Sunday, November 27, 2022

Konkan Travel : रत्नागिरीतील 'मालगुंड'ला कधी गेलाय का? ही सुंदर ठिकाणे पाहा...

 स्वालिया शिकलगार - पुढारी ऑनलाईन डेस्क : आमचा महाराष्ट्र सह्याद्रीच्या डोंगररांगानी व्यापलेला आहे. (Konkan Travel ) महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टी आणि डोळ्यात न मावणारा निसर्गाचा ठेवा, आमच्याकडे आहे. हा अनमोल ठेवा जपत महाराष्ट्राची भटकंती तर करायलाच हवी.  या सुंदर ठिकाणांपैकी एक रत्नागिरी जिल्हा. त्यामधील सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे गणपतीपुळे. पण, तुम्हाला माहितीये का गणपतीपुळ्याजवळ अनेक रमणीय आणि सुंदर अशी पर्यटनस्थळे आहेत, जिथे तुम्ही भेट देऊ शकता. तुम्ही जर गणपतीपुळेला गेला तर या पुढील ठिकाणांना नक्की भेट द्या. (Konkan Travel )

गणपतीपुळे मंदिर[/caption]

गणपतीपुळे - रत्नागिरी जिल्ह्यातील हे एक धार्मिक पर्यटनस्थ‍ळ आहे. येथे स्वयंभू गणपतीचे मंदिर असून ते ४०० वर्षांपेक्षा जुने असल्याचे म्हटले जाते. कोकण किनारपट्टीवर गणपतीपुळे असून एका बाजूला सह्याद्रीच्या रांगा आणि दुसऱ्या बाजूला विशाल अरबी समुद्र आहे. जवळपास मालगुंड आणि जयगड ही गावेदेखील प्रसिद्ध आहेत, जेथे तुम्ही भेट देऊ शकता. येथे वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध आहे. शिवाय घोडागाडीमधून तुम्हाला समुद्र किनारी फेरफटका मारता येतो. (Konkan Travel )

कसे जाल - कोल्हापूर - बांबवडे- मलकापूर-कोल्हापूर रत्नागिरी मार्ग-आंबा घाट-साखरपा-चाफे-नेवरे फाटा-गणपतीपुळे

[caption id="attachment_376780" align="alignleft" width="1160"] मालगुंड गाव[/caption]

मालगुंड - कवी केशवसूत यांचे घर तुम्हाला मालगुंड गावात पाहायला मिळेल. शिवाय त्यांची साहित्यसंपदा आणि वाचनासाठी ग्रंथालयदेखील घराला लागून दिमाखात उभे आहे. अस्सल कोकणी पद्धतीच्या या घरात तुम्हाला आतमध्ये जाऊन पाहता येते. कवी केशवसुतांचे जन्मस्थान मालगुंड आहे.

कसे जाल- गणपतीपुळेपासून १ किलोमीटर अंतरावर मालगुंड आहे.

आरे-वारे बीच - हे दोन जुळे सुंदर समुद्रकिनारे आहेत. पांढऱ्या वाळूमुळे हे किनारे आपले लक्ष वेधून घेतात.

कसे जाल- गणपतीपुळे पासून आरे वारे अर्धा तासांच्या अंतरावर आहे. मंदिर व्ह्यू पॉईंट-आरे वारे रोड- आरे वारे ब्रीज-आरे वारे किनारा.

[caption id="attachment_376770" align="alignleft" width="940"] गावखडी[/caption]

गावखडी बीच - दाट सुरुची वने आणि सुंदर निखळ समुद्रकिनरा या ठिकाणी पाहायला मिळतो. रत्नागिरीहून राजापूर रस्त्यावरून प्रवास करताना, पूर्णगडचा खाडी पूल ओलांडला की गावखडीचा समुद्र नजरेत भरतो. गावखडी समुद्रकिनारा अंदाजे १ किमी लांब आहे. गावखडी समुद्रकिनाऱ्याच्या उजवीकडे मुचकुंडी नदी आहे. तेथून तुम्ही पूर्णगड किल्ला पाहू शकता.

कसे जाल - पावस ते गावखडी हे अंतर ९ किमी आहे. गणपतीपुळेपासून हे अंतर दीड तासांचे आहे. गणपतीपुळे मंदिर-आरे-मुसलमानवाडी-गोलप-गावखडी बीच.

