Friday, August 24, 2018

वाजपेयींनी दिलेली अणुचाचणीची माहिती, 'परमाणु'ने दाखवला सीन







माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच नाव राजकारणात मोठं आहे. भाजप पक्षाचे अध्‍यक्ष ते पंतप्रधान असा त्‍यांचा राजकीय प्रवास मोठा आहे. १९९८ मध्‍ये ज्‍यावेळी वाजपेयी पंतप्रधान होते. त्‍यावेळी त्‍यांच्‍या नेतृत्‍वाखाली भारताने अणुचाचणी केली होती. अणुचाचणीने जगभरात खळबळ माजली होती. 

ही घटना जॉन अब्राहमचा चित्रपट 'परमाणु'मध्‍ये दाखवण्‍यात आली आहे. सत्य घटनेवर आधारित परमाणु चित्रपटात जॉनने IAS अधिकारी रैनाची भूमिका साकारली आहे. 
१९९८ साली भारताने एकूण ५ चाचण्या केल्या होत्या.११ मे १९९८ ला राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातल्या पोखरण शहरात तीन अणुचाचण्या केल्या. मग दोन दिवसांनी १३ मे राजी आणखी दोन चाचण्या केल्या. या तीन अणुचाचण्‍यांनी सगळ्या जगाला आश्चर्याचा धक्काच बसला. न्‍यूक्‍लियर राष्‍ट्रांच्‍या यादीत भारताचे नाव समाविष्‍ट झाले. ही घटना देशासाठी अभिमानाची होती. या अणु चाचण्यांनंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २० मे ला पोखरणला भेट दिली होती. 
अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना न्यूक्लियर स्टेटला हिरवा कंदील दाखवला होता. ११ मे ला दुपारी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सरकारी घर ७ रेस कोर्समध्‍ये एक पत्रकार परिषद बोलावली होती. या परिषदेत त्‍यांनी अणुचाचणी योजनेची माहिती माध्‍यमांना दिली होती. 
अटल बिहारी वाजपेयी हे या अणुचाचण्‍यांचे श्रेय माजी पंतप्रधान पी. व्‍ही. नरसिंह राव यांना देतात. राव यांना श्रद्धांजली देताना अटल यांनी म्‍हटलं होतं की, ‘मे १९९६ मध्‍ये राव यांच्‍यानंतर मी पंतप्रधानपदाची खुर्ची सांभाळली. त्‍यावेळी राव मला म्‍हणाले होते की, बॉम्‍ब तयार आहे.’ 
तसेच अनेक भाषणांमध्‍ये वाजपेयी यांनी अणुचाचणीचे श्रेय ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर. चिदंबरम आणि एपीजे अब्‍दुल कलाम यांना दिलं होतं.  

Thursday, August 16, 2018

शिल्‍पकलेचा अप्रतिम नमुना : खिद्रापूरचे कोपेश्‍वर मंदिर





शिरोळ तालुक्‍यातील खिद्रापूर येथील प्राचीन कोपेश्‍वर मंदिर. चालुक्‍य शिल्‍प स्‍थापत्‍यशैली दर्शन यातून घडते. मंदिर सद्‍यस्‍थितीत सुस्‍थितीत असले तरी पावसाळ्‍यात या मंदिरातील पडझड झालेल्‍या स्‍तंभांना, कमानीला धोका पोहोचण्‍याची शक्‍यता आहे. कलेचा अप्रतिम नमुना असलेल्‍या मंदिराचे संरक्षण, संवर्धन अपरिहार्य बनले आहे. त्‍यामुळे पर्यटन विभागाने या परिसराच्‍या विकासाकडे लक्ष देण्‍याची तर पुरातत्‍व विभागाने या मंदिराची देखभाल करण्‍याची आवश्‍यकता आहे. 

