मुंबई : पुढारी ऑनलाईन
राधिका आपटे आज ३३ वा वढदिवस. राधिकाचा जन्म ७ सप्टेंबर, १९८५ मध्ये तामिळनाडूच्या वेल्लोर शहरात झाला होता. बालपण पुण्यात गेलं. राधिकाचे वडिल डॉ. चारुदत्त आपटे तामिळनाडूमध्यन्यूरोसर्जन होते.
चित्रपट करण्यापूर्वी ती नाटकांत काम करत होती. २००५ मध्ये आलेला चित्रपट वाह! लाईफ हो तो ऐसी! यातून तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर राधिकाने हिंदी चित्रपट त्याचबरोबर तमिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली आणि मराठी चित्रपटांत काम केलं आहे.

तिने २०१३ मध्ये ब्रिटिश संगीतकार Benedict Taylor शी विवाह केला.

राम गोपाल वर्माच्या 'रक्त चरित्र'मधून राधिकाचं चित्रपटसृष्टीतलं करिअर फुललं. राधिकाने बॉलिवूड चित्रपटांबरोबरच मराठी चित्रपटांतही काम केलं आहे. राधिकाचा २०११ मध्ये आलेला चित्रपट 'आय एम' आणि 'शोर इन द सिटी'ची बॉक्स ऑफिसवर फारशी जादू चालली नाही. २०१२ आणि २०१४ या कालावधीत राधिकाने धोनी (तमिल / तेलुगू), तुकाराम, लय भारी (मराठी) या चित्रपटांत काम केलं. चित्रपट 'बदलापुर'मधून राधिकाने पुन्हा दमदार आगमन केलं होतं. राधिकाने एका वर्षात ८ चित्रपट करून रेकॉर्ड केलं होतं. तिने 'पार्च्ड' या चित्रपटात न्यूड सीन दिल्यानंतर राधिकाची चांगलीच चर्चा रंगली होत. राधिकाने शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत. परंतु, 'पॅडमॅन' आणि 'मांझी'मुळे राधिकाला अभिनयाची चुणूक दाखवता आली.

नेटफ्लिक्सच्या वेब सीरीजमध्ये 'सेक्रेड गेम्स' दिसलेली राधिका आपटे आता घौउल या सस्पेन्स थ्रीलरमध्ये दिसली. याआधी राधिका रजनीकांत आणि अक्षय कुमारसोबत दिसली होती. नेटफ्लिक्सची सर्वांत लोकप्रिय सीरीज सेक्रेड गेम्स आणि घोउलमुळे राधिकाने यशाची उंची अधिक गाठली. सेक्रेड गेम्सचं पहिलं सीजन रिलीज झाल्यानंतर ही सीरीज वादात सापडली होती.

घौउल चित्रपटात ती एका मुस्लिम मुलीची भूमिका साकारत आहे. त्या मुलीचे वडिल देशद्रोही असल्याने ती त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करते. राधिकाची पोस्टींग एका अंडरग्राऊंड तुरुंगात केली जाते. तुरुंगात ५ कैदी आणि १२ स्टाफ मेंबर्स असतात. तेथून पुढची कहाणी पाहण्यासाठी तुम्हाला घोउल पाहावा लागेल. घोउलमध्ये राधिका बरोबर मानव कौल, विक्रमादित्य मोटवाणी यांच्या भूमिका आहेत. घोउल वेगवेगळ्या भागात असून प्रत्येक भागाला वेगळे नावही देण्यात आले आहे.

राधिका लवकरच 'अंधाधुंन' चित्रपटात झळकणार आहे.
No comments:
Post a Comment