Saturday, January 9, 2021

HAPPY B'DAY विनोदाचा 'सम्राट' अशोक सराफ

 

अशोक मामांबद्दल काय बोलावं आणि किती लिहावं. अशोक सराफ यांच्याबद्दल लिहालं तितकं थोडेचं आहे. मराठी चित्रपटसृष्टीत विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ यांचा आजदेखील टिव्हीवर चित्रपट लागला की, प्रेक्षक अजुनही त्यांना पाहण्याची संधी गमावत नाहीत. गंभीर भूमिकांबरोबरच विनोदी चित्रपटात सहज अभिनय साकारणारा अभिनेता म्हणून त्यांची ख्याती. काही चित्रपटांतूनही ते खलनायकाच्या भूमिकेतही दिसले. परंतु, गंभीर आणि खलनायकांच्या भूमिकांपेक्षा त्यांच्या विनोदी भूमिका मात्र अधिक गाजल्या. दिसायला फारसे सुंदर नसले तरी बोलण्याची विशेष लकब आणि दमदार आवाजाने अशोक मामा यांची ओळख एक विनोदी कलाकार म्हणून कायमची सिनेसृष्टीवर उमटली. मुंबईत जन्मलेले अशोक सराफ मुळचे बेळगावचे आहेत. पण, त्यांचा जन्म ४ जून, १९४७ रोजी मुंबईत झाला. त्यांचे बालपणही तेथेच गेले. 

Ashok Saraf | Collection Of Best Comedy Scenes | Superhit Marathi ...

आज अशोक सराफ ७३ वर्षांचे झाले. तरीही, ते जणू तरूण अभिनेता असल्याचा भास आपल्याला आजही होतो. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून अद्यापही त्याचे वलय सिनेप्रेमींच्या आणि चाहत्यांभोवती निर्माण करणारे ते अशोक मामाचं होय. आपल्या वयापेक्षाही कमी अभिनेत्रींसोबत अभिनय जमवून घेणे आणि त्या-त्या भूमिकेत परफेक्ट बसण्याचे कौशल्य फक्त त्यांच्याकडेच आहे, असे म्हणायला हरकत नाही. छोट्या पडद्यावर येण्यापूर्वी रंगभूमीवरील त्यांचं सादरीकरण 'अफलातून'च आहे. तर संगीत नाटकातीलही त्यांच्या भूमिकांचे कौतुक करावं लागेल. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांचे रंगभूमीवर सादरीकरण केले. वि. वा. शिरवाडकरांच्या 'ययाती आणि देवयानी'ची कथेच्या सादराकरणात अशोक सराफ एक प्रतिभावंत कलावंत म्हणून उतरले. ययाती आणि देवयानी नाटकात त्यांनी विदूषकाची भूमिका साकारली होती.  

अशोक यांनी १९६९ मध्ये जानकी चित्रपटातून सिनेसृष्टीत प्रवेश केला. सुरूवातीला निळू फुलेंच्याबरोबर त्यांची चांगली जोडी जमली. 'फटाकडी', 'मोसंबी नारंगी', 'गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं', 'सासुरवाशीन', 'बिन कामाचा नवरा', 'कळत नकळत', 'माझा पती करोडपती' यांसारख्या चित्रपटांमध्ये निळू आणि अशोक यांच्या जोडीने धमाल उडवून दिली. 

Ashok Saraf

अशोक सराफ यांनी अडीचशेहून अधिक चित्रपट गाजवले. 'दोन्ही घरचा पाहुणा', 'जवळ ये लाजू नको,' 'तुमचं आमचं जमलं,' 'दिड शहाणे', 'हळदी कुंकू', 'दुनिया करी सलाम', 'पांडू हवालदार', 'कळत नकळत', 'भस्म', 'वजीर', 'चौकट राजा', 'अशी ही बनवा बनवी,' 'गोंधळात गोंधळ,' 'बिन कामाचा नवरा,' 'लपंडाव,' 'एक डाव भुताचा,' 'आम्ही सातपुते' यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी आपली वेगळी ओळख बनवली. 'नवरी मिळे नवऱ्याला',' आत्मविश्वास', 'गंमत जंमत', 'आयत्या घरात घरोबा'पासून, 'शुभमंगल सावधान', 'आई नंबर वन' व 'एक शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर' यांसारख्या चित्रपटांसून वेगळ्या भूमिका साकारून त्यांनी हम भी किसीसे कम नहीं हे दाखवून दिले.     

Aga Aga Mhashi (Rit Zali Ka Hi Rit Zali) - Ashok Saraf, Ranjana ...

'चौकट राजा'ची मैत्री 

मराठी चित्रपटसृष्टीत मैत्रीचा संदर्भ आला की, अशोक शराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे या कलाकारांची नावे समोर येतात. नव्वदच्या दशकात या कलाकारांची मैत्री चित्रपटाच्या माध्यमातून आपण पाहिलीच आहे. लक्ष्या, सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ, या त्रिकूटालाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. 'अशी ही बनवाबनवी,' 'भूताचा भाऊ', 'आयत्या घरात घरोबा' अशा अनेक चित्रपटात या त्रिकूटाची धम्माल पाहायला मिळाली. ‘अशी ही बनवाबनवी’ वर प्रेक्षक अक्षरश: फिदा झाले. या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्‍यावर घेतले. लक्ष्मीकांत बेर्डेबरोबरची त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने 'अशी ही बनवाबनवी', 'धूमधडाका' यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली. 

Lakshmikant Berde |Latest news and wiki – StarsMarathi.Com

टीव्ही मालिका 

'ये छोटी बडी बातें,' 'हम पाच' यासारख्या टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी अभिनय साकारला.   

ठाकुर तो गियो' कहने वाले इस एक्टर ने ...

हिंदी चित्रपटसृष्टीतील आठवणीतील भूमिका 

अशोक यांनी मराठी चित्रपटांबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. 'करण-अर्जुन', 'येस बॉस', 'प्यार किया तो डरना क्या,' 'गुप्त,' 'कोयला,' 'जोरू का गुलाम,'  'सिंघम’ यांसारख्या हिंदी चित्रपटांतूनही त्यांनी विविध भूमिका साकारल्या. राकेश रोशन यांचा १९९५ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट 'करण अर्जुन'मध्ये अशोक यांनी 'मुन्शीजी'ची भूमिका साकारली. त्यांची ही भूमिका आजही सिनेप्रेमींच्या आजही लक्षात आहे. तर 'येस बॉस'मध्ये शाहरूख खानच्या मित्राची भूमिका त्यांनी साकारल्या. 'सिंघम'मध्ये अजय देवगनसोबत एका पोलिस कॉन्स्टेबलची भूमिका करून त्यांनी अजयसोबतच आपलीदेखील प्रतिमा पुन्हा एकदा उंचावली. 

अशोकसराफ hashtag on Twitter

जमली जोडी 

अभिनेत्री उषा चव्हाण, सुष्मा शिरोमणी, रंजना, वर्षा उसगावकर, रेखा राव, आश्विनी भावे, निवेदिता जोशी,रिमा लागू, अलका कुबल, सुप्रिया पिळगावकर अशा हरहुन्नरी अभिनेत्रींसोबत अशोक यांनी वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केले. 

Cineknowledge marathi movie quiz guess this reema lagoo and ashok ...

अशोक सराफ संपूर्ण मराठी फिल्म ...

अशोक सराफ यांची अर्धांगिनी  

सुरूवातीला अनेक चित्रपटांमध्ये अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांनी एकत्र काम केले. त्यामुळे त्यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. पुढे त्यांनी लग्न केले. 'मामला पोरीचा,' 'फेका फेकी,' 'माझा छकुला'सह 'नवरी मिळे नवऱ्याला', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी,' 'तुझी माझी जमली जोडी,' 'धुम धडाका,' 'अशी ही बनवाबनवी,' अनेक चित्रपटांमध्ये अशोक सराफ आणि निवेदिता यांनी एकत्र काम केले.

अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या वयात १८ वर्षांचे अंतर आहेत. अशोक मामा आणि निवेदिता यांनी गोव्यात लग्न केले होते. त्यांचे लग्न प्रसिद्ध मंगेश मंदिरात झाले होते. निवेदिता जोशी-सराफ आणि अशोक सराफ यांनी मिळून एक निर्मिती संस्था स्थापन केली. 'टन टना टन' (मराठी) आणि काही हिंदी मालिकांची निर्मिती त्यांनी या संस्थेर्गत बनवल्या होत्या. अशोक मामांना एक मुलगा असून त्याचे नाव अनिकेत आहे. तो एक उत्तम शेफ आहे. अनिकेतचे शिक्षण फ्रान्समध्ये झाले असून तो पाश्चिमात्य पद्धतीचे उत्तम जेवण बनवतो. 

Ashok Saraf Wiki, Age, Wife, Family, Biography & More – WikiBio

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...