Saturday, December 5, 2020

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण : दीपिका, रियाचे जूने WhatsApp मेसेज NCBला कसे मिळाले?

 


दीपिका पादुकोण आणि रिया चक्रवर्ती यांचे व्हॉट्सॲप चॅट सार्वजनिक झाल्याने एकच खळबळ उडाली. अखेर हे चॅट बाहेर आले कसे? कुणी पाठवले? रिया आणि दीपिकाच्या मोबाईलचा बॅकअप ॲक्सेस कुणाला मिळाला? पोलिसांना की एनसीबी अधिकाऱ्यांना? तसा मोबाईल ॲक्सेस मिळवण्याची ऑथोरिटी कोणाला? की ज्यांना ही ऑथोरिटी आहे, त्यांनी हे चॅट व्हायरल केले? असे डेटा सिक्युरिटी, चॅट कायदेशीर पुरावा म्हणून राहणार का? ही प्रोसेस इतकी सोपी आहे का? असे असंख्य प्रश्न आता पडू लागले आहेत. 


आयटी तज्ज्ञ  विनायक पाचलग यांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. व्हॉट्सॲप मॅसेजचे जे end-to-end encryption आहे, त्याचा अर्थ असा होतो की, ज्या व्यक्तींमध्ये हे मेसेज सेंट झाले आहेत, ते केवळ त्यांना माहिती असतील. त्याची गोपनियता अबाधित राहते. स्वत: व्हॉट्सॲपही हे मॅसेज वाचू शकत नाही. व्हॉट्सॲप केवळ त्यांचा फोन क्रमांक घेतो. ऑपरेटिंग सिस्टमच्या दृष्टीने सुरक्षा चोख असते. अशा परिस्थितीत व्हॉट्सॲपवर दोन लोकांमध्ये होणारा संवाद पूर्णपणे encrypted असल्याचा दावा विश्वासार्ह आहे का? यावर आता विचार होणे गरजेचे आहे. 

वाचा - सोशल मीडियात दीपिकावर कमेंट्सचा पाऊस!

आपल्या मोबाईलचा बॅकअप इंटरनल स्टोरेजमध्ये हा डेटा साठवला जातो. तो डेटा आपल्याला उघडता येत नाही पण, फेसबुकला उघडता येतो. ज्यांना असा डेटा ॲक्सेस करण्याची ऑथोरिटी असते, अशांनाच हा डेटा मिळवता येतो. रोजचा बॅकअप गुगल ड्राईव्हलादेखील ऑटो सिंक करण्याची सुविधा असते. ऑटो सिंक जर ऑन असेल तर डेली, विकली अशामधून तुमचा डेटा तुमच्या गुगल ड्राईव्हला सेव्ह करता येतो. 

आपल्या मोबाईलच्या हॅण्डसेटमध्ये दोन ते तीन असे ऑप्शन्स आहेत, ज्याच्यामधून या चॅटचे ट्रेसेस राहू शकतात. अशा पध्दतीचे जे बॅकअप्स आहेत, त्यातून चॅट रिड्राईव्ह करता येतात. यासाठी मोबाईलचा ॲक्सेस मिळावा लागतो. सायबर तज्ज्ञांच्या मते, व्हॉट्सॲपच्या डाटा सुरक्षा धोरणात अनेक गोष्टी आहेत. जर मोबाईल फोनमधून व्हॉट्सॲप चॅट डिलीट होतं किंवा केलं जातं, तेव्हा सायबर तंत्रज्ञानाने ते पुन्हा मिळवू शकतो. 

अशा प्रकरणातून डेटा सिक्युरिटी, डेटा ॲक्सेस असे प्रश्न समोर उभे राहिले आहेत. हे चॅट कुणाकडून ॲक्सेस करण्यात आले? एनसीबीसारख्या संस्थेने मोबाईलचा ॲक्सेस घेतला का? किंवा पोलिसांनी तो ॲक्सेस घेतला? हे सर्व चॅट कायदेशीर पुरावा म्हणून राहणार का? असे सवाल समोर उपस्थित राहत आहेत. त्यामुळे आपले संवाद, मॅसेज किती सुरक्षित आहेत?, याविषयीचे असंख्य प्रश्न व्हॉट्सॲप युजर्ससमोर उपस्थित झाले आहेत. 

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...