Tuesday, June 14, 2022

Reena Madhukar : 'ही' अभिनेत्री आहे सलमान खानची मोठी फॅन

 पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वालिया शिकलगार

सध्या मन उडू उडू झालं मालिकेतील अभिनेत्री रीना मधुकर हिची चर्चा होतेय. रीना मधुकर (Reena Madhukar) हिने अनेक मालिका, हिंदी चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये काम केलंय. अजिंठा या चित्रपटातून मराठी सिनेविश्वात पदार्पण करणारी सुंदर रीनाची मन उडू उडू झालं ही पहिली मालिका आहे. तिचा (Reena Madhukar) इथवरचा प्रवास आणि तिच्या अभिनयाविषयी 'पुढारी ऑनलाईन'शी तिने बातचीत केली.

हिंदीनंतर मराठीत काम करतेय, काय नवीन अनुभवायला मिळतंय?

रीना : माझी सुरुवातचं मराठी चित्रपट अजिंठामधून झाली होती. नितीन देसाईंच्या या चित्रपटात सोनाली कुलकर्णी सोबत काम केलं. यामध्ये माझी कमला नावाची भूमिका होती. येथून माझ्या करिअरची सुरुवात झाली. पुढे हिंदीमध्ये काम केलं. पण, मराठी कधीचं सोडलं नव्हतं. मराठी माझं माहेर असल्यासारखं आहे. चांगल काम मला करायचं होतं. त्यात चित्रपट, मालिका, वेबरीरीज अशी कुठलीही माध्यमं असो. चांगल्या भूमिका कुठल्याही भाषेतील असल्या तरी त्या भूमिका मी स्वीकारते.

एखाद्या भूमिकेसाठी वजन वाढवायचं आहे, तर होकार देशील का?

रीना : जर स्क्रिप्टची गरज असेल तर नक्कीचं वजन वाढवेन. अजिंठामध्ये एका आदिवासीची भूमिका केलीय. झाला बोभाटामध्ये एका गावकरीची भूमिका मी केलीय. ३१ दिवस चित्रपटात अंध मुलीची भूमिका केली. एक अभिनेत्री म्हणून मी फिट राहते. असं नाहीये. माझं हे पहिल्यापासूनचं रुटीन आहे. वेगवेगळं आयुष्य जगताना आम्हाला वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात.

 

 

 

आवडता कलाकार कोणता? एखादी आठवण सांगशील?

रीना : सलमान खान माझा आवडता अभिनेता आहे. त्याला मी भेटलेय. जेव्ही मी पहिल्यांदा सलमानला समोर भेटले. त्यावेळी मला विश्वास बसत नव्हता की तो माझ्या समोर आहे. ज्यावेळी मी सलमानला पहिल्यांदा भेटले, तेव्हा मी त्याला असं म्हटलं होतं की- प्लीज तुम्हाला टच करून पाहू का? तेव्हा खरंच मी त्याला बोटाने टच करून पाहिलं होतं. अजुनही मी त्याला भेटले की, माझी बोलती बंद होते.

तुला ट्रॅव्हल करायला आवडतं. मग, ट्रॅव्हलर ब्लॉग सुरू करावा, असं वाटलं का?

रीना : मला मनात बऱ्याचं वेळेला आलं की, ट्रॅव्हलिंग ब्लॉग सुरू करावं. पण, जेव्हा ब्लॉगर व्हायचं म्हटलं तर तो अनुभव घेणं, निसर्ग पाहणं होतं. हे सर्व करताना ब्लॉगर म्हणून मी काम करू शकले नसते. त्यामुळे एक ब्लॉगर म्हऩून काम करताना ती मजा, तो अनुभव मला घेता आला नसता.

तुला आजही आठवते ती आठवण कोणती?

रीना : आठवणी खूप साऱ्या आहेत. शाळेतील भरपूर आठवणी आहेत. शाळेत असताना मी खूप मस्तीखोर होते. तो शाळेचा ड्रेस घालून पुन्हा बेंचवर जाऊन बसावं. मस्ती करावी. बालपण पुन्हा परत यावं, अनुभवावं असं वाटतंय. बालपणाचं आयुष्य बेफिकिरीवालं असतं. जगाची चिंता नसते. सर्वजण आपापल्या जीवनात आहेत. काही जण परदेशात आहेत. त्यामुळे मित्रमंडळींशी फारसा संपर्क नसतो.

मला नेहमीचं डान्सिंग हे डोळ्यासमोर आहे. मी राजस्थानी फोक डान्सर आहे. त्यामध्ये मी मास्टर केलंय. अभिनयात आल्यापासून मी सध्या डान्सपासून दूर आहे. जेव्हा मला वेळ मिळेल, तेव्हा मला डान्स करायचं आहे. मी मुळची पुण्याची आहे. माझा जन्म, शिक्षण पुण्यातील आहे. माझा डान्स क्लासही पुण्यात होता.

अभिनयाव्यतिरिक्त आणखी काय करावसं वाटतं?

रीना : डान्सिंगमध्येचं मला करिअर करायचं होतं. अभिनयात यायचं असं काही ठरवलं नव्हतं. शिक्षण घेऊन मला एखादी नोकरी करायची नव्हती. लहानपणापासून एअर होस्टेस व्हायचीही इच्छा होती. एकदा पुण्यात जेट एअरवेजच्या मुलाखती सुरू होत्या. तेव्हा मी मुलाखतीसाठी गेले होते. साडेआठशे मुलींमधून तीन मुली निवडल्या गेल्या. निवडलेल्यांपैकी मी एक होते. मी मुंबईत आले. जेट एअरवेजचं काम सुरू असताना अभिनयात आवड निर्माण झाली.

अभिनय क्षेत्रात कसे पदार्पण झाले?

दिग्दर्शक नितीन देसाई भेटले. अजिंठामधील भूमिका माझ्या डान्सिंग स्किलमुळे मिळाली. तेव्हा असं ध्यानी-मनीदेखील नव्हतं की, मला अभिनय करायचा आहे.

जर अभिनेत्री झाली नसतीस तर कोणतं क्षेत्र निवडलं असतंस?

जर अभिनेत्री झाले नसते तर मी डान्सर झाले असते. मला डान्स शिकवायला खूप आवडतो. ज्यांना डान्स करायला येत नाही किंवा वेडिंग संगीत कोरिओग्राफीही करते. जर मी अभिनेत्री झाले नसते तर मी वेडिंग संगीतमध्ये असते.

आगामी प्रोजेक्टबद्दल काय सांगशील?

रीना : देव देव्हाऱ्यात नाही हा माझा आगामी चित्रपट आहे. विक्रम गोखले, सुहासिनी मुळये असे दिग्गज कलाकार यामध्ये आहेत. या चित्रपटात माझी मुख्य भूमिका आहे. याचे उरलेले शूटिंग सध्या सुरू आहे. वेबसीरीजच्याही ऑफर आल्या आहेत. पण, सध्या मालिकेतही काम सुरू आहे. त्यामुळे वेळेचं नियोजन करून आगामी प्रोजेक्टकडे लक्ष राहिल.

