नूतन प्रशांत गायधने या नव उद्योजिका. मुळच्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील राह..ऱ्या ..हेत. सध्या त्या मुंबईमध्ये राहतात. वयाच्या २८ व्या वर्षी आपला संसार, नोकरी सांभाळत त्यांनी चहा बिस्किट कप बनवण्याचे नवे स्टार्ट अप सुरु केले. २ वर्षे या उद्योगात त्या असून नवनवीन प्रयोग करत हा व्यवसाय वाढवणे आणि त्याचा विस्तार करत स्टार्टअप यशस्वी करण्याचे ध्येय त्यांनी बाळगले आहे. कमी शिक्षण सतानाही त्यांनी धाड्साने चहा बिस्किट कप बनवण्याचे नवे स्टार्टअप सुरू केले.
अशी झाली सुरुवातत्या सुरेश इंदू लेझर मॅन्युफॅक्चर या कंपनीत मार्केटिंग विभागात सेल्स एक्झीक्यूटिव्ह काम करतात. नूतन यांनी बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेऊ शकल्या नाहीत. बारावी नंतर नोकरी करायचं ठरवलं. संगणकाचे ज्ञान घेत टॅली, एमएससीआयटीचे कोर्सेस पूर्ण केलं. छोटी-मोठी नोकरी करत त्यांनी अनुभवाच्या जोरावर चांगली नोकरी मिळवली. तर त्यांचे पती प्रशांत गायधने ऍमेझॉनमध्ये डिलिवरी बॉय चे काम करायचे. पण पगार परवडत नसल्याने नूतन यांनी पतीला नोकरी सोडायला लावली. कोविड पर्यंत ही नोकरी सुरु होती. पण नंतर करायचं. काय ? असा प्रश्न समोर उभा होता. नूतन यांनी आपल्या संसारासोबतच नवीन स्टार्टअप करायचं ठरवलं. गायधने कुटुंब अंधेरीला शिफ्ट झाले. या परिसरात समुद्र आहे. मग ठरलं की. चहा आणि भेलपुरीचा व्यवसाय सुरू करायचा. त्याप्रमाणे प्रशांत यांनी समुद्रावर चहा आणि पुणेरी ओली भेळ विक्रीचा व्यवसाय केला. मात्र, इतक्यात संसाराचा गाडा चालवणं, फार कठीण होतं.
दरम्यान, कोल्हापुरच्या दिग्विजय गायकवाड यांची जाहिरात टीव्हीला पाहिली. त्यांच्याकडून बिस्किट चहा कप मागवले. त्याचा खप वाढला. म्ह...न चहा बिस्किट बनवारी १२ कपांची चार लाख रुपयांची चायनीज मशीन दिल्लीहून मागवली. चायनीज मशीन सारखी बंद पडायची. संपकर् केला तरी त्या कंपनीचे इंजिनिअर्स प्रतिसाद देन नसत. यामध्ये अपयश मिळाले. पुढे कोल्हापूरचे दिग्विजय गायकवाड यांनी स्वतः तयार केलेली ४९ कपांची चहा बिस्किट कप मशीन नूतन यांनी साडे सात लाख रुपयांना खरेदी केली.
सुरुवातीला या कपांचे मार्केटिंग आणि डिस्टीब्युशन मुंबई - सोलापूर- कोल्हापूरमध्ये स्वतः गाडीवरून फिरून केले. पुढे आर्थिक गणित कोलमडले. पण त्यांनी हार न मानता हे काम पुढे सुरू ठेवायचे ठरवलं. रात्री ऑर्डर आली की पहाटे ३-४ वाजेपर्यंत ऑर्डर तयार करून दिली जाते.
असे तयार होतात चहा बिस्किट कप
आरे कॉलनीत एका इमारतीत १० बाय १५ च्या रुममध्ये ही मशीन बसवली. एकावेळी हे कप बनवण्यासाठी ९ मिनिटांचा कालावधी लागतो. प्रत्येक दिवसाला ३० किलो मटेरियलमध्ये १२००-१५०० कप यार होतात. इलायची, कॉफी, वेनिला, चॉकलेट अशा विविध फ्लेवरमध्ये हे कूप बनवले जातात. चॉकलेटमध्ये कपावर चॉकलेटचे कोटिंग करून दिले जाते. यात मागी...धिक आहे. चहा बिस्कीट कप तयार करताना कोणतेही केमिकल मिसळले जात नाही. हे लिक्विड स्वरुपात पलेवर असतात. कस्टमरची मागणी असेल तर हे चहा बिस्किट कप स्ट्रॉबेरी फ्लेवर, बटरस्कॉच फ्लेवरमध्ये तयार करून दिले जातात.
अडचणींवर अशी केली मात
दिग्विजय यांनी मशीनचे प्रशिक्षण दिले. जेव्हा प्रत्यक्षात गायधने जोडप्याने काम सुरु केलं तेव्हा ते कप व्यवस्थित बनत नसत. कप तयार करायला तुटायचे. त्यामुळे संपूर्ण साहित्य वाया जायचे. पण वारंवार प्रयत्न करून शिकून किती साहित्य लागतं, प्रत्येक साहित्याचे प्रमाण कसे ठेवायचे याचा अभ्यास करून त्यांना अखेर कप बनवण्यात यश मिळाले. १० किलो मटेरिअलमध्ये कप बनवायाला अडीच तास लागतात. च्यासाठी फ्लेवर, बाजरी, नाचणी, मैदा, पाणी, कॉर्नफ्लॉवर, साखर असे कच्चे साहित्य लागते. कोणतेही केमिकल नसल्यामुळे कपची गुणवत्तादेखील उत्तम राहते. तसेच मशीनमध्ये कप बनून जेव्हा बाहेर पडतात, तेव्हा शिल्लक राहिलेले पदार्थ वाया जात नाही. ते गाईला खायला दिलं जातं. त्यामुळे हे मटेरिअल वाया जात नाही.
राज्य आणि देशभरातून मागणी
हे कप फक्त चहासाठी नाही तर केकसाठी, कुल्हड पिझ्झा साठी, आईस्क्रिमसाठी वापरता. त्यामुळे स्थानिक पातळीवर आणि राज्य, देशभरातून या कपांना वाढती मागणी आहे. लुधियाना, झारखंड, बिहार, इंदौर, हैदराबाद, दिल्ली, राजस्थान, उत््तर प्रदेश नागपूर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, नाशिक, परभणी या ठिकाणी आॅर्डर पाठवली जाते. शिवाय लोकल मार्केट - अमृततुल्य चहासाठी, कोल्हापूर- श्रीमंत चहासाठी, मुंबईतील बारसाठी, मोठमोठे कॅफेमध्ये छोट्या-मोठ्या हे बिस्किट कपांची मागणी आहे. नूतन हे मार्केटिंग पाहतात आणि प्रोडक्शन प्रशांत गायधने पाहतात.
कस्टमरची पसंती
सध्या बाजारात पेपरकपमधून जो चहा दिला जातो, त्यात प्लास्टिकचे कण दिसतात. ते आरोग्यास हानिकारक आहेत. हे लक्षात आल्यानंतर नूतन यांनी चहा बिस्किट कप बनवले, ज्यामधून चहा घेता येईल शिवाय बिस्किट पण खाता येईल. हे बिस्किट खारी सारखी चवीला वाटते. त्यामुळे जे जे कस्टमर हे कप वापरतात त्यांनी या कपांना खूप पसंती दर्शवलीय. तसेच पोट देखील भरतं. या बिस्किट कपांची क्रेझ देखील सध्या बाजारात मध्ये आहे.
आपला उद्योग सर्वदूर पोहोचवण्यासाठी त्य़ांनी अविरतपणे काम सुरु ठेवले आहे. कस्टरमला जे प्रोडक्ट देणार ते उत्तम असले पाहिजे आणि कस्टमर आपल्या उद्योगाशी कायमचा जोडला गेला पाहिजे, असा प्रयत्न नूतन प्रशांत गायधने यांचा आहे.
No comments:
Post a Comment