पूर्णगड किल्ला - गावखडी बीचला जाताना तुम्ही पूर्णगडला जाऊ शकता. जाताना तुम्ही रनपार समुद्रकिनारा आणि वायंगणी बीचलादेखील भेट देऊ शकता.

गणेशगुळे - या गावाला निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभला आहे. येथे पर्यटकांसाठी निवास-भोजन अशा सर्व सोयी झाल्या आहेत. येथील रमणीय परिसरामुळे अनेक चित्रपटांचे व मालिकांचे शूटिंग या भागात होत असते.

कसे जाल - गणपतीपुळेपासून गणेशगुळेपर्यंत दीड तासांचा रस्ता आहे. गणपतीपुळे-भंडारवाडा-आरे वारे रोड-गंजुर्डा-सुभाष रोड- सी लिंक - गणेशगुळे रोड-गणेशगुळे.

पावस - हे ठिकाण स्वामी स्वरुपानंद यांच्या आश्रमासाठी प्रसिद्ध आहे.

कसे जाल - गणपतीपुळेपासून ४१ किमी. अंतरावर पावस आहे.

[caption id="attachment_376776" align="alignleft" width="1088"] थिबा पॅलेस[/caption]

थिबा पॅलेस - हे पॅलेस पाहण्यासारखे असून गणपतीपुळे पासूनचे अंतर १ तासांचे आहे.

कसे जाल - गणपतीपुळे-भंडारवाडा-आरे वारे रोड -गंजुर्डा-थिबा पॅलेस.

जयगड - जयगडचा किल्ला पाहण्यासाठी अनेक पर्यटक, निसर्गप्रेमी आणि इतिहास अभ्यासक, संशोधक येथे येत असतात. हा किल्ला १६ व्या शतकातील आहे. येथे लाीटहाऊसदेखील आहे.

कसे जाल - गणपतीपुळेपासून २० किमी अंतरावर शास्त्री खाडीजवळ हा किल्ला दिमाखात उभा आहे.

जय विनायक मंदिर - जयगड येथील जय विनायक मंदिर प्रसिद्ध ठिकाण आहे. अनेक भाविक येथे भेट देत असतात. जर तुम्ही रत्नागिरीत आला तर या स्थळाला नक्की भेट द्या.

कसे जाल- जय विनायक मंदिराला जाण्यासाठी अर्धा तासाचा वेळ लागतो. गणपतीपुळे-आरे वारे रोड- जय विनायक मंदिर

रत्नदुर्ग किल्ला - रत्‍नदुर्ग हा रत्‍नागिरी शहरापासून अवघ्या २-३ कि.मी. वर आहे. रत्‍नदुर्ग हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण आहे. येथे सुंदर भगवती मंदिर आहे. येथून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे.

कसे जाल - गणपतीपुळे-आरे रोड- गंजुर्डा-रत्नदुर्ग किल्ला

रत्नदुर्गला जाताना तुम्ही रत्नागिरी मरीन फिश म्युझियम देखील पाहू शकता.

वर्षभर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. पण उन्हाळ्यात येथील तापमान जास्त असते. म्हणून ऑक्टोबर ते मार्चपर्यंत तुम्ही या ठिकाणांना भेट देऊ शकता.

[caption id="attachment_376775" align="alignleft" width="1086"] थिबा पॅलेस[/caption]

Ratnagiri best Tourism : राजापुरात पाहायला जा 'ही' अद्भूत ठिकाणे

स्वालिया शिकलगार : पुढारी ऑनलाईन डेस्क - रत्नागिरीत अनेक प्रसिध्द पर्यटनस्थळे आहेत. खूप सारे पर्यटक समुद्र किनारी जायला पसंती देतात. खळखळत्या समुद्रकिनारी पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते. पण, रत्नागिरीमध्ये अशी काही ठिकाणे आहेत, जिथे फार कमी लोक जातात किंवा तेथे फार गर्दी नसते. अशाच काही उत्तम ठिकाणांविषयीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (Ratnagiri best Tourism) राजापूर, कसबा, संगमेश्वर, जुवे बेट आणि तुम्ही कादाचित या ठिकाणी कधी गेला नसाल अशा स्थळांबद्दल आम्ही सांगणार आहोत. लाँग ड्राईव्हसोबत वेगळी कला-संस्कृती आणि कोकणचा साद घालणारा निसर्ग यांचा तिहेरी संगम या रत्नागिरीच्या ट्रीपमधून तुम्हाला अनुभवता येईल. यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. यानंतर तुम्ही या ठिकाणांना नक्कीच भेट द्याल! तुमच्या नेहमीच्या टूरपेक्षा ही हटके टूर असेल. (Ratnagiri best Tourism)

