
सोज्वळ सुनेची भूमिका साकारणारी मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव झिम्मा या चित्रपटात तिच्या बोल्ड सीनमुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी, फ्रेशर्स फेम अमृता देशमुख बिकिनी घालून प्रकाशझोतात आली. नंतर अलीकडे चर्चेत आलेली कबीर सिंग फेम अभिनेत्री वनिता खरातने बोल्ड फोटोशूट करून सर्वांनाचं धक्का दिला. याआधी 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम शनाया अर्थातच रसिका सुनील, मिताली मयेकर, प्राजक्ता माळी, पूजा सावंत यांनीही आपला बोल्डनेस दाखवून सर्वांनाचं अचंबित केलं होतं. एक अभिनेत्री म्हणून वैयक्तिक आयुष्यात असो वा चित्रपटांची गरज म्हणून अनेक मराठमोळ्या अभिनेत्रींनी बोल्डनेसचा तडका लावलेला, पाहायला मिळत आहे. कलाविश्वात मराठी अभिनेत्रींना बोल्डनेसचा रस्ता का पकडावा लागत आहे?

मराठी चित्रपट असो वा खासगी आयुष्यात काही अभिनेत्रींनी फोटोशूटच्या माध्यमातून बोल्ड अदाकारी आणलेली दिसते. सई ताम्हणकर, अमृता देशमुख, रसिका सुनील, स्मिता गोंदकर, स्पृहा जोशी, अमृता खानविलकर अशी काही निवडक कलाकारांची नावे येथे घेता येतील. या अभिनेत्रींनी थेट बिकिनी शूट करून, तर मृण्मयी गोडबोलेने बॅकलेस फोटोशूट करून, नेहा पेंडसेने स्वीमसूट घालून आपल्या सौंदर्याचं प्रदर्शन केलं. विशेष सांगायचं झालं तर सई ताम्हणकरचा 'नो एन्ट्री - पुढे धोका आहे' चित्रपटात आपल्या अदाकारीने बोल्डनेस आणला. मराठीत असा चित्रपट येतोय, म्हटल्यावर त्यावेळी या चित्रपटाची आणि अभिनेत्रीची जोरदार चर्चा झाली होती. मिताली मयेकर, पूजा सावंत, प्राजक्ता माळी यांसारख्या अभिनेत्रींनी आपली बोल्ड अदाकारी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर आणली. चित्रपटाच्या पडद्यावर तसेच पडद्यामागेदेखील या अभिनेत्रींनी आपल्या मादक अदा सर्वांसमोर आणल्या.

आता स्पर्धेत टिकून राहणं आव्हानात्मक बनलं आहे. त्यामुळे ग्लॅमरस दिसणं, चर्चेत राहणं, प्रसिध्दी मिळवणं यासाठी अभिनेत्री सोशल मीडियावरदेखील वेगवेगळा फंडा वापरत आहेत. आपल्या सौंदर्याचं प्रदर्शन करणं हा त्यांच्या व्यवसायाचा एक भाग असू शकतो. त्याचबरोबर, चित्रपटांमध्ये भूमिका मिळवणं, असाही एक उद्देश त्यामागे असू शकतो. पूर्वी चारित्र्य ही घट्ट संकल्पना होती. अंगप्रदर्शन करणं म्हणजे चारित्र्य बिघडतयं, असं काही आता वाटत नाही. स्पर्धात्मक युगात टिकणं, आपलं फिटनेस दाखवणं, फोटोशूट करणं, विविध माध्यमातून सौंदर्याचं प्रदर्शन करणं, हे मराठी तारकांनी अगदी सहजरित्या स्वीकारलेलं दिसत आहे.

बॉलिवूड, टॉलिवूडप्रमाणेच मराठी कलाविश्वही प्रत्येक गोष्टीत मागे पडू नये, यासाठी मराठी तारका प्रयत्न करत आहेत. यातील एक भाग म्हणजे, बोल्ड भूमिका किंवा आपलं ग्लॅमरस रूप. प्रेक्षकांसमोर त्याचं उत्कृष्टपणे सादरीकरण करणं, ही आवश्यक बाब बनली आहे. परंतु, त्यांचा बोल्डनेस समोर आल्यानंतर त्यांना अनेकदा टीकेचा धनी व्हावं लागलं. पण, याकडे अधिक लक्ष न देता ''कुछ तो लोग कहेंग, लोगों का काम है कहना...'' म्हणत अभिनेत्रींनी आपलं काम अखंडपणे सुरू ठेवलंय.

