Thursday, March 11, 2021

'पूरा नाम विजय दीनानाथ चौहान...' अमिताभ यांच्या अग्निपथ चित्रपटाला ३१ वर्षे पूर्ण

Image result for agneepath amitabh bachchan

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे प्रसिद्ध नाव विजय दीनानाथ चौहान या संवादाने चित्रपट अग्निपथ हिट ठरला. आज १६ फेब्रुवारी रोजी अग्नपथला ३१ वर्षे पूर्ण झाली. विशेष म्हणजे या चित्रपटातील बिग बींनी साकरलेली विजय ही भूमिका इतकी गाजली की, पुढे 'पूरा नाम विजय दीनानाथ चौहान...'हा संवाद गाजलाचं, शिवाय तब्बल २० चित्रपटांमध्ये त्यांचे नाव 'विजय' असे आहे. तर अमित हे सर्वाधिक वेळा वापरले गेलेले नाव आहे. अमिताभ यांच्‍या अग्‍निपथरबरोबरचं डॉन, जंजीर या गाजलेल्‍या चित्रपटांचे रिमेक बनवण्‍यात आलेले आहेत. 

अग्निपथ १६ फेब्रुवारी, १९९० रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकुल आनंद यांनी केले होते. अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत तर मिथुन चक्रवर्ती, माधवी (अभिनेत्री),  नीलम, डॅनी डेन्जोंगपा, आलोक नाथ, रोहिणी हट्टंगड़ी, टिन्नू आनंद, विक्रम गोखले, अर्चना पूरन सिंह, शरत सक्सेना, गोगा कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका यामध्ये होत्या.

चित्रपटाचे निर्माते यश जोहरने होते. चित्रपटाचे नाव अग्निपथ कवितेतून घेण्यात आले होते. हे नाव हिंदीचे प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतून घेण्यात आले होते. अग्निपत म्हणावा तसा चालला नाही. तिकिट खिडकीवर अयशस्वी  ठरलेल्या या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या अभिनयावर टीका झाली. परंतु, मिथुन चक्रवर्तीच्या अभिनयाला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांकडून दाद मिळाली होती. असे असले तरी अमिताभ बच्चन यांच्या करिअरच्या दृष्टीने हा चित्रपट मैलाचा दगड ठरला होता. दमदार संवाद आणि उत्तम अदाकारीमुळे अग्निपथ १९९० मधील सर्वात चौथा कमाई करणारा चित्रपट ठरला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, चित्रपटाची कहाणी खूप उत्तम होती, असे असतानाही हा चित्रपट आपला बजेटदेखील या चित्रपटाच्या माध्यमातून काढू शकला नाही. आणि बॉक्स ऑफिस पर अयशस्वी ठरला. 

बिग बींना मिळाला होता पहिला राष्ट्रीय पुरस्कार 

अग्निपथसाठी अमिताभ बच्चन यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ३८ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्नोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आले होते. 

२०१२ मध्ये आला अग्निपथचा रिमेक 

मूळचा चित्रपट अग्निपथ रिलीज झाल्यानंतर २२ वर्षांनंतर २०१२ मध्ये रिमेक आला. या चित्रपटामध्ये संजय दत्त, ऋतिक रोशन, ऋषी कपूर, प्रियांका चोप्रा यांच्या भूमिका होत्या. हा रिमेक मूळच्या अग्निपथच्या तुलनेत कमर्शियली हिट ठरला होता. 

बॉलिवूडमध्ये ५२ वर्षे पूर्ण 

अमिताभ यांना बॉलिवूड इंडस्ट्रीत ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत. बिग बींनी आपल्या जुन्या आठवणी शेअर करत थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनी ट्विट करून म्हटले की, आजच्याच दिवशी (१५ फेब्रुवारी) त्यांनी चित्रपट इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. 

छत्रपती शिवाजी महाराजांची अजरामर भूमिका साकारलेले चंद्रकांत मांडरे!

Image result for film balu chandrakant mandare

कोल्हापूरचे प्रसिध्द मराठी अभिनेते चंद्रकांत मांडरे यांचा आज दि. १७ फेब्रुवारीला स्मृतिदिन आहे. एक उत्तम अभिनेते आणि चित्रकार अशी त्यांची ख्याती. आजही कोल्हापुरातील राजारामपुरीत त्यांच्या नावाचे म्युझियम आहे. खरंतरं त्यांचे हे राहते घर होते. पुढे ते वस्तू संग्रहालयात रुपांतरीत करण्यात आले. डॉ. चंद्रकांत मांडरे यांनी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांतून बहरदार सादरीकरण, अभिनय कौशल्य दाखविले . 

युगे युगे मी वाट पाहिली, पवनाकाठचा धोंडी, थोरातांची कमळा, छत्रपती शिवाजी, संथ वाहते कृष्णामाई, मीठभाकर, सांगत्ये ऐका, मोहित्यांची मंजुळा, धन्य ते संताजी धनाजी, खंडोबाची आण, बनगरवाडी अशा चित्रपटांतून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अधिक उंचीवर नेले. चंद्रकांत यांचा जन्म १३ ऑगस्ट १९१३ ला कोल्हापुरात झाला. 

Image result for film balu chandrakant mandare

कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या हाताखाली ते नोकरी करू लागले. तर बाबा गजबर यांच्याकडून चित्रकलेचे शिक्षण घेतले. आजही त्यांनी काढलेली चित्रे त्यांच्या म्युझियममध्ये पाहायला मिळतात. त्यांच्या चित्रात रंगसंगतीबरोबर, निसर्गाची किमया पाहायला मिळते. झाडे, पक्षी, शेती, नदी, फुले, निसर्गाशी संबंधित त्यांची चित्रे लक्ष वेधून घेतात. 

No photo description available.

