टीव्ही निर्माती एकता कपूरचा ७ जूनला ४४ वा वाढदिवस. एकता कपूरचे अधिकतर टीव्ही शो हिट ठरले. त्यामध्ये उल्लेखनीय म्हणजे, 'क्योंकि सास भी कभी बहू थी' आणि 'कसौटी जिंदगी की' या मालिकांचा समावेश करावा लागेल. सर्व मालिकांनी टीआरपी लिस्टमध्ये टॉपमध्ये आपले स्थान मिळवले होते. एकता कपूरने आपल्या मालिकांमध्ये अनेक नव्या चेहर्यांना लॉन्च केले होते. टीव्हीवर प्रसिध्दी मिळवल्यानंतर हे सेलिब्रिटीज आता बॉलिवूडमध्ये आपली जादू दाखवत आहेत. पाहुता, ते कोणकोणते सेलिब्रिटीज आहेत, ज्यांना एकता कपूरने टीव्हीवर लॉन्च केले होते.
सुशांत सिंह राजपूत:
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला एकता कपूरने टीव्हीवर लॉन्च केलं होतं. एकता कपूरचा शो पवित्र रिश्तामधून सुशांत लोकप्रिय बनला. पुढे सुशांतला बॉलिवूडमध्ये संधी मिळाली. सुशांतने काय पो छे, शुध्द देसी रोमान्स, एम. एस. धोनी, केदारनाथ यासारख्या चित्रपटात काम केले आहे.
रोनित रॉय :
एकता कपूरची मालिका कसौटी जिंदगी कीमध्ये मिस्टर बजाजची भूमिका रोनित रॉयने साकारली होती. रोनित रॉयला या मालिकेतून खूप प्रसिध्दी मिळाली होती. रोनित रॉयने बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.

विद्या बालन:
प्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनला एकता कपूरने हम पांच या मालिकेतून टीव्हीवर लॉन्च केले होते. या शोनंतर विद्या बालनने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

प्राची देसाई :
एकता कपूरच्या 'कसम से' या मालिकेतून प्राची देसाईने टीव्ही जगतमध्ये आपली चांगली ओळख बनवली. पुढे प्राचीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.


No comments:
Post a Comment