Tuesday, August 13, 2019

जेव्हा दिलीप कुमार यांनी शरीफांना फटकारले


वीस वर्षांपूर्वी म्हणजेच २६ जुलै, १९९९ रोजी कारगिल युद्धात भारताने विजय मिळवला होता. आज कारगिल विजयला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या युध्दात ५२७ भारतीय जवान शहीद झाले होते तर १३६३ जवान जखमी झाले होते. भारताने ही लढाई ८४ दिवसांत जिंकली होती. कारगिलच्या लढाईमध्ये भारतीय सैन्याचे धाडसाचे खुप किस्से सांगितले जातात. परंतु, खूप कमी लोकांना माहिती असेल की, कारगिल युद्धादरम्यान एक प्रसंग असा आला की, ज्यावेळी भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी दिलीप कुमार यांचे बोलणे घडवून आणले होते.  

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे संबंध खूप चांगले होते. कारगिल युद्धादरम्यान एक प्रसंग सांगितला जातो. वाजपेयींसाठी दिलीप कुमार यांनी तत्कालीन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना फटकारले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी शरीफ यांना विनम्र राहण्याचा सल्ला दिला होता. 
दिलीप कुमार अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत १९९७ मध्ये लाहौर दौऱ्यावर गेले होते. आणि त्याचवर्षी दिलीप कुमार यांना पाकिस्‍तानने सर्वोच्‍च सन्मान 'निशान ए इम्तियाज'ने सन्मानित केले होते.
Related image
असे होते प्रकरण
दिलीप कुमार यांनी थेट पाकिस्तानच्या पंतप्रधानांना खडसवण्याचे इतपत काय झाले होते, हे समजून घेण्यासाठी वायपेयींची लाहोर यात्रा आणि १९९९चे लाहोर घोषणापत्र काय होते? हे समजून घेतले पाहिजे. 
पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यासाठी वाजपेयींनी एक मोठे पाऊल उचलले होते आणि मैत्रीचा हात पुढे केला होता. लाहोर घोषणापत्रामुळे एक आशेचा किरण निर्माण झाला होता की, दोन्ही देशांमध्ये मैत्री होईल. या घोषणा पत्रात दोन्ही देशांनी शिमला करार लागू करण्याचे मान्य केले होते. वाजपेयींच्या या यात्रेला पाकमधील कट्टरपंथीयांनी विरोधदेखील केला होता. तसेच ‘मीनार-ए-पाकिस्तान’ची स्वच्छतादेखील केली होती. पण मैत्रीचा हा प्रयत्न यशस्वी ठरला नाही. पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी कारगिलमध्ये घुसखोरी केली आणि दोन्ही देशांचे संबंध पुन्हा बिघडले.  
त्यानंतर कारगिल भारतीय लष्कराने पुन्हा मिळवले. यासंदर्भात पाकचे माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री खुर्शीद कसूरी यांनी ‘नीदर ए हॉक नॉर ए डव’ या पुस्तकात दिलीप कुमार यांच्याबद्दलचा एक प्रसंग लिहला आहे. कारगिल घुसखोरीनंतर वाजपेयींनी शरीफ यांच्याबद्दल दिलीप कुमार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. कारण, १९९७मध्ये वाजपेयी यांच्यासोबत बसमध्ये दिलीप कुमारदेखील होते आणि त्याचवर्षी पाकिस्तानने दिलीप कुमार यांना ‘निशान ए इम्तियाज’ या सर्वोच्च पुरस्काराने सम्मानित केले होते. 
कारगिल घुसखोरी ही वाजपेयींच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखे होते. वाजपेयी यासंदर्भातील तक्रार दिलीप कुमार यांच्याकडे केली. एका बाजूला शरीफ लाहोरमध्ये शांततेची चर्चा करतात आणि दुसऱ्या बाजूला मुशर्रफ यांना घुसखोरी रोखण्यापासून थांबवतादेखील आले नाही.    
Related image
कसूरी यांनी लिहिल्याप्रमाणे, वाजपेयींनी शरीफ यांना फोन केला आणि नाराजी व्यक्त केली आणि फोन अचानक दिलीप कुमार यांच्याकडे दिला. फोनवर दिलीप कुमार यांचा आवाज ऐकून शरीफ घाबरले. फोनवर दिलीप कुमार म्हणाले, 'मियां साहिब, आपने हमेशा अमन के बडे समर्थक होने का दावा किया है इसलिए हम आपसे जंग की उम्मीद नहीं करते. तणाव के हालत में भारतीय मुसलमान बहुत असुरक्षित हो जाते हैं , इसलिए हालात को काबू करने में बराय मेहरबानी कुछ किजिए.' 
वाजपेयी यांनी यासंदर्भात सरताज अजीज यांनादेखील फोन करून नाराजी सांगितली होती. त्यावेळी पाकिस्तानमध्ये असलेले भारताचे उच्चायुक्त पार्थसारथी यांच्या मते, दिलीप कुमार यांच्या बोलण्यामुळे शरीफ यांना मोठा धक्का बसला होता. एका बाजूला ते सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत होते आणि दुसऱ्या बाजूला कारगिलच्या घटनेमुळे त्यांची प्रतिमा किती मोठ्या प्रमाणात खराब झाली आहे याचा अंदाजदेखील त्यांना आला नाही.

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...