मराठी मालिका मन उडू उडू झालं याविषयी बोलताना रीना म्हणतेय-

मराठी मालिका मन उडू उडू झालंमध्ये सध्या ती दिसतेय. तिला या मालिकेची ऑफर मिळाली आणि तिने ती स्वीकारली. पँडेमिक काळात ती दोन वर्षे घरात होती. या काळात तिने कुठलेही कामे हाती घेतले नव्हते.

मंदार देवस्थळी यांचा झी मराठीवरील मन उडू उडू झालं मालिका ही तिची पहिली मराठी मालिका ठरलीय. तिने हिंदी मालिका केल्या आहेत. पण, तिला मराठी मालिका करायची इच्छा होती. ती इच्छा आता या मालिकेच्या माध्यमातून पूर्ण झालीय.

अधिक वाचा- 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Reena Madhukar (@reenameranaam)

Thursday, March 31, 2022

Age Difference : 'या' स्टार्सनी मोठ्या वयाच्या पार्टनरसोबत केले लग्न

 


(Age Difference) – प्रेमाची कोणती सीमा असते ना वय. त्‍यामुळेच आपले प्रेम मिळवण्‍यासाठी इतर कुणाचाही विचार केला जात नाही. कोण काय म्‍हणेल, याची पर्वा त्‍यांना नसते. मग, ती व्‍यक्‍ती वयाने मोठी असो वा लहान. प्रेमामध्‍ये त्‍यांचे वय कधीच आड येत नाही. (Age Difference )

बॉलिवूडमध्‍ये अशा अनेक अभिनेते/अभिनेत्री आहेत, ज्‍यांना ‘बडे अच्छे लगते हैं’. आपल्‍यापेक्षा कितीतरी वयाने मोठ्‍या किंवा लहान अभिनेते/अभिनेत्रींशी त्‍यांनी विवाह केला आहे. प्रेमात लोक वेडे होतात. लग्‍न करण्‍यासाठी येथे कोणतेही स्‍टेटस पाहिले जात नाही, पैसे पाहिले जात नाही, धर्म, जात-पात पाहिली जात नाही. येथे केवळ प्रेम पाहिलं जातं. वय लहान असो वा मोठे येथे त्‍याला अजिबात महत्त्‍व दिलं जात नाही. अनेक स्टार्स आपल्‍या वयापेक्षा मोठं अथवा लहान अभिनेते/अभिनेत्रींशी लग्न केल्याचं आपण पाहतो. यावेळी असं म्हणावसं वाटतं…वयाचं काय घेऊन बसलाय? इथे तर थेट लग्न करून मोकळे झालेत.

कॅटरीना कैफ-विकी कौशल

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ आणि विकी कौशल यांचं लग्न ९ डिसेंबरला होतंय. तुम्हाला माहितीये का, विकी कौशल कॅटरीना कैफपेक्षा ५ वर्षांनी लहान आहे.

तरी बरं सल्‍लू भाईने आपल्‍या लग्‍नाचा विषय ड्रॉप केला आहे. जर सलमान आणि कॅटरीनाचं प्रेम पक्‍क झालं असतं तर येथे १९ वर्षांचं अंतर पाहायला मिळालं असतं.

Arjun Kapoor on marriage with Malaika Arora: You will be part of it - Movies News
अर्जुन कपूर आणि मलायका

अर्जुन कपूर आणि मलायका

सध्या चर्चेत असलेली हॉट जोडी म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका. दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत, अशी चर्चा मध्‍यंतरी सुरू होती. अर्जुन कपूर ३३ वर्षांचा आहे तर मलायका ४५ वर्षांची. अर्थात मलायका अर्जुनपेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे. मलायकाने अरबाज खानशी घटस्‍फोट घेतला. त्‍यानंतर अर्जुन आणि मलायकाची जवळीक वाढली. दोघे अनेकदा एकत्र स्‍पॉट झाले आहेत.

Nick Jonas opens up about his life after marriage with Priyanka Chopra; says having a life
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस जोधपूरमध्‍ये लग्‍नबंधनात अडकले. प्रियांका ३६ वर्षांची आहे तर निक २६ वर्षे. म्‍हणजेच दोघांच्‍या वयात १० वर्षांचे अंतर आहे. दोघांची भेट पहिल्‍यांदा मेट गाला २०१७ च्‍या इव्‍हेंटमध्‍ये झाली होती.

Milind Soman asked about loyalty in a relationship with a huge age gap. He responds : Bollywood News - Bollywood Hungama
मिलिंद सोमन आणि अंकिता

मिलिंद सोमन आणि अंकिता

प्रेम आंधळं असतं, असं म्‍हटलं जातं. प्रेमाच्‍या आड कोणतीच गोष्‍ट येत नाही. मॉडेल मिलिंद सोमणचेदेखील तसेच झाले आहे. त्‍याच्‍यापेक्षा वयाने अर्ध्या असलेल्या अंकिता कोनवारसोबत मिलिंद सोमणने विवाह केला. मिलिंद सोमणचे वय ५२ तर अंकिता २४ वर्षांची आहे.

मिलिंदची दुसरी पत्नी अर्थात अंकिता ही आसामची असून तिचे खरे नाव सुनकुस्मीता कोणवार असे आहे. मिलिंद सोमनने अंकिताशी २२ एप्रेल २०१८ ला महाराष्‍ट्रीयन पद्‍धतीने लग्‍न केले होते. मिलिंद सोमन आणि अंकिता यांच्‍या वयात २५ वर्षाचे अंतर आहे. अंकिता मिलिंदपेक्षा लहान आहे. या कारणावरुन या जोडीला ट्रोल करण्‍यात आले होते. याआधी मिलिंद सोमनने २००६ मध्‍ये फ्रान्‍समधील अभिनेत्री मिलिन जैम्पेनोई हिच्‍याबरोबर लग्‍न केले होते. त्‍यांचे हे लग्‍न फार काळ टिकू शकले नाही. तीन वर्षांतच ते वेगळे झाले.

Shahid Kapoor & Wife Mira Kapoor Expecting Their Third Child?
शाहिद कपूर-मीरा राजपूत

शाहिद कपूर-मीरा राजपूत

शाहिद आणि मीराचे लग्‍न २०१५ मध्‍ये झाले होते. आणि त्‍यावेळी मीरा २१ वर्षांची होती तर शाहिद ३४ वर्षांचा. दोघांच्‍यामध्‍ये १३ वर्षांचे अंतर आहे. मीरा राजपूतने आपल्‍या इ्‍स्‍टाग्राम चॅटमध्‍ये फॅन्‍सनी विचारलेल्‍या प्रश्‍नांना उत्तर देताना म्‍हटले होते, मी लग्‍नापूर्वी काही वर्षे आधी शाहिदला भेटले होते. त्‍यावेळी माझे वय ६ होते. एक फॅन म्‍हणून मी त्‍याला भेटले होते.

