
बर्थडे स्पेशल
बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांचा १६ ऑक्टोबरला वाढदिवस. त्यांचा जन्म १९४८ चा. स्वप्नसुंदरी हेमा मालिनी यांचा या वयातही फिटनेस परफेक्ट आहे. पूर्वी जितक्या त्या सुदंर दिसायच्या. आताही तितक्याच सुंदर दिसतात. त्यांच्या फिटनेसचे रहस्य तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या हेमा या दुस-या पत्नी आहेत. धर्मेंद्र यांचे पहिले लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झाले होते. पहिल्या पत्नीपासून धर्मेंद्र यांना सनी देओल, बॉबी देओल ही दोन मुले आहेत. हेमा यांच्या अहाना देओल आणि ईशा देओल या दोन मुली आहेत. ईशा आणि अहाना यांचं माध्यमिक शिक्षण सुरू झालं. तेव्हापासून हेमा यांनी चित्रपटातलं लक्ष कमी केलं आणि ते नृत्यावर केंद्रित केलं. नृत्याचे कार्यक्रम त्यांना त्यांच्या सोयीसवडीने घेता येत होते. चित्रपटांच्या बाबतीत ते शक्य नव्हतं. या निर्णयामुळे मोजक्या पण चांगल्या भूमिका करण्याचा विचार त्यांना अंमलात आणता आला. मुलींकडे अधिक लक्ष देता आले.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे चित्रपटावरचं लक्ष कमी करूनही हेमा यांच्या नावाची झळाळी कमी झाली नाही. त्यांच्या सौंदर्याप्रमाणेच त्यांचा लौकिक अबाधित राहिला.
हेमा यांची डेट डायरी सदैव शूटिंगच्या आणि नृत्याच्या कार्यक्रमांनी भरून गेलेली असायची. हेमा यांची प्रकृती चांगली आहे आणि त्या मनानेही कणखर आहे. त्या थकतील, दमतील पण, मोडून पडत नाहीत. थोड्याशा विश्रांतीनंतर त्या ताजेतवाने होऊन कामाला लागतात. चित्रपट आणि नृत्य यावर त्यांचं अपार प्रेम आहे. त्यांची इच्छाशक्तीही अपार आहे. चित्रपट आणि नृत्य यांच्यासाठी लागणारी गुणवत्ता त्यांच्याजवळ आहे. सुंदर चेहरा आहे. पण, सौंदर्य म्हणजे बाह्य रूप नव्हे; तर सौंदर्य ही आंतरिक गुणवत्ता आहे. हेमा एक कुशल नर्तिका आहेत. त्यांचा बांधा उंच आणि सडपातळ आहे. त्यांच्या हालचाली चपळ आणि डौलदार आहेत.
डान्स
हेमा डान्सिंगला एक्सरसाइजच्या रुपात बघतात. त्यांच्या जीवनताला प्रत्येक मार्ग नृत्याजवळ येऊन थांबतो. नृत्यामुळे उच्च दर्जाचा कलात्मक आनंद तर मिळतोच; शिवाय सर्वांगाला नियमित व्यायाम घडतो.
सायकलिंग
रोज दहा ते पंधरा मिनिटे हेमाजी सायकलिंग करतात.
योग-प्राणायाम
रोज ४५ मिनिटे योग आणि प्राणायामला त्या वेळ देतात. त्यामुळे त्यांचे वजन मेंटेन राहते.

आहार
- निरोगी राहण्यासाठी हेमा शाकाहारी आहार घेतात. त्या मांसाहार करत नाहीत.
- सकाळी दोन कप ग्रीन टी घेतात.
- दुपार्या जेवणात दोन चपाती, एक वाटी वरण, दोन पालेभाज्या आणि भातासोबत रसम घेतात.
- रात्रीचे जेवण त्या ८ वाजण्यापूर्वी करतात.

उपवास
त्या आठवड्यातून २ दिवस त्या उपवास करतात. यावेळी फक्त फळे, ज्युस, सुकामेवा खातात.
- दिवसभरात भरपूर पाणी पितात. त्यामुळे त्या नेहमी फ्रेश दिसतात.
- चेहर्यावर मेकअपऐवजी अरोमा ऑईल लावतात.
- जंक फूडऐवडी फळे आणि भाज्या खातात.
- नारळ तेलात आवळा, तुळस, नीम आईल मिक्स करुन हेअर मसाज करतात.
No comments:
Post a Comment