मुंबई : पुढारी ऑनलाईन
बॉलिवूडमध्ये अनेक सेलेब्सच्या जोड्या जमल्या. बॉलिवूडमधल्या काही 'देसी गर्ल्स'ना त्यांचा जोडीदार परदेशातील मिळाला आहे. काही अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी परदेशातील व्यक्तीशी लग्न केले आहे. तर काही जणी रिलेशनशीपमध्ये आहेत. या देसी गर्ल्सच्या परदेशी जोडीदारांपैकी काही जण खेळाडू आहेत तर कुणी हॉलिवूड अभिनेता. कुणी उद्योगपती आहे तर काहींना अभिनयात इंटरेस्ट आहे. बॉलिवूडच्या ७ अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी सातासमुद्रापार असलेल्या व्यक्तींशी प्रेम केलं.
प्रियांका आणि निक जोनस :
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा विधीवत साखरपुडा पार पडला आहे. निक जोनस गायक असून तो प्रियांकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. त्यांची भेट मेट गाला येथे २०१७ मध्ये झाली होती. त्यानंतर प्रियांकाने निकच्या कझिनच्या लग्नाला हजेरी लावली होती. प्रियांका आणि निकचा १८ ऑगस्ट २०१८ ला साखरपुडा झाला.
आता मीडिया रिपोर्टनुसार, बॉलिवूड-हॉलिवूड ही जोडी ऑक्टोबरमध्ये लग्न करू शकते. हे लग्न परदेशात होऊ शकते, असे म्हटले जात आहे.
आता मीडिया रिपोर्टनुसार, बॉलिवूड-हॉलिवूड ही जोडी ऑक्टोबरमध्ये लग्न करू शकते. हे लग्न परदेशात होऊ शकते, असे म्हटले जात आहे.

तापसी पन्नू आणि मॅथिस बोए :
दाक्षिणात्य चित्रपटानंतर बॉलिवूडमध्येही आपली वेगळी प्रतिमा निर्माण करणार्या तापसी पन्नू बॅडमिंटन खेळाडू मॅथिस बोएलाला डेट करत आहे. डेनमार्कचा मॅथिस गेल्या ४ वर्षांपासून तापसीला डेट करत असून २०१३ मध्ये झालेल्या इंडियन बॅडमिंटन लीग दरम्यान, दोघांची भेट झाली होती. ऑगस्ट २०१८ मध्ये दोघेही लंच डेटवर स्पॉट झाले होते. दोघांनीही आपले रिलेशनीपबद्दल उघडपणे सांगितलेले नाही.

प्रीति झिंटा आणि जेन गुडनॉफ :
प्रीति जिंटाला तिचं प्रेम यूएसमध्ये मिळालं. इन्व्हेस्टमेंट बँकर असलेला जेन गुडनॉफसोबत प्रीती रिलेशनशीपमध्ये होती. त्यानंतर तिने २०१६ मध्ये जेनशी लग्न केलं. हा लग्नसोहळा लॉस एंजिल्समध्ये भारतीय पारंपरिक पध्दतीने पार पडला होता.
लवकरच प्रीति बॉलिवूडमध्ये 'भैय्या जी सुपरहिट' या चित्रपटातून परत येतेय. चित्रपटात सनी देओल आणि अरशद वारसी यांच्याही भूमिका आहेत.
श्रुती हासन आणि मायकल कॉर्सेल :
लंडनमधील थिएटर आर्टिस्ट मायकल कॉर्सेल हा श्रुती हासनचा बॉयफ्रेंड आहे. दोघांची भेट लंडनमध्ये झाली होती. डिसेंबर २०१७ मध्ये श्रुती, मायकल आणि दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांना एकत्र एका लग्न सोहळ्यात पाहण्यात आले होते. मध्यंतरी, श्रुती आणि मायकल यांनी लग्न केल्याची चर्चा होती. परंतु, श्रुतीने हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले.

सेलिना जेटली आणि पीटर हॉग:
दुबईत झालेल्या भेटीनंतर पीटर हा सेलिना जेटलीच्या फॅमिलीला भेटण्यासाठी भारतात आला होता. २०११ मध्ये सेलिनाने पीटरशी लग्न केलं. ऑस्ट्रियन उद्योगपती पीटर हॉगचे दुबई आणि सिंगापुरमध्ये हॉटेल्स आहेत. सेलिना जेटलीला विंसटन आणि विराज अशी जुळी मुले आहेत. दुसर्यांदा २०१७ मध्ये देखील सेलिनाला जुळी मुले झाली होती. त्यातील एक मुल जिवंत राहू शकले नाही.

इलियाना डिक्रूज आणि एंड्रयू नीबोन :
ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर एंड्रयू आणि अभिनेत्री इलियाना डिक्रूज गेल्या ४ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनी सीक्रेट मॅरिज केल्याचं मध्यंतरी वृत्त होतं. परंतु, इलियानाकडून याबाबतची कुठलीही माहिती समोर आली नाही.
इलियानाचा आगामी चित्रपट 'अमर अकबर ॲन्थोनी' ऑक्टोबर २०१८ ला रिलीज होणार आहे.

श्रिया सरन आणि आंद्रेई कोश्चीव :
श्रियाचा जोडीदार आंद्रेई रशियन टेनिस खेळाडू आहे. मार्च २०१८ मध्ये दोघांनी उदयपूरमध्ये लग्न केलं होतं. याआधी मुंबईत श्रियाच्या घरी सीक्रेट वेडिंग सोहळा पार पडला होता.
राधिका आपटे आणि बेनडिक्ट टेलर :
युके बेस्ड बेनडिक्ट संगीतकार आहे. राधिका-बेनडिक्ट दांची भेट लंडनमध्ये झाली होती. राधिका लंडनमध्ये कंटेम्परेरी डान्स ट्रेनिंगसाठी गेली होती. लिव्हइन रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर सप्टेंबर २०१२ मध्ये राधिका-बेनडिक्टने कोर्ट मॅरेज केलं होतं. राधिकाचा जवळचा मित्र सारंग साठ्येने बेनडिक्ट-राधिकाच्या लग्नाबद्दल सांगितलं होतं. तोपर्यंत कुणालाही माहित नव्हतं की, राधिका विवाहित आहे.

No comments:
Post a Comment