सायरा बानो आणि दिलीपकुमार यांची खास लव्हस्टोरी
बॉलिवूडचे सुपरस्टार, हॅण्डसम अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची प्रेम कहाणी खूपच रोमँटिक आहे. बॉलिवूडच्या या कपलचा रोमँटिक प्रवास सर्वश्रृत आहे. सायरा सुरूवातीपासूनच दिलीपकुमार यांची चाहती होती. सायरा बानो यांचा २३ ऑगस्टला वाढदिवस. या औचित्याने सायरा यांच्याविषयी जाणून घेऊया या खास गोष्टी.
आपल्या अदाकारीने घायाळ करणाऱ्या सायरा बानो दिलीपकुमार यांच्या पत्नी. दोघांना पुत्रसुख नाही. सायरा बानो आई का बनू शकल्या नाहीत? याचा खुलासा खुद्द दिलीपकुमार यांनी केला होता.
सायरा बानो यांचा जन्म १९४४ मध्ये मसूरीमध्ये झाला होता. त्यांच्या आयुष्याची कथा फिल्मी कहाणीपेक्षा कमी नाही. सायरा हिंदी अभिनेत्री नसीम बानो यांची कन्या. सायरा यांचं बालपण लंडनमध्ये गेलं. १९६० मध्ये त्या मुंबईत आल्या. सायरा यांना आपल्या आईप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री बनायचे होते. त्यांचे वडील मियां एहसान-उल-हक चित्रपट निर्माते होते. त्यांनी मुंबईत 'फूल' आणि पाकिस्तानमध्ये 'वादा' नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली.
सायरा यांचे 'जंगली'मधून डेब्यू
सायरा १९६० मध्ये मुंबईत आल्या. त्यावेळी त्यांची भेट निर्माता-दिग्दर्शक शशीधर मुखर्जी यांच्याशी झाली. येथून त्यांच्या करिअरला सुरूवात झाली. १९६१ मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये चित्रपट 'जंगली'मधून डेब्यू केलं. त्यात शम्मी कपूर यांची मुख्य भूमिका होती. जंगलीमध्ये सायरा यांची काश्मीरी मुलीची भूमिका होती. त्यांची चांगली अभिनेत्री म्हणून ओळख असली तरी त्या त्यांच्या लव्हस्टोरीमुळे त्या अधिक ओळखल्या जातात.

१९६८ मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'पडोसन'ने सायराला लोकप्रियता मिळवून दिली. सायरा यांच्यासाठी १९६४ चं वर्ष खूपच खास होतं. यावर्षी त्याचा दूर की आवाज, आओ प्यार करें, आई मिलन की बेला आणि अप्रैल फूल यासारखे चित्रपट केले. साठ-सत्तरच्या दशकात सायरा बानोचे नाव बॉलिवूडच्या प्रसिध्द आणि सुंदर अभिनेत्रींमध्ये घेतलं जायचं.

बालपणापणापासूनच सायरा यांना दिलीपजींचे आकर्षण
सायरा बानो १२ वर्षांच्या होत्या. त्यांना सुपरस्टार दिलीपकुमार आवडायचे. एक फॅन ते एक पत्नी होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास इंटरेस्टिंग आहे. सायरा बानो यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, '१२ वर्षांची असल्यापासून ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार मला आवडायचे.'

सायरा यांनी पहिल्यांदा दिलीपकुमार यांना १९५२ मध्ये 'आन' चित्रपटात पाहिलं होतं. तेव्हाच त्यांना दिलीपकुमार यांच्याशी प्रेम झालं. १९६६ मध्ये सायरा यांनी अभिनेता दिलीपकुमार यांच्याशी विवाह केला. त्यावेळी सायरा २२ वर्षांच्या तर दिलीपकुमार ४४ वर्षांचे होते. लग्नानंतर दोघांच्याही जीवनात अनेक चढ-उतार आले. दिलीपकुमार यांनी दुसरं लग्न देखील केलं. दिलीप कुमार यांनी आसमा नावाच्या महिलेशी लग्न केलं होतं. सायरा बानो आई होऊ शकत नव्हत्या, म्हणून दिलीप यांनी हे लग्न केल्याचं म्हटलं जातं. परंतु, हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. दिलीप पुन्हा सायरा यांच्याकडे आले.

सायरा का आई बनू शकल्या नाहीत?
अभिनेता दिलीपकुमार यांनी आपल्या पुस्तकात 'द सब्सटेंस ॲण्ड द शॅडो'मध्ये सायरा बानो यांच्याशी लग्न केल्याचं म्हटलं होतं. १९७२ मध्ये सायरा प्रेग्नेंट होत्या, हा खुलासाही खुद्द दिलीप यांनी केला होता. दिलीपकुमार यांनी पुस्तकात म्हटलं होतं की, 'प्रेग्नेंसीच्या आठव्या महिन्यात सायरा बानो यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास होता. त्याचदरम्यान, आम्ही आमचं बाळ गमावलं. नंतर आम्हाला कळालं की, मुलगा होता. आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. त्यानंतर सायरा कधी आई बनू शकल्या नाहीत.'

No comments:
Post a Comment