Kareena Kapoor Khan and Saif Ali Khan to become parents again: We are expecting an addition to family | People News | Zee News
सैफ अली खान-करीना कपूर

सैफ अली खान-करीना कपूर

सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांची जोडी मोठ्‍या पडद्‍यावर सुपरहिट राहिली. रिअल लाईफमध्‍येही या दोघांची जोडी हिट आणि नेहमीच चर्चेत राहिली आहे. करीना कपूर सैफ अली खानपेक्षा ११ वर्षांनी लहान आहे. सैफ करीनावर इतके प्रेम करत होता की, त्‍याने आपल्‍या हातावर करीनाचे नाव गोंदवले आहे. विशेष म्‍हणजे, सैफ विवाहित होता, त्‍याला दोन मुले आहेत. हे माहिती असतानाही करीना सैफशी विवाहबध्‍द झाली.

सैफचा विवाह अभिनेत्री अमृता सिंहशी झाला होता. त्यांच्याही वयात खूपच अंतर होते. हे अंतर तब्बल १२ वर्षांचे होते. अमृता सैफपेक्षा तब्बल १२ वर्षांनी माेठी होती. म्हणजे सैफच्या दोन बायकांच्यामध्ये तब्बल २४ वर्षांचे अंतर आहे हा एकप्रकारचा विक्रमच म्हणावा लागेल. सैफ आणि अमृताला सारा अली खान आणि इब्राहीम ही दोन मुले आहेत. broken heartअमृतापासून वेगळे झाल्‍यानंतर सैफने करीनाशी विवाह केला. सैफ-करीनाला दाेन मुले आहेत.

Genelia Riteish Deshmukh: Riteish, Genelia's love story in their own words
रितेश देशमुख आणि जेनेलिया

रितेश देशमुख आणि जेनेलिया

रितेश देशमुख आणि जेनेलियाची केमिस्‍ट्री मोठ्‍या पडद्‍याबरोबरच रिअल लाईफमध्‍येही जुळली. तुझे मेरी कसम या चित्रपटात दोघे एकत्र आले ते कायमचेच. खर्‍या आयुष्‍यातही ते दोघे फेब्रुवारी २०१२ मध्‍ये एकमेकांचे झाले. रितेश जेनेलियापेक्षा ९ वर्षांनी मोठा आहे.

Sanjay Dutt Gift To Manyata: Sanjay Dutt Gifts Manyata Dutt Four Apartments Worth Over Rs 100 Crore - संजय दत्त ने गिफ्ट में दिए 100 करोड़ रुपये के 4 अपार्टमेंट, वाइफ मान्यता
संजय दत्त-मान्‍यता दत्त

संजय दत्त-मान्‍यता दत्त

मुन्ना भाई अर्थातच संजय दत्तने मान्यता दत्त याच्‍याशी तिसरा विवाह केला होता. मान्‍यता संजयला लग्‍नाआधी ९ वर्षांपासून ओळखत होती. संजय दत्तचे अनेक अफेअर्सही होते. संजय मान्‍यतापेक्षा १९ वर्षांनी मोठा आहे. तरीही मान्‍यताने संजय दत्तशी २००८ मध्ये विवाह केला हाेता.(Age Difference)

संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्मा हिचे कॅन्सरने १९९६ मध्ये निधन झाले. यानंतर संजयने रिया पिल्लई हिच्याशी लग्न केले होते. पंरतु, संजय दत्त आणि त्याचे संबंध बिघडल्याने २००८ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर संजय यांनी मान्यतासोबत विवाह केला.

Aamir Khan and Kiran Rao announce they are getting divorced - Celebrity - Images
आमिर खान आणि किरण राव

आमिर खान आणि किरण राव

आमिर खान आणि किरण राव ही चर्चित जोडी आहे. आता दोघे एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. पण, लग्नावेळी आमिर किरण रावपेक्षा ९ वर्षांनी मोठा होता. आमिर खानने एक अभिनेता म्‍हणून नाव कमावले तर आमिर-किरण आपल्‍या विविध सामाजिक कामांमुळे चर्चेत राहिले आहेत.

आमिरने किरण रावसाठी आपले पहिले प्रेम सोडले होते. ‘लगान’ चित्रपटाने आमिरची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ दोन्‍ही बदलली. लगान चित्रपटाच्‍या शूटिंगवेळी आमिर आणि किरणची पहिली भेट झाली होती. heart या चित्रपटात किरण शामिन देसाई यांची असिस्टंट होती. किरणलाही आमिर आवडायचा. लगानच्‍या सेटवर आमिरने किरणकडे तिच्‍या कानातील बाली (ईअररिंग्‍ज) मागितली होती आणि तेथूनच दोघांची लव्‍हस्टोरी सुरू झाली होती. २००५ मध्‍ये आमिरने किरणशी विवाह केला. आमिरने २००२ मध्‍ये आपली पहिली पत्नी रीना दत्ताशी घटस्‍फोट घेतला होता. घटस्‍फोटानंतर आमिरला रिनाला जवळपास ५० कोटी रुपये द्‍यावे लागले होते.(Age Difference)

आमिर आणि रीना दत्ताचे लव्‍ह मॅरेज होते. त्‍यांनी आपल्‍या आई-वडिलांच्‍या मर्जीविरुध्‍द जाऊन लग्न केले होते. अनेक दिवस त्‍यांनी आपले लग्‍न लपवून ठेवले होते. आमिर-रीना दत्ताचे लग्‍न झाले, त्‍यावेळी रीना विद्‍यार्थिनी होती. आमिर त्‍यावेळी ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटाचे शूटिंग करत होता. अमीर आणि किरण राव यांचा आता घटस्फोट घेतलाय.

आठ साल बड़ी फराह खान पर ऐसे लट्टू हो गए थे शिरीष, बहुत दिलचस्प है लव स्टोरी - Entertainment News: Amar Ujala
फराह खान आणि शिरीष कुंदर

फराह खान आणि शिरीष कुंदर

फराह खान शिरीषपेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. त्‍यांना तीन मुले आहेत. ९ डिसेंबर, २००४ रोजी दोघे लग्नगाठीत अडकले. शिरीषचा जन्म २४ मे, १९७३ रोजी मंगळूरु, कर्नाटकात झाला. तर फराहचा जन्म ९ जानेवारी, १९६५ रोजी मुंबईत झाला. लग्नानंतर जवळजवळ चार वर्षांनी शिरीष आणि फराह तिळ्या मुलांचे आई-वडील झाले. अन्या आणि दीवा ही मुलींची तर जार हे त्यांच्या मुलाचे नाव आहे.

