Friday, September 21, 2018

'त्‍या' चित्रपटाने बदललं अनुराग कश्‍यपचं नशीब






ब्लॅक फ्रायडे, गँग्स ऑफ वासेपुर, देवी डी यासारखे वेगळ्‍या विषयावरील चित्रपट आणणारे दिग्‍दर्शक अनुराग कश्यप यांचा आज ४६ वा वाढदिवस. अनुराग यांचा जन्म १० सप्‍टेंबर १९७२ ला उत्तर प्रदेशच्‍या गोरखपूर जिल्‍ह्‍यात झाला होता. अनुराग कश्यपचे वडिल इलेक्ट्रिसिटी बोर्डमध्‍ये चीफ इंजीनिअर होते. त्‍यांची बदली होत असल्‍यामुळे अनुरागचा अनेक मोठ्‍या शहरांशी संपर्क आला. डेहराडूनच्‍या ग्रीन स्कूल आणि ग्वालियरच्‍या सिंधिया स्कूलमध्‍ये त्‍याने शिक्षण घेतले. त्‍यानंतर त्‍याने दिल्‍लीच्‍या हंसराज कॉलेजमध्‍ये झूलॉजी (प्राणीशास्‍त्र) मध्‍ये पदवीचे शिक्षण घेण्‍यासाठी प्रवेश घेतला. 

इंग्लिश बोलायला येत नव्‍हतं
इंग्‍लिश येत नसल्‍यामुळे अनुराग सिंधिया स्कूलमध्‍ये आपल्‍या वर्गमित्रांपासून दूर राहायचा. आणि बराच वेळ लायब्ररीत हिंदी पुस्‍तके वाचण्‍यासाठी घालवायचा. कॉलेजच्‍या दिवसांत त्‍याने इंग्रजी पुस्‍तके वाचण्‍यास सुरूवात केली. 
अनुराग कश्यपने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, त्‍यांचे बालपणी लैंगिक शोषण झाले होते. त्‍यांचे जवळपास ११ वर्षे शोषण होत राहिलं. ज्‍या व्‍यक्‍तीने शोषण केलं, तो तरुण २२ वर्षांचा होता. याप्रकरणी अनुराग कश्यप म्‍हणाला होता, 'मी खूप वर्षांनंतर त्‍या तरुणाला भेटलो होतो. त्‍याला, ती गोष्‍ट चुकीची वाटत नव्‍हती. परंतु, आता त्‍याला पश्‍चाताप झाला होता.' 
dinsta
म्‍हणून शिक्षणाकडे लक्ष लागले नाही...
अनुराग कश्यपने एका मुलाखतीत म्‍हटले होते की, तरुणींमुळे त्‍याचं शिक्षणात लक्ष लागत नव्‍हतं. तरुणींना आकर्षित करण्‍यासाठी तो वेगवेगळे हेअरस्टाईल करायचा आणि रंगबिरंगी कपडे घालायचा. फक्‍त इतकचं नाही तर कुठल्‍या तरी ब्रँडचे सेकंड हॅण्‍ड बूट खरेदी करण्‍यासाठी कुठून ना कुठून तरी पैसे गोळा करायचा.  
अनुरागला दिग्‍दर्शक व्‍हायचे नव्‍हते. तो यूपीएससीची तयारी करत होता. अनुराग कश्यप १९९३ मध्‍ये एका चित्रपट महोत्‍सवात इटालियन चित्रपट 'बायसायकिल थिफ्स' पहायला गेला होता. त्‍यानंतर त्‍यांनी चित्रपट दिग्‍दर्शनात उतरण्‍याचा निर्णय घेतला. या निर्णयावर अनुराग म्‍हणाला होता की, 'इटालियन चित्रपटाचा क्लायमॅक्स त्‍याच्‍या रिअल लाईफसारखा होता.' 
dinsta
नाटकांत काम करण्‍याचा दिला होता सल्‍ला
दरम्‍यान, दिल्लीत 'जन नाट्य मंच'शी संबंधित असलेला मित्र सुनीत सिन्हाने अनुरागला नाटकांत काम करण्‍याचा सल्‍ला दिला होता. त्‍यानंतर त्‍याला स्‍ट्रीट प्ले करण्‍याची संधी मिळाली. प्रसिध्‍द हबीब तनवीर ग्रुपमध्‍ये सहभागी होण्‍यासाठी त्‍याला बरेच पापड लाटावे लागले. त्‍यासाठी त्‍याने श्रीराम सेंटरवर नाटकाचे तिकिट देखील विकले होते. 
तो १९९३ मध्‍ये दिल्‍लीतून मुंबईत आला, त्‍यावेळी त्‍याच्‍या खिशात केवळ ५-६ हजार रुपये होते. सुरूवातीला त्‍याला रस्‍त्‍यावरही झोपावे लागले होते तर कधी कामाच्‍या शोधात भटकावेही लागले होते. नंतर त्‍याला पृथ्वी थिएटर्समध्‍ये नोकरी लागली.  
दिग्‍दर्शनात पदार्पण 
दिग्‍दर्शक म्‍हणून अनुराग 'पांच' या चित्रपटापासून सुरूवात केली. हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. अनुरागला खरी ओळख मिळाली ती 'सत्या' चित्रपटामुळे.  त्‍यानंतर २००४ मध्‍ये त्‍याने 'ब्लॅक फ्रायडे' आणला. बरेच वाद झाल्‍यानंतर शेवटी हा चित्रपट रिलीज झाला. २०१२ मध्‍ये अनुरागच्‍या गँग्‍ज ऑफ वासेपूरला चांगलं यश मिळालं. त्‍यानंतर त्‍याने अनेक चित्रपट केले. 'गुलाल', बॉम्बे टॉकीज, 'अग्ली', 'रमन राघव 2.0' यासारखे हिट चित्रपट दिले. 
dinsta
dinsta
अनुरागने दोन विवाह केले होते. त्‍याचा पहिला विवाह त्‍याची मैत्रीण आरती बजाज हिच्‍याशी झाला होता. दोघांचा संसार ६ वर्षे टिकला. २००९ मध्‍ये त्‍यांनी घटस्‍फोट केला. घटस्‍फोटानंतर २०११ मध्‍ये त्‍याने कल्कि कोचलीनशी विवाह केला. कल्कि कोचलीनने २०१५ मध्‍ये घटस्‍फोट घेतला. 
Related image
२१ सप्‍टेंबरला रिलीज होणार 'मनमर्जियां'
अनुराग कश्यप यांचा आगामी चित्रपट 'मनमर्जियां' लवकरच रिलीज होणार आहे. तापसी पन्नू, विक्की कौशल आणि अभिषेक बच्चन यांचा ‘मनमर्जियां’ २१ सप्‍टेंबरला रिलीज होणार आहे. 

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...