Wednesday, October 16, 2019

म्हणून किशोर कुमारांच्या गाण्यांवर घालण्यात आली होती बंदी!

आणीबाणीच्या काळात किशोर कुमार यांची गाणी प्रसारीत करण्यास प्रतिबंध 




'आंदोलन' ते 'शाब्बास' अशा ७४ चित्रपटांमध्ये भूमिका करणारे नशीली, रसीली आणि फडकती गाणी गाणारे किशोर कुमार यांचा १३ ऑक्टोबरला स्मृतीदिन. किशोर कुमार यांचे भाऊ अशोक कुमार यांचा आज जन्मदिवसही आहे.  

किशोर कुमार यांनी सिनेइंडस्ट्रीमध्ये अभिनेते म्हणून एन्ट्री घेतली होती. किशोर कुमार यांचा पहिला चित्रपट 'शिकारी' १९४६ मध्ये रिलीज झाला होता. यात किशोर कुमार यांचे मोठे भाऊ अशोक कुमार मुख्य भूमिकेत होते. किशोर कुमार यांना पहिल्यांदा देव आनंद यांचा चित्रपट 'जिद्दी' (१९४८) मध्ये गाण्याची संधी मिळाली. मध्य प्रदेश-खंडवा शहरात जन्मलेले किशोर कुमार यांनी एकापेक्षा एक हिट गाणी दिली आहेत. परंतु, अशी एक वेळ आली की, ज्यावेळी त्यांच्या गाण्यांवर बंदी घालण्यात आली होती. 
ज्यावेळी १९७५ मध्ये इंदिरा गांधी सरकारने आणीबाणी लागू केली होती, त्यावेळी किशोर कुमार यांची गाणी बॅन करण्यात आले होते. किशोर कुमार आपल्या नियमांचे काटेकोर पालन करत असत. आणीबाणीच्या वेळी काँग्रेसचं म्हणणं होतं की, सरकारी योजनांची माहिती किशोर कुमार आपल्या आवाजात गाऊन द्यावी. काँग्रेसने किशोर कुमारशी संपर्क केला. इंदिरा गांधी सरकारमध्ये तत्कालीन माहिती प्रसारण मंत्री व्ही. सी. शुक्ला होते. त्यांनी किशोर कुमार यांना सांगितले की, त्यांनी इंदिरा गांधींसाठी गाणे गावे. परंतु, किशोर कुमार यांनी नकार दिला. त्यानंतर किशोर कुमार यांची गाणी ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शनवर बॅन करण्यात आली. 
अभिनेतापेक्षा म्हणून प्रसिध्दीपेक्षा गायक म्हणूनच अधिक लोकप्रियता किशोरकुमार यांनी मिळवली. तरीही तेव्हाच्या आघाडींच्या अभिनेत्रींबरोबर त्यांनी चित्रपटात काम केले होते. यात रेहाना-छम छमा छम, बेबी शकुंतला-फरेब, मीनाकुमारी-नया अंदाज, मधुबाला-चलती का नाम गाडी, वैजयंतीमाला-लडकी, उषाकिरण-धोबी डॉक्टर, नूतन-दिल्ली का ठग, निम्मी-भाईभाई, माला सिन्हा-जालसाज, वहिदा रेहमान-गर्लफ्रेंड, बीना रॉय-मद भरे नैन, साधना-मनमौजी, तनुजा-दो दुनी चार, मुमताज-लडका लडकी यांचा समावेश आहे. 

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...