Sridevi and Boney Kapoor's controversial love story
श्रीदेवी आणि बोनी कपूर

श्रीदेवी आणि बोनी कपूर

बोनी कपूर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्‍यापेक्षा ८ वर्षांनी मोठे आहेत. श्रीदेवी यांच्‍याशी विवाह केला, त्‍यावेळी बोनी कपूर दोन मुलांचे बाप होते. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांना जान्‍हवी आणि खुशी या दोन मुली आहेत. (Age Difference)

बोनी कपूर हे त्‍यांचा भाऊ अनिल कपूर आणि श्रीदेवी यांना घेऊन ‘जुदाई’ चित्रपट बनवत होते. त्‍याचदरम्‍यान, श्रीदेवी यांची आई राजेश्वरी यांची तब्‍येत बिघडली. त्‍यांना उपचाराकरता अमेरिकेला घेऊन जावे लागले. त्‍यावेळी श्रीदेवी बोनी कपूर यांना आपल्‍यासोबत घेऊन गेल्‍या. श्रीदेवी यांच्‍या आईच्‍या उपचारावेळी बोनी कपूर यांनी त्‍यांना पाठिंबा दिला. परंतु, श्रीदेवी यांच्‍या आईचे निधन झाले. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्‍या आईवर चुकीच्‍या पध्‍दतीने उपचार झाल्‍याचा आरोप करत कोर्टात खटला दाखल केला आणि संघर्ष करून मोबदला वसूल केला.

श्रीदेवी यांनी अनुभवले की, बोनी कपूर नि:स्वार्थ भावनेने हे सर्व करत होते. बोनी विवाहित आहेत, हे माहिती असतानादेखील श्रीदेवींना बोनी कपूर यांच्‍याशी जवळीक वाटून प्रेम झाले. ‘जुदाई’ या चित्रपटाच्‍या निर्मितीवेळी बोनी कपूरही श्रीदेवीच्‍या प्रेमात पडले होते. त्‍यानंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्‍याशी दुसरा विवाह केला. त्‍यावेळी बोनी कपूर यांना आपल्‍या कुटुंबीयांकडून नाराजीचा सामनादेखील करावा लागला. बोनी यांचा दुसरा विवाह असल्‍याने त्‍या काळात हे प्रकरण खूप वादग्रस्‍त ठरले होते.

Dharmendra - Hema Malini
धर्मेंद आणि हेमा मालिनी

धर्मेंद आणि हेमा मालिनी

आणखी एक हिट जोडी म्‍हणजे धर्मेंद आणि ड्रीम गर्ल हेमा मालिनी. ‘शोले’च्‍या सेटवर हेमा यांच्‍याशी धर्मेंद्र यांना प्रेम झालं. मग काय, धमेंद्र आधीपासूनच विवाहित असतानाही हेमा यांनी त्‍यांचं प्रेम स्‍वीकारलं. आपल्‍यापेक्षा १३ वर्षांनी मोठे असणारे धर्मेंद्र यांच्‍याशी हेमा यांनी विवाह केला. धर्मेंद्र हे हेमा यांच्‍यावर इतके प्रेम करत होते की, हेमा यांच्‍याशी लग्‍न करण्‍यासाठी त्‍यांनी आपला धर्म बदलला होता.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी १९७० मध्‍ये पहिल्‍यांदाच मोठ्‍या पडद्‍यावर दिसले होते. ‘शराफत’ आणि ‘तुम हसीन मैं जवां’ या चित्रपटांनंतर दोघांमध्‍ये जवळीक निर्माण झाल्‍याची चर्चा सुरू झाली होती. याशिवाय, लग्‍नानंतर देखील पहिली पत्‍नी प्रकाश आणि मुलांना मी सोडू शकत नाही. माझा परिवार स्‍वीकारावा लागेल, अशी अट धर्मेंद्र यांनी हेमा यांच्‍यासमोर ठेवली होती. हेमा यांनी ती अट स्‍वीकारली आणि दोघांनी १९७९ मध्‍ये विवाह केला. ((Age Difference))

धर्मेंद्र यांच्‍या पहिली पत्‍नीचे नाव प्रकाश कौर असे आहे. त्‍यांना चार मुले- सनी, बॉबी, अजिता आणि विजिता आहेत. तर धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी यांच्‍या दोन मुली ईशा आणि अहाना आहेत.

Dilip Kumar-Saira Banu romance: Married for 54 years, how they weathered 'a great mistake' | Entertainment News,The Indian Express
दिलीप कुमार आणि सायरा बानो

दिलीप कुमार आणि सायरा बानो

दिवंगत अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानो या जोडीने एक काळ गाजवला. ही जोडी त्‍यावेळची फेमस जोडी. १९६६ मध्‍ये २२ वर्षांच्या सायरा बानोला दिलीप कुमार आवडायचे. दिलीप यांचे त्यावेळी वय होते ४४ वर्षे. परंतु, प्रेमापोटी आपल्‍या वयापेक्षा दुपटीने असलेल्‍या दिलीप यांच्‍यासोबत विवाह करण्‍याचं धाडस सायरा यांनी केलं होतं. १९८० मध्‍ये त्‍यांच्‍या नात्‍यात काही काळासाठी दुरावा आला होता. परंतु, काही काळानंतर दोघे पुन्‍हा एकत्र आले.

एज-डिफरन्‍स लव्‍ह

एकेकाळी वयात इतके अंतर म्‍हटलं की, भुवया उंचवायच्‍या. आपल्‍यापेक्षा ५-७ वर्षांनी मोठ्‍या असणार्‍या व्‍यक्‍तीबरोबर (Age Difference) लग्‍न करायचे म्‍हणजे, जगातील दहाव्‍या आश्‍चर्याप्रमाणे असायचं. परंतु, अशा प्रकारची नाती तेव्‍हाही बनायची आणि आताही तो सिलसिला कायम आहे. बॉलिवूडमध्‍ये अशा नात्‍यांना नेहमीच मान्‍यता दिली गेली. आता बॉलिवूडमध्‍ये ऐज-डिफरन्‍स लव्‍ह कॉमन गोष्‍ट बनली आहे.

South Movies : दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये असं काय आहे, जे आपल्याकडे नाही?