राजापूरची गंगा राजापूरची गंगा

राजापूरची गंगा

राजापूरची गंगा - देवगिरीच्या यादव काळापासून राजापूर ही प्रसिद्ध व्यापारी पेठ होती. रत्नागिरी जिल्ह्यातील 'राजापूरची गंगा' तीर्थस्थानला खूप महत्त्व आहे. ऐतिहासिक काळापसून या ठिकाणाला महत्त्व आहे. जमिनीत असलेल्या १४ कुंड अचानक पाण्याने भरून जातात. सामान्यपणे तीन वर्षांतून एकदा राजापूरची गंगा अवतरते. साधारणपणे तीन महिने ही गंगा थांबते. गंगेचे दर्शन घेऊन स्नान करण्यासाठी येथे भाविक गर्दी करतात.

राजापूरची गंगा राजापूरची गंगा

कसे जाल - बालिंगे- घरपण - साळवण - असळज-गगनबावडा-भूईबावडा घाट-तिरवडे तर्फ खारेपाटण-मेहबूबनगर-कोळपे-तीथवली-मुंबई-गोवा हायवे- पनवेल कोची कन्याकुमारी हायवे-हातखंबा गोवा रोड-राजापूर गाव-राजपूरची गंगा.

उन्हाळे - गरम पाण्याचे झरे उन्हाळे - गरम पाण्याचे झरे

उन्हाळे - गरम पाण्याचे झरे येथे आढळतात. उन्हाळे हे राजापूर तालुक्यातीस गाव आहे. या गावात प्रसिध्द महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे. या मातेच्या चरणापासून झऱ्याची निर्मिती झाल्याचे सांगितले जाते. येथे १२ महिने गरम पाण्याचे झरे प्रवाहित होतात. राजापूर तालुक्यात असे अनेक छोटे-छोटे गरम पाण्याचे कुंड पाहायला मिळतात. उन्हाळे गावातील महालक्ष्मी मंदिरासमोर एक कुंड आहे. या कुंडात गरम पाण्याचे दोन वेगवेगळे झरे आहेत. यास गंगा तीर्थ असे म्हटले जाते. या गरम पाण्याच्या झऱ्यापासून ३०० मीटर अंतरावर श्री. स्वामी समर्थ महाराजांचा मठदेखील आहे. हा मठ पाहण्यासारखा आहे. नारळी, आंबा, पोफळी, फणस या झाडांच्यामध्ये हे गाव वसलेले आहे. आजूबाजूला नदी, हिरवागार निसर्ग, रम्य शांत वातावरणात हे मठ आहे. हे मठ कौलारु जांभ्या दगडापासून बनवलेले आहे. गंगा तीर्थ उन्हाळे येथे गंगा ही मूळगंगा, चंद्रकुंड, सूर्यकुंड, बाणकुंड, यमुना कुंड, सरस्वती कुंड, गोदावरी कुंड, कृष्ण कुंड, नर्मदा कुंड, कावेरी कुंड, अग्नि कुंड, भीमा कुंड, चंद्रभागा कुंड आणि काशी कुंड या चौदा कुंडाकडे वाहते. यापैकी काशीकुंड आणि मूळ गंगा हे प्रमुख मानले जाते.

