Wednesday, August 16, 2023

HBD Jacqueline Fernandez : भारतात येण्यापूर्वी काय करायची श्रीलंकन ब्युटी जॅकलिन



जॅकलीन फर्नांडिसचा आज ११ ऑगस्ट रोजी ३८ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. जॅकलीनची श्रीलंका टू इंडियाची प्रवास आणि मग तिची बॉलीवूडमध्ये एंट्री कशी झाली, माहितीये का? जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) चा जन्म ११ ऑगस्ट १९८५ रोजी कोलंबो, श्रीलंका (Colombo, Sri Lanka) मध्ये झाला होता. तिचे प्राथमिक शिक्षण बहरीन (Bahrain) मध्ये झाले आणि ती मास कम्युनिकेशन कोर्ससाठी ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी गेली. (Jacqueline Fernandez)

चित्रपटात येण्यापूर्वी पत्रकार होती जॅकलीन

जॅकलीनला बालपणापासून अभिनेत्री व्हायचं होतं. तिने हे अनेक मुलाखतीत सांगितलं आहे. चित्रपटामध्ये आवड असल्याने तिने जॉन स्कूल ऑफ ॲक्टिंगमध्ये प्रवेश घेतला. खूप कमी लोकांना ही माहिती असेल की, चित्रपटात  येण्यापूर्वी जॅकलीन एक पत्रकार होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोर्स पूर्ण झाल्यानंतर ती श्रीलंकामध्ये आली. तिने रिपोर्टिंग करत करत मॉडलिंगदेखील केले. तिने अनेक सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला. २००६ मध्ये तिने मिस युनिव्हर्स श्रीलंकाचे मुकूट आपल्या नावे केले. एक यशस्वी मॉडल झाल्यानंतर जॅकलीनला विदेशात प्रोजेक्ट मिळू लागले. ती २००९ मध्ये एका मॉडलिंग असाईनमेंटसाठी भारत आली. यादरम्यान, सुजॉय घोषच्या 'अलादीन' चित्रपटासाठी ऑडिशन दिलं आणि तिची निवड झाली. पुढे तिला 'मर्डर २' मध्ये भूमिका मिळाली. चित्रपटांबरोबरचं तिने हिट अल्बम केले. अल्बम GF-BF, 'मेरे अंगने में 2.0', बादशाह सोबत 'गेंदा फूल' 'पानी-पानी' यासारख्या गाण्यातून प्रसिद्धी मिळवली.

त्यानंतर तिने बॉलीवूडच्या अनेक चित्रपटात अभिनय केला. यामध्ये 'हाउसफुल २', 'रेस २', 'किक', 'जुडवा २', 'हाउसफुल ३', 'भूत पुलिस' आदी चित्रपटांचा समावेश आहे. २०१० मध्ये तिला बेस्ट डेब्यू अभिनेत्रीचा ॲवॉर्ड मिळाला होता.

जॅकलीनचे नाव दिग्दर्शक साजिद खानशी जोडले गेले होते. दोघांच्या रिलेशनशिपवरून अनेक वृत्त समोर आले होते. सध्या जॅकलीन महाठग सुकेश चंद्रशेखरमुळे चर्चेत आहे. 

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...