
एक नृत्यांगना, सौंदर्यवती, सुंदर अदाकारा....तिच्या सुंदर नयनांनी हिंदी चित्रपटसृष्टीतल अख्खं जग व्यापलं....ती हेमा. 'हेमा' या नावाचा अर्थ 'सुंदर स्त्री' असा होतो, हे कुठेतरी वाचनात आलं होतं. असो. अर्थाप्रमाणे हेमा खरंच 'सुंदर' आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडतील.
मोहक चेहरा आणि नृत्य करताना रंगमंचावरचा डौलदार आणि आत्मविश्वासपूर्ण वावर यामुळे चित्रपटनिर्मात्यांचं लक्ष हेमाकडे वळलं. तिला पहिली ऑफर मिळाली, तेव्हा हेमा १४ वर्षांच्या होत्या. हेमा यांना स्टार बनवण्यात त्यांची आई जया यांचा मोलाचा वाटा आहे. * हेमाचं प्रतिरुप बनलेल्या दोन्ही कन्या सुसंस्कृतता आणि कलेचा वारसा पुढे नेत आहेत. ओडीसी नृत्यात त्यांनी कौशल्य संपादन केलं आहे.
* संपूर्ण कुटूंब. धमेंद्र, हेमा मालिनी, ईशा आणि आहना.

* १९६९ मध्ये हिंदी चित्रपटांच्या क्षितिजावर एक तेज:पुंज चांदणी उगवली.
* 'सपनों का सौदागर'मध्ये हेमाजी राज कपूर यांच्यासोबत. ही मुलगी एक दिवस हिंदी चित्रपटांची मोठी स्टार असेल अशी भविष्यवाणी करणार्या राज कपूर यांचा विश्वास हेमाजींनी सार्थ करून दाखवला.

* दागिने, झगमगीत नक्षीदार कपडे परिधान करून हेमाजींनी 'शराफत' चित्रपटात तवायफची भूमिका केली होती.
* 'चॉकलेट हिरो' देव आनंद आणि हेमा मालिनी यांनी अनेक चित्रपट केले. धमेंद्रनंतर हेमाने देव आनंद यांच्यासोबत सर्वाधिक चित्रपट केले.

* 'तुम हसी मैं जवाँ'...चित्रपटातील हेमा आणि धमेंद्र.

* 'लाल पत्थर'मधली भूमिका ही हेमाजींची वेगळी प्रतिमा दर्शवणारी होती. कपटी, स्वार्थी, मत्सर स्त्रीची भूमिका तिने या चित्रपटात साकारली होती. या भूमिकेनंतर हमेचं खूप कौतुक झालं होतं.
* मोठ्या पडद्यावरचं तिचं पहिलं सर्पनृत्य दिसलं ते म्हणजे 'बाबुल की गलियां' चित्रपटात.
* 'पराया धन'मध्ये प्रसिध्द अभिनेते राकेश रोशनसोबत अभिनय केला. त्यातील तिची साहसी भूमिका वाखाण्याजोगे आहे.

* 'तेरे मेरे सपने'मध्ये नृत्यकलेचा भरपूर आनंद घेता आला असे हेमाजी सांगतात.
* 'राजाजानी'मध्ये वेस्टर्न ड्रेसमधील हेमा.

* तिची मनमोहक अदा दिसली ती म्हणजे 'गोरा और काला' या चित्रपटात.
* 'दो ठग' चित्रपटातील तिचे नृत्य लोकप्रिय ठरले.
* मेरे नसीब में तू हैं के नहीं...! नसीब मधली नाईटक्लब सिंगर! फ्लोअर टच ब्लॅक रंगाचा वन पीस गाऊन आणि फरचा स्टोल अडकवून नाईट क्लबमध्ये सिंगर म्हणून नसीब चित्रपटातील हेमाजींची एक अदा.

* चित्रपट 'खूशबू'मधील एक प्रसंग

No comments:
Post a Comment