पेंटरांबरोबर काम करता करता त्यांना 'सावकारी पाश' हा बोलपट मिळाला. या बोलपटातून त्यांचे अभिनय बहरू लागले. मराठी सिनेसृष्टीला नवा देखणा अभिनेता मिळाला होता. याचवेळी त्यांची भालजी पेंढारकर यांच्याशी जवळीक झाली. मुळचे गोपाळ असे नावात बदल करून त्यांचे चंद्रकांत असे नाव ठेवण्यात आले. अद्यापपर्यंत चंद्रकांत मांडरे असेच त्यांचे नाव प्रसिध्द आहे. तर धाकटा भाऊ वामन हे सूर्यकांत मांडरे झाले. 

May be an image of 2 people

पाटील, जल मल्हार, ईर्ष्या, अशा अनेक चित्रपटांमध्ये विविध व्यक्तीरेखांच्या सर्व रंगछटा त्यांनी साकारल्या. ७७ मराठी, १४ हिंदी आणि एका इंग्रजी चित्रपटात काम करणाऱ्या चंद्रकांत यांची चित्रपट सृष्टीतील कारकीर्द अविस्मरणीय आहे.  

No photo description available.

गावातल्या बायांवर डोळा ठेवणारा रंगेल 'पाटील' साकारणारे, छत्रपती शिवाजी महाराजांची अजरामर भूमिका साकारणारे ते घरंदाज, रुबाबदार, देखणे चंदकांत मांडरेचं होय. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांच्याबरोबर २७ चित्रपटांत चंद्रकांत यांनी एकत्र भूमिका केल्या.

May be an image of 1 person

कोल्हापूरच्या चित्रनगरीला कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे नाव देण्यात यावे, ही त्यांची पहिल्यापासून मागणी होती. 

No photo description available.

चंद्रकांत मांडरे कलादालन 

आपल्या चित्रांचे एक स्वत:चे दालन असावे, असे त्यांचे महाराष्ट्र फिल्म कंपनीत असल्यापासूनचे स्वप्न आहे. पुढे त्यांनी कोल्हापुरात राजारामपुरीत बंगला बांधला. या बंगल्याला निसर्ग हे नाव दिले. या बंगल्यात त्यांनी स्वत:ची सगळी निसर्गचित्रे लावून कलादालन सजवले. 

No photo description available.

चंद्रकांत यांचा शेवटचा चित्रपट बनगरवाडी होता. त्यावेळी ते ८२ वर्षांचे होते. शूटिंग नसेल तेव्हा ते चित्रे काढायचे. आम्ही त्यांना दादा म्हणायचो, अशी आठवण त्यांच्या आतेभावाने सांगितली होती, असा संदर्भ संपादक अनंत दीक्षित यांच्या चंद्रकांत पुस्तकात मिळतो. 

May be an image of 1 person

शनिवार, दि. १७ फेब्रुवारी २००१ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घरीच हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.  

(photos - Late Dr. Chandrakant Mandare 100th Birth Year Celebration facebook वरून साभार)

Monday, February 22, 2021

पहाटे उठणारी माणसं श्रीमंत होतात का?

 सकाळी लवकर लवकर घरामध्ये आईने हाक मारली तर किती कंटाळ येतो यार! घरातली आई सगळ्यात आधी लवकर उठते. कारण तिला चहा, नाष्ता, डबा बनवायचा असतो. मग, नंतर बाकीचे निवांत उठतात. हातात सर्वकाही आयतं मिळतं.  कॉलेजला जाण्याआधी, कामाला जाण्याआधी डबादेखील भरून हातामध्ये तयार असतो. आई लवकर उठते म्हणून तिला ही सर्व कामे पटापट करायला वेळ मिळतो. मग आपण काय करतो? घरातल्या भांड्यांचा आवाज येतो म्हणून आईवर राग काढत पांघरूण तोंडावर घेऊन आराम झोपतो. मग, आपण आपली कामे करायला स्वत: लवकर का नाही उठत? असं म्हटलं जातं की, 'लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे'. लवकरच झोपल्याने सकाळी लवकरच उठायला होतं. आणि आरोग्यही चांगलं राहतं. अनेक यशस्वी व्यक्ती पहाटे लवकर उठून आपल्या कामाला लागतात. पहाटे लवकर उठणारी माणसे श्रीमंत होतात का? 

असं म्हटलं जातं की, अनेक यशस्वी लोकांना सकाळी उठून आपली कामे करण्यास पुरेसा वेळ मिळतो. ठरलेल्या नियोजन, कामाव्यतिरिक् कामे करण्यासाठी त्यांना वेळ मिळतो. लवकर उठल्याने त्यांचे आरोग्य टिकून राहते. दवाखान्यात ढिगभर पैसे घालवण्याची वेळ त्यांच्यावर सहसा येत नाही. त्यामुळे लवकर उठून उत्साहाने, सकारात्मक विचारांनी कामाला सुरवात झाल्यास आपल्या कामात यश हमखास मिळतं. 

sunset without copyright साठी इमेज परिणाम

लवकर का उठावं?

सकाळी लवकर उठल्यामुळे तुमच्या दिवसाची सुरूवात फ्रेश होते. उत्साह येतो. दिवसभर आपल्याला कोणती कोणती कामे करायची आहेत, हे पटकन सुचतं. ती कामे पूर्णत्वास होण्यासाठी आपले प्रयत्न सुरू होतात. सकाळी लवकर उठून तुम्ही मॉर्निंग वॉक, जीम अथवा घरच्या घरी व्यायाम करू शकता. शुध्द हवेत ऑक्सिजन मुबलक प्रमाणात असल्यामुळे तुम्ही फ्रेश वातावरणात रनिंग (पळायला, चालायला) जाऊ शकता. घरी पूजा, प्रार्थना वेळेवर करता येतात. घरातील अन्य व्यक्तींना त्यांच्या कामात मदतही करू शकता. सकाळी उठून शांत वातावरणात अभ्यासही करता येतो. काही वेळा वेळ झाला म्हणून आपण नाष्ता करत नाही. न खाताच आपण बाहेर पडतो. पण, सकाळी नाष्ता खाणे, आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. काही जण जेवूनच बाहेर पडतात. अशावेळी नाष्ता किंवा जेवायला पुरेसा वेळ मिळतो. वेळेवर रेल्वे, बस मिळावी म्हणून पटपट कामे आवरून बाहेर पडू शकता. वेळेवर शाळा, कॉलेज, कामाला जाऊ शकता. मग, इथे तुमची धावपळ होणार नाही. अगदी पळापळ न करता, तुम्ही ही सर्व कामे आटोपशीर आणि व्यवस्थितपणे पार पाडू शकता.  

indian breakfast and tea without copyright साठी इमेज परिणाम

लवकर उठण्याचे फायदे काय? 

