Tuesday, October 22, 2019

कादर खान यांच्‍या अभिनयाने इम्‍प्रेस झाले होते दिलीप कुमार

कादर खान काही वर्षांपासून लाईमलाईटपासून दूर होते. मोठ्‍या पडद्‍यावर खळखळून हसवणारे कादर खान यांचा अभिनय चित्रपटात आहे म्‍हटल्‍यावर प्रेक्षक आवर्जुन तो चित्रपट पाहायला जायचे. कादर खान यांचे चित्रपट म्‍हणजे त्‍या चित्रपटाला मिळालेले यश, असे समीकरण असायचे. त्‍यांनी आपल्‍या दमदार अभिनयाने आणि विनोदाने प्रेक्षकांना अक्षरश: पोट धरून हसायला लावले. जितक्‍या विनोदात्‍मक भूमिका केल्‍या, तितक्‍याच गंभीर भूमिकाही साकारल्‍या. 

Image result for kader khan
कादर खान यांनी 'डाग' या चित्रपटापासून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्‍यांनी 'होशियार,' 'हत्‍या,' 'कुली' यासारख्‍या चित्रपटांचे लेखन केले. नव्‍वदच्‍या दशकात तर अनेक चित्रपटांमध्‍ये त्‍यांनी उत्तम अभिनय केला. उत्तम अभिनयाकरिता आणि लेखनासाठी त्‍यांना आजपर्यंत अनेक पुरस्‍कारांनी सन्‍मानित करण्‍यात आले होते. 
Image result for kader khan hd
अफगानिस्तानमधील काबुल येथे १९३७ मध्‍ये जन्मलेल्‍या कादर खान यांनी ३०० हून अधिक चित्रपटात काम केले. त्‍यांनी लेखनापासून अभिनयापर्यंत अनेक चित्रपटात काम केले. कादर खान यांनी चित्रपट करिअरमध्‍ये वेगवेगळ्‍या भूमिका निभावून प्रेक्षकांच्‍या मनावर अधिराज्‍य गाजवले. प्रेक्षकांना त्‍यांच्‍या नेगेटिव्‍ह आणि कॉमिक दोन्‍ही भूमिका आवडल्‍या. सातत्‍याने प्रकृती बिघडत असल्‍याने ते चित्रपटांपासून दूर होते. 
Image result for kader khan hd
कादर खान यांनी लिहिलेले डायलॉग्‍ज
हळूहळू कादर इंडस्‍ट्रीमध्‍ये सेटल झाले. त्‍यांनी अभिनयाबारोबरच 'सत्‍ते पे सत्‍ता', 'अमर अकबर एंथोनी', 'मिस्‍टर नटवर लाल', 'दो और दो पांच', 'अग्निपथ' यांसारख्‍या चित्रपटांचे डायलॉग्‍ज लिहिले. अमिताभ बच्‍चन यांचे बहुतांशी डायलॉग्‍ज कादर यांनी लिहिले होते. त्‍यानंतर त्‍यांना चित्रपटात काम करण्‍याची संधी मिळाली. सुरुवातीला निगेटिव्‍ह  भूमिका मिळाली. पुढे दाक्षिणात्‍य चित्रपट 'हिम्‍मतवाला'मध्‍ये काम करण्‍याची संधी त्‍यांना मिळाली. या चित्रपटातील त्‍यांच्‍या भूमिकेने कादर खान यांच्‍यासाठी कॉमेडीचे दरवाजे उघडले. 
कादर खान एक दिग्‍दर्शक, स्क्रीन रायटर, कॉमेडियन देखील होते. चित्रपट रोटीचे (१९७४) डायलॉग लिहिण्‍यासाठी  राजेश खन्ना आणि मनमोहन देसाई यांनी त्‍यांना १.२१ लाख रुपये मानधन दिले होते. त्‍यावेळीहे मानधन जास्‍त असल्‍याचे म्‍हटले जायचे. 
Image result for kader khan
कादर यांच्‍या अभिनयावर इम्‍प्रेस झाले होते ट्रॅजिडी किंग 
कॉलेजमध्‍ये कादर यांनी एक नाटक लिहिले होते. या नाटकासाठी त्‍यांना पुरस्‍कारदेखील मिळाला होता. त्‍यांनी बेस्‍ट ॲक्‍टर, बेस्‍ट रायटर, बेस्‍ट डायरेक्‍टर या कॅटेगरीमध्‍ये पुरस्‍कार जिंकला होता. पुरस्‍काराची राशी म्‍हणून त्‍यांना १५०० रुपयांचे कॅश प्राईज मिळाले होते. असे म्‍हटले जाते की, कॉलेजमध्‍ये असताना कादर खान ज्‍यावेळी वार्षिक समारंभात परफॉर्म करत होते. त्‍यावेळी दिलीप कुमार त्‍यांच्‍या अदाकारीने इम्‍प्रेस झाले होते. पुढे दिलीप यांनी कादर खान यांना आपल्‍या चित्रपटात साईन केले. त्‍यानंतर कादर खान यांचे कुटुंबीय मुंबईत आले. 
कादर खान यांचे उल्‍लेखनीय चित्रपट असे -
कुली
कुली चित्रपटात त्‍यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. दमदार अभिनय करून त्‍यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. 
तकदीरवाला 
तकदीरवाला चित्रपटात कादर खान यांनी यमराज भूमिका साकारली होती. यमराजची भूमिका असूनही ते विनोदात्‍मक पध्‍दतीने सादर करणे, हे त्‍यांना सहजरित्‍या जमले होते. या चित्रपटातील त्‍यांचा 'यम है हम' हा संवाद फेमस झाला होता.  
राजा बाबू 
या चित्रपटात अभिनेता गोविंदाच्‍या वडिलांची भूमिका कादर यांनी निभावली होती. राजा बाबू चित्रपट हिट ठरला. 
Image result for kader khan
हिरो नं  १
या चित्रपटातदेखील कादर खान यांनी गोविंदाच्‍या वडिलांची भूमिका साकारली होती. हिरो नंबर १ मध्‍ये त्‍यांनी गोविंदासोबत अभिनय करून मोठ्‍या पडद्‍यावर धुमाकूळ घातला.  
आंटी नं १
कादर खान आणि गोविंदा यांची जोडी लोकप्रिय ठरली. आंटी नंबर १ मध्‍येदेखील दोघांची जोडी हिट ठरली. 
मिस्टर ॲण्ड मिसेज खिलाडी
मिस्टर ॲण्ड मिसेज खिलाडीमध्‍ये अभिनेत्री जुही चावला प्रमुख भूमिकेत होती. जुही चावलाच्‍या स्ट्रिक्ट वडिलांची भूमिका कादर खान यांनी साकारली होती. 
Image result for kader khan
बाप नंबरी बेटा दस नंबरी 
बाप नंबरी बेटा दस नंबरीमध्‍ये कादर यांच्‍यासोबत शक्ती कपूर मुख्‍य भूमिकेत होते. दोघांनी मिळून प्रेक्षकांना खळखळून हसायला लावले. 
 

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...