Tuesday, August 13, 2019

कंडक्टर ते विनोदी अभिनेता जॉनी वॉकर

कॉमेडी अभिनेते जॉनी वॉकर म्हणजेच बदरुद्दीन जमालुद्दीन काजी यांचा २९ जुलैला स्मृतिदिन. सिनेरसिकांना पोट धरून हसायला लावणारे जॉनी वॉकर यांनी २९ जुलै, २००३ मध्ये जगाचा निरोप घेतला. बॉलिवूडचे एक उत्तम कॉमेडियन जॉनी वॉकर यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. बॉलिवूडचे सुपरस्टार जॉनी वॉकर यांच्या आयुष्याशी संबंधित या खास गोष्टी जाणून घेऊया. 
वॉकर यांनी चित्रपटात आल्यानंतर आपलं नाव बदललं होतं. घरची बेताची परिस्थिती असल्यामुळे त्यांना ६ व्या इयत्तेतच शाळा सोडावी लागली होती. 

'सीआयडी' चित्रपटातील गाणे 'ऐ दिल है मुश्किल जीना यहां, जरा हटके जरा बचके ये है बॉम्बे मेरी जां', जॉनी वॉकर यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. गाण्यात मुंबईमधील बसची स्थिती दाखवण्यात आली होती. चित्रपटांमध्ये काम करण्याचे स्वप्न घेऊन आलेले जॉनी वॉकर यांना सुरूवातीला बस कंडक्टरची नोकरी करावी लागली होती. यासाठी त्यांना महिन्याला २६ रुपये मिळत होते. जॉनी वॉकर लोकांची मिमिक्री करत असत. त्यामुळे बसमध्ये मिमिक्री करून ते प्रवाशांचे मनोरंजन करायचे. 

जॉनी वॉकर बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट बस सर्व्हिसमध्ये काम करत होते. अनेक वर्षे त्यांनी हे काम केले. एकदा दिग्गज कलाकार बलराज साहनी यांची नजर त्यांच्यावर पडली. त्यावेळी ते गुरु दत्त यांचा चित्रपट बाजी लिहित होते. साहनी यांनी जॉनी यांची भेट गुरु दत्त यांच्याशी करून दिली. दत्त साहब यांनाही जॉनी यांचा अभिनय आवडला. 

जॉनी वॉकर यांचे कौशल्य पाहून त्यांना पहिली संधी गुरु दत्त यांनी दिली. चित्रपट होता 'बाजी'. या चित्रपटानंतर त्यांना मागे वळून पाहावे लागले नाही. जॉनी वाकर यांनी गुरुदत्त यांच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यामध्ये 'आर-पार', 'प्यासा', 'चौदहवी का चांद', 'कागज के फूल', 'मधुमती,' 'मिस्टर एंड मिसेज 55', 'टॅक्सी ड्रायव्हर,' 'देवदास,' 'मिलाप,' 'सीआयडी,' 'आनंद,' 'दो रास्ते', 'चाची 420' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. 

मधुमती चित्रपटासाठी त्यांना बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर म्हणून फिल्मफेअर ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. शिखर या चित्रपटासाठी त्यांना बेस्ट कॉमेडियन ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.


No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...