फटका आपल्या आरोग्याला बसू शकतो आणि आपण आजारीदेखील पडू शकतो.surprise 

ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीतील प्रा. मानसशास्त्रज्ञ जेनिस कीकोल्ट-ग्लेसर म्हणतात की, एका पार्टनरशी तुमचे नाते तुटल्यानंतर लोक एकटे पडतात.broken heart काळानुसार, भावनिक जखमा भरून निघतील. हे परंतु, तो आपल्या एक्सच्या विचारांशी किती जोडला आहे, यावर अवलंबून आहे. त्यांच्या संशोधनानुसार, किकॉल्ट-ग्लेझरला आढळले आहे की, हरवलेल्या प्रेमामुळे त्या व्यक्तीला क्रोध येऊ शकतो. पण, दुसऱ्या एका केसमध्ये ते एकटे पडू शकतात, तणावात जाऊ शकतात आणि आत्मविश्वास कमी होऊ शकतो. हे सर्व रोगप्रतिकारक कार्यावर परिणाम करू शकतो. 

तणाव हार्मोन (स्ट्रेस हार्मोन्स) एक गुन्हेगारासारखे आहेत. आपल्या रोगप्रतिकारक यंत्रणेच्या पेशींमध्ये रिसेप्टर्स असतात जे तणाव, नैराश्य आणि इतर ब्रेकअप- broken heartप्रेरित भावनिक प्रतिसादाशी संबंधित अनेक भिन्न संप्रेरकांवर प्रतिक्रिया देतात. जर ब्रेकअप झाल्यामुळे आठवड्यातून किंवा काही महिन्यांपर्यंत ताणतणावाचे संप्रेरक वाढत राहिले तर ते आरोग्यास हानिकारक ठरू शकते. आजारपणास कारणीभूत असणाऱ्या रोगजनकांपासून आपल्या शरिराचे संरक्षण कमी होण्याची शक्यता असते. 

Free download Broken Heart Wallpaper Heart Love HDjpg [1024x739] for your  Desktop, Mobile & Tablet | Explore 50+ HD Heart Wallpapers | Hearts  Background Wallpaper, Broken Heart Wallpapers, Wallpaper Of Love Heart

मानसिक तणावाबद्दल ॲरिझोना युनिर्व्हसिटीचे मानसशास्त्राचे प्रा. डेविड स्ब्रा म्हणतात, तुमचा ताण जितके काळ अधिक असू शकते आणि तुमच्या दु:खदायक भावनाcrying कायम राहिल्यास तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला जितका मोठा धक्का बसू शकतो. संशोधनानुसार, तुम्ही आणि तुमचा पार्टनर खूप जवळ असता. जेव्हा तुमचा पार्टनर तुमच्यापासून दूर गेला तर त्याच्या गैरहजेरीत तुमच्या झोपेवर, भूकेवर, तापमानाचे नियमन यावर परिणाम होऊ शकते. 

दुसरीकडे, तुमचे रिलेशनशीपचे हॅप्पी एन्डिंग smileyझाले असेल तर तुमच्या तुमच्या रोगप्रतिकारक कार्यावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता नसते. तुम्हाला या सर्व ब्रेकअप, दु:खापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी, तुम्ही ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि जवळचे मित्र आणि परिवाराशी जोडण्याचा प्रयत्न करा, असे स्ब्रा यांनी नमूद केले. 

योग्य आहार घेणे, व्यायाम करणे आणि दारू टाळणे हेदेखील आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदतशीर ठरू शकते. तुम्ही पार्टनरपासून वेगळे झाल्यानंतरbroken heart तुम्हाला मानसिकदृष्ट्या चांगले राहण्यास मदत होऊ शकते. 

तुम्ही तुमच्या पार्टनरला भेटण्याआधी जर कराओके गात असाल, सी-फूड शिजवत असाल तर त्या गोष्टी तुम्ही ब्रेकअपनंतर पुन्हा सुरू करा, yes असे ग्रेस लार्सन (रिसर्चर ॲण्ड ग्रॅज्युएट स्टुडंट इन सायकॉलॉजी, नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटी) यांनी शिफारस केली आहे. आमच्या अभ्यासात आढळले आहे की, लोकांनी या गोष्टी मान्य केल्या आहेत, असेही त्या म्हणाल्या. 

