Friday, August 24, 2018

लताजींनी जागवल्‍या अटलजींच्‍या आठवणी






अटल बिहारी वाजपेयी फक्‍त नेतेच नाही तर ते उत्तम कवी, लेखक होते. त्‍याचबरोबर बॉलिवूडशी त्‍यांचं खास नातं होतं. अटल बिहारी वाजपेयी हे गायि‍का लता मंगेशकर यांच्‍याशीही खास नातं होतं. लता मंगेशकर यांनी अटलजी यांच्‍या निधनानंतर दु:ख व्‍यक्‍त केलं आहे. त्‍यांनी एका वेबसाईटशी बोलताना आपल्‍या आठवणी सांगितल्‍या आहेत. 

लता मंगेशकर म्‍हणाल्‍या, 'मला वाटतयं की, भारतमधून एक साधु पुरुष गेला. ते खूप उत्तम लेखक आणि कवी होते. अटलजी यांच्‍या भाषणात सर्व काही सत्‍य असायचं, ते चांगले व्‍यक्‍ती होते. त्‍यांनी कुणाचं कधीही मन दुखावलं नाही. मी त्‍यांना माझ्‍या वडिलांप्रमाणे मानत होते. जेव्‍हा मी त्‍यांना म्‍हणाले, मी आपल्‍याला माझ्‍या वडिलांप्रमाणे मानते. हे ऐकून ते म्‍हणाले होते की, मी देखील आपल्‍याला माझी मुलगी मानतो. त्‍यानंतर मी त्‍यांना दद्‍दा म्‍हणू लागले. ते माझ्‍या प्रेम करत होते. ते सगळ्‍यांवर प्रेम करत होते.'  
Related image
'१९४२ मध्‍ये माझ्‍या वडिलांचा मृत्‍यू झाला होता, आज तितकाच मोठा धक्‍का मला बसला आहे,' असे लताजी म्‍हणाल्‍या. 
लता मंगेशकर यांनी एक आठवण सांगितली की, 'ज्‍यावेळी आम्‍ही आमच्‍या वडिलांच्‍या नावे एक हॉस्‍पिटल उभारले होते. त्‍यावेळी हॉस्‍पिटलच्‍या उद्‍घाटनाला अटल बिहारी वाजपेयींना आमंत्रित केलं होतं. उद्‍घाटन समारंभाच्‍या शेवटी त्‍यांनी भाषण केलं होतं. ते म्‍हणाले होते, आपलं हॉस्‍पिटल चांगले चालावे, अशा शुभेच्‍छा मी देणार नाही. कारण, अशा शुभेच्‍छा देण्‍याचा अर्थ लोक आजारी पडू देत असा होईल. हे ऐकून मी पुढे काही बोलू शकले नाही.'
लता मंगेशकर यांनी ट्‍विटरवर लिहिलं होतं की, 'अटलजी यांच्‍या निधनाचे वृत्त ऐकून असं वाटलं की, डोंगर कोसळला. ईश्वर त्‍यांच्‍या आत्म्‍याला शांती देवो.'  

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...