Wednesday, October 16, 2019

हेमा-धर्मेंद्र यांची लव्हस्टोरी एकदा वाचाच!


हॅप्पी बर्थडे हेमा मालिनी


बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र आणि 'ड्रीमगर्ल' हेमा मालिनी यांची लव्‍ह स्‍टोरीचे किस्‍से आपण ऐकला असाल. हेमा मालिनी यांच्‍याशी लग्‍न करण्‍यासाठी धर्मेंद्र यांनी आपलं नाव बदललं होतं. तुम्‍हाला ही गोष्ट माहिती आहे का? धर्मेंद्र हे हेमा मालिनी यांच्‍यापेक्षा १३ वर्षांनी मोठे आहेत. या दोघांची लव्‍ह स्‍टोरी इंटरेस्‍टिंग आहे. एकदा वाचायला हरकत नाही. 
अभिनेता धर्मेंद्र चित्रपटात येण्‍यापूर्वी त्‍यांचं लग्‍न प्रकाश कौर यांच्‍याशी झालं होतं. धर्मेंद्र १९५८ मध्‍ये चित्रपटात आले. त्‍यांचा पहिला चित्रपट 'दिल भी तेरा हम भी तेरे.' तर हेमा मालिनी यांचा पहिला चित्रपट होता...'सपनों का सौदागर'. हा चित्रपट १९६८ मध्‍ये झाला होता. १९७० मध्‍ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी पहिल्‍यांदाच एकत्र दिसले होते. 'शराफत' आणि 'तुम हसीन मैं जवां' या चित्रपटांनंतर दोघांच्‍यात जवळीक निर्माण झाल्‍याचे वृत्त येऊ लागले होते. 
Image result for dharmendra and hema malini
पहिला चित्रपट फ्लॉप...तरीही ऑफर 
आपल्‍या पहिल्‍या चित्रपटाबद्‍दल (सपनों का सौदागर) हेमाजी म्‍हणाल्‍या होत्‍या की, 'माझा पहिला चित्रपट चालला नाही, तरीही तो रिलीज झाल्‍यानंतर मला बरेच चित्रपट मिळाले, हे एक आश्‍चर्यचं होतं. तो का चालला नाही, मला आजवर कळलेलं नाही. सुदैवाने त्‍याच्‍यानंतर मला मिळालेले बहुतेक चित्रपट चांगले चालले. सपनों का सौदागरच्‍या अपयशाचा शोक कुणालाच नव्‍हता. चित्रपट पूर्ण झाला आणि थिएटरमध्‍ये लागला, हेच माझ्‍यादृष्‍टीने खूप मोठं होतं. मद्रासमधल्‍या माझ्‍या तमिळ चित्रपटाचा जो दु:खद अनुभव आला होता, त्‍यानंतर हिंदीतला पहिला चित्रपट सुरळीत रिलीज झाला, हीच ईश्‍वराची मोठी कृपा.'
Image result for dharmendra and hema malini
१९७० नंतर एका मागोमाग एक हेमा आणि धर्मेंद्र एकत्र चित्रपटांत काम करू लागले. दोघांच्‍यात जवळीक निर्माण झाली. धर्मेंद्र विवाहीत होते. परंतु, दुसरं लग्‍न करणं धर्माविरुध्‍द होतं. हेमा मालिनी दाक्षिणात्‍य कुटुंबातील होत्‍या. चित्रपट 'शोले'पर्यंत (१९७५) हेमा-धर्मेंद्र यांच्‍यातील प्रेम वाढत गेलं. 
...आणि नाव बदललं
धर्मेंद्र यांनी हेमा यांच्‍याशी लग्‍न करण्‍यासाठी धर्म बदलला आणि दिलावर खान असं स्‍वत:चं नाव करवून घेतलं. त्‍याचशिवाय, लग्‍नानंतर देखील पहिली पत्‍नी प्रकाश आणि मुलांना मी सोडू शकत नाही. माझा परिवार स्‍वीकारावा लागेल, अशी अट धर्मेंद्र यांनी हेमा यांच्‍यासमोर ठेवली होती. हेमा यांनी ती अट स्‍वीकारली आणि दोघांनी  १९७९ मध्‍ये लग्‍न केलं. 
Related image

अनेक चित्रपटांत एकत्र काम
धर्मेंद्र - हेमा यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. 'नया जमाना,' 'सीता और गीता,' 'राजा जानी,' 'पायल,' 'प्रतिज्ञा,' 'बर्न‍िंग ट्रेन,' 'दिल का हीरा,' 'अलीबाबा और ४० चोर,' 'आसपास,' 'रजिया सुल्‍तान' या महत्त्‍वाच्‍या चित्रपटांचा समावेश आहे. 

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...