अनेक वेगळ्या विषयांवरील शॉर्ट फिल्म्स आणि वेब सीरीज सध्या येत आहेत. हिंदीमध्ये तर अनेक वेब सीरीजमध्ये बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडल्या जात आहेत. तरुण वर्ग याकडे आकर्षला जावा, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. तर मग, मराठी कंटेट मागे का पडावा? म्हणूनचं मराठी वेब सीरीजमध्येही वेगळ्या कथानकांबरोबरचं वेगळ्या भूमिकादेखील अभिनेत्री साकारताना दिसत आहेत.
चित्रपटांतही बोल्डनेस
बॉलिवूडप्रमाणेच दाक्षिणात्य चित्रपटात ज्या पद्धतीने चित्रपटांचं सादरीकरण केलं जातयं; जसं सुंदर लोकेशन्स, बोल्ड हिरोईन त्या पध्दतीचा ट्रेंड मराठीत येतोय. मराठी चित्रपटांचा क्राऊडही प्रेक्षकांना काय हवयं, हे धरूनच सुरू आहे. महेश मांजरेकरांचा अलिकडचा चित्रपट 'शिकारी' (अभिनेत्री नेहा खानचा चित्रपट-सध्या देवमाणूसमध्ये साकारत असलेली भूमिका) पर्यंत अशा चित्रपटांमध्ये बोल्डनेसचा तडका पाहायला मिळाला.
अगदी जुन्या काळातलं सांगायचं झालं तर ब्रह्मचारी चित्रपटात मास्टर विनायकांच्यासोबत मीनाक्षी शिरोडकरने स्वीमिंग सूट घातला होता. त्यावेळीही या सीनवरून खळबळ माजली होती. त्यावेळी या अभिनेत्रीला ट्रोल केलं गेलं. या मराठी चित्रपटापासून अंगप्रदर्शन करणं, बोल्ड अभिनेत्री दाखवणं सुरू झालं. मात्र, त्यानंतर बराच काळ मराठी चित्रपटात अभिनेत्री सोज्वळ आणि सात्विकच भूमिका घेऊन आल्या. त्यात बोल्डनेस नव्हता. तो अगदी अलिकडच्या काळात पुन्हा आला. जुन्या जाणकारांच्या माहितीप्रमाणे, आशू नावाच्या अभिनेत्रीने बोल्ड नाटकांमध्ये काम केले होते. 'यादों की बारात' यासारख्या अनेक हिंदी चित्रपटांत ती दिसली होती.

मराठी चित्रपटांनी नेहमीच मनोरंजनाबरोबर सामाजिक संदेश दिले आहेत. परंतु, कालांतराने थोडसं ग्लॅमर चित्रपटांमध्ये दिसला. नंतरच्या काळात बोल्डनेसचं प्रमाण वाढत गेलं. विनोदी, सामाजिक आशयाचे चित्रपट आणि वास्तव मांडणाऱ्या चित्रपटांबरोबरच मराठी सिनेमात अधिक बोल्डनेस आणला गेला. सिंगल स्क्रिनबरोबरच मल्टिप्लेक्सचा रिच क्लासदेखील त्याकडे आकर्षित होईल, असा सिनेमाचा कंटेंट असणारा, वेगळ्या धाटणीचे चित्रपट मराठी इंडस्ट्रीत आणले गेले आणि ते आताही आणले जात आहेत.
पारंपरिक चौकटींना छेद देणाऱ्या मराठी चित्रपटांच्या कथेचा नवा आशयदेखील अलीकडे हिंदी चित्रपटांसारखाच दर्जेदार करण्यावर भर दिला जातोय. बोल्डनेस हा त्यातील महत्त्वाचा भाग असल्यामुळे नव्या पिढीलादेखील आकर्षण वाटावे, प्रेक्षक त्या चित्रपटाकडे आकर्षित व्हावेत, अशा दृष्टीकोनातून चित्रपटांचे विषय निवडले जात आहेत. याप्रकारच्या चित्रपटातून सेक्स कॉमेडी, सेक्स हॉरर कॉमेडी असाही ट्रेंड दाखवला जातोय. मराठी अभिनेत्रीही आपला बोल्डनेसच्या अदा सादर करायला मागेपुढे पाहत नाहीत. एकूणचं मराठी अभिनेत्री आता बोल्ड झाल्या आहेत. काळानुसार, गरज म्हणून वा कलाविश्वातील स्पर्धांमुळे मराठी अभिनेत्रींनी बोल्डनेसचा रस्ता पकडला आहे.































पण, ब्रेकअपच्या जाळ्यातून आपण बाहेर पडलो नाहीच तर? पुढे काय? 
काळानुसार, भावनिक जखमा भरून निघतील. हे परंतु, तो आपल्या एक्सच्या विचारांशी किती जोडला आहे, यावर अवलंबून आहे. त्यांच्या संशोधनानुसार, किकॉल्ट-ग्लेझरला आढळले आहे की, हरवलेल्या प्रेमामुळे त्या व्यक्तीला क्रोध येऊ शकतो. पण, दुसऱ्या एका केसमध्ये ते एकटे पडू शकतात, तणावात जाऊ शकतात आणि आत्मविश्वास कमी होऊ शकतो. हे सर्व रोगप्रतिकारक कार्यावर परिणाम करू शकतो. ![Free download Broken Heart Wallpaper Heart Love HDjpg [1024x739] for your Desktop, Mobile & Tablet | Explore 50+ HD Heart Wallpapers | Hearts Background Wallpaper, Broken Heart Wallpapers, Wallpaper Of Love Heart](https://cdn.wallpapersafari.com/93/70/cHgWK2.jpg)
झाले असेल तर तुमच्या तुमच्या रोगप्रतिकारक कार्यावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता नसते. तुम्हाला या सर्व ब्रेकअप, दु:खापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी, तुम्ही ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि जवळचे मित्र आणि परिवाराशी जोडण्याचा प्रयत्न करा, असे स्ब्रा यांनी नमूद केले.