सकाळी लवकर उठून जर तुम्ही बाहेर फिरायला गेलात तर निसर्गाचा आनंद तुम्हाला घेता येईल. सुर्योदय पाहणं, हे अनेकांना जमत नाही. पण, लवकर उठून गेल्यानंतर उगवता सूर्य पाहणं, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकणं, एकांत आणि शांत वातावरणात चालणं, हे सर्व तुम्हाला तुमचं मानसिक आरोग्य जपायला कारणीभूत ठरतं. चालल्याने, रनिंग, मेडिटेशन, व्यायाम केल्यानं तुमचं आरोग्य सुधारतं. तुम्ही फिट राहू शकता. जे लोक लठ्ठ आहेत, त्यांच्यासाठी तर लवकर उठून व्यायाम करणे, वॉकिंगला जाणे आवश्यक आहेत. शरिरातील अतिरिक्त चरबी करण्यासाठी हा सर्वात चांगला पर्याय आहे. काही जण मोकळ्या हवेत फिरतात, तर काही जण मैदान निवडतात, काहींना बागेत हिरव्यागार गवतावर अनवाणी चालायला आवडतं. यामुळे तुम्ही मानसिक तणावापासून दूर राहू शकता. अनेक वेगवेगळ्या आयडिया तुम्हाला सूचतात. आत्मविश्वास वाढण्याबरोबरचं स्फूर्ती येते. हा उत्साह रात्रीपर्यंत कायम टिकून राहतो. 

morning exercise without copyright साठी इमेज परिणाम

पहाटे लवकर उठल्याने रात्री निवांत झोप लागते का? 

खरंतरं तुम्ही पहाटे ५ किंवा सव्वा पाच दरम्यान उठला की, तुम्हाला रात्री लवकर डोळ्यावर झापड येऊ लागते. म्हणजेच १० वाजता निवांत आणि शांत झोप लागते. मग, इथे तुमचा रात्री टीव्ही पाहण्याचा, इंटरनेटवर किंवा मोबाईलमध्ये डोकं घालून बसण्याचा कार्यक्रम आपोआप रद्द होतो. (स्वानुभवावरून) शिवाय झोप लवकर येत असल्यामुळे रात्रीचं जेवण लवकर होतं. 

sleep without copyright साठी इमेज परिणाम

पहाटे लवकर उठण्यासाठी किती वाजता झोपावं? 

असं म्हटलं जातं की, रोज किमान ८ तास झोप घेणं आवश्यक आहे. एखाद्या वेळी ७ तासांची झोप झाली तरी फारसा फरक पडत नाही. रात्री ९ किंवा १० वाजता झोपल्यास पहाटे पाच - साडेपाचला जाग येतेच. त्याचबरोबर, तुम्ही अलार्मदेखील लावून ठेवू शकता. काही वेळा दुपारी वेळ मिळाल्यास वामकुक्षीही घेता येते, असे काहीजण म्हणतात. लवकर उठल्याने दिवसभर येणारा कंटाळा, किंवा बोअरिंग होण्याचा प्रकार टाळता येतोय त्याच उत्साहाने तुम्ही घरातील, ऑफिसमधील अथवा तुमच्या कामाच्या ठिकाणी कामे पूर्ण करता येतात. 

morning walk without copyright साठी इमेज परिणाम

मोकळ्या वेळेत काय करावं? 

पहाटे लवकर उठून तुम्ही कामे आवरता, दिवसभर कॉलेज, ऑफिस करून जेव्हा घरी परतता. त्यावेळी अगदी संध्याकाळीदेखील तुम्ही फ्रेश राहता. काहीतरी नवीन करण्याची कल्पना तुमच्या डोक्यात येऊ शकतात. जर तुम्ही संध्याकाळचा एखादा क्लास लावला असेल, तर क्लासला जाण्याचा उत्साहदेखील कायम राहतो. तेव्हा तेथे तुम्हाला कंटाळा येणार नाही. कारण, सकाळी उठून तुम्ही मॉर्निंग वॉक, व्यायाम केलेला असता. ती एनर्जी, उत्साह संध्याकाळपर्यंत कायम राहतो. मिळालेल्या मोकळ्या वेळेत तुम्ही तुमचे वेगवेगळे छंद जोपासू शकता. एखादा चित्रपट पाहायलादेखील तुम्ही जाऊ शकता. तुमच्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवू शकता. मित्र-मैत्रीणींना भेटू शकता. उत्साह टिकून राहिल्याने तुम्हाला या गोष्टी साध्य करू शकता. जर झोप पूर्ण झाली नसेल तर दिवसभर उत्साह राहणार नाही आणि मग, तुमच्या सर्व नियोजनावर पाणी फिरू शकते. 

morning walk without copyright साठी इमेज परिणाम

पहाटे उठून ही सर्व कामे केल्याने तुमची दगदग कमी होऊन पूर्ण दिवस आनंदात जाईल. 

सुटलेलं पोट, कमरेचा वाढलेला घेर आणि बेढब शरीर काय करावं?

