
जन्मदिन विशेष
'चॉकलेट हिरो' देव आनंद यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची शुरूआत १९४६ मध्ये 'हम एक हैं'मधून केली होती. देव आनंद यांना सदाबहार म्हटलं जायचं. नेहमी फ्रेश असणारे देव आनंद कधीच कंटाळलेले नसायचे. पूर्ण जोशाने ते आपलं काम पूर्ण करायचे.
१९५५ ते १९६५ पर्यंत देव आनंद सर्वात महाग बॉलिवूड अभिनेता होते. देव आनंद यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात १९४६ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट 'हम एक हैं'मधून केली होती. देव आनंद यांचं व्यक्तिमत्त्व इतकं आकर्षक होतं की, अनेक अभिनेत्री त्यांच्यावर फिदा होत्या. देव आनंद यांच्या जन्मदिनी त्यांच्या हिट चित्रपटांची सुपरहिट गाणी पाहुया.
१ जानेवारी १९६३ ला रिलीज झालेला चित्रपट 'तेरे घर के सामने' हा सुपरहिट ठरला होता. हा चित्रपट खुद्द देव आनंद यांनी प्रोड्यूस केला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचे भाऊ विजय आनंद यांनी केले होते. या चित्रपटातील गाणं 'दिल का भंवर करे पुकार...' पाहा.
१९७० मध्ये आलेला 'जॉनी मेरा नाम' एक क्राईम ॲक्शन चित्रपट होता. दिग्दर्शन विजय आनंद यांनी केलं होतं. 'पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले' हे या चित्रपटातील गाणं प्रसिध्द झालं होतं.
१९७३ मध्ये आलेला चित्रपट 'हीरा-पन्ना' देव आनंद यांनी दिग्दर्शित केला होता. प्रोडक्शनही त्यांनीच केलं होतं. चित्रपटात देव आनंद, जीनत अमान आणि राखी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
वहीदा रहमान आणि देव आनंद यांचा सुपरहिट चित्रपट 'गाईड' १९६५ मध्ये आला होता. विजय आनंद यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं. 'आज फिर जीने की तमन्ना है' हे या चित्रपटातील गाणं लोकप्रिय आहे.
No comments:
Post a Comment