उन्हाळे - महालक्ष्मी मंदिर

कसे जाल - राजापूरची गंगा पासून उन्हाळे गरम पाण्याचे झरे हे दीड किलोमीटरचे अंतर आहे. राजापूरची गंगा- रेल्वेस्टेशन रोड-उन्हाळे गरम पाण्याचे कुंड/हॉट वॉटर स्प्रिंग.

view point view point

संगमेश्वर तालुका :


उक्षी ब्रीज - संगमेश्वरला जाताना डाव्या बाजुलाच मुंबई गोवा हायवेला लागून उक्षी ब्रीज आहे. अतिशय सुंदर हे ब्रीज असून कोकण म्हणजे काय? हे इथं अनुभवता येतं. सुंदर वातावरण, नदीवर पुल, आजूबाजूला विस्तीर्ण पसरलेली माडाची झाडे, पोफळीच्या बागा आणि सुपारीचे मळे तुम्हाला निदर्शनास पडतील. फोटोग्राफी करण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

कसबा पेठ सोमेश्वर मंदिर

कसबा पेठ - कसबा पेठेतून पुढे गेल्यानंतर छोटे संगमेश्वरचे मंदिर आहे. जरा अतिशय सुंदर शिल्पकाम असलेले कर्णेश्वर मंदिर दृष्टीस पडते. येथे जुनी गावे, गावातील जुने घरे, लाकडी वाडे, लाकडी वाड्यांवर केलेले कोरीव काम आणि निरामय शांतता अनुभवता येते. येथील बहुतांशी घराला कुलूप दिसते. जवळ असलेल्या मुंबईच्या ठिकाणी येथील माणसे बहुदा कामासाठी गेली असावीत, असा अंदाज लावता येईल. कसबा गावात सोमेश्वराचेदेखील दगडी बांधकाम असलेले प्राचीन मंदिर आहे.

कसबा पेठ सोमेश्वर मंदिर कसबा पेठ सोमेश्वर मंदिर

संगमेश्वर मंदिर - संगमेश्वर येथे अनेक मंदिर पाहायला मिळतात. ही मंदिरे प्राचीन काळातील आहेत. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूरपेक्षाही संगमेश्वर खूप जुनं मंदिर असल्याचे म्हटले जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री नदीच्या संगमाचे ठिकाण म्हणजे संगमेश्वर. यास 'रामक्षेत्र' असेही म्हटले जाते. संगमेश्वरला जाण्यासाठी राजापूरची गंगा ठिकाणापासून अडीच तासांचा रस्ता आहे. सुरुवातीलाच संगमेश्वर हे छोटेखानी महादेवाचं मंदिर दिसतं. नदीच्या किनारी वसलेलं खूप सुंदर असं संगमेश्वर मंदिर आहे. पण, ५ मिनिटाच्या अंतरावर कर्णेश्वराचं मंदिर आहे. पण, ते सहजासहजी दृश्यास पडत नाही. एका लोखंडी पुलावरून पुढे गेल्यानंतर एखाद्या घराच्या पायऱ्या असल्याप्रमाणे जांभा दगडी पायऱ्या नजरेस पडतात. या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर एक विस्तीर्ण मैदान लागते. या मैदानावर कर्णेश्वराचे प्रसिध्द महादेव मंदिर आहे.

sangmeshwar temple sangmeshwar temple[/caption]

कर्णेश्वर मंदिर - हे महादेवाचे प्रसिध्द मंदिर आहे. कोल्हापुरातील खिद्रापूरच्या मंदिराच्या स्थापत्यशैलीशी मिळते-जुळते असलेले कर्णेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर खिद्रापूरपेक्षाही जुने असल्याचे येथील मंदिराच्या स्थापत्यशैलीवरून ओळखते. काही जण हे मंदिर कर्ण राजा (कोल्हापूर) ने बांधले असावे असे म्हणतात. तर काही जण इ.स. १०७५ ते १०९५ या काळात गुजरातच्या चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले असावे, असे अभ्यासकांचे मत आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरावर गणपती, लक्ष्मी, महिषासूरमर्दिणी, विष्णू अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. अतिशय आखीव रेखीव कोरीव काम असलेल्या या मूर्ती भक्तांच्या चटकन लक्ष वेधून घेतात. त्याकाळात इतकी सुंदर शिल्पे कशी काय घडवली असावीत, असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल. मंदिरात गेल्यानंतर भूमीज शैलीची मंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आढळते. बाहेर कितीही ऊन पडलेलं असो वा गर्मी असो, मंदिरात पाऊल ठेवताच मनाला आणि शरीराला शितलता वाटते. गर्भगृहात कर्णेश्वराची पिंड आहे. सोबत पार्वतीची मूर्तीही आहे. येथे सुंदर प्रभावळदेखील दिसते.

karneshwar temple karneshwar temple

कसे जाल -१) राजापूर-मांडवकरवाडी-नेरकेवाडी-मुंबई गोवा हायवे-हातखंबा गोवा रोड-पाली फाटा-निवळी घाट-उक्षी ब्रीज साईट रोड- संगमेश्वर रोड-संगमेश्वर मंदिर आणि कर्णेश्वर मंदिर.

