आज १६ ऑक्टोबर ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांचा ७० वा वाढदिवस. हेमा मालिनी यांचे चाहते जगभरात आहेत. परंतु, त्यांचा डाय हार्ट फॅन असणारे एक दिग्गज व्यक्ती होते, ते म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी. दुर्देवाने अटलजी आपल्यात नाहीत. परंतु, खुद्द हेमाजींनी हा खुलासा एका कार्यक्रमात केला होता. कवीमनाचे, साहित्यिक, राजकीय नेते अटलबिहारी वाजपेयीजी आपले डाय हार्ड फॅन असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
'सीता और गीता' हा आपला चित्रपट अटलजींनी २५ वेळा पाहिला आहे. त्यामुळे जेव्हा अटलजींना मी पहिल्यांदा भेटले तेव्हा ते लाजले होते, असेही हेमा मालिनी म्हणाल्या होत्या. अटलबिहारी वाजपेयी आपले प्रशंसक असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. अटलजींना 'सीता और गीता' हा चित्रपट इतका आवडला होता की, त्यांनी हा चित्रपट २५ वेळा पाहिला आहे. जेव्हा अटलजींना पहिल्यांदाच भेटले तेव्हा ते लाजले होते, असे त्या कार्यक्रमात म्हणाल्या.

'मी राजकारणात विशेषत: भाजपमध्ये येण्याचे श्रेय अभिनेते विनोद खन्ना यांना जाते. १९९९मध्ये गुरुदासपुरमधून लोकसभेची निवडणूक लढवत होते आणि विनोद यांनी आपणास प्रचारासाठी बोलवले होते. प्रचारादरम्यानचे भाषण ऐकून लालकृष्ण अडवाणी यांनी बिहारमध्ये प्रचार करण्याचे आमंत्रण दिले होते. यानंतर भाजपच्या प्रचारासाठी मी जात होते आणि २००३ मध्ये त्यांनी राज्यसभा सदस्यत्व देऊन माझ्यावर जबाबदारी सोपवली होती,' असेही हेमा म्हणाल्या होत्या.

हेमा यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची एक आठवणही सांगितली होती. 'जेव्हा मी पदाधिकार्यांना सांगितले की, मी भाषणात अटलजींचा नेहमीच उल्लेख करते. मात्र, त्यांना कधीही भेटलेले नाही. यानंतर त्यांना भेटण्याचा योग आला. मी पदाधिकार्यांना विचारलं की, अटलजी व्यवस्थित का बोलत नाहीयेत? तेव्हा ते माझे प्रशंसक असल्याचे समजले. १९७२ मध्ये आलेला माझा 'सीता और गीता' हा चित्रपट त्यांनी २५ वेळा पाहिल्याचे त्यांनी सांगितले,' असे हेमामालिनी म्हणाल्या होत्या.
No comments:
Post a Comment