कुठलेही जवळचे नाते संपवणे कठीण आहे, दु:खदायक आहे. परंतु, जितकं तुम्ही त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल, मित्रांसोबत राहाल, तितक्या लवकर तुमची रोगप्रतिकारशक्ती परत येईल.smiley 

'पूरा नाम विजय दीनानाथ चौहान...' अमिताभ यांच्या अग्निपथ चित्रपटाला ३१ वर्षे पूर्ण

Image result for agneepath amitabh bachchan

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे प्रसिद्ध नाव विजय दीनानाथ चौहान या संवादाने चित्रपट अग्निपथ हिट ठरला. आज १६ फेब्रुवारी रोजी अग्नपथला ३१ वर्षे पूर्ण झाली. विशेष म्हणजे या चित्रपटातील बिग बींनी साकरलेली विजय ही भूमिका इतकी गाजली की, पुढे 'पूरा नाम विजय दीनानाथ चौहान...'हा संवाद गाजलाचं, शिवाय तब्बल २० चित्रपटांमध्ये त्यांचे नाव 'विजय' असे आहे. तर अमित हे सर्वाधिक वेळा वापरले गेलेले नाव आहे. अमिताभ यांच्‍या अग्‍निपथरबरोबरचं डॉन, जंजीर या गाजलेल्‍या चित्रपटांचे रिमेक बनवण्‍यात आलेले आहेत. 

अग्निपथ १६ फेब्रुवारी, १९९० रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकुल आनंद यांनी केले होते. अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत तर मिथुन चक्रवर्ती, माधवी (अभिनेत्री),  नीलम, डॅनी डेन्जोंगपा, आलोक नाथ, रोहिणी हट्टंगड़ी, टिन्नू आनंद, विक्रम गोखले, अर्चना पूरन सिंह, शरत सक्सेना, गोगा कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका यामध्ये होत्या.

चित्रपटाचे निर्माते यश जोहरने होते. चित्रपटाचे नाव अग्निपथ कवितेतून घेण्यात आले होते. हे नाव हिंदीचे प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतून घेण्यात आले होते. अग्निपत म्हणावा तसा चालला नाही. तिकिट खिडकीवर अयशस्वी  ठरलेल्या या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या अभिनयावर टीका झाली. परंतु, मिथुन चक्रवर्तीच्या अभिनयाला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांकडून दाद मिळाली होती. असे असले तरी अमिताभ बच्चन यांच्या करिअरच्या दृष्टीने हा चित्रपट मैलाचा दगड ठरला होता. दमदार संवाद आणि उत्तम अदाकारीमुळे अग्निपथ १९९० मधील सर्वात चौथा कमाई करणारा चित्रपट ठरला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, चित्रपटाची कहाणी खूप उत्तम होती, असे असतानाही हा चित्रपट आपला बजेटदेखील या चित्रपटाच्या माध्यमातून काढू शकला नाही. आणि बॉक्स ऑफिस पर अयशस्वी ठरला. 

बिग बींना मिळाला होता पहिला राष्ट्रीय पुरस्कार 

अग्निपथसाठी अमिताभ बच्चन यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ३८ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्नोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आले होते. 

२०१२ मध्ये आला अग्निपथचा रिमेक 

मूळचा चित्रपट अग्निपथ रिलीज झाल्यानंतर २२ वर्षांनंतर २०१२ मध्ये रिमेक आला. या चित्रपटामध्ये संजय दत्त, ऋतिक रोशन, ऋषी कपूर, प्रियांका चोप्रा यांच्या भूमिका होत्या. हा रिमेक मूळच्या अग्निपथच्या तुलनेत कमर्शियली हिट ठरला होता. 

बॉलिवूडमध्ये ५२ वर्षे पूर्ण 

अमिताभ यांना बॉलिवूड इंडस्ट्रीत ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत. बिग बींनी आपल्या जुन्या आठवणी शेअर करत थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनी ट्विट करून म्हटले की, आजच्याच दिवशी (१५ फेब्रुवारी) त्यांनी चित्रपट इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. 

छत्रपती शिवाजी महाराजांची अजरामर भूमिका साकारलेले चंद्रकांत मांडरे!

Image result for film balu chandrakant mandare

कोल्हापूरचे प्रसिध्द मराठी अभिनेते चंद्रकांत मांडरे यांचा आज दि. १७ फेब्रुवारीला स्मृतिदिन आहे. एक उत्तम अभिनेते आणि चित्रकार अशी त्यांची ख्याती. आजही कोल्हापुरातील राजारामपुरीत त्यांच्या नावाचे म्युझियम आहे. खरंतरं त्यांचे हे राहते घर होते. पुढे ते वस्तू संग्रहालयात रुपांतरीत करण्यात आले. डॉ. चंद्रकांत मांडरे यांनी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांतून बहरदार सादरीकरण, अभिनय कौशल्य दाखविले . 

