Friday, February 14, 2020

वहीदा रहमान यांच्या प्रेमात होते गुरु दत्त; आजपर्यंत समजलं नाही मृत्यूचं कारण




चौदहवीं का चांद हो, या आफताब हो
जो भी हो तुम खुदा कि कसम, लाजवाब हो। 

मोहम्मद रफी यांच्या सुरेल आवाजातील हे गाणे जेव्हा  कानावर पडते, तेव्हा डोळ्यासमोर उभी राहते ती सुंदर अदाकारा वहीदा रहमान यांची प्रतिमा. चौदहवीं का चांद हो, या आफताब हो...हे गाणे ऐकून खरचं असं वाटतं की, हे गाणे फक्त आणि फक्त वहीदा रहमान यांच्यासाठी लिहिण्यात आलं होतं. पन्नास आणि साठच्या दशकात वहीदा हे नाव प्रत्येक जणाच्या तोंडावर होतं. त्यांच्या सुंदर अदाकारीने वहीदा यांना बॉलिवूडची सर्वात सुंदर हिरोईन बनवलं. ३ फेब्रुवारीला वहीदा यांचा वाढदिवस आहे.  त्यानिमित्त जाणून घेऊया, त्यांच्या आयुष्यातील या खास गोष्टी.  
Image result for waheeda rehman hd
१९३८ रोजी तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या वहीदा यांनी हिंदी, तमिळ, तेलुगु, बंगाली आणि मल्याळम भाषेतील अनेक चित्रपटांत काम केले. वहीदा त्यावेळी तेलुगु चित्रपटांमध्ये आपले नाव कमवत होत्या. एका चित्रपटामध्ये अभिनेते गुरु दत्त यांनी पाहिलं आणि त्यांना मुंबईमध्ये आणण्याचा निर्णय घेतला. आपल्या प्रोडक्शनचा चित्रपट 'सीआयडी'मध्ये गुरु दत्त यांनी वहीदा यांना पहिली संधी दिली. त्यानंतर १९५७ मध्ये चित्रपट 'प्यासा'मध्ये गुरु दत्त आणि वहीदा यांची जोडी दिसली. या चित्रपटाने हिंदी सिनेमामध्ये एक नवी क्रांती आणली. 
Image result for waheeda rehman hd
१९५३ मध्ये गुरु दत्त यांनी गीता दत्त यांच्याशी लग्न केले. परंतु, काही वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात वहीदा रहमान आल्या. 'प्यासा' चित्रपटादरम्यान गीता आणि गुरु दत्त यांच्यात दुरावा निर्माण झाला. वहीदा यांच्यामुळे गुरु दत्त आणि गीता दत्त यांच्यात वाद निर्माण झाले होते, असे म्हटले जाते. १९५७ मध्ये गुरु दत्त आणि गीता दत्त यांच्या वैवाहिक जीवनात वादळ आले आणि दोघे वेगवेगळे राहू लागले. 
वहीदा यांना घेऊनच आपला चित्रपट करण्यासाठी गुरु दत्त आग्रही असायचे. या गोष्टीचा उल्लेख त्यांचे मित्र अबरार अल्बी यांनी '१० ईअर्स विथ गुरु दत्त' नावाच्या पुस्तकात केला आहे. गुरू दत्त आणि वहीदा यांच्या नात्यावर वहीदा यांच्या कुटुंबीयांनीही आक्षेप घेतला होता. वहीदा यांनी गुरू दत्त यांच्याशी विवाह करू नये, असे त्यांच्या कुटुंबीयांना वाटत होते. 
Image result for waheeda rehman hd
१९६३ मध्ये गुरू दत्त यांनी वहीदा यांची साथ सोडली. आपल्या पत्नी-मुलांपासून दूर राहणे आणि वहीदा यांच्यापासून दूर जाणे हे गुरु दत्त यांना सहन झाले नाही. असे म्हटले जाते की, आपल्या सहकाऱ्यांसमोर ते वारंवार जीव देण्याबद्दल बोलायचे. गुरू दत्त यांना आपल्या अडीच वर्षांच्या मुलीला भेटायचे होते. परंतु, गीता यांनी नकार दिला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या पत्नीला आपण जीव देण्याचीही धमकीही दिली होती.  
१० ऑक्टोबर, १९६४ रोजी दुपारी गुरु दत्त यांचे मित्र अबरार यांच्याकडे फोन आला की, गुरु दत्त यांची  तब्येत बिघडली आहे. अचानकपणे त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. परंतु, अखेरपर्यंत गुरु दत्त यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. 
Image result for waheeda rehman hd
गुरु दत्त यांच्या मृत्यूने बसला होता धक्का
१० ऑक्टोबर, १९६४ रोजी गुरु दत्त यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त येऊन धडकले. त्यावेळी वहीदा यांना मोठा धक्का बसला होता. पुढे त्यांनी १९६५ मध्ये 'गाइड' चित्रपट केला. असे म्हटले जाते की, गुरु दत्त यांनी अधिक दारू प्यायल्याने आणि खूप साऱ्या झोपेच्या गोळ्या घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी गुरू दत्त यांचं वय केवळ ३९ वर्षांचं होतं. 
वहीदा यांचा 'गाइड' हा चित्रपट सुपरहिट ठरला. यामध्ये 'चॉकलेट हिरो' देवानंद यांची मुख्य भूमिका होती. ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस इतकी उतरली की, चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहायला लोक तुफान गर्दी करायचे. या चित्रपटासाठी वहीदा यांना बेस्ट ॲक्ट्रेसचा पुरस्कार मिळाला होता. 
Related image
१९६६ मध्ये 'तीसरी कसम' चित्रपटाने वहीदा यांचा फिल्मी ग्राफ बदलला. बॉक्स ऑफिसवर 'तीसरी कसम' हिट ठरला की आजदेखील हा चित्रपट मैलाचा दगड मानला जातो. या चित्रपटातून वहीदा आणि राजकपूर यांनी मोठ्या पडद्यावर प्रेमाची एका अनोखी व्याख्या सादर केली होती. 
Related image
'किशोर कुमार' पुरस्काराने सन्मानित केले जाणार 
मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री विजयलक्ष्मी साधौ ४ फेब्रुवारीला अभिनेत्री वहीदा रहमान यांना प्रतिष्ठित ‘किशोर कुमार सन्मान-२०१८’ न सन्मानित करणार आहेत. गायक किशोर कुमार यांच्या नावे दिला जाणारा हा पुरस्कार मध्य प्रदेश सरकारद्वारा दिला जातो. वहीदा रहमान यांना हा सन्मान मागील वर्षी १३ ऑक्टोबरला खंडवानमध्ये किशोर कुमार यांच्या ३२ व्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमात दिला जाणार होता. परंतु, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकल्या नव्हत्या. 

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...