Image result for khidrapur
कोपेश्‍वर मंदिराला केंद्रीय पुरातत्‍व विभागाने २ जानेवारी १९५४ रोजी महाराष्‍ट्रातील राष्‍ट्रीय संरक्षित स्‍मारक म्‍हणून घोषित केले. कोपेश्‍वर मंदिर अप्रतिम स्‍थापत्‍यशैलीसाठी प्रसिध्‍द आहे. बेसॉल्‍ट आणि ग्‍लास पॉलिशिंग केल्‍याप्रमाणे या मंदिराचे बांधकाम आहे. पावसाळ्‍यात ऊबदारपणा आणि उन्‍हाळ्‍यात गारवा टिकून राहावा, त्‍यादृष्‍टीने तत्‍कालीन स्‍थापत्‍य विशारदांनी केलेला प्रयत्‍न येथे दिसून येतो. 
कोपेश्‍वर मंदिराची वैशिष्‍ट्‍ये
या मंदिराचे वैशिष्‍ट्‍ये म्‍हणजे गजपट्‍ट असणारे हे भारतातील एकमेव मंदिर आहे. 
उत्‍कृष्‍ट शिल्‍पकलेचा अविष्‍कार पाहता या मंदिराची तुलना खजुराहोच्‍या मंदिराशी केली जाते. या स्‍थानाचे मूळ नाव कोप्‍पम किंवा कोप्‍पद होते. पण, मोगल सरदार खिद्रखान मोकाशीने कोप्‍पम जिंकल्‍यानंतर त्‍याच्‍या नावावरून खिद्रापूर असे नाव त्‍याला मिळाले. येवूर (जि. विजापूर) येथील शिलालेखात कोपेश्‍वराचा उल्‍लेख मिळतो. तसेच एका ताम्रपटातही या मंदिराचा उल्‍लेख सापडतो.
Image result for khidrapur
मंदिरात २ शिवलिंग
गाभार्‍यात कोपेश्‍वर (महेश) आणि धोपेश्‍वर (विष्‍णू) अशी दोन शिवलिंगे आहेत. याला लागूनच सभामंडप आहे. सभामंडपावर सहा दगडी गवाक्ष असून हे वैशिष्‍ट्‍य असणारे हे असे एकमेव मंदिर आहे. या मंदिरात नंदी नाही, हे त्‍याचे दुसरे वैशिष्‍य होय. मंदिराचे वेगळेपण म्‍हणजे स्‍वर्गमंडपाची रचना. या मंडपाबाहेर २४ हत्तींची मूळ रचना होती. पैकी ११ हत्ती येथे पाहावयास मिळतात. चार प्रवेशद्‍वार आणि ४८ खांबांवर हे मंदिर उभारलेले असून मंदिराच्‍या दर्शनी भागात आकाशाच्‍या दिशेने १३ फूट व्‍यासाचे गवाक्ष आहे. त्‍याच मापाची खाली रंगशिला (गोलाकार दगडासारखी) असून त्‍याभघेवती १२ खांब वर्तुळाकृती आढळतात. मंदिरावर नर्तिका, वादक, शस्‍त्रधारी द्‍वारपाल, सप्‍तमातृकांच्‍या प्रतिमा आहेत. यावरून, तत्‍कालीन समाजातील स्‍त्रियांना असणारे उच्‍च स्‍थान समजते. 
Related image
मंदिर परिसरात १२ शिलालेख
मंदिर परिसरात १२ शिलालेख असून त्‍यातील ८ शिलालेख कन्‍नड भाषेतील आहेत. त्‍यापैकी एक संस्‍कृतमध्‍ये, दुसरा देवनागरीत आहे. पहिला शिलालेख नगारखान्‍याच्‍या दक्षिण बाजूच्‍या विरगळावर जुन्‍या कन्‍नड भाषेत लिहिले आहे. आणखी एका शिलालेखात कोपश्‍वराची स्‍थिती, कुसुमेश्‍वर, कुटकेश्‍वर या नावांचा उल्‍लेख मिळतो. 
दक्षिण स्‍थापत्‍यशैलीचा प्रभाव
मंदिरात प्रवेश करताना नगारखाना, स्‍वर्गमंडप, सभामंडप, अंतराळ, गाभारा असे बांधकाम दिसते. मंदिराच्‍या पायथ्‍याशी खुरशिला, गजपट्‍ट त्‍यावर नरपट्‍ट आणि त्‍यावरील देवकोष्‍ट (चौकट असल्‍यासारखे) आणि नक्षीकाम अशी रचना दिसते. मंदिराचे शिखर गोपुरासारखे असल्‍याने दक्षिणेतील स्‍थापत्‍यशैलीचा प्रभाव दिसतो. 
मंदिरावरील भवानी, काळभैरव, विष्‍णू, ब्रम्‍हदेव, चामुंडी, गणपतीची मूर्ती ही हिंदू देवदेवता, पंचतंत्रातील कथा तर उत्तरेच्‍या बाजूस घंटा वादिका, अहिनकुल (साप-मुंगुस), मिथून शिल्‍प आदी शिल्‍पे जैन मंदिराची वैशिष्‍ट्‍ये दशर्वणारी आहेत.  
Image result for khidrapur
मंदिरात आढळते आखाती शिल्‍प 
मंदिरावर इराणी किंवा आखाती व्‍यक्‍तीचे शिल्‍प आहे. इराणचा बादशहा  दुसरा खुस्रो याने राजदुतामार्फत चालुक्‍य दरबारी नजराणा पाठवला होता, असे जाणकार सांगतात. यावरून, चालुक्‍यांचे इराणशी संबंध होते, असे दिसते. या भेटीचे प्रतिक म्‍हणून त्‍या इराणी राजदुताचे शिल्‍प कोरले असावे. 
Image result for khidrapur
सप्‍टेंबर, १७०२ मध्‍ये मोगल बादशाह औरंगजेबने केलेल्‍या आक्रमणात येथील मूर्तींची मोडतोड केली. २००५ साली आलेल्‍या महापुरातदेखील मंदिर सुस्‍थितीत राहिले होते. मध्‍यंतरी, स्‍वर्गमंडप, काही स्‍तंभाची पडझड झाली होती. पुरातत्‍व विभागाने त्याची डागडुजी केली होती. आता आर्किलाजिकल सर्वे ऑफ इंडियाचे मंदिराच्‍या भोवती तटबंदीचे काम सुरू झाले असून हे बांधकाम पूर्ण होत आले आहे. हे काम गेली १० वर्षे सुरू होते. 
पर्यटन केंद्र म्‍हणून आजही दुर्लक्षित 
‘‘धार्मिक पर्यटन  केंद्र म्‍हणून आजही खिद्रापूर विकसित झालेले नाही. येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. परंतु, पर्यटकांसाठी येथे निवासाची सोय नाही. हॉटेल्‍स नाहीत. महिलांसाठी प्रसाधनगृह नाहीत. या सोई येथे होणे आवश्‍यक आहे.  पुरातत्‍व खात्‍याने मंदिरात आणि मंदिर परिसरात प्रकाश व्‍यवस्‍था करण्‍याची गरज आहे.’’ 
- प्रा. शशांक रामचंद्र चोथे (इतिहास संशोधक)