 

दाक्षिणात्य चित्रपट (South Movies) ‘आरआरआर’चे यश पाहून भल्याभल्यांची बोलती बंद झालीय. कमाईच्या बाबतीत ‘बाहुबली’ला देखील हा चित्रपट टक्कर देईल, असं म्हटलं जातय. (South Movies) साऊथचे येणारे एकापेक्षा एक चित्रपट पाहून अनेकांचे ‘तोते उड गए रे’ अशी अवस्था झाली आहे. साऊथच्या चित्रपटांमध्ये असं काय आहे, जे आपल्याकडे नाही? नुकत्याच रिलीज झालेल्या ‘आरआरआर’च्या सुपरसक्सेसवर काही बॉलीवूड स्टार्सनी मौन धारण केल्याचेही चित्र आहे. मग आपल्याकडे बॉलिवूडमध्ये असे चित्रपट का नाही येत? दक्षिणेतील संस्कृती, जीवनमान वेगळं असलं तरी माणसं तिचं आहेत. साऊथचेच चित्रपट विविध भाषांमध्ये डब करून तो सगळीकडे फिरवले जातात. किंबहुना त्याच चित्रपटांचा रिमेक करण्याची वेळ बॉलिवूडला येते. कोट्यवधींची कमाई करणारे, टॉलिवूडला टक्कर देणारे चित्रपट मग बॉलिवूडमध्ये का येऊ शकत नाही?

दक्षिणेतला मोठा प्रेक्षकवर्ग सिनेप्रेमी आहे. मजूर असो वा महिला, वा मध्यमवर्गीय सर्वच पातळीवरील लोक सिनेमा पाहायला उत्सुक असतात. दिवसभराच्या कमाईतील थोडे पैसे बाजूला ठेवून, वेळात वेळ काढून चित्रपट थिएटरला लागला की तो लगेच पाहणं, हे नित्याचंच झालं आहे. चित्रपटीय मनोरंजनावर खर्च करणं, हे तिथल्या लोकांच्या संस्कृतीचा एक भागचं बनला आहे, असं म्हणायला हरकत नाही.

    लोकांच्या मनाला भिडणार्‍या कथा

    दक्षिणेतील चित्रपटांचा फिव्हर संपूर्ण देशभरात पाहायला मिळतोय. कन्नड असो, तेलुगु असो वा तमिळ चित्रपट, तिथल्या राज्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. भाषेच्या भिंती तोडून ते सगळीकडे पसरल्याने मुख्य मुख्य राज्यांच्या त्या-त्या भाषांमध्ये डब झालेला चित्रपट पाहण्याची मजाही कुछ और आहे. अन्य भाषिक लोकांना या चित्रपटांचा रिमेक येईपर्यंत वाट पाहत राहणंदेखील बंद झालं आहे. कारण, कोणत्याही मूळ भाषेतील चित्रपट असो, तो हिंदी, इंग्रजीमध्ये डब करायची सोय करून ठेवली गेलेली आहे.

    चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचं झालं तर साऊथच्या चित्रपटांच्या कहाण्या काहीशा मनाला भिडणार्‍या असतात. त्या वर्षांनुवर्षे प्रेक्षकांच्या लक्षात राहणार्‍या ठरतात. काळजाला हात घालणार्‍या अशा कथा पाहून प्रेक्षकवर्गही खुर्चीला खिळून राहतो. शेवटपर्यंत चित्रपट पाहात राहावं, तशी कथा तयार करणं, हे चित्रपट लेखकाचं कौशल्यचं म्हणावं लागेल.

    ‘आई’ हा फॅक्टर कॉमन

    बहुतांशी चित्रपट पाहिले तर साऊथच्या चित्रपटांमध्ये ‘आई’ हा कॉमन फॅक्टर असलेलं दिसतं. चित्रपटांमध्ये आई ही असतेच. कधी ती साधीभोळी, प्रेमळ तर कधी कोयता तर कधी हत्यारे हातात घेऊन लढणारी कडक – लढाऊ आई चित्रपटात पाहायला मिळते. या चित्रपटांमध्ये पुष्कळ माणसं असतात. मुख्य भूमिकेतील कलाकारांव्यतिरिक्त काका, मामा, भाचे, आत्या, आजी, बाबा हे  वावरत असतात, ढीगभर माणसांची गर्दी दृश्यास पडते. एकत्र कुटुंबाने वा कुटुंबातील प्रत्येक सदस्याने पाहता येईल, अशी चित्रपटाची रचना केलेली असते.

    नुकताच रिलीज झालेला पुष्पा, आरआरआर हे चित्रपटदेखील याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. या चित्रपटाची कथा आणि गाणी अद्यापही प्रत्येकाच्या तोंडी ऐकायला मिऴताहेत. लोकांच्या जीवनाच्या जवळ जाणारी कथा दाखवणं हे साऊथच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य म्हणता येईल. देखण्या अभिनेत्री असल्या तरी तथाकथित  देखणा अभिनेता चित्रपटात असेलच असं नाही. रांगडा, आडदांड नायक असला तरीही प्रेक्षकवर्ग त्यांना स्वीकारतो. चित्रपटातील साधेपणाच हा लोकांना भावतो.

    अ‍ॅक्शन चित्रपटांची क्रेझ

    साऊथच्या अ‍ॅक्शन चित्रपटांची जादू सगळ्यांवरच झालेली दिसते. तुम्हाला विचार करायला भाग पाडणार्‍या कहाण्या प्रेक्षकांना चित्रपट पाहायला भाग पाडणार्‍या ठरतात. चित्रपटांत ज्या कथेचं चित्रण दाखवतात, त्यात कृत्रिमपणा नसतो. भाषेत, अभिनयात आणि दृष्टीकोनात सौंदर्य लपलेलं असतं आणि ते नैसर्गिक वाटतं. जसं आहे तसं दाखवलं जातं आणि ते आपल्याला सामान्य वाटतं.

    खलनायक ठरलेलाच!

    प्रत्येक चित्रपटात एखादा दुसरा किंवा अनेक खलनायक असतोच, जो एकट्या हिरोच्या मागे लागलेले असतात. अत्याचार करणार्‍या दृष्ट खलनायकाचा नाश करणारा हिरो लोकांच्या मनात कायमचा घर करून जातो.

    कलेला वाव

    चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी अभिनेत्याच्या प्रतिमेला किंवा चित्रपटाच्या पोस्टरला पूजा, दुग्धाभिषेक, पैसे आणि फुलांचा हार, ढोल ताशे आणि फटाकड्या वाजवणं ही गोष्ट नित्याचीच बनलीय. आपल्या कलाकारांचं चाहत्यांमधून होत असलेलं स्वागत हे तिथल्या कलेप्रती असलेलं प्रेम दर्शवतं. चित्रपटाच्या बोर्डांना हार घातले जातात, मग आपल्याकडे का नाही घातले जात?.

    बॉलिवूडमध्येदेखील दक्षिणेतील कलाकारांचं खास करून अभिनेत्रींचं स्वागत केलेलं दिसतं. यात सामंथा, पूजा हेगडे, काजल अग्रवाल, रश्मिका मंदाना या दाक्षिणात्य सुंदरींचा समावेश असल्याचं दिसतं.

    साऊथचे हे चित्रपट आपली संस्कृती सोडत नाहीत. कुंकू लावणं, साडी, गजरा घालणं, हिरो लुंगी घालून डान्स करणं या छोट्या-छोट्या गोष्टींतून संस्कृती जपली जाते आणि आपण त्यांच्या प्रेमात पडतो. मग, आपल्याच मातीत आपण दुसर्‍यांच्या प्रेमात का पडतो?.