युगे युगे मी वाट पाहिली, पवनाकाठचा धोंडी, थोरातांची कमळा, छत्रपती शिवाजी, संथ वाहते कृष्णामाई, मीठभाकर, सांगत्ये ऐका, मोहित्यांची मंजुळा, धन्य ते संताजी धनाजी, खंडोबाची आण, बनगरवाडी अशा चित्रपटांतून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अधिक उंचीवर नेले. चंद्रकांत यांचा जन्म १३ ऑगस्ट १९१३ ला कोल्हापुरात झाला. 

Image result for film balu chandrakant mandare

कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या हाताखाली ते नोकरी करू लागले. तर बाबा गजबर यांच्याकडून चित्रकलेचे शिक्षण घेतले. आजही त्यांनी काढलेली चित्रे त्यांच्या म्युझियममध्ये पाहायला मिळतात. त्यांच्या चित्रात रंगसंगतीबरोबर, निसर्गाची किमया पाहायला मिळते. झाडे, पक्षी, शेती, नदी, फुले, निसर्गाशी संबंधित त्यांची चित्रे लक्ष वेधून घेतात. 

No photo description available.

पेंटरांबरोबर काम करता करता त्यांना 'सावकारी पाश' हा बोलपट मिळाला. या बोलपटातून त्यांचे अभिनय बहरू लागले. मराठी सिनेसृष्टीला नवा देखणा अभिनेता मिळाला होता. याचवेळी त्यांची भालजी पेंढारकर यांच्याशी जवळीक झाली. मुळचे गोपाळ असे नावात बदल करून त्यांचे चंद्रकांत असे नाव ठेवण्यात आले. अद्यापपर्यंत चंद्रकांत मांडरे असेच त्यांचे नाव प्रसिध्द आहे. तर धाकटा भाऊ वामन हे सूर्यकांत मांडरे झाले. 

May be an image of 2 people

पाटील, जल मल्हार, ईर्ष्या, अशा अनेक चित्रपटांमध्ये विविध व्यक्तीरेखांच्या सर्व रंगछटा त्यांनी साकारल्या. ७७ मराठी, १४ हिंदी आणि एका इंग्रजी चित्रपटात काम करणाऱ्या चंद्रकांत यांची चित्रपट सृष्टीतील कारकीर्द अविस्मरणीय आहे.  

No photo description available.

गावातल्या बायांवर डोळा ठेवणारा रंगेल 'पाटील' साकारणारे, छत्रपती शिवाजी महाराजांची अजरामर भूमिका साकारणारे ते घरंदाज, रुबाबदार, देखणे चंदकांत मांडरेचं होय. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांच्याबरोबर २७ चित्रपटांत चंद्रकांत यांनी एकत्र भूमिका केल्या.

May be an image of 1 person

कोल्हापूरच्या चित्रनगरीला कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे नाव देण्यात यावे, ही त्यांची पहिल्यापासून मागणी होती. 

No photo description available.

चंद्रकांत मांडरे कलादालन 

आपल्या चित्रांचे एक स्वत:चे दालन असावे, असे त्यांचे महाराष्ट्र फिल्म कंपनीत असल्यापासूनचे स्वप्न आहे. पुढे त्यांनी कोल्हापुरात राजारामपुरीत बंगला बांधला. या बंगल्याला निसर्ग हे नाव दिले. या बंगल्यात त्यांनी स्वत:ची सगळी निसर्गचित्रे लावून कलादालन सजवले. 

No photo description available.

चंद्रकांत यांचा शेवटचा चित्रपट बनगरवाडी होता. त्यावेळी ते ८२ वर्षांचे होते. शूटिंग नसेल तेव्हा ते चित्रे काढायचे. आम्ही त्यांना दादा म्हणायचो, अशी आठवण त्यांच्या आतेभावाने सांगितली होती, असा संदर्भ संपादक अनंत दीक्षित यांच्या चंद्रकांत पुस्तकात मिळतो. 

May be an image of 1 person

शनिवार, दि. १७ फेब्रुवारी २००१ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घरीच हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.  

(photos - Late Dr. Chandrakant Mandare 100th Birth Year Celebration facebook वरून साभार)

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...