
ऐश्वर्या राय बर्थडे
अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायचे लग्न २००७ मध्ये झाले. मात्र त्यापूर्वीची अभिषेक आणि ऐश्वर्या रायची लव्ह स्टोरी खूपच खास आहे. ॲश आणि अभिषेक यांची लव्ह स्टोरी कशी आणि कधी सुरू झाली, हे पाहुयात.
अनेक चित्रपटात एकत्र काम

अभिषेक-ऐश्वर्याने एकत्र अनेक चित्रपटात काम केले आहे. दोघांनी सुरुवात 'ढाई अक्षर प्रेम के' आणि 'कुछ ना कहो' मध्ये काम केलं होतं. त्यावेळी दोघांची केवळ मैत्री होती. याआधीही अभिषेक-ॲश 'प्यार हो गया' (१९९७) चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. या चित्रपटात अभिषेक बॉबी देओलसोबत काम करत होता. त्यादरम्यान, ॲश सलमानसोबत तर अभिषेक करिश्मा कपूरशी एंगेज्ड होता. अभिषेक बच्चनचं लग्न अभिनेत्री करिश्मा कपूरशी होणार होतं. दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. ऐश्वर्या राय पहिल्यांदा सलमान खान आणि नंतर विवेक ओबरायसोबत रिलेशनशीपमध्ये होती.
ॲशला अभिषेकने असं प्रपोज केलं

त्यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्या दोघांनी 'बंटी और बबली' चित्रपटातील गाणं 'कजरा रे'मध्ये एकत्र काम केलं. चित्रपटातील हे गाणं सुपरहिट झालं. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा जोर धरू लागल्या. दोघांनी मणि रत्नम यांच्या 'गुरु' चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आणि चित्रपटाच्या प्रीमियरनंतर टोरांटोमध्ये अभिषेकने ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज केलं. ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनचं प्रपोजल स्वीकारलं.

एका मुलाखतीत अभिषेकने म्हटलं होतं, 'मी एकदा न्यू-यॉर्कमध्ये एका चित्रपटाचे शूटिंग करत होतो. त्यावेळी मी एका हॉटेलमधील रूमच्या बाल्कनीत उभा राहून विचार करत होतो, की जर मी ॲशशी लग्न केलं तर किती छान होईल. काही वर्षांनंतर गुरुच्या प्रीमियरनंतर आम्ही त्याच हॉटेलमध्ये गेलो आणि त्याच बाल्कनीत मी ॲशला लग्नासाठी प्रपोज केलं.'
प्रपोज केल्यानंतर ॲश-अभिषेक मुंबईत परतले. १४ जानेवारी, २००७ मध्ये दोघांनी साखरपुडा केला. त्यानंतर ते एकत्र मूव्हीज पाहायला आणि नाईट क्लब जाऊ लागले. एका मुलाखतीत ॲशनेही म्हटलं होतं, 'अभिषेकने तिला गुरु चित्रपटाच्या सेटमध्ये असलेली नकली अंगठीसोबत प्रपोज केलं. ते मला खूपच रिअल वाटलं होतं.'

लग्नात होती अडचण
लग्नाच्या आधी ॲश-अभिषेक यांच्या आयुष्यात चढ-उतार आले. पहिली अडचण म्हणजे, ॲशच्या कुंडलीमध्ये दोष होता. दोष दूर करण्यासाठी ॲशला एका झाडाशी लग्न करायचं होतं. दुसरी अडचण अशी की, 'धूम-२' चित्रपटातील ॲश आणि ऋतिक रोशनचे किसिंग सीन. सूत्रांच्या माहितीनुसार, ॲशचे हे बोल्ड सीन देणे बच्चन कुटुंबीयांना आवडले नव्हते.

बहुप्रतीक्षित लग्न
अभिषेक-ऐश्वर्याने २० एप्रिल २००७ मध्ये लग्न केलं. दोघांच्या लग्नाची चर्चा संपूर्ण मीडियात झाली होती. दोघांनी लग्नाच्या कपड्यांपासून लग्नात येणार्या पाहुण्यांच्या यादीपर्यंत ही चर्चा होती. परंतु, अभिषेक बच्चनच्या आजीची तब्येत बिघडल्याने हे लग्न घरगुतीच करण्याचा निर्णय घेण्यात आला.
एका मुलाखतीत ॲशने म्हटलं होतं की, अभिषेक माझ्यासाठी एक प्रेरणा स्रोत आहे. तो खूप सपोर्टिव आहे. ज्यावेळी मी गोंधळाच्या परिस्थितीत असते. तेव्हाअभिषेक माझी समस्या पटकन मिटवतो.

मुलीचा जन्म
१६ नोव्हेंबर २०११ ला ॲशने मुलीला जन्म दिला. तिचं नाव आराध्या असं ठेवण्यात आलं. आराध्याच्या जन्मानंतर ॲशने चित्रपटात काम केलं नाही. आराध्या चार वर्षांची झाल्यानंतर 'जज्बा' चित्रपटातून ॲशने कमबॅक केलं.
No comments:
Post a Comment