Friday, July 6, 2018

किसिंग डे स्‍पेशल : होठों से छु लो तुम...

आपल्‍या पार्टनरच्‍या प्रति आपल्‍या भावना पोहोचवण्‍यासाठी एक 'किस' पुरेसे आहे. असं नाही की हे फक्‍त तुमच्‍या प्रेमलाला दर्शवतं. तर एकमेकांशी जुळलेल्‍या भावनादेखील दर्शवतं. काही वेळा मैत्रीत रुसवे-फुगवे होतात. अशा वेळी मनधरणी करण्‍यासाठी एक किस पुरेसे होतं. आज आंतरराष्‍ट्रीय चुंबन दिवस. त्‍या औचित्‍याने पार्टनरच्‍या प्रती असलेलं प्रेम, भावना, व्‍यक्‍त करण्‍यासाठी हा खास दिवस आहे.


अधिकतर कपल किस करून आपलं प्रेम दर्शवतात. किस विश्‍वास, आपुलकी आणि प्रेम दर्शवण्‍यासाठी या खास दिवसापेक्षा आणखी दुसरं काय हवयं. एका किसच्‍या माध्‍यमातून तुम्‍ही तुमच्‍या पार्टनरला खूप स्‍पेशल फिल देऊ शकता.

'किसी भी मिस को तब
तक किस न करो
जब तक मिस आपको 
किस न करे, 
अगर मिस आपको किस
करे, तो उसे इतनी किस करो 
कि वो किसी और को मिस न करें'

किसिंग डे ला आपली पत्‍नी वा गर्लफ्रेंडला एखादी भेटवस्‍तू देऊनही तिला खुश करू शकता. तर पती किंवा बॉयफ्रेंडला खास मॅसेज पाठवून देखील स्‍पेशल फिलिंग देऊ शकता.

'प्‍यार नहीं  तो क्‍या, जिंदगी मे तनहा रहकर क्‍या करोगे' 

किसिंग डे ऐकताच प्रेमीकरांची हार्टबीट्‍स नक्‍कीच वाढतात. दिल मे कुछ कुछ होता है.... हे एक लव्‍ह एक्‍सप्रेशन असतं. किस करण्‍यासाठी कुठलाही प्रकारचा एका खास दिवसाची गरज नाही. तुमच्‍या भावना, प्रेम तुम्‍ही पार्टनरपर्यंत पोहोचवण्‍याचे हे एक माध्‍यम आहे.


पहिल्‍यांदा किस करताना आपला पार्टनर काय म्‍हणेल, त्‍यासाठी तयार होईल की नाही? असे ढिगभर विचार मनात असतात. काही वेळा सुरुवातीला संकोच होतं. तर ना-नको! चा सामनाही करावा लागतो. पहिल्‍यांदा किस करण खरचं आव्‍हानात्‍मक असतं. कारण, पार्टनरची रिॲक्‍शन कशी येईल, याबाबत अनभिज्ञ असतो. किंवा काहीच माहिती नसतं.

हे महत्त्‍वाचं नाही की, तुम्‍ही पहिल्‍यांदाच किस करत आहात किंवा अनेकवेळा केलं आहे. महत्त्‍वाचं हे आहे की, तुम्‍ही लव्‍ह बाईट किस करू शकता की नाही? पहिलं किस आपल्‍या पार्टनरला दिवस-रात्र आपल्‍याबद्‍दल विचार करण्‍यास भाग पाडतं. कारण, हे कायम स्‍मरणात राहणार असतं.

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...