बॉलिवूडचा 'सिंघम' अजय देवगनचा २ एप्रिलला वाढदिवस आहे. ॲक्शन हिरो ते कॉमिक किंग असा प्रवास असणार्या अजयने अगदी कमी वयात चित्रपट इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. एक काळ असा होता की, अजय देवगनच्या नावाने चित्रपट हिट ठरत असत. आजदेखील चाहत्यांना अजय देवगनच्या नव्या चित्रपटांची उत्सुकता लागून राहिलेली असते. असे अनेक चित्रपट आहेत, जे अजय देवगनने रिजेक्ट केले होते आणि नंतर त्या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली होती.
अजय देवगनने १९९१ मध्ये चित्रपट 'फूल और कांटे'मधून चित्रपट इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते. ॲक्शन ते कॉमेडीपर्यंतच्या प्रवासात अजयच्या प्रत्येक भूमिका परफेक्ट ठरल्या. अजयने काही चित्रपट नाकारले होते. ते चित्रपट पुढे ब्लॉकस्टर ठरले. ते चित्रपट कोणते आहेत, पाहुया.
'करण-अर्जुन'

सलमान खान आणि शाहरुख खानचा 'करण-अर्जुन' हा चित्रपट आजही सुपरहिट आहे. या चित्रपटात सलमान खानच्या जागी अजयला भूमिका ऑफर झाली होती. परंतु, त्याने या भूमिकेसाठी नकार दिला.
'डर'

शाहरुख खान, सनी देओल आणि जूही चावला स्टारर चित्रपट 'डर' हिट ठरला होता. या चित्रपटामुळे शाहरुख खान रातोरात स्टार बनला होता. जर या चित्रपटातील भूमिका अजय देवगनने स्वीकारली असती तर शाहरुखच्या जागी अजय दिसला असता. शाहरुख खानच्या आधी अजयला ही भूमिका ऑफर झाली होती. परंतु, दुसर्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी असल्याने अजयने हा चित्रपट स्वीकारला नाही.
'बाजीराव मस्तानी'
रणवीर सिंह ज्या भूमिकेमुळे फेमस झाला, ती भूमिका अजय देवगनला मिळाली होती. अजयला चित्रपटाची स्क्रिप्टदेखील पसंत होती. परंतु, डेट्सच्या कारणांमुळे अजय हा चित्रपट करू शकला नाही. नंतर ही भूमिका रणवीर सिंहला ऑफर करण्यात आली. हा चित्रपट सुपरहिट ठरला.
'कुछ कुछ होता है'

'कुछ कुछ होता है' शाहरुखचा हिट चित्रपट आहे. काजोल, शाहरुख आणि राणी मुखर्जी स्टारर चित्रपटात अजय देवगनला ऑफर देण्यात आली होती. परंतु, हा चित्रपट अजयने नाकारला.
'पद्मावत'

गेल्यावर्षी रिलीज झालेला संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत'मध्ये अजयला भुमिका मिळाली होती. ही भूमिका होती अलाउद्दीन खिलजीची. परंतु, अजयने ही भूमिका नाकारल्याने रणवीर सिंहला ऑफर देण्यात आली. या चित्रपटातील रणवीरच्या अभिनयाचे खूप कौतुकही झाले होते. इतर प्रोजेक्टमुळे बिझी असल्याने अजय खिलजीची भूमिका करू शकला नाही.
No comments:
Post a Comment