आजच्याच दिवशी २० वर्षांपूर्वी म्हणजेच १९९९ मध्ये भारताने पाकिस्तान विरुद्धच्या कारगिल युद्धात विजय मिळवला. या युद्धात अनेक भारतीय सैनिकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. याची आठवण म्हणून आजचा दिवस (२६ जुलै रोजी) हा कारगिल विजय दिवस म्हणून संबोधण्यात आले. कारगिल युद्धावर आधारित गेल्या अनेक वर्षांमध्ये बॉलिवूडमध्ये चित्रपट बनवण्यात आले आहेत.
कारगिल युद्धावर आधारित चित्रपटात अनेक दिग्गज बॉलिवूड स्टार्सनी आपल्या अभिनयाच्या छटा उमटवल्या. यामध्ये संजय दत्त, आयुब खान, सुनील शेट्टी, सैफ अली खान, अभिषेक बच्चन, रवीना टंडन, शाहिद कपूर, ओम पुरी, गुल पनाग, ऋतिक रोशन आणि सोनम कपूर यासारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे.
एलओसी कारगिल
'एलओसी कारगिल' हा चित्रपट २००३मध्ये जे.पी. दत्ता यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट कारगिलच्या युद्धावर आधारित आहे. या चित्रपटात पाकिस्तानच्या सैन्याविरोधी कारवाईला सामोरे जाताना भारतीय सैन्यदलातील जवानांनी केलेल्या पराक्रमांची गाथा दाखवण्यात आली आहे. 'कारगिल' या चित्रपटात अभिषेक बच्चन, सैफ अली खान, आयुब खान, सुनील शेट्टी, संजय दत्त या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
लक्ष्य
फरहान अख्तर दिग्दर्शित 'लक्ष्य' हा चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सैन्याला लावण्यात येणारी शिस्त आणि त्याचे आयुष्य यावर भाष्य करण्यात आले होते. या चित्रपटाचे शूटिंग लडाखमधील तंग्लांग्ला येथे २४ फुटावरून क्रेनच्या सहाय्याने करण्यात आले आहे. या चित्रपटात ऋतिक रोशन, प्रीति जिंटा, अमिताभ बच्चन, अमरीश पुरी आणि ओम पुरी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

धूप
'धूप' हा चित्रपट २००३मध्ये चाहत्यांच्या भेटीस आला. या चित्रपटात कारगिलच्या युद्धात शहीद झालेल्या एका कॅप्टन (अनुज नय्यर)च्या कुटुंबाची होणारी परिस्थिती दाखवण्यात आली आहे. तसेच या चित्रपटात शहीद कुंटुंबीयांची सरकारी अनुदानासाठी होणारी धडपड दाखवण्यात आले होते. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता ओम पुरी आणि गुल पनागची मुख्य भूमिका साकारली आहे.
टँगो चार्ली
कारगिलच्या युद्धावर आधारित 'टँगो चार्ली' हा चित्रपट २००५ मध्ये आला होता. या चित्रपटात भारताच्या सीमेवर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या जवानांच्या जीनवावर आधारित आहे. या चित्रपटात अजय देवगन, बॉबी देओल आणि संजय दत्त या दिग्गज कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक मणी शंकर यांनी केले आहे.
स्टंप्ड
कारगिल युद्धावर आधारित 'स्टंप्ड' हा चित्रपट २००३ मध्ये आला होता. या चित्रपटात अभिनेत्री रवीना टंडनने एका सैन्यदल अधिकाऱ्यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.
मौसम
कारगिल युदधावर आधारित बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि सोनम कपूर यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘मौसम’ (२०११) हा चित्रपट साकारण्यात आला होता.
उरी: द सर्जिकल स्ट्राईक
दिग्दर्शक रोनी स्क्रूवाला 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' हा चित्रपट २०१९मध्ये चाहत्यांच्या भेटीस आला होता. हा चित्रपटात भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित ‘उरी’ आधारित आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका साकारली होती.

No comments:
Post a Comment