'एक अलबेला' २०१६ मध्ये आलेला चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, रायटर, निर्माता, डान्सर भगवान दादा यांच्या जीवनावर आधारित होती. शेखर सरतांडेल दिग्दर्शित या चित्रपटात भगवान दादा यांची भूमिका मराठी अभिनेता मंगेश देसाई याने साकारली होती. यात विद्या बालनने लोकप्रिय अभिनेत्री गीता बालीची भूमिका साकारली होती. भगवान दादांचा १ ऑगस्टला जन्मदिवस. या निमित्ताने भगवान दादांच्या आयुष्याविषयी जाणून घेऊया.

१. मुंबईच्या दादर भागात लालूभाई मेंशन नावाची चाळ होती. गणेश उत्सवाच्या वेळी अनेक मंडळे या चॉळीच्या समोर थांबायचे आणि भोली सूरत दिल के खोटे गाणे वाजवून डान्स करायचे. भगवान दादा आपल्या चाळीतून बाहेर पडायची प्रतीक्षा करत. मग, भगवान दादा बाहेर येऊन डान्स स्टेप करून दाखवत.
२. भगवान दादा हिंदी चित्रपटांचे पहिले ॲक्शन हिरो होते.
३. हिंदी चित्रपटांचे पहिले डान्सिंग स्टार होते.
४. त्यांनी भारतीय पहिली हॉरर चित्रपट भेडी बंगला (१९४९) बनवला होता. व्ही. शांताराम यासारखे दिग्गज चित्रपट निर्मात्यांना भगवान दादा यांचे काम आवडले होते.
५. भगवान दादा यांचे वडील मिलमध्ये मजुरी करत होते.
६. महाराष्ट्राच्या अमरावतीमध्ये १९१३ मध्ये भगवान दादा यांचा जन्म झाला. पूर्ण नाव - भगवान अभाजी पलव असं होतं. पुढे त्यांना भगवान, मास्टर भगवान आणि भगवान दादा नावाने ओळखले जाऊ लागले.

७. भगवान दादा यांचे बालपण दादर, परेल येथे गेले. चौथ्या इयत्तेत असताना त्यांनी शिक्षण सोडलं.
८. सायलेंट चित्रपटांच्या काळात त्यांनी काम करणे सुरू केले. जवळपास १९३१ ते १९९६ पर्यंत जवळपास ६५ वर्षे ते सक्रीय होते. अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, निर्माता आणि अन्य भूमिका त्यांनी साकारल्या.
९. भगवान दादांना त्यांचे मित्र राज कपूर यांनी सल्ला दिला होता की, त्यांनी सोशल मॅसेज देणारे चित्रपट बनवावेत. त्यावर भगवान दादांनी अलबेला दिग्दर्शित केला. हा चित्रपट १९५१ मध्ये रिलीज झाला. त्यावेळी राज कपूर यांचा आवारा चित्रपट आला. 'शोला जो भडके, दिल मेरा धडके दर्द जवानी का सताए बढ बढ के...' हे अलबेलामधील गाणे आजही लोकप्रिय आहे.
१०. अलबेला त्यावर्षीचा तिसरी सर्वात अधिक कमाई करणारा चित्रपट होता. पहिल्या क्रमांकावर राज कपूर यांचा आवारा आणि दुसऱ्या क्रमांकावर गुरु दत्त यांचा बाजी चित्रपट होता.
११. भगवान दादा यांनी अलबेला नंतर झमेला आणि लाबेला यांसारखे चित्रपट बनवले. परंतु, ते यशस्वी झाले नही.
१२. भगवान दादा यांनी 'हंसते रहना' या चित्रपटासाठी आपल्याकडील सर्व पैसा, पत्नीचे दागिने खर्च केले. यात अभिनेते होते किशोर कुमार. परंतु हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. नुकसानीमुळे पुढे त्यांना दादरमध्ये चाळीत राहावं लागलं. तेथेच त्यांचं निधन झालं.
१३. बॉम्बे टू गोवा (१९७२) कमर्शियल आणि सोलो हिरो म्हणून अमिताभ बच्चन यांचा हा पहिला चित्रपट होता. परंतु, त्यांना डान्स करता येत नव्हते. एक गाणं होतं-'देखा न हाय रे सोचा न हाय रे रख दी निशाने पे जां...' पुढे बच्चन डान्स करायला शिकले. हात पुढे काढून हळू-हळू पाय हलवणे आणि ठुमके लगावणे, ही भगवान दादा स्टाईल होती.

१४. गोविंदा, मिथुन, ऋषी कपूरसह अनेक स्टार्स भगवान दादा यांची डान्स स्टाईल शिकले. ऋषी कपूर यांना खुद्द भगवान दादा यांनी डान्स स्टेप शिकवले होते.
१५. गीतकार आनंद बक्शी यांना चित्रपटात भगवान दादा यांनी आणले होते. बक्शी यांनी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, अमर प्रेम, आराधना, शोले, परदेस, मोहरा, यादें, खुदा गवाह यासारखे ६०० हून अधिक चित्रपटांची गाणी लिहिली होती.
१६. हृदय विकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झालं.
१७. महत्त्वाचे चित्रपट- फरार, शंकर शंभू, खेल खिलाडी का, चाचा भतीजा, शिक्षा, साहस, कातिलों के कातिल, दर्द-ए-दिल, बिंदिया चमकेगी, सनी, झूठा सच, रामकली, लवर बॉय, काली बस्ती, फर्ज की जंग, गैर कानूनी यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले.
No comments:
Post a Comment