Image result for khidrapur














खिद्रापूरला जाण्‍याचा मार्ग 
 एसटीने पुढील तीन मार्गाने खिद्रापूर (ता. शिरोळ, जि. कोल्‍हापूर) येथे जाता येते. 
 हातकणंगले-शिरोळ-नृसिंहवाडी-कुरुंदवाड-अकिवाट-खिद्रापूर
कोल्‍हापूर-इचलकरंजी-कुरूंदवाड-अकिवाट-खिद्रापूर 
 कोल्‍हापूर-हुपरी-रेंदाळ-बोरगाव-दत्तवाड-सैनिक टाकळी-खिद्रापूर

'शोले'ची ४३ वर्षे







१५ ऑगस्‍ट १९७५ हा दिवस खास आहे. कारण, याच दिवशी चित्रपट 'शोले' बॉक्‍स ऑफिसवर हिट ठरली होती. आयकॉनिक, क्लासिक चित्रपटांमध्‍ये 'शोले' देखील समाविष्‍ट आहे. प्रसिध्‍द दिग्‍दर्शक रमेश सिप्पी यांच्‍या 'शोले' या चित्रपटात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, संजीव कुमार आणि जया बच्चन यांच्‍या भूमिका होत्‍या. ' शोले'ला ४३ वर्षे पूर्ण झाली आहेत. 

चित्रपटाची कथा, गाणी, डायलॉग्‍ज प्रसिध्‍द आहेत. 'शोले'ला बॉलिवूडमध्‍ये  ४३ वर्षे पूर्ण झाल्‍याने अभिनेते अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर काही फोटोज शेअर करून ट्‍विट केले आहे. हे फोटोज जुने आहेत. अमिताभ बच्चन यांनी फोटो आणि पोस्टर्स शेअर करत लिहिलयं की, 'शोलेची ४३ वर्षे, १५ ऑगस्टला रिलीज झाला होता.'

देशभक्‍तीवर आधारित 'हे' आहेत ९ चित्रपट








देशभरात आज ७२ वा स्वांतत्र्यदिन साजरा केला जात आहे. सगळीकडे उत्साह दिसत आहे. स्‍वातंत्र्याचं नवं रूप लोकापर्यंत पोहोचवण्‍यासाठी बॉलिवूडचेही योगदानही महत्त्‍वाचे आहे. बॉलिवूडमध्‍ये स्‍वातंत्र्य लढा आणि देशभक्‍तीवर आधारित चित्रपट आले. या नऊ चित्रपटांबद्‍दल जाणून घेऊयात.

आनंद मठ
गोल्डन इरा आणि १९५२ मध्‍ये आलेला चित्रपट ‘आनंद मठ’ बंकिम चंद्र चॅटर्जी यांच्‍या कादंबरीवर आधारित होता. ही कथा क्रांतिकारकांच्‍या स्‍वातंत्र्याच्‍या संघर्षाची होती. चित्रपटात बंकिंम चंद्र लिखित गाणेही दाखवण्‍यात आले होते. 
हकीकत
हा चित्रपट १९६४ मध्‍ये आला होता. ही कहाणी एका सैन्‍याच्‍या तुकडीवर आधारित होती. हे सैनिक लडाखमध्‍ये भारत-चीन युद्धाच्‍या दरम्‍यान, विचार करतात की, आता आपला मृत्‍यू निश्चित आहे. आणि त्‍यातील काही सैनिक कॅप्टन बहादूर सिंह यांना वाचवण्‍यात यशस्‍वी होतात. हा चित्रपट प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरला होता. 
Image result for haqeeqat movie 1964
शहीद (१९६५)
एस. राम शर्मा दिग्‍दर्शित या चित्रपटात मनोज कुमार यांनी सरदार भगतसिंग यांची भूमिका केली होती. याशिवाय, या चित्रपटात कामनी कौशल, प्राण, प्रेम चोप्रा, निरुपा रॉय आणि मदन पुरी देखील होते. या चित्रपटातील गाणी स्वातंत्र्य सेनानी राम प्रसाद बिस्मिल यांनी लिहिले होते. १३ व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार पटकावला होता. या चित्रपटानंतर त्यांनी 'उपकार', 'पूरब और पश्चिम', 'क्रांती' यासारखे चित्रपटही केले. 
Image result for manojkumar in film shahid poster
उपकार
देशभक्तीवर आधारित ‘उपकार’ हा चित्रपट १९६७ रोजी रिलीज झाला होता. मनोज कुमार आणि प्रेम चोप्रा यांच्‍या भूमिका होत्‍या. 
गांधी
महात्मा गांधी यांच्‍या आयुष्‍यावर आधारित 'गांधी' हा चित्रपट १९८२ मध्‍ये आला होता. हा चित्रपट रिचर्ड एटनबरोघ यांनी दिग्‍दर्शित केला होता. यात बेन किंग्सले यांनी गांधी यांची भूमिका केली होती. चित्रपटाने अनेक पुरस्‍कार आपल्‍या नावे केले होते. 
Image result for film gandhi
बॉर्डर
या चित्रपटाबरोबर या चित्रपटातील गाणीही हिट झाली होती. बॉर्डर १९७१ च्‍या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित होती. या चित्रपटात अनेक स्टार्स होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. 
Image result for border film
द लेजेंड ऑफ भगतसिंग (२००२)
२००२ मध्‍ये सरदार भगतसिंग यांच्‍या जीवनावर राजकुमार संतोषी यांनी बनवलेल्‍या चित्रपटात भगतसिंग यांची व्‍यक्‍तिरेखा अभिनेता अजय देवगनने साकारली होती. अजयच्‍या या भूमिकेचे कौतुकही झाले होते. याचशिवाय, चित्रपटातील गाणीही प्रसिध्‍द झाले होते. या चित्रपटात अजयसोबत सुशांत सिंह, अखिलेंद्र मिश्रा, राज बब्