Image result for fat gain female without copyright image

 या महिन्यात माझी आवडती जिन्स आणि टॉप मी घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे कपडे मला बसलेच नाहीत. कारण होतं...कमरेचा वाढलेला घेर. मग, हा कमरेचा घेर वाढला कसा? खूप सारं खाल्ल्याने पोटाबरोबर कमरेचा आकारदेखील वाढलाय का? की ८-८, ९-९ तास एका जागी बसून काम केल्याने झालं असेल? की वेळेवर खाल्लचं नाही म्हणून...कधी-कधी उपाशीच झोपले, यामुळे झालं असेल का? असे सर्व प्रश्न तुमच्याही मनात घोळत असणार. मग, आता काय करावं, कसं कमी करायचं सुटलेलं पोट, वाढलेला कमरेचा घेर? 

वाढलेलं वजन प्रत्येकाची समस्या बनली आहे. धकाधकीच्या जीवनात अवेळी खाणे, फास्ट फूड खाणे, घरातले जेवण नाकारणे, व्यायाम न करणे, ताणतणावामुळे आपण बेढब होत जातो. मग, इतकं सारं खाल्लेलं जेवण, पदार्थ कुठे जातात. ते पचत नाहीत का? फास्ट फूडमुळे खरंच आपल्या आरोग्यावर परिणाम होतो का? या गोष्टी आपण जाणून घेणे खूप आवश्यक आहे. तुम्ही काय खाता यापेक्षा तुम्ही कसं आणि किती वेळा खाता हे महत्त्वाचं आहे. 

Image result for faty woman without copyright image

पोट आणि कमरेचा घेर कशामुळे वाढतो?   

अपुरी झोप, अवेळी खाणे, बाहेरचे खाणे, व्यायाम नसणे, खूप तेलकट आणि चरबीयुक्त पदार्थ खाण्यानेदेखील बॅड फॅट वाढायला सुरुवात होते. चांगल्या आरोग्यासाठी शरिरातील चरबीचे प्रमाण आटोक्यात असणे आवश्यक आहे. सलग एक - दोन तास एका जागी बसणे टाळावे. दिवसातून किमान एकदा तरी व्यायाम करावा. शक्य असल्यास दोरीच्या उड्या मारणे. 

- ऑफिसमध्ये काम करत असाल तर मध्ये मध्ये उठून चालावे. 

- सकाळी उठून चालायला जावे. 

- घरच्या घरीदेखील किमान १ तास व्यायाम करावा. 

- दिवसभरात भरपूर पाणी प्यावे 

- भूक लागल्यानंतर प्रसन्न मनाने खावे. 

- नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. 

- सकाळी पोटभर नाष्ता खाणे 

- दुपारचे जेवण वेळेवर घेणे 

- रात्री लवकर जेवणे, लवकर झोपणे

- दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने खाणे 

Image result for dorivaril udya

काय खावं? 

सकाळी पोटभर खावं, असं म्हणतात, ब्रेकफास्ट कधी चुकवू नये. कामाला जाणाऱ्या लोकांनी आणि गृहिणींनीदेखील ब्रेकफास्ट करायलाच हवे. 

अंडी -अंडी खात असाल तर सकाळी दोन अंडी खायला हरकत नाही. यातून प्रथिने भरपूर मिऴतात. 

Image result for milk and egg without copyright

दूध - एक ग्लास दूध पिणेदेखील आरोग्यास फायदेशीर ठरते. बदाम दूध पिल्यास तरीही चालेल. बदाम, अक्रोड असा सुका मेवा खावा. 

ग्रीन टी - सकाळी ग्रीन टी प्यायला हरकत नाही. किंवा विनादुधाचा चहा घेणे फायदेशीर ठरेल. 

घरात बनवलेला नाष्ता - घरात बनवलेली खीर, उपीट, पोहे, आंबवलेल्या पदार्थापासून बनवलेले पदार्थ-इडली, डोसा, अप्पे वगैरे. तसेच मुगाची खिचडी खावी.

सॅलेड - दुपारच्या जेवणात गाजर, बीट, काकडी, कांदा खावा. कच्चा कोबी, हिरवे मटर, हिरवी मिरची, हिरवी कोथिंबीर यांचे मिश्रण करून कोशिंबीर खाल्ली तरी चालेल.

 

फळे - पोटावरील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी विविध फळे खायला हवेत. बेरीज्, सफरचंद, चेरी, पेर, पपई, डाळिंब यासारखे फळे देखील लाभदायक आहेत. दरम्यान वजन घटवण्यासाठी फळांचे सेवन करणे सर्वात जास्त फायदेशीर ठरते, यासाठी लोक आपल्या जेवणात फळांचा समावेश करतात. 

हिरव्या पालेभाज्या - हिरव्या भाज्यांचा आहार शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी पोषक मानला जातो. यासाठी आपल्या जेवणात अधिक प्रमाणात भाज्यांचा समावेश करावा. फळभाज्या, ब्रोकली, कोबी यासारख्या स्टार्च नसलेल्या भाज्यांचे सेवन करणं फायदेशीर ठरेल. 

तूप - गायीच्या दुधाच्या तुपाचा वापर आहारात केल्यास अतिउत्तम आहे. तूप तुमचं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतं. यात चांगले फॅटी अॲसिड, ओमेगा-६ असतात. हे आपल्या शरिरातील चरबीचा स्तर कमी करण्यास मदत करते. परंतु, तूपदेखील प्रमाणात खाणे आवश्यक आहे. कारण काही गोष्टी जरी जास्त प्रमाणात वापरल्या गेल्या तरी त्या हानिकारक असतात.

Image result for green saledwithout copyright

काय टाळावं -

तळलेले पदार्थ टाळावेत - समोसे, फरसाण, पुऱ्या, शेव, पापडी, तळलेले पापड, तळलेले वेफर्स टाळावेत. 

फास्ट फूड टाळणे - पाणीपुरी, रगडा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, अन्य फास्ट फूड खाणे टाळावे. त्याऐवजी फळे, शेंगदाणे, सुका मेवा, हरभरा खावा. फळांचा ज्यूस पिणेही उत्तम ठरते.  

