Thursday, April 4, 2019

'सिंघम'च्‍या जयकांत शिकरेने १२ वर्षांनी लहान तरुणीशी केले होते लग्‍न

'सिंघम' फेम जयकांत शिकरे अथांतच दाक्षिणात्‍य अभिनेता प्रकाश राज ५४ वर्षांचे झाले आहेत. प्रकाश राज यांचा जन्‍म २६ मार्च, १९६५ रोजी झाला. निर्माते नेहमी प्रकाश राज यांच्‍यावर आरोप करतात की, ते कधीही वेळेवर शूटला येत नाही. प्रकाश राज यांच्‍याविषयी अशा अनेक इंटरेस्‍टिंग गोष्‍टी आहेत, ज्‍या तुम्‍ही कदाचित वाचल्‍या नसतील. वाढदिवसानिमित्त प्रकाश राज यांच्‍या आयुष्‍याविषयी थोडक्‍यात जाणून घेऊया.


प्रकाश राज यांनी एका मुलाखतीत म्‍हटले होत की, ते कोणताही चित्रपट साईन करण्‍यापूर्वी स्‍पष्‍ट करतात की, कोणत्‍या वेळेत ते शूटसाठी सेटवर येणार आहेत. प्रकाश यांनी म्‍हटले होते की, 'मी रात्री जवळपास ३ वाजता झोपतो आणि सकाळी ९ वाजता उठतो. मी कुणासाठी माझी लाईफस्टाईल चेंज करू शकत नाही. जर मी तुम्‍हाला आवडत असेन तर तुम्‍ही मला चित्रपटात साईन करा अथवा कोणताही प्रॉब्‍लेम नाही.' 
तेलगु चित्रपट इंडस्ट्रीने ६ वेळा केले बॅन 
असे म्‍हटले जाते की, चित्रपट इंडस्‍ट्रीत प्रकाश राज यांच्‍या असभ्‍य वर्तणुकीमुळे तेलगु फिल्म प्रोड्यूसर्सनी प्रकाश राज यांना काम करण्‍यास ६ वेळा बंदी घातली होती. यावर प्रकाश राज म्‍हणाले होते, 'मी माझे नियम-कायदे पाळतो.' परंतु, याविषयी असेही वृत्त आले होते की, दाक्षिणात्‍य चित्रपट इंडस्‍ट्रीत आणि मीडियामध्‍ये आलेल्‍या वृत्तानुसार, काही चित्रपट निर्मात्‍यांनी मिळून प्रकाश राज यांच्‍याविरोधात हे षड्‍यंत्र रचले होते. 
एका चित्रपटासाठी २ कोटी रुपये
प्रकाश राज एका चित्रपटासाठी जवळपास २ कोटी रुपयांचे मानधन घेतात. प्रकाश राज यांना आजपर्यंत आपल्‍या कामासाठी मॅनेजरची गरज भासली नाही. त्‍यांच्‍या माहितीनुसार, ते आपले मानधन स्‍वत: ठरवतात. ते म्‍हणतात, 'इंडस्ट्रीमध्‍ये मी असा एकमेव अभिनेता आहे, ज्‍याला आजपर्यंत मॅनेजरची आवश्‍यकता वाटली नाही. मी फोन कॉल्‍स घेण्‍यापासून चित्रपटाच्‍या सिलेक्शन, स्टोरी आणि मानधनापर्यंत सर्वकाही स्‍वत: निर्णय घेतो. इतकेच नाही तर मी माझ्‍या कमाईचा २० टक्‍के भाग चॅरिटीला देतो.'
३०० रु. होती कमाई
प्रकाश राज यांनी सुरुवातीला थिएटरमध्‍ये काम केले. याशिवाय, ते स्ट्रीट प्लेदेखील करत होते. त्‍यांना स्टेज शो करण्‍यासाठी महिने ३०० रु. मिळत होते. यानंतर त्‍यांनी टीव्‍ही मालिकांमध्‍ये काम केले. हळूहळू ते चित्रपटाकडे वळले. त्‍यांनी कन्नड, तमिळ, मराठी, मल्‍याळम आणि हिंदी चित्रपटांमध्‍ये काम केले आहे. बहुतांशी चित्रपटात त्‍यांनी खलनायकाची भूमिका केली आहे. अभिनयाकरिता त्‍यांना राष्‍ट्रीय पुरस्‍कारदेखील मिळाला आहे. त्‍यांनी चित्रपट दिग्‍दर्शनदेखील केले आहे. त्‍यांनी चित्रपटांकरिता आपले नाव प्रकाश राय असे बदलून प्रकाश राज असे ठेवले. 
१२ वर्षांनी लहान तरुणीशी केला विवाह 
कोरिओग्राफर पोनी वर्मा प्रकाश राज यांची दुसरी पत्नी आहे. प्रकाश यांनी ऑगस्‍ट, २०१० मध्‍ये पोनीशी विवाह केला होता. त्‍यावेळी पोनी प्रकाश यांच्‍यापेक्षा १२ वर्षांनी लहान होती. प्रकाश यांचे पहिले लग्‍न १९९४ मध्‍ये अभिनेत्री ललिता कुमारी यांच्‍याशी झाला होता. २००९ मध्‍ये दोघांनी घटस्‍फोट घेतला. दोघांच्‍या दोन मुली मेघना आणि पूजा आहेत. प्रकाश राज ५० व्‍या वर्षी पुन्‍हा बाबा बनले. ३ फेब्रुवारी, २०१६ रोजी पोनी वर्माने मुलाला जन्म दिला. मुलाचे नाव वेदांत आहे. 

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...