Tuesday, November 27, 2018

सुष्‍मिता सेनचं नाव 'यांच्‍याशी'ही जोडलं गेलं

आपल्‍या अभिनयाने आणि सुंदरतेने घायाळ करणारी अभिनेत्री सुष्मिता सेन आपला ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. सुष्‍मिता अविवाहित आहे. सध्‍या तिचं नाव एक मॉडल रोमन याच्‍याशी जोडलं गेलं आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसल्‍यामुळे सुष्‍मिता रोहमनला डेट करत असल्‍याची चर्चा आहे. रोहमन २७ वर्षांचा असून तो सुष्‍मितापेक्षा १५ वर्षांनी लहान आहे. काही दिवसांपूर्वी दिवाळीमध्‍ये रोमनसोबतचा सुष्मिताचा एक व्‍हिडिओ समोर आला आहे. 

Image result for sushmita sen and model roman
रोमनच्‍या आधी सुष्‍मिताने कोणाकोणाला डेट केलंयं माहिती आहे का? सुष्मिताने अनेक नाईट क्लबचे मालक असणारे रितिक भसीनला दोन वर्षे डेट केलं.   
Image result for sushmita sen and banti sachdeva
Related image
बिल्डर इम्तियाज खत्रीसोबतही सुष्मिताची मैत्री होती.
Related image
एक टॅलेंट कंपनी चालवणारा बंटी सचदेवासोबतही सुष्‍मिताचं नाव जोडलं गेलं. 
Image result for sushmita sen and banti sachdeva
त्‍याचबरोबर, सुष्‍मिताने अभिनेता रणदीप हुड्डालाही डेट केलं. रणदीप हुड्डाशी ब्रेकअप घेतल्‍यानंतर सुष्मिता सेन ॲडमॅन मानव मेननसोबत रिलेशनशीपमध्‍ये होती.
Image result for sushmita sen and banti sachdeva
एका जाहिरातीच्‍या शूटिंगवेळी सुष्मिता मानवशी भेटली होती. सुष्‍मिताने मानवचा चित्रपट 'रानी लक्ष्मीबाई' प्रोड्यूस केला होता. 
Image result for sushmita sen and manav menon
हॉटेल मालक संजय नारंग देखील सुष्मिता सेनचा बॉयफ्रेंड होता. असं म्‍हटलं जातं की, सुष्मिता आणि संजयने साखरपुडा केला होता. परंतु, नंतर दोघांचा ब्रेकअप झाला. 
Image result for sushmita sen and sanjay narang
सुष्मिता चित्रपट निर्माता विक्रम भट्टसोबत रिलेशनमध्‍ये होती, असे म्‍हटले जाते. 
Image result for sushmita sen and banti sachdeva
'दूल्हा मिल गया' चे दिग्‍दर्शक मुद्दसर अजीजसोबतही सुष्मिताचं अफेअर होतं. तर यादरम्‍यान, सुष्मिता माजी पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अकरमसोबत अफेअरचे वृत्त समोर आले होते. एक शो होस्ट करताना हे दोघे एकत्र आले होते. 

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...