२) मुंबई-गोवा महामार्ग-कसबा गाव - संगमेश्वर मंदिर आणि कर्णेश्वर मंदिर.

३) रेल्वेने यायचे असेल तर कोकण रेल्वे आहे. संगमेश्वर रेल्वे स्थानकाजवळ थांबता येते.

४) रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पुण्याहून एसटी आहे.

पण, शक्यतो स्वत:ची गाडी असलेली चांगली. यामुळे तुम्हाला जागोजागी थांबून विविध पॉईंट्स पाहता येतात. शिवाय वेळही वाचेल.

karneshwar temple karneshwar temple

छत्रपती संभाजी महाराज स्मारक - संगमेश्वरात कसबा या गावात छत्रपती संभाजी महाराज स्मारक आहे. छत्रपती संभाजी महाराज स्मारक

छत्रपती संभाजी महाराज स्मारकश्री सप्तेश्वर मंदिर - संगमेश्वरापासून सप्तेश्वर मंदिर हे अंतर सव्वा तासांचे आहे. कुठेही पाहायला मिळणार नाही असा सप्तेश्वराचा मंदिर परिसर आहे. स्वच्छ नितळ पाण्याचे कुंड असलेला हा परिसर हिरवाईने नटलेला आहे.

septeshwar temple septeshwar temple

कसे जाल - संगमेश्वर - मुंबई गोवा हायवे-संगमेश्वर सप्तेश्वर मार्ग- कसबा लावगणवाडी (Kasba lavganwadi) - पुढे आतमध्ये फाटा गेलेला आहे-सप्तेश्वर मंदिर

मल्लिकार्जुन मंदिर - शिरंबे येथील पाण्यातील मल्लिकार्जुन मंदिर पाहण्यासारखं आहे.

mallikarjun temple mallikarjun temple

कसे जाल - मुंबई गोवा हायवेवर चिपळूण नंतर सावर्डे बस स्थानक- मल्लिकार्जुन मंदिर

जुवे बेट जुवे बेट

जुवे बेट - राजापूर तालुक्यातील जुवे नावाचे गाव आहे. जुवे बेटाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हे ठिकाण सप्तेश्वर मंदिरापासून ५० कि.मी अंतरावर आहे. पावणे दोन तासात हे अंतर कापता येते. या जुवे गावात पारंपरिक पद्धतीची कौलारू घरे आहेत. आंबा, फणस, नारळ, काजूची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. गावात आल्हाददायक वातावरण आहे. भौतिक सुख-सुविधांपासून हे गाव दूर आहे. गावात श्री रवळनाथ, श्री सीमराई देवीची मंदिरे आहेत. समुद्रकिनाऱ्यामुळे या गावाचे निसर्ग आणखी बहरले आहे. अर्जुना नदीच्या मुखाशी जुवे बेट असून याठिकाणची शांतता तुम्हाला मोहून टाकणारी आहे.

[caption id="attachment_354691" align="alignnone" width="652"]जुवे बेट जुवे बेट

कसे जाल- सप्तेश्वर मंदिर-कसबा लावगणवाडी-मुंबई गोवा हायवे-शास्त्री पुल-पनवेल कोची कन्याकुमारी हायवे-कोल्हापूर रत्नागिरी रोड-निवखोळ रोड- कर्ला रोड- खालची गल्ली-जुवे.

swami samarth math unhale swami samarth math unhale

आणखी काय पाहाल?

  • कोल्हापूरहून जाताना घाटकडा धबधबा पाहू शकता. पुढे व्हयू पॉईंट पाहू शकता.
  • राजापूर गढी, वखार, ब्रिटीश वेअरहाऊस
  • भूईबावडा घाट येथे सनसेट पॉईंट पाहण्यासाठी थांबू शकता.
  • कसबा पेठ येथे गणेश मंदिर, श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिर येथे दर्शनासाठी जाऊ शकता.
  • राजापुरात तुम्हाला जितवणे धबधबा, कातळकडा धबधबा (हर्डी) अशा ठिकाणांनाही भेटी देता येतील.
  • हक्रावाने वाडी (Hakrawane Wadi) हे देखील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.
  • तसेच कुंभेश्वर, काशी विश्वेश्वर, केदारेश्वर, रावणेश शंकर, जलयुक्त नन्दिकेश (संगम मंदिर), काळभैरव अशा मंदिरांनादेखील भेटी देऊ शकता.
  • तुम्ही प्रसिध्द महादेवाचे मंदिर मार्लेश्वर आणि मार्लेश्वर धबाधबा देखील पाहू शकता.

