Wednesday, October 16, 2019

'कालिया' बनून विजू खोटेंनी जिंकली होती मने



बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते विजू खोटे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी मराठी चित्रपटांबरोबरच इतर भाषांमध्येही  उल्लेखनीय काम केलं. विजू खोटे यांचे शोले या चित्रपटातील 'कालिया'चे डायलॉग्ज खूप लोकप्रिय ठरले. त्यांचा 'सरदार मैने तुम्हारा नमक खाया है' हा डायलॉग प्रेक्षकांच्या आजही लक्षात राहिला आहे. 

Image
शोलेनंतर त्यांनी आमिर खान-सलमान खानचा चित्रपट 'अंदाज अपना अपना'मध्ये रॉबर्टची भूमिका साकारली होती. विजू खोटे यांनी बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केल्यानंतर मराठी चित्रपट पंथमध्ये निगेटिव्ह भूमिका साकारून हे सिध्द केलं की, ते प्रत्येक भूमिकेसाठी फिट आहेत. 
विजू खोटे यांनी १९६४ पासून सिनेजगतात कार्यरत होते. त्यांनी आपल्या चित्रपट करिअरमध्ये अनेक मराठी आणि हिंदी चित्रटांमध्ये काम केलं होतं. यामध्ये अशी ही बनवाबनवी, आयत्या बिळावर नागोबा अशा चित्रपटांचा समावेश आहे. हिंदी आणि मराठी असे मिळून जवळपास ३०० चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. 
Image
विजू यांची १९९३ मध्ये आलेली टीव्ही मालिका 'जबान संभाल के' लोकप्रिय ठरली होती. त्यांनी थिएटरमध्येही काम केलं आहे. विजू खोटे यांची बहिण शुभा खोटेदेखील अभिनेत्री आहे. शुभा खोटे यांची मुलगी भावना बलसावरदेखील अभिनेत्री आहे. विजू खोटे यांचे वडील नंदू खोटेदेखील स्टेज ॲक्टर होते. 
Image
विजू खोटे यांचा शेवटचा चित्रपट 
विजू खोटे यांचा शेवटचा चित्रपट 'जाने क्यों दे यारो' हा होता. २०१८ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. 

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...