    Monday, February 28, 2022

    खिद्रापूरचं कोपेश्‍वर मंदिर

    शिरोळ तालुक्‍यातील खिद्रापूर येथील प्राचीन कोपेश्‍वर मंदिर. चालुक्‍य शिल्‍प स्‍थापत्‍यशैली दर्शन यातून घडते. मंदिर सद्‍यस्‍थितीत सुस्‍थितीत असले तरी पावसाळ्‍यात या मंदिरातील पडझड झालेल्‍या स्‍तंभांना, कमानीला धोका पोहोचण्‍याची शक्‍यता आहे. कलेचा अप्रतिम नमुना असलेल्‍या मंदिराचे संरक्षण, संवर्धन अपरिहार्य बनले आहे. त्‍यामुळे पर्यटन विभागाने या परिसराच्‍या विकासाकडे लक्ष देण्‍याची तर पुरातत्‍व विभागाने या मंदिराची देखभाल करण्‍याची आवश्‍यकता आहे. 

    कोपेश्‍वर मंदिराला केंद्रीय पुरातत्‍व विभागाने २ जानेवारी १९५४ रोजी महाराष्‍ट्रातील राष्‍ट्रीय संरक्षित स्‍मारक म्‍हणून घोषित केले. कोपेश्‍वर मंदिर अप्रतिम स्‍थापत्‍यशैलीसाठी प्रसिध्‍द आहे. बेसॉल्‍ट आणि ग्‍लास पॉलिशिंग केल्‍याप्रमाणे या मंदिराचे बांधकाम आहे. पावसाळ्‍यात ऊबदारपणा आणि उन्‍हाळ्‍यात गारवा टिकून राहावा, त्‍यादृष्‍टीने तत्‍कालीन स्‍थापत्‍य विशारदांनी केलेला प्रयत्‍न येथे दिसून येतो. 

    कोपेश्‍वर मंदिराची वैशिष्‍ट्‍ये

    या मंदिराचे वैशिष्‍ट्‍ये म्‍हणजे गजपट्‍ट असणारे हे भारतातील एकमेव मंदिर आहे. 

    उत्‍कृष्‍ट शिल्‍पकलेचा अविष्‍कार पाहता या मंदिराची तुलना खजुराहोच्‍या मंदिराशी केली जाते. या स्‍थानाचे मूळ नाव कोप्‍पम किंवा कोप्‍पद होते. पण, मोगल सरदार खिद्रखान मोकाशीने कोप्‍पम जिंकल्‍यानंतर त्‍याच्‍या नावावरून खिद्रापूर असे नाव त्‍याला मिळाले. येवूर (जि. विजापूर) येथील शिलालेखात कोपेश्‍वराचा उल्‍लेख मिळतो. तसेच एका ताम्रपटातही या मंदिराचा उल्‍लेख सापडतो.

    मंदिरात २ शिवलिंग

    गाभार्‍यात कोपेश्‍वर (महेश) आणि धोपेश्‍वर (विष्‍णू) अशी दोन शिवलिंगे आहेत. याला लागूनच सभामंडप आहे. सभामंडपावर सहा दगडी गवाक्ष असून हे वैशिष्‍ट्‍य असणारे हे असे एकमेव मंदिर आहे. या मंदिरात नंदी नाही, हे त्‍याचे दुसरे वैशिष्‍य होय. मंदिराचे वेगळेपण म्‍हणजे स्‍वर्गमंडपाची रचना. या मंडपाबाहेर २४ हत्तींची मूळ रचना होती. पैकी ११ हत्ती येथे पाहावयास मिळतात. चार प्रवेशद्‍वार आणि ४८ खांबांवर हे मंदिर उभारलेले असून मंदिराच्‍या दर्शनी भागात आकाशाच्‍या दिशेने १३ फूट व्‍यासाचे गवाक्ष आहे. त्‍याच मापाची खाली रंगशिला (गोलाकार दगडासारखी) असून त्‍याभघेवती १२ खांब वर्तुळाकृती आढळतात. मंदिरावर नर्तिका, वादक, शस्‍त्रधारी द्‍वारपाल, सप्‍तमातृकांच्‍या प्रतिमा आहेत. यावरून, तत्‍कालीन समाजातील स्‍त्रियांना असणारे उच्‍च स्‍थान समजते. 

    Image result for khidrapur temple

    मंदिर परिसरात १२ शिलालेख

    मंदिर परिसरात १२ शिलालेख असून त्‍यातील ८ शिलालेख कन्‍नड भाषेतील आहेत. त्‍यापैकी एक संस्‍कृतमध्‍ये, दुसरा देवनागरीत आहे. पहिला शिलालेख नगारखान्‍याच्‍या दक्षिण बाजूच्‍या विरगळावर जुन्‍या कन्‍नड भाषेत लिहिले आहे. आणखी एका शिलालेखात कोपश्‍वराची स्‍थिती, कुसुमेश्‍वर, कुटकेश्‍वर या नावांचा उल्‍लेख मिळतो. 

    दक्षिण स्‍थापत्‍यशैलीचा प्रभाव

    मंदिरात प्रवेश करताना नगारखाना, स्‍वर्गमंडप, सभामंडप, अंतराळ, गाभारा असे बांधकाम दिसते. मंदिराच्‍या पायथ्‍याशी खुरशिला, गजपट्‍ट त्‍यावर नरपट्‍ट आणि त्‍यावरील देवकोष्‍ट (चौकट असल्‍यासारखे) आणि नक्षीकाम अशी रचना दिसते. मंदिराचे शिखर गोपुरासारखे असल्‍याने दक्षिणेतील स्‍थापत्‍यशैलीचा प्रभाव दिसतो. 

    Image result for khidrapur temple

    मंदिरावरील भवानी, काळभैरव, विष्‍णू, ब्रम्‍हदेव, चामुंडी, गणपतीची मूर्ती ही हिंदू देवदेवता, पंचतंत्रातील कथा तर उत्तरेच्‍या बाजूस घंटा वादिका, अहिनकुल (साप-मुंगुस), मिथून शिल्‍प आदी शिल्‍पे जैन मंदिराची वैशिष्‍ट्‍ये दशर्वणारी आहेत.  

    मंदिरात आढळते आखाती शिल्‍प 

    मंदिरावर इराणी किंवा आखाती व्‍यक्‍तीचे शिल्‍प आहे. इराणचा बादशहा  दुसरा खुस्रो याने राजदुतामार्फत चालुक्‍य दरबारी नजराणा पाठवला होता, असे जाणकार सांगतात. यावरून, चालुक्‍यांचे इराणशी संबंध होते, असे दिसते. या भेटीचे प्रतिक म्‍हणून त्‍या इराणी राजदुताचे शिल्‍प कोरले असावे. 

    सप्‍टेंबर, १७०२ मध्‍ये मोगल बादशाह औरंगजेबने केलेल्‍या आक्रमणात येथील मूर्तींची मोडतोड केली. २००५ साली आलेल्‍या महापुरातदेखील मंदिर सुस्‍थितीत राहिले होते. मध्‍यंतरी, स्‍वर्गमंडप, काही स्‍तंभाची पडझड झाली होती. पुरातत्‍व विभागाने त्याची डागडुजी केली होती. आर्किलाजिकल सर्वे ऑफ इंडियाचे मंदिराच्‍या भोवती तटबंदीचे काम सुरू झाले असून हे बांधकाम पूर्ण होत आले आहे. हे काम गेली १० वर्षे सुरू होते. 

    पर्यटन केंद्र म्‍हणून आजही दुर्लक्षित 

    ‘‘धार्मिक पर्यटन  केंद्र म्‍हणून आजही खिद्रापूर विकसित झालेले नाही. येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. परंतु, पर्यटकांसाठी येथे निवासाची सोय नाही. हॉटेल्‍स नाहीत. महिलांसाठी प्रसाधनगृह नाहीत. या सोई येथे होणे आवश्‍यक आहे.  पुरातत्‍व खात्‍याने मंदिरात आणि मंदिर परिसरात प्रकाश व्‍यवस्‍था करण्‍याची गरज आहे.’’ 

    खिद्रापूरला जाण्‍याचा मार्ग 

    एसटीने पुढील तीन मार्गाने खिद्रापूर (ता. शिरोळ, जि. कोल्‍हापूर) येथे जाता येते. 

    हातकणंगले-शिरोळ-नृसिंहवाडी-कुरुंदवाड-अकिवाट-खिद्रापूर

    कोल्‍हापूर-इचलकरंजी-कुरूंदवाड-अकिवाट-खिद्रापूर 

    'मंदिरात विजेची सोय व्हावी' 

    कोपेश्वर मंदिरात विजेची सोय व्हावी, तसेच मंदिराचे संवर्धन व्हावे. पर्यटकांना राहण्याची सोय व्हावी. त्याचप्रमाणे, प्रशासनाने प्रसाधनगृहाची सोय करणे गरजेचे आहे. मंदिरापर्यंत येण्यासाठी खासगी वाहने नसल्याने बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना अडचणीचे ठरते. 

    - प्रा. शशांक रामचंद्र चोथे, इतिहास अभ्यासक 

    Monday, January 24, 2022

    एन. डी. पाटील यांच्या 'या' आठवणीने अजूनही डोळ्यात पाणी




    भारत पाटणकर, ज्येष्ठ नेते

    पुरोगामी चळवळींचे खंदे नेते, बहुजनांसाठी लढणारे प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी आज (दि. १७ जानेवारी, २०२२) रोजी अखेरचा श्वास घेतला. दुपारी १२ वाजता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनाही पंढरपुरातून प्रतिक्रिया दिलीय.

    ”ते खूप आजारी होते. पण, इतक्या लवकर ते जगाचा निरोप घेतील, असं वाट नव्हतं. मी पंढरपुरात आहे आणि ही बातमी येऊन धड़कली. या वृत्तनंतर मला मोठा धक्का बसला आहे.”

    ‘एन. डी. पाटील हे माझ्या कुटुंबाचा भाग होते. सुरूवातीच्या काळात माझे वडील क्रांतिकारी बाबुजी पाटणकर आणि आई इंदुमती पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते राहिले होते. नंतर मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे. अनेक चळवळींच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वादळ उठवण्याचं काम केलं आहे.’

    पुरोगामी चळवळीत त्यांनी सत्व आणलं. चळवळीला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्राच्या पातळीवर कुणी केलं असावं, असं मला वाटत नाही. खूप मोठा माणूस मी गमावला आहे. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण होणार आहे. ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. आम्हाला सर्वांनाचं एक मोठा धक्का यामुळे बसला आहे.

    ‘त्यांचं कार्यचं पुढे नेणं हीचं आदरांजली’

    त्यांनी चळवळीत अतुलनीय योगदान दिलं आहे. त्यांच्य़ा पश्चात आता त्यांचं अमूल्य कार्य पुढं नेण, हीचं त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल.

    ‘ही’ आठवण कायम स्मरणात राहील

    माझी आई गेली, त्यावेळी एन. डी. पाटील आजारी होते. आजारी असतानाही ते आले. ते उशीरा आले. आम्ही त्यांच्यासाठी थांबलो होतो. ते आजारी असल्याकारणाने त्यांना बाहेर जाण्यासाठी परवानगी नव्हती. तरीही ते आले. त्यावेळी एन. डी. पाटील म्हणाले होते की, ‘मी इथे आलो नसतो, आयुष्यात फार मोठी चूक केली असती. मी कितीही आजारी असलो तरी ‘त्या’ गेल्या म्हटल्यानंतर मी येणंचं आवश्यक होतं.’ ती अत्यंत हृद्य आणि डोळ्यात पाणी आणणारी आठवण आहे.

    मी हायस्कूलमध्ये शिकत होतो. तेव्हापासून मी एन. डी. पाटलांना पाहिलेलं आहे. त्यांचं काम जवळून पाहिलेलं आहे. त्यांच्यासोबत वेगळ्या पध्दतीने कार्य केलं आहे. परंतु, गेल्या २५ वर्षांमध्ये महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण नियम संदर्भातील जी चळवळ आहे. यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पातळीवर त्यांचा सहसचिव म्हणून मी काम केलं आहे आणि त्यांच्यासोबत एकत्र काम करण्याचा हा सर्वात मोठा आमचा कालखंड होता.

    एन डी पाटील बहुजनवादी होते. तळागाळातील लोकांविषयीची त्यांची तळमळ होती. सामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, बहुजनांसाठीविषयीची आस्था त्यांच्या कार्यातून दिसायची. श्रमिकांसाठी ते झगडले आहेत. स्त्रियांना आणि सर्व जाती-धर्माच्या लोकांना एक माणूस म्हणून जगवलं पाहिजे, असा त्यांचा विचार होता. कार्य करताना कुठला पक्ष, जात, धर्म त्यांनी पाहिले नाही. एक माणूस म्हणूनचं त्यांनी नेहमीचं त्यांच्याकडं पाहिलं.

    मानवमुक्ती चळवळीचे खंदे कार्यकर्ते

    मानवमुक्ती चळवळीचे खंदे कार्यकर्ते आपण आहोत, असं धरून ते चळवळीत उतरले होते. आणि हेचं त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे.

    मानवमुक्तीसाठी सर्व गोष्टींचा त्याग

    घरच्यांचा सहवास, त्यांचं प्रेम आणि धनसंपत्तीचा देखील त्याग एन. डी. पाटील यांनी केला होता. सर्व बंध तोडून पुरोगामी चळवळ पुढे नेण्यासाठी त्यांनी जीवनातील अनेक गोष्टी गमावल्या आहेत. इतका मोठा त्याग केवळ एन. डी. पाटीलचं करू शकतात.

    – शब्दांकन : स्वालिया शिकलगार

    Tuesday, November 9, 2021

    Jai Bhim : क्रूरतेच्या पलिकडचा अत्याचार कधीपर्यंत सहन करणार?

    Jai Bhim – आपल्या समोर अन्याय होत असताना आपण अनेकदा पाहिलंय. आपल्या अवतीभोवतीही अनेकांना अन्यायाला सामोरे जावं लागतं. अन्याय वेगवेगळ्या पातळींवर होत असतो. मग आपण काय करतो. निमूटपणे सहन करतो किंवा बघून गप्प बसतो. पण, अन्यायाला वाचा फोडणारं कुणीतरी हवं ना! कधी ते धर्मावरून होत असतं तर कधी जातीवरून. कधी लाचार, गरिबांवर अन्यायाचा मारा होत असतो. जय भीम हा मूळ तमिळ भाषेतील चित्रपट आहे. कधीही न पाहिलेल्या अत्याचाराचे दृश्य जय भीम चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. घालून दिलेल्या व्यवस्थेच्या भिंती आणि त्यावर राज्य करणारी एकमेकांशी लागेबंद असणारी काही माणसं किती क्रूरपणे वागतात. हे जय भीम! चित्रपटात दाखविण्यात आलं आहे. (Jai Bhim)

    स्वत: केलेला गुन्हा लपवण्यासाठी संरक्षण करणारेचं पोलिसचं एका आदिवासी माणसावर क्रूरपणे अत्याचार करतात. जबरदस्तीने त्याला पोलिस स्टेशनमध्ये उचलून नेतात. त्याला इतकं मारतात की, त्यात त्याचा मृत्यू होतो. तुम्ही हे दृश्य पाहिल्यानंतर तुम्हालाही चिड येईल. तुमचं रक्त खवळेल. तुम्हीही म्हणाल, चित्रपटातील पोलिस इतके राक्षसी वृत्ताचे कशी असू शकतात? (Jai Bhim)

    आदिवासी राजकन्नू आणि सेंगानी

    हा आदिवासी म्हणजेच राजकन्नू होय. राजकन्नूची पत्नी तिच्या पतीला वाचवण्यासाठी पुढे सरसावते. ती एका वकिलाकडे जाते, त्या वकिलाचं नाव आहे-चंद्रू. चंद्रू एक उत्तम वकिल आणि अन्यायाविरोधात लढणारा आहे. या वकिलाची भूमिका साकारलीय-साऊथ सुपरस्टार सूर्या याने. मानवाधिकार प्रकरण तो हाताळत असतो. तो या आदिवासीची केस लढताना अनेक घृणास्पद सत्य उघडकीस येतात. चंद्रूची अन्यायाविरोधातील लढाई ही केवळ अत्याचाराची कहाणी नाहीय. तर व्यवस्थेतील भ्रष्टपणा, आर्थिक विषमता, जाती-पाती आणि खालच्या वर्गाला दाखवलेल्या हीनपणाची कहाणी होय.


    अनेक शतकं आपण जाती-धर्माची रचना मांडत त्याखाली जगत आलोय. आजही तेचं घडतंय. अनेक ठिकाणी पदोपदी जात-धर्म काढली जाते. उच्च-नीच असा भेदभाव केला जातो. आतादेखील खालच्या वर्गातील माणसांची वस्ती वेशीबाहेर वा गावाबाहेर असते. आजदेखील शिवाशिवसारखे प्रकार घडतात. आपण, अनेकवर्षे हे पाहत आलोय आणि सहनही करत आलोय. जय भीमचा विषय असाचं काहीसा आहे. यामध्ये पोलिसांकडून झालेला अत्याचार म्हणजे क्रूरतेच्या पलिकडचा हिंसाचार होय.

    जातीचा राग भलताच!

    राजकन्नू हा आदिवासी असून तो साप, उंदिर पकडण्याचे काम करतो. एकदा गावातील एक उच्च व्य़क्तीचा नोकर त्याला बोलवायला येतो. त्याला गाडीवरून घेऊन जात असताना राजकन्नू आधारासाठी त्याच्या खांद्यावर हात ठेवतो, तेव्हा तो नोकर मागे वळून रागाने त्याच्याकडे पाहतो. तेव्हा त्याच्या डोळ्यातील भावना राजकन्नू जाणतो आणि तो हात पटकन मागे घेतो.


    दोन साऊथ सुपरस्टारचा दमदार अभिनय

    चंद्रू म्हणजेच सूर्या आणि आय़जी पेरुमल स्वामीची भूमिका साऊथ स्टार प्रकाश राज यांनी साकारलीय. चंद्रू हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तामिळनाडूतील समाजसुधारक पेरियार यांच्या विचारांनी प्रेरीत आहे.

    महापुरुषांविषयी शाळेतील शिक्षकांमध्ये अनास्था का?

    चित्रपटामधील एका दृश्यात तो एका सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे दाखवण्यात आलंय. तेथे लहान मुले महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्या वेषात उभे असतात. चंद्रूला या महापुरुषांमध्ये मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुठेचं दिसतं नाहीत. तेव्हा चंद्रू मुख्याध्यापकांना विचारतो- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुठेचं दिसतं नाहीयेत. अगदी तळागाळातील लोकांचा उध्दार करणारे, त्यांना त्यांचे हक्क-अधिकार मिळवून देणाऱ्या या महापुरुषांविषयी शाळेतील शिक्षकांमध्ये अनास्था का? हे या दृश्यावरून प्रतीत होते. या चित्रपटातील अभिनेत्रीने राजकन्नूच्या पत्नीची उत्तम साकारलीय. ती अभिनेत्री Lijomal Jose होय. या अभिनेत्रीने चित्रपटात सेंगानीची व्यक्तीरेखा साकारलीय.


    जेव्हा पोलिस राजकन्नूला उचलून पोलिस ठाण्यात नेतात आणि तुरंगात डांबतात. त्यावेळी चित्रपटाचे कथानक सेंगानीकडे वळते. पुढचा बराच चित्रपट सेंगानीवर भार टाकतो. दोन साऊथ स्टार प्रकाश राज आणि सूर्य चित्रपटामध्ये असतानाही सेंगानी आपली अभिनयाची छाप सोडायला यशस्वी ठरलीय. हा चित्रपट पाहिल्यानंतर कनिष्ठ वर्गाचे दुःख तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे आणि शेवटी सामजिक संदेश देण्यासाठी जय भीम यशस्वी ठरतो.

    R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

    Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...