काय खाल?

मासे, सोलकडी, तांदळाची भाकरी, भात, गोलमा, ऑम्लेट, पोहे, चहा, अंडाकरी, चिकन, गोलमा, चपाती, ताक, शाकाहारी जेवण आदी.

  • karneshwar temple  karneshwar temple Marleshwar कातळकडा धबधबा मार्लेश्वर धबधबा मार्लेश्वर धबधबा[/caption]

 

 

 

 

 

 

Friday, October 7, 2022

Unseen Konkan: मालवणमधील 'ही' प्रसिध्द ठिकाणे पाहिली का?


कोकण फिरायचं म्हटलं तर सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते ती गोष्ट म्हणजे, वाहतूक आणि रस्ते. कुठल्याही ठिकाणी जाताना रस्ते जर चांगले असतील तर तासनतास प्रवास करायला काहीही वाटत नाही. तर मग चला नव्या ठिकाणी भेट द्यायला! कोकणात जायला सर्वांनाच आवडतं. त्यात आरामदायी कोकणची (Unseen Konkan) सफर करायला कुणाला आवडणार नाही? सिंधुदुर्गचा किल्ला, तारकर्ली तर आपण पाहिले आहेच. पण, जरा मालवणमध्ये तुमच्या गाडीची दिशा बदलून तर बघा. मालवणमधील तुम्ही कधी न पाहिलेले सौंदर्य तुम्हाला आँखो देखी मिळेल. आज आम्ही तुम्हाला अशा काही प्रसिध्द ठिकाणांबद्दल सांगणार आहेत, जी ठिकाणे कदाचित तुम्ही पाहिल नसतील किंवा क्वचितच या ठिकाणांची नावे ऐकली असतील. होय, आम्ही तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील वेगळ्या पर्यटन स्थळांविषयी सांगणार आहोत, जिथे जाणे सोपे तर आहेच, शिवाय खरा कोकण असतो तरी काय? याची अनुभूती घेण्यासाठी तुम्ही याठिकाणी नक्की जाल!  

तर आम्ही मालवण तालुक्यातील धामापूर, भगवती देवी मंदिर, रात्रीस खेळ चाले वाडा, ठाकर आदिवासी ट्रायबल म्युझियम/ पपेट म्युझियम, ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम ॲण्ड आर्ट गॅलरी या ठिकाणांविषयी सांगणार आहोत. 
 

धामापूर गाव 

 
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हिवाळ्यात येथील हवामान थंड असते. आपण कधी पाहिली नसेल इतकी हिरवाई या भागात आहे. उंचच्या उंच माडाची झाडे, पोफळीच्या बागा, सुपारीचा माळ आणि त्यांतून पाटांमधून वाहणारे पाणी, सुंदर निसर्गरम्य व शांत वातावरण अशी धामापूरची ओळख आहे.
 
 

धामापूर तलाव :

 
धामापूर तलावाचे पाणी धामापूर, काळसे, गावांसह संपूर्ण मालवण शहराला पिण्यासाठी नळयोजनेमार्फत पुरविले जाते. अतिशय विस्तीर्ण असा तलावही धामापूरची ठळक वैशिष्ट्ये आहेत. तळ्यामध्ये नौकाविहाराची सुविधादेखील आहे. तलावाला लागूनच भगवती देवीचे मंदिर आहे. हा तलाव १५३० साली राजा नागेशराव देसाई यांनी निर्माण केल्याचे म्हटले जाते. येथे पावसाळ्यात खूप पाऊस पडतो. कितीही पाऊस पडला तरी हा तलाव ओसंडून वाहत नाही. तर दुष्काळ पडल तरी तलावातील पाणी आटत नाही, असं म्हटलं जातं.
 
