
नंदिता दासने न केवळ बॉलिवूडमध्ये पारंपरिक ब्यूटीला आव्हानच दिले नाही तर तिला मॉर्डन जगाची स्मिता पाटील असेही म्हणण्यात आले. नंदिताने दीपा मेहता यांच्या फायरमध्ये समलैंगिक भूमिका साकारली होती.
शबाना आझमी आणि नंदिता दास
नव्वदच्या दशकामध्ये नंदिता दासने आपल्या भूमिकांच्या आधारांवर बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख बनवली. नंदिता दासचा जन्म ७ नोव्हेंबरला मुंबईमध्ये झाला होता.

नंदिताने दीपा मेहता यांच्या फायर चित्रपटात समलैंगिक भूमिका साकारली. या चित्रपटात फॅमिली ड्रामा दाखवण्यात आला होता. एक रुढीवादी कुटुंब दाखवण्यात आलं होतं. या कुटुंबातील दोन महिलांना एकमेकींशी प्रेम होतं.
या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला होता. भारतामध्ये हा चित्रपट रिलीज होण्यास अडचणीदेखील निर्माण झाल्या. या चित्रपटाच्या रिलीज होण्याच्या दोन दशकानंतर समलैंगिकता विषयावर संवेदनशील चित्रपट येऊ लागले. चित्रपट महोत्सवातही फायरचे कौतुक करण्यात आले होते. फ्रान्स, स्पेन, युके आणि अमेरिकेमध्ये १४ पुरस्कार मिळवण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. फायरनंतर दीपा मेहता यांच्या अर्थ चित्रपटातही नंदिता दासने काम केलं होतं.
दिग्दर्शनातही पदार्पण

प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्यूरी म्हणन काम केलेल्या नंदिताने अभिनयाशिवाय दिग्दर्शनातही नशीब आजमावलं. त्यांनी श्याम बेनेगल, मणिरत्नम यासारख्या अनेक दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केलं. विविध भाषांमधील ४० हून अधिक चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे. २००८ मध्ये त्यांचा पहिला दिग्दर्शित चित्रपट फिराक रिलीज झाला होता.

२०१८ मध्ये त्यांनी लेखक मंटो यांचा बायोपिक आणला. या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने काम केल होतं. समीक्षकांकडून या चित्रपटाला वाहव्वा मिळाली. चित्रपट महोत्सवांमध्येही या चित्रपटाचे कौतुक झाले.
No comments:
Post a Comment