Tuesday, November 27, 2018

इंडस्‍ट्रीत श्रीदेवी यांचं शोषण? स्‍मिता पाटील यांनी केलेले खुलासे


काही दिवसांपूर्वी राज बब्‍बर यांचा मुलगा प्रतीक बब्‍बरने आपली आई स्‍मिता पाटील यांचा एक कोट इन्‍स्‍टाग्रामवर शेअर केला होता. या कोटमध्‍ये लिहिलं होतं की, 'श्रीदेवी माझी चांगली मैत्रीण आहे. मला प्रत्‍यक्षात त्‍यांच्‍याशी बोलण्‍याची इच्‍छा आहे. त्‍यांना मला विचारायचे आहे की, त्‍यांना महिती आहे का की, कशा प्रकारे त्‍यांचं शोषण होत आहे?' प्रतीकने शेअर केलेल्‍या फोटोला पाहून समजलं की, फोटोतील कोट स्‍मिता यांच्‍या एका मुलाखतीतला आहे. 

काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत स्‍मिताजी भारतीय सिनेमातील बदल याविषयावर बोलल्‍या होत्‍या. त्‍यावेळी दाक्षिणात्‍य सिनेसृष्‍टीसह श्रीदेवी आणि जया प्रदा यांच्‍यावर त्‍यांनी प्रश्‍न उपस्‍थित केले होते. 
स्‍मिता यांनी मुलाखतीत म्‍हटले होते, 'इंकलाबमध्‍ये एक स्‍विमिंग पूल गाणं आहे. मला चिंता होते की, महिला हे सर्व पाहतात. त्‍यांना नक्‍कीच लाज वाटत असणार की, आजकालच्‍या अदाकारा अशा प्रकारे अंगप्रदर्शन करतात. मला वाटतं की, यावर महिला प्रेक्षकांनी आवाज उठवायला हवा. दिल्‍लीमध्‍ये सहेली समूहाने मल्‍याळम चित्रपटांतील अश्‍लील दृश्‍यांविरोधात आंदोलन केले होते. आणि त्‍यावर प्रतिबंध घालण्‍यास ते यशस्‍वी झाले होते.' 
त्‍यानंतर स्‍मिता यांनी श्रीदेवी यांच्‍याबद्‍दल बोलताना म्‍हणाल्‍या होत्‍या की, 'श्रीदेवी माझी चांगली मैत्रीण आहे. मला प्रत्‍यक्षात त्‍यांच्‍याशी बोलण्‍याची इच्‍छा आहे. त्‍यांना मला विचारायचे आहे की, 'त्‍यांना महिती आहे का की, कशा प्रकारे त्‍यांचं इंडस्‍ट्रीत शोषण होत आहे?' 
'चक्र'दरम्‍यान, मला समजलं नाही की, त्‍या बाथ सीनचा अर्थ काय आहे? हे समजण्‍यासाठी मला चार वर्षे लागली. त्‍यावेळी मी हा सीन करण्‍यास तयार झाले होते. नंतर मला या गोष्‍टीचं खूप दु:ख झालं. परंतु, साऊथ इंडस्‍ट्रीच्‍या अभिनेत्रींना असा विाचर करण्‍याची संधीदेखील मिळत नाही. त्‍यांच्‍या अवती-भोवतीचे लोक त्‍यांना मानसिकरित्‍या तसा विचार करू देत नाहीत. लहानपणापासूनच त्‍यांना अभिनेत्री बनण्‍यासाठी तयार केले जाते. त्‍या सेटवर जातात आणि सर्वकाही आपल्‍या आई-वडिलांच्‍या म्‍हणण्‍यानुसार करतात. त्‍यांचं फक्‍त एकच उद्‍देश असतो की, पैसे कमवणे आणि लग्‍न करणे. त्‍यांना शेवटपर्यंत हे समजत नाही की, इंडस्‍ट्रीत त्‍यांचं कशा प्रकारे शोषण होत आहे,' असे त्‍या म्‍हणाल्‍या. 
त्‍या पुढे म्‍हणाल्‍या, या साऊथ इंडस्‍ट्रीच्‍या अभिनेत्री केवळ सेक्‍स -ऑब्‍जेक्‍टस समोर ठेवून काम करतात. त्‍यांना शोषणाबद्‍दल काही वाटत नाही. याच अभिनेत्रींना मोठ्‍या पडद्‍यावर कशा प्रकारे सादर केले जाते आणि त्‍यामुळे प्रेक्षकांवर काय प्रभाव पडेल, याचा विचार केला जात नाही. आता पाहा की, 'तोहफा,' 'मवाली' हिट ठरले. प्रत्‍यक्षात मात्र, ते निराशाजनक आहेत. चित्रपट एक मजबूत माध्‍यम आहे. या माध्‍यमातून खूप काही करता येऊ शकतो. श्रीदेवी एक शानदार अभिनेत्री आहे परंतु, पाहा की ती स्‍वत: काय करत आहे? मी 'जाग उठा इन्‍सान' पाहिला. त्‍यातील त्‍यांचा अभिनय आणि नृत्‍याने मला प्रभावित केलं होतं. मला वाटतं की, त्‍यांनी काही चांगले चित्रपट करायला हवेत. 'सदमा'मध्‍ये देखील त्‍यांचा अभिनय उत्‍कृष्‍ट होता. परंतु, त्‍यानंतर त्‍यांनी 'तोहफा' आणि 'मक्‍सद' यासारखे चित्रपट केले. 
'मला वाटतं की, अभिनेत्रींनी आपण काय करायचं आहे, हे ठरवायला हवं. मी अनेक वर्षांपर्यंत स्‍वत:ला रेखा, हेमा समजले. या भ्रमात मी अनेक चुकीचे चित्रपट साईन केले. परंतु, आता मी स्‍पष्‍ट आहे. जर मी एक अभिनेत्री म्‍हणून यशस्‍वी असेल तर मी यशस्‍वी झाले आहे. मला बॉक्‍स ऑफिसची चिंता नाही, जेथे अभिनेत्री काहीही करतात,' असेही त्‍या म्‍हणाल्‍या.  

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...