जवळच ७-८ किमीवर चौके मालवण येथे प्रसिद्ध असे भराडी देवीचे मंदिर आहे.

कसे जाल?

कोल्हापूरपासून जायचे असेल तर : कोल्हापूर- बालिंगे-कळे-असळज-गगनबावडा-वैभववाडी-तळेरे-नांदगाव-कणकवली-कसाल-कट्टा बाजारपेठ-नेरूर-मळकेवाडी-धामापूर गाव. तसेच मुंबईपासून रेल्वे आहे. मुंबई ते कुडाळ असा कोकण रेल्वेचा प्रवास तुम्ही करू शकता. रेल्वे स्टेशनपासून धामापूर हे अंतर १४ किमी. आहे. येथे एसटीबस किंवा रिक्षाने जाता येईल.

भगवती देवी मंदिर :

 
धामापूर तलावाच्या काठावरच भगवती देवीचं मंदिर आहे. भगवती मंदिराची स्थापत्यशैली पारंपरिक कोकणी पध्दतीची आहे. भगवती देवीचे मंदिर कौलारू आहे. ४८०  वर्षाहूनही अधिक जुना इतिहास श्री देवी भगवती मंदिराला आहे. मंदिरावर कोरीव कलाकुसर केले आहे. भगवती देवीची काळ्या पाषाणात कोरलेली सुबक आणि आकर्षक मूर्ती आहे. भगवतीची मूर्ती चतुर्भूज आहे.  शेजारीच खूप मोठे आणि अनेक वर्षे वारुळ आहे. येथे वारुळाचे मंदिर असून त्याची नित्यनियमाने पूजा केली जाते. या मंदिराला सातेरी देवीचे मंदिर असे म्हटले जाते. पर्यटनासाठी म्हणून धामापूर गाव प्रचलित झाले आहे. सिंधुदुर्गचे पर्यटन करणाऱ्या पर्यटकांनी धामापूरला एकदा जाऊन यायलाच हवे!
 
 

रात्रीस खेळ चाले वाडा :

 
रात्रीस खेळ चाले वाडा पाहण्यासाठी धामापूर तलावापासून ४० मिनिटांचे अंतर आहे. धामापूर गावातून झारप -अक्केरी रोड आहे. हा रोड हायवेला जोडतो. तेथून वाड्याकडे जाणारा मार्ग आहे. हा वाडा जसा मालिकेत दिसतो, तसाच आहे. मातीच्या भिंती, कौलारू छप्पर, शेणाने सारवलेली जमीन, स्वयंपाक घर, घराच्या मागील बाजूस विहिर आणि सभोवताली झाडी सर्वकाही जसं आहे तसं. हा वाडा पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनलं आहे.
 
 कसे जाल?

धामापूर-मळकेवाडी-कळसे-जकात नाका-मलवण रोड-झारप तिट्टा-झारप अक्केरी रोड-शेटकर वाडा (रात्रीस खेळ चाले वाडा)

कोकम फळ

स्वयंरोजगार आणि व्यवसाय -

भगवती मंदिराजवळ काही स्थानिक येथे आवळा सरबत, सिरप, कोकम, कोकोनेट तेल, जास्वंदी तेल, शिकाकाई अशा असंख्य कोकणी पदार्थ, वस्तू विकायला ठेवलेल्या असतात. या कुठल्या कंपनीकडून नव्हे तर ओरिजिनल हातापासून बनवलेले पदार्थ इथे मिळतात. तर काही अंतरावर कंपनीच्या विविध वस्तू जसे की, आंबा बर्फी, कोकोनेट बर्फी, आवला ज्यूस, कोकम, काजू, फणस चीफ्स वगैरे आदी पदार्थ मिळतात.

ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम ॲण्ड आर्ट गॅलरी - पिंगुली (pinguli) या गावात हे आंगण आहे. सिंधुदर्ग जिल्ह्यातील ठाकर आदिवासी समाजाच्या परंपरा जपून ठेवण्यासाठी हे संग्रहालय बनवलं आहे. आधीचा आदिवासी समाज कसा राहत होता, त्यांची जीवनशैली कशी होती? याविषयीची माहिती अनेक पुतळे, वस्तू, कपडे आदींच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. येथे ठाकर आदिवासी ट्रायबल म्युझियम किंवा पपेट म्युझियमदेखील आहे.
 
 
 

 

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...