आपलं वजन आटोक्यात राहण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तसेच नियमित व्यायाम, योग्य आहार आणि प्रसन्न मन हीच आपल्या आरोग्याची गुरूकिल्ली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार कसे होते?

 आज १९ फेब्रुवारी शिवजयंतीच्या औचित्याने ...


 शिवरायांसी आठवावे|जीवित तृणवत मानावे| इहलोकी परलोकी उरावे|किर्तिरुपे||
 
'आरमार हे राज्याचे स्वतंत्र राज्यांगच आहे. ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे. तद्वतच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र. याकरिता आरमार अवश्य मेव करावे.' असं आज्ञापत्रात म्हटलं आहे. त्याकाळातील आरमाराचे महत्त्व सांगणारे हे आज्ञापत्रातील वर्णन होय. जाणता राजा, निश्च्यायाचा महामेरू छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आरमाराची सुरूवात नक्की कधी व कशी केली, याविषयी मराठा इतिहासात थेट नोंद नाही. परंतु, बखरी आणि युरोपीय नोंदीमधून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरुपात माहिती समोर येते, असा संदर्भ 'मराठा आरमार एक अनोखे पर्व' या डॉ. सचिन पेंडसे यांच्या पुस्तकात सापडतो.

छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि कौशल्याच्या बळावर समुद्र सुरक्षिततेचे महत्त्व ओळखून मराठा आरमार दलाची (इंडियन नेव्ही) स्थापना केली. आज भारतीय नाविक दल छत्रपती शिवाजी महाराजांना 'Father of Indian Navy' (भारतीय आरमाराचे जनक) मानते. शिवरायांनी त्याकाळी हिंदुस्थानातील पहिले जहाज निर्माण करुन सागरी सुरक्षेची मुहूर्तमेढ रोवली. खंबायतच्या आखातापासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता काबीज करून मराठ्यांचे वर्चस्व स्थापित केले. 'ज्याचे आरमार त्याचा समुद्र' ही कृती लक्षात घेऊन समुद्रावर आपलं स्वत:चं वर्चस्व निर्माण करायचं असेल आणि समुद्र जिंकायचं असेल तर आरमाराची आवश्यकता असल्याचे छत्रपतींना वाटले. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी यांच्या आक्रमणांपासून हिंदुस्थानला वाचवायचे असेल तर स्वतःचे आरमार हवे, हे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या वेळीच ओळखले होते.

किल्ले, घोडदळ, पायदळ, गडकोट, याबरोबरचं मराठा स्वराज्याच्या संरक्षणासाठी आरमाराची गरज निर्माण झाली होती. १६५९ ला महाराजांनी आरमाराची मुहुर्तवेढ रोवली असा उल्लेख सापडतो. इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन म्हणतात, मराठ्यांकडे युध्दांची परंपरा असली तरीही समुद्र हा त्यांच्यासाठी एक नवीनच पैलू होता. भारताच्या इतिहासात शिवाजी हे कदाचित एकमेव राजे होते, ज्यांनी नौदलाची स्थापना राजकीय दृष्टीने केली. महाराजांनी केवळ साम्राज्याच्या संरक्षणासाठी आरमाराचा उपयोग केला नाही तर व्यापाऱ्याच्या दृष्टीनेदेखील खुबीने त्याचा वापर केला.  

आरमार उभारण्यासाठी महत्त्वाची कारणे -

कोकण किनाऱ्याचे, सिद्दी आणि युरोपीय व्यापारी शक्तींपासून रक्षण करणे.

युरोपीय शक्तींना राजकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवणे.

कोकणातील प्रजेचे सिद्दी आणि पोर्तुगीजांच्या हल्ल्यांपासून संरक्षण करणे.

बंदरे आणि त्यांमधून होणाऱ्या व्यापार आणि उत्पन्नाचे रक्षण करणे

व्यापारी जहाजांची सुरक्षा करणे

नाविक नाकेबंदीपासून कोकणाचे संरक्षण करणे.  

आरमारी जहाजांचे प्रकार-

मराठ्यांच्या युध्दनौका

गलबत - साधारणपणे ७० टन क्षमतेचे असून वल्ह्यांच्या सहाय्याने हाकले दाई. यात २० माणसे बसतील, अशी सोय होती.

गुरब - १५० ते ३०० टन क्षमतेचे असे. गुरबाच्या वरची बाजू बांबूची बनलेली असे. पुढच्या भागात नाळ असे. या बांधणीमुळे प्रवासात ते मोठ्या प्रमाणात हेलकावे घेत असे. गुरबाच्या वरच्या बाजूला भागात नाळेवर ९ ते १९ पौंडाच्या दोन तोफा असत. या तोफा पुढच्या बाजूला डागल्या जात तर गुरबाच्या बाजूला ६ ते ९ पौंडाच्या तोफा असत.

पाल - मराठा आरमारातील सर्वात मोठी युद्दनौका होय. विजयदुर्गाच्या लढाईनंतर ७४ तोफा असलेले एक मोठे (पाल) इंग्रजांना सापडले होते. पाल हे दुमजली असे. वरच्या भागात एक आराम करण्यासाठी आणि निरीक्षणासाठी जागा असे.

व्यापारी जहाजे-

मचवा  -

याचा उपयोग मुख्यत: मासेमारी आणि सामान वाहून नेण्यासाठी केला जात असे. मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या मचव्यास कोला किंवा कोळी मचवा असे म्हटले जाई. यात शिडांच्या उपयोगाबोरबर वल्ह्यांचाही वापर करण्यात येत असे. काही मोठ्या मचव्यांवर २-६ तोफा ठेवून त्यांचा आरमारात उपयोग केला जात असे. मचवा २ ते ३ टन क्षमतेचा असे आणि त्यात ५० माणसे मावत.

