माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच नाव राजकारणात मोठं आहे. भाजप पक्षाचे अध्यक्ष ते पंतप्रधान असा त्यांचा राजकीय प्रवास मोठा आहे. १९९८ मध्ये ज्यावेळी वाजपेयी पंतप्रधान होते. त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अणुचाचणी केली होती. अणुचाचणीने जगभरात खळबळ माजली होती.
ही घटना जॉन अब्राहमचा चित्रपट 'परमाणु'मध्ये दाखवण्यात आली आहे. सत्य घटनेवर आधारित परमाणु चित्रपटात जॉनने IAS अधिकारी रैनाची भूमिका साकारली आहे.
१९९८ साली भारताने एकूण ५ चाचण्या केल्या होत्या.११ मे १९९८ ला राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातल्या पोखरण शहरात तीन अणुचाचण्या केल्या. मग दोन दिवसांनी १३ मे राजी आणखी दोन चाचण्या केल्या. या तीन अणुचाचण्यांनी सगळ्या जगाला आश्चर्याचा धक्काच बसला. न्यूक्लियर राष्ट्रांच्या यादीत भारताचे नाव समाविष्ट झाले. ही घटना देशासाठी अभिमानाची होती. या अणु चाचण्यांनंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २० मे ला पोखरणला भेट दिली होती.
अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना न्यूक्लियर स्टेटला हिरवा कंदील दाखवला होता. ११ मे ला दुपारी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सरकारी घर ७ रेस कोर्समध्ये एक पत्रकार परिषद बोलावली होती. या परिषदेत त्यांनी अणुचाचणी योजनेची माहिती माध्यमांना दिली होती.
अटल बिहारी वाजपेयी हे या अणुचाचण्यांचे श्रेय माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना देतात. राव यांना श्रद्धांजली देताना अटल यांनी म्हटलं होतं की, ‘मे १९९६ मध्ये राव यांच्यानंतर मी पंतप्रधानपदाची खुर्ची सांभाळली. त्यावेळी राव मला म्हणाले होते की, बॉम्ब तयार आहे.’
तसेच अनेक भाषणांमध्ये वाजपेयी यांनी अणुचाचणीचे श्रेय ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर. चिदंबरम आणि एपीजे अब्दुल कलाम यांना दिलं होतं.
No comments:
Post a Comment