Tuesday, November 27, 2018

शाहरुखच्‍या 'मन्नत'चं इतकं लाईट बिल!

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा आज २ नोव्‍हेंबरला वाढदिवस. शाहरुखच्‍या आलिशान बंगल्‍याचं म्‍हणजेच 'मन्‍नत'चं लाईट बिल किती येतं, माहिती आहे का? 'मन्नत'चं महिन्‍याचं लाईटचं बिल या पुढील ६ बॉलिवूड स्‍टार्सच्‍या घराच्‍या लाईट बिलांपेक्षा अधिक येतं. त्‍या ६ बॉलिवूड स्‍टार्सच्‍या घराचं लाईटचं बिल किती येतयं पाहा. 

कॅटरीना कैफ
कॅटरीना कैफच्‍या मुंबईतील घराचं लाईटचं बिल महिन्‍याला १० लाख रुपये येतं. या सहा जणांच्‍या यादीतलं हे सर्वांत कमी लाईटचं बिल आहे. 
दरम्‍यान, कॅटरीना ही 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि आमिर खानसोबत दिसणार आहे. 
Image result for katrina kaif
दीपिका पादुकोण 
'पद्‍मावत'ची राणी दीपिका पादुकोण महिन्‍याला १३ लाख रुपयांचे लाईट बिल भरते. 
१४ आणि १५ नोव्‍हेंबरला दीपिका अभिनेता रणवीर सिंहसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.  रणवीर आणि दीपिकाची पहिली भेट संजय लीला भन्‍साळी यांचा सुपरहिट चित्रपट 'रामलीला' (२०१३) च्‍या सेटवर झाली होती. 
Image result for deepika padukone
आमिर खान
बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान बांद्रा येथील  अपार्टमेंटचे महिन्‍याचे बिल २२ लाख रुपये भरतो. 
आमिर खान आगामी चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्‍ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आमिर आणि बिग बी अमिताभ बच्‍चन पहिल्‍यांदाच एकत्र या चित्रपटात काम करणार आहेत. ४ नोव्‍हेंबरपासून आमिर पुन्‍हा टीव्‍ही शो 'सत्यमेव जयते' होस्ट करताना दिसणार आहे. 
Related image
महानायक अमिताभ बच्‍चन 
महानायक अमिताभ बच्‍चन आपल्‍या संपूर्ण कुटुंबासोबत जूहू स्‍थित बंगल्‍यात राहतात. त्‍यांच्‍या बंगल्‍याचे महिन्‍याचे बिल जवळपास २२ लाख रुपये येते. 
अमिताभ ८ नोव्‍हेंबरला रिलीज होणार्‍या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटात मुख्‍य भूमिकेत दिसणार आहे. यशराज बॅनरचा हा चित्रपट  विनय कृष्णा आचार्य यांनी दिग्‍दर्शित केला आहे.   
Image result for amitabh bachchan
सलमान खान 
बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खान आपल्‍या गॅलेक्सी अपार्टमेंटचं महिन्‍याचं बिल २३ लाख रुपये भरतो. 
सलमान खान सध्‍या 'भारत,' 'वॉन्टेड-२' आणि 'दबंग-३' चित्रपटाच्‍या प्रोजेक्‍टमध्‍ये बिझी आहे. 
Image result for salman khan
सैफ अली खान 
बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आपल्‍या केबिनचे फक्‍त ३० लाख रुपये महिन्‍याचं बिल भरतो. 
सैफचा नुकताच 'बाजार' हा चित्रपट रिलीज झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकला नाही. 
Image result for saif ali khan
किंग खान शाहरुख
बर्थडे बॉय शाहरुख खानच्‍या 'मन्‍नत' या बंगल्‍याचं लाईटचं बिल ऐकून तुम्‍ही थक्‍क व्‍हाल. शाहरुख खान 'मन्नत'चं महिन्‍याचं बिल ४३ लाख रुपये येतं. 
शाहरुख सध्‍या 'जीरो' चित्रपटाच्‍या शूटिंगमध्‍ये  बिझी आहे. ख्रिसमसच्‍या औचित्‍याने हा चित्रपट रिलीज होणार आहे.
Image result for sharukh khan

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...