Thursday, July 14, 2022

शून्यातून गरूडझेप घेणारे उद्योजक

 एखादा उद्योजक यशाचे शिखर गाठण्यामागे अपार मेहनतचं नाही तर सहनशीलताही खूप महत्त्वाची आहे. एखादं ध्येय साध्य करण्यासाठी जीवतोड मेहनत लागते. त्यामध्ये खूप सारे दु:ख आणि संकटांच्या काट्यांवरून चालावं लागतं. कधी कधी खूप मोठ्या नुकसानीलाही सामोरे जावे लागते. तर कधी आनंदाचा 'गोल्डन पिरीयड' सुरू होईल, सांगता येत नाही. पण, शून्यातून विश्व निर्माण करणे इतकी सोपी गोष्ट नाहीये. हे विश्व निर्माण करणारे यशस्वी उद्योजक म्हणजे मधवाचार्य. त्यांनी आपल्या कष्टाच्या पंखांना बळ देऊन उद्योग जगताच्या आकाशी मोठी झेप घेतली. कधी कधी लोकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. पण, मधवाचार्य यांनी हार मानली नाही. नेटाने उद्योग पुढे नेण्यासाठी आयुष्यातील सर्व चढ-उतार पार केले. मधवाचार्य हे कर्नाटकातील प्रसिध्द उद्योजक, ज्यांच्या हाताखाली सध्या १४०० कामगार कार्यरत आहेत. इतका मोठा उद्योजक असूनही जमिनीवर राहणारे मधवाचार्य म्हणून त्यांची ख्याती आहे.  

मधवा नरसिंह आचार्य हे बेळगावातील प्रसिध्द उद्योजक आहेत. कष्टातून उभारलेल्या एका इंडस्ट्रीचे रुपांतर आता ५ वेगवेगळ्या प्लँटमध्ये झाले आहे. नरंसिंह कृष्णा आचार्य हे त्यांचे वडील होते. तेही एका राईस मिलचे मालक होते. पण, वाईट काळाने झप घातली आणि एका दिवसात वडिलांच्या उद्योगात एका व्यक्तीकडून फसवणूक करण्यात आली. तेथून पुन्हा नव्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला.    

मधवा यांचा जन्म अथणी येथे झाला. मुळचे गाव बोमरहरळी ता. हणगल, धारवाड जिल्ह्यातील आहे. सध्या ते बेळगाव येथे स्थायिक झाले. मधवा यांचे दहावीपर्यंत शिक्षण अथणीमध्ये झाले. पुढे पदवीचे शिक्षण बेळगावात झाले. पदवीनंतर नोकरी न करता त्यांनी उद्योग करायचा ठरवलं. हातात फारसे भांडवल नसतानाही मधवा यांनी एक यशस्वी उद्योजकापर्यंत जी मजल मारली आहे, ती वाखाणण्याजोगे आहे.  

१९८० मध्ये भावाने मदत केल्यानंतर १९८१ मध्ये एखादा उद्योग सुरू करावा असा विचार आला. आता फौंड्री (बीड आणि स्टील दोन्ही काढले जातात), मशीनिंग (सीएनसी), हिट ट्रीटमेंट असे कारखाने आहे. आता मुलगा सगळे प्लँट बघतो. ब्राह्मण भिक्षुक होते. ते पुरोहिताचे काम करायचे. त्याला 'गोपाळ' असे म्हणतात. 

वडिलांची राईस मिल होती. चौघे भाऊ आणि दोन बहिणींचा सांभाळ वडिलांनी खूप कष्टातून केले. वडिलांना उद्योगधंद्यात एक व्यक्तीने फसवणूक केली. एका दिवसात हा उद्योग होत्याचं नव्हतं झालं. म्हणून ते मंत्रालय या गावी गेले. मंत्रालय हे रायचूर जिल्ह्यातील आंध्र प्रदेशच्या सीमेवर एक मठ आहे. राघवेंद्र स्वामींचा हा मठ होय. याचे मुळचे जे वृंदावन आहे, त्याला मंत्रालय असे म्हणतात.  तेथे त्यांना सांगण्यात आले की, अथणी गावात जावा. येथे अथणी गावात मठामध्ये चार पाच महिने राहिले. त्यानंतर भाड्याने घर घेऊन पुन्हा जीवन सुरू केलं. पुढे काय करायचं. 

एकाकडून झालेल्या  फसवणुकीत सगळा उद्योग गेल्यामुळे पुढे काय करायचं म्हणून वडील राघवेंद्र मटात गेले होते. तेव्हा मधवा यांचा जन्म झाला नव्हता. तेथे त्यांनी अथणी दिशेचा मार्ग दाखवला, स्वामींचे मार्गदर्शन मिळाले. म्हणून वडील अथणीला आले. येथे मधवा यांचा जन्म झाला.  अथणीत आल्यानंतर माणुसकीचे दर्शन घडले. इथे मुलांना जेवण दिलं, राहायचा व्यवस्था केली. मुलांचं चांगल व्हावं, यासाठी मदत केली आणि आशीर्वादही दिले. अथणीच्या लोकांनी शिक्षणासाठी पैसे दिले. फी भरले. शाळेत पुस्तके दिली. शिकता शिकता मधवा यांच्या भावाने एमबीबीएसचे शिक्षण घेतले. नंतर भाऊ आपल्या कुटुंबाला हातभार लावला. 