महागिरी - महागिरी २० ते ३० टन क्षमतेची असे. महागिरीचा वापर मंगलोरहून विटा आणि कौले आणण्यासाठी केला जात असे. महागिरीवर शीड आणि वल्ही याचा उपयोग केला जात असे.

पटीमार - पटेमारी, पटेमार

पटीमार हे मचव्यापेक्षा मोठे, अरूंद, देखणे हाज असे. पटेमार २५ ते १०० टन क्षमतेचे असे. पटेमार हे अतिशय वेगवान असून सामान वाहून नेण्याची क्षमता अधिक असे. 

शिबाड-
शिबाड ही पटेमारची मोठी आवृत्ती होती. शिबाडाचे वेगळेपण त्याच्या चौकोनी आकाराची मागची बाजू यातून दिसे. पाल व्यतिरिक्त इतर भारतीय जहाजांची मागची बाजू निमुळती असे. 

बटेला -
मचवा आणि पडावाची मोठी आवृत्ती म्हणजे बटेला. बटेलाचा उपयोग मलबार, कोकण, गुजरातमधील वाहतुकीसाठी केला जात असे. 

जहाज बांधणी -

जहाज बांधणीसाठी इमारती लाकडाची उपयोग करण्यात येत असे. जहाजाचे पठान (keel), बाहेरील फळ्या आणि समुद्राच्या पाण्याशी संबंध असलेले भाग हे लाकडांपासून बनवलेले असतं. तर जहाजाच्या आतील भागासाठी उंडी, आंबा, फणस या झाडांच्या लाकडाचा उपयोग केला जात असे. डोलकाठ्यांसाठी पुन्नी आणि आइन ही दोन प्रकारची लाकडे उपयोगात आणली जात असे. मराठ्यांच्या काळात उत्तर कोकणात कल्याण, भिवंडी, वसई, ठाणे, कुलाबा या जिल्ह्यांच्या किनाऱ्यावर नागाव आणि बाणकोट, विजयदुर्ग येथे जहाजबांधणी होत असे.

अधिक वाचा - मराठा आरमाराची ३६३ वर्षे; छत्रपती शिवाजी महाराजांनी याच दिवशी रोवली होती सागरी सुरक्षेची मुहूर्तमेढ
 
युरोपीय जहाजे -गॅलिओत, गल्लीयोत, गॅलीओते, कॅरक, गॅलियन, कॅरवेल, चौकौनी शिडाचे कॅरवेल, फ्रिगेट, Ship of the line, मॅन ऑफ वॉर, बॉम्ब वेसल (बॉम्ब केच), स्लूप, इस्ट इंडिया मेन, छत्रपती महाराजांनी खुबीने आरमारात व्यापारी दृष्टीकोन आणला. समुद्री व्यापार वाढवण्यासाठी महाराजांनी केलेले प्रयत्न इंग्रज, पोर्तुगीज, डच इ. च्या विविध नोंदीतून हे स्पष्ट होतात. १२ मार्च, १६६५ मधील एका नोंदीनुसार, महाराजांच्या ताब्यातील ८-९ बंदरामधून दरवर्षी २-३ जहाजे पर्शिया, बसरा आणि मोख्याला व्यापारासाठी पाठवत असल्याची नोंद आहे. या काळात कोकणातून तांदूळ आणि मिठाचा व्यापार, दाभोळ, कल्याण, भिवंडी, वेंगुर्ला, पेण आणि राजापूर या बंदरातून होत असे.  

(संदर्भ आणि फोटो - मराठा आरमार एक अनोखे पर्व - डॉ. सचिन पेंडसे)

जलदुर्ग -  

कोकण किनारपट्टीच्या सुरक्षिततेबरोबरच, संदेशवहन, दळणवळण, व्यापार ही आरमार आणि जलदुर्ग उभारणीची काही प्रमुख उद्दीष्टे आहेत. आरमाराच्या हालचाली, संरक्षण यातून जलदुर्गाचे महत्त्व अनन्यसाधारण होते. सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, खांदेरी-उंदेरी विजयदुर्ग, सुवर्णदुर्ण असे कित्येक जलदुर्ग आणि आरमार यांची जोड संरक्षण आणि व्यापाराला होती.

आरमारी तोफा -

आपल्या आरमारांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आरमारी तोफांच्या मारक शक्तीचा पुरेपूर उपयोग करून आरमारी तोफखाना ही नवी संकल्पना पुढे आली. आरमारी तोफांचा उपयोग पहिल्यांदा १५ व्या शतकात करण्यात आला आणि या तोफांमुळे काही अंतरावरूनच शत्रूच्या जहाजांना बुडवता येते, हे आढळल्यानंतर तोफा या जहाजावरील मुख्य अस्त्र म्हणून प्रस्थापित झाल्या.  

त्याहूनि करावे विशेष । तरीच म्हणावे पुरुष ॥
या उपरी विशेष । काय लिहावें ॥१९॥

या पंक्तीप्रमाणे छत्रपती महाराजांची स्वराज्य संरक्षण, अर्थव्यवस्थेची नीतीबाबतचा दूरदृष्टीकोन किती अफाट होता, हे दिसून येते. महाराजांनी स्थापलेल्या या आरमाराने हिंदुस्थानच्या इतिहासातील एका नवीन पर्वाची सुरूवात झाली, असं म्हणायला हरकत नाही.

Saturday, January 9, 2021

ॲसिड हल्ले आपण रोखू शकू का?

 




दीपिका पादुकोनचा ‘छपाक’ हा चित्रपट १० जानेवारीला रिलीज झाला. लक्ष्मी अग्रवाल या ॲसिड हल्ला पीडितेच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या छपाक चित्रपटात दीपिका ‘मालती’ची भूमिका साकारत आहे. अशा अनेक 'मालती' आहेत, ज्यांना आपल्या आयुष्यात पुन्हा उभे राहण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. लक्ष्मी अग्रवाल, अलिगढमध्ये राहणारी शबनम, डॉली, रूपा आणि बऱ्याच जणी ॲसिड हल्ल्याला बळी पडल्या आहेत. परंतु, हा ॲसिड हल्ला आपण रोखू शकलो असतो तर? ही सल मनात कायम आहे. 

महाराष्ट्रात डिसेंबर २०१९ ची ताजी घटना आहे. नागपूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकणाऱ्या एका २० वर्षीय तरूणीवर ॲसिड फेकण्यात आलं होतं. ही दुर्दैवी घटना गोंदिया जिल्ह्यामध्ये घडली होती. याला जबाबदार कोणाला ठरवायचं? ॲसिड हल्ला करणारा, ॲसिड विक्री करणारा? सरकार? की समाज? 

ॲसिड हल्ल्याच्या घटना बहुतांशी मानसिक विकृतीतून घडलेल्या आहेत. प्रेम नावाच्या प्रकरणामध्ये अधिक घटना घडलेल्या दिसून येतात. मुलीची इच्छा नाही. परंतु, कोणीतरी मागे लागलेला आहे. आधी ओळख झालेली आहे. पण, 'तिने' नकार दिला असेल. किंवा बिनसल्यानंतर सूड उगवण्याचा जो एक प्रकार आहे त्यातून अथवा 'तिने' रिस्पॉन्स दिला नाही तर; मित्र असेल पण लग्नाला नकार दिला असेल, आधी ओळख झालेली आहे आणि पुढे त्यांच्यामध्ये काहीतरी बिनसले असेल तर आणि एकतर्फी प्रेमातून ॲसिड हल्ल्यामागची कारणे आहेत. बहुसंख्य ॲसिड हल्ल्याची प्रकरणे अशा गोष्टींवरून झाली आहेत. अशा पुरूषी मानसिकतेतून उद्भवणारा प्रकार हा ॲसिड फेक होय. मुलींच्याबाबतीतच हे हल्ले झाले आहेत. तिचं विद्रुपीकरण करणं, ही पुरूषी मानसिक विकृती आहे. 'ॲसिड फेक' हे विकृतीकरणचं प्रकटीकरण आहे. 

असे हल्ले थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो? ॲसिड हल्ल्यासारखी विकृती थांबवायची असेल तर दोन मार्ग आहेत. एक प्रबोधन आणि दुसरे म्हणजे मुलांच्या जीवनातील खुलेपणा. 

मुलांचे 'प्रबोधन' करणं हा त्यातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. ज्याप्रकारे पुरूषांना प्रेम करण्याचं स्वातंत्र्य आहे, तसं प्रेम नाकारण्याचे मुलीला स्वातंत्र्य आहे. हा जो समजूतदारपणा आहे, तो मुले किशोरवयीन असल्यापासून यायला हवा. येथे मुलांचे कौंटुबिक पातळीवर प्रबोधन करणे गरजेचे आहे. मुख्यत्वे जी किशोरवयीन मुले आहेत, त्यांच्या भावभावना दडपण्याचा प्रकार काही वेळा होतो. त्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये विविध पातळींवर प्रबोधन होणे आवश्यक आहे. 

मुलींच्याबद्दल आकर्षण असो वा सेक्सविषयक, मुलांच्या जीवनात खुलेपणाने यावर चर्चा व्हायला हवी. मग ते कुटुंब असो वा शालेय जीवन. सहशिक्षणाच्या काळात हा खुलेपणा आला किंवा शालेय जीवनातच मुलांना त्यांच्या बोलण्यामध्ये मोकळेपणा आणू दिला तर कदाचित असे प्रकार कमी होण्याची शक्यता आहे. 

दुसरं म्हणजे विकृतीला कोणताही इलाज नसतो. त्यामुळे ॲसिड फेकसारख्या विकृतीला कठोर शिक्षा, कठोर कायद्याची अंमलबजावणी हा एक मार्ग आहे. जर आरोपी मोकाट सुटले तर त्यांना अधिक प्रोत्साहन मिळाल्यासारखं होईल. त्यामुळे कायद्याचा धाक, कठोर शिक्षा असायलाच हवी. पण, त्याच्या जोडीला प्रबोधनाचीही गरज आहे. प्रबोधन हे शैक्षणिक पातळीवर असेल, समाज पातळीवर असेल किंवा कौंटुंबिक पातळीवर असेल. विविध प्रकारचे प्रबोधन आणि कायद्याचा धाक या दोन गोष्टींमुळे ॲसिड हल्ल्यासारख्या विकृती कमी होऊ शकतात. 

५९ टक्के अविवाहित तरूणींवर, ४१ टक्के विवाहितांवर ॲसिड हल्ले 

मध्यंतरी, एक वृत्त वाचनात आले होते. त्यामध्ये एका वेलफेअर टीमने आतापर्यंत शंभर ॲसिड ॲटॅक पीडितांवर सर्व्हे केला होता. त्या अहवालात म्हटले होते-६९ टक्के एकट्या व्यक्तीने तरूणीवर ॲसिड फेकले आहे. २९ टक्के एकाहून अधिक व्यक्तींनी तरूणीवर ॲसिड हल्ला केला आहे. तर २ टक्के लोकांची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ५९ टक्के अविवाहित तरूणींवर आणि ४१ टक्के विवाहित महिलांवर ॲसिड फेकण्यात आले आहे. यातील काही ६४ टक्के घटना दिवसांत आणि ३६ टक्के घटना रात्री घडल्या आहेत. 

ॲसिड ॲटॅकचे एकानंतर एक झालेल्या घटनांनंतर २०१३ मध्ये एक कायदा झाला. त्यानुसार, ॲसिड खरेदीविषयीचे नियम कडक करण्यात आले. सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ॲसिडच्या बाटल्या विकणाऱ्या दुकानदाराला रजिस्टर ठेवावं लागेल. यामध्ये ॲसिड खरेदी करणाऱ्याचे पूर्ण नाव आणि पत्ता तसेच कोणत्या कामासाठी ॲसिड घेऊन जात आहे, हे सर्व लिहावं लागेल. परंतु, अडचण ही आहे की, या नियमांचे पालन कुठेच करण्यात आले नाही. न ही ॲसिड विकणाऱ्यांनी, न विकत घेणाऱ्यांनी हे नियम पाळले. आजही सर्व नियम मोडीत काढत खुलेआम ॲसिड विकले जाते. 

समाजाचा भाग होण्याच्या नात्याने आपण सर्वच जण यावर विचार करूया.

#kissDay एक लव्हेबल किस पार्टनरसाठी!

 


                                               ''इश्क पर जोर नहीं है ये वो आतिश 'ग़ालिब' 

कि लगाए न लगे और बुझाए न बने''
''इश्कने 'गालिब' निकम्मा कर दिया 
वर्ना हम भी आदमी थे काम के'' 

मिर्जा गालिब यांची शायरी एव्हरग्रीन आहे. अणि प्रेमवीरांमध्ये लोकप्रियदेखील आहे. प्रेम म्हटलं की, अनेकांच्या मनात प्रेमाच्या तारा छेडल्या जातात. मग त्यांना आठवते ती पार्टनरची पहिली भेट, पहिली मिठी आणि पहिलं किस. व्हॅलेंटाईन डे (१४ फेब्रुवारी) पूर्वी येतो तो किस डे. आपल्‍या पार्टनरच्‍या प्रति आपल्‍या भावना पोहोचवण्‍यासाठी एक 'किस' पुरेसं आहे. असं नाही की हे फक्‍त तुमच्‍या प्रेमाला दर्शवतं. तर किस एकमेकांशी जुळलेल्‍या भावनादेखील दर्शवतं. काही वेळा मैत्रीत रुसवे-फुगवे होतात. अशा वेळी मनधरणी करण्‍यासाठी एक किस पुरेसं आहे. आज १३ फेब्रुवारीला किस डे (चुंबन दिवस) आहे. पार्टनरच्‍या प्रती असलेलं प्रेम, भावना, व्‍यक्‍त करण्‍यासाठी आजचा हा दिवस अगदी खास आहे. 

Image result for kiss day

अधिकतर कपल किस करून आपलं प्रेम दर्शवतात. किस विश्‍वास, आपुलकी आणि प्रेम दर्शवण्‍यासाठी या खास दिवसापेक्षा आणखी दुसरं काय हवयं? एका किसच्‍या माध्‍यमातून तुम्‍ही तुमच्‍या पार्टनरला खूप स्‍पेशल फिल देऊ शकता. तुम्हीही तुमच्या पार्टनरला कधी किस केलाय काय? 

Image result for kiss day

शब्दांविना प्रेम व्यक्त करायचं असेल तर एक लव्हेबल किस पुरेसं असतं. किस डे (Kiss Day) ची कपल्सना उत्सुकता लागून राहिलेली असते. हा खास दिवस स्पेशल बनवण्यासाठी कपल्स खूप सारी तयारी करतात. किस डेच्या दिवशी प्रेम  करणारे प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांना किस करून आपलं अतुट प्रेम व्यक्त करतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी किस सर्वात उत्तम माध्यम आहे. तेव्हा नातं खास होत जातं. जवळीकता वाढते आणि नातं विश्वासाच्या जोरावर पुढं जाऊ लागते. हेच कारण आहे की, या नात्यांमध्ये अधिक गोडवा भरण्यासाठी कपल्स व्हॅलेंटाईन वीकच्या सहाव्या दिवशी किस डे साजरा करतात. 

Image result for kiss lipstics

तुम्ही किसिंग डे ला आपली पत्‍नी वा गर्लफ्रेंडला एखादी भेटवस्‍तू देऊनही तिला खुश करू शकता. तर पती किंवा बॉयफ्रेंडला खास मॅसेज पाठवूनदेखील स्‍पेशल फिलिंग देऊ शकता. 

'प्‍यार नहीं  तो क्‍या, जिंदगी मे तनहा रहकर क्‍या करोगे' 

किसिंग डे हे नाव ऐकताच प्रेम करणाऱ्यांचे हार्टबीट्‍स नक्‍कीच वाढतात. 'दिल मे कुछ कुछ होता है....' हे लव्‍ह एक्‍सप्रेशन असतं. तुमच्‍या भावना, प्रेम पोहोचवण्‍यासाठी आपल्या पार्टनरला तुम्ही एक किस देऊ शकता. पहिल्‍यांदा किस करताना आपला पार्टनर काय म्‍हणेल, त्‍यासाठी तयार होईल की नाही? असे ढिगभर विचार मनात असतात. काही वेळा सुरुवातीला संकोच होतं. तर ना-नको! चा सामनाही करावा लागतो. पहिल्‍यांदा किस करण खरचं आव्‍हानात्‍मक असतं. कारण, पार्टनरची रिॲक्‍शन कशी येईल, याबाबत अनभिज्ञ असतो किंवा त्याबद्दल काहीच माहिती नसतं.

Image result for rose

हे महत्त्‍वाचं नाही की, तुम्‍ही पहिल्‍यांदाच किस करत आहात किंवा अनेकवेळा केलं आहे. महत्त्‍वाचं हे आहे की, तुम्‍ही लव्‍ह बाईट किस करू शकता की नाही? पहिलं किस आपल्‍या पार्टनरला दिवस-रात्र आपल्‍याबद्‍दल विचार करण्‍यास भाग पाडतं. कारण, हे कायम स्‍मरणात राहणार असतं. तर मग, आपल्या खास अंदाजात किसींग डे साजरा करा... 

'किसी भी मिस को तब तक किस न करो जब तक मिस आपको किस न करे, 
अगर मिस आपको किस करे, तो उसे इतनी किस करो कि वो किसी और को मिस न करें'

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...