माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाले. एक नेते, कवी, लेखक म्हणून त्यांची ख्याती. इतकेच नाही तर अटल बिहारी वाजपेयी हे अभिनेत्री हेमा मालिनी यांचे मोठे फॅन होते. त्यांना हेमा मालिनी यांचा १९७२ मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'सीता और गीता' इतका आवडला होता की, त्यांनी हा चित्रपट २५ वेळा पाहिला होता. खुद्द हेमा मालिनी यांनी ही माहिती दिली होती. चित्रपट 'सीता और गीता'मध्ये हेमा मालिनी यांची दुहेरी भूमिका होती. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी होते. या चित्रपटात हेमा मालिनी सोबत धर्मेंद्र आणि संजीव कुमार यांच्यादेखील मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात हेमा मालिनी यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता.
हेमा मालिनी म्हणाल्या होत्या की, 'मला आठवतयं की, ज्यावेळी मी पदाधिकार्यांना म्हणाले होते की, मी माझ्या भाषणात अटल बिहारी वाजपेयी यांचा उल्लेख करते. परंतु, मी त्यांना कधी भेटलेले नाही. त्यानंतर माझी अटलजी यांच्याशी भेट झाली. या भेटीत अटल बिहारी वाजपेयी माझ्याशी बोलले नाहीत. मग तेथे उपस्थित असलेल्या एका महिलेला मी विचारलं की, अटलजी माझ्याशी का बोलत नाहीत? तर ती महिला म्हणाली, अटलजी आपले खूप मोठे फॅन आहेत. त्यांनी १९७२ मध्ये आलेला चित्रपट 'सीता और गीता' हा २५ वेळा पाहिला आहे.'
No comments:
Post a Comment