बालपणापासून वेद शिकण्याचे मिळाले धडे 

वयाच्या ९ व्या वर्षांपासून वेद शिकायला सुरुवात केली होती. त्याआधी इतर मोठ्या भावांनी वेद शिकले होते. ते वेदअध्ययन करत होते. त्यामुळे घरोघरी ते पूजेला जायचे. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा.                                                                

एका डॉक्टरांना स्मरून तर त्यांनी आपली आठवण अद्यापपर्यंत जपलीय. एक डॉक्टर अनंतराव देशपांडे होते, त्यांनी एक पैसाही न घेता फुकटमध्ये उपचार केले होते. त्या भल्यामाणसाचे ऋण अद्यापपर्यंत आपल्यावर असल्याचे मधवा म्हणतात. 

वेदमध्ये स्त्रोत्र, मंत्र असत. मुंज, होम हवन, लग्नाच्या विधी भावांनी शिकले होते. वेगवेगळे स्त्रोस्त्र मधवा हे शिकले. वेद शिकल्याचा आनंद झाला. आपल्या आई-वडिलांमुळे आपण शिकलो, मोठे झालो, असे सांगताना ते भावूकही झाले. 

बीएससीचे शिक्षण घेतल्यानंतर जे. एम. कुलकर्णी नावाच्या गृहस्थाच्या घरी शिकायला जात असते. तेथे पूजा करायचे, जेवायचे आणि नंतर कॉलेजला जायचे. सलग २८ वर्षे चौघा भावांना जेऊ-खाऊ दिलं.  जे. एम. कुलकर्णी हे तहसीलदार ऑफिसमध्ये क्लार्क म्हणून काम करायचे. नंतर ते तहसीलदार होऊन निवृत्त झाले.  

डॉक्टर माणूस 

घरामध्ये भांडी घसायला एक बाई डॉक्टरांकडे कामासाठी होती. ती  एकदा रडत आली आणि म्हणाली की, माझा मुलगा आजारी आहे. तो तुच्याकडे येऊ शकत नाही, अशा स्थितीत आहे. डॉक्टर साधे होते. सायकलवरून ते तिच्या घरी गेले. त्यांनी तिच्या मुलाला अंडे  देण्यास सांगितले. त्यावेळी ती म्हणाली, माझ्याकडे इतके पैसे नाहीत, की मी त्याला चांगलं जेवण देऊ शकेन. यावर डॉक्टर म्हणाले, माझ्या दवाखान्यात येऊन कम्पाऊंडरकडून रोज आठ आणे घेऊन जा. यानंतर ती रोज महिला रोज आठ आणे घेऊन जायची. १५ दिवसांनंतर जाऊन डॉक्टरांनी पाहिलं तर त्या मुलाच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली नव्हती.  

तर त्या मुलाची प्रकृती ठिक नव्हती. तिला विचारलं तर ती म्हणाली की, अंडे दिले. पण दरडावून विचारल्यानंतर तिने कबूल केले की, तिने अंड्याचे पैसे अन्य ठिकाणी खर्ची केले आहेत. म्हणून मी अंडे देऊ शकलो नाही. डॉक्टर संतापले. ती महिला पाया पडू लागली की, असं करू नका. माझ्या मुलाला काही करून वाचवा. ते पुन्हा तिच्या घरी जाऊन मुलावर उपचार केले आणि त्या मुलाचे प्राण वाचवले. इतका दयाळू डॉक्टर त्याकाळी मधवा यांनाही भेटला. इतकं मोठं मन करून डॉक्टरांनी माणूसकी दाखवली. या देवमाणसाथी मधवा यांची मैत्री असणं भाग्यचं. 

(गोपाळ मागणे म्हणजे प्रत्येक ब्राह्मणाच्या घरी जाऊन विष्णू सहस्त्रनाम म्हणून एक स्त्रोत्र असतो, हे म्हणत जायचे आणि भात, जोंधळ दिले जायचे.) 

विष्णू (उद्योजक), वामन (डॉक्टर), सुभद्रा आणि गौरी असे बहिण-भावंडे आहेत. 

मादुकरी मागणे म्हणजे मुंज झाल्यानंतर ब्राह्मणांच्या घरी जाऊन ओम भिक्षांदेही म्हणून भिक्षा मागायची असते. मधवा यांना खूप साऱ्या लोकांनी मदत केली. 

दु:खाचे प्रसंग कधीही नाही विसरू शकत 

एका शेजाऱ्याने एका स्टीलच्या भांड्यातून एक पदार्थ घालून दिला होता. ते भांड त्या शेजाऱ्याला परत केलं गेलं. पण, त्या शेजाऱ्यांनी म्हटले की, तुम्ही हे स्टीलचे भांडे परत दिलेला नाही. तेव्हा वडिलांनी घरातील स्वत:चे स्टीलचे भांडे विकून त्या शेजाऱ्याला नवे भांडे आणून दिले. वडील स्वाभिमानी होते. 

तहसीलदार ऑफिसमध्ये जेव्हा वडील गेले, तेव्हा ते अगदी साध्या कपड्यांमध्ये (पंजा घालून) गेले होते. तासभर बाहेर बसल्यानंतर जी. एम. कुलकर्णी यांनी येऊन वडिलांना विचारले. तुम्ही कुठून आला? काय काम आहे? वडील म्हणाले, मला माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी उत्पन्नाचा दाखला हवाय. त्यानंतर तेवढी ओळख ठेवून वडिलांना घराकडे बोलावलं. ते म्हणाले, तुमच्या मुलाला माझ्याकडे ठेवा आणि गावाकडे जावा. तेव्हापासून ते जवळचे झाले. जीवनामध्ये इतकी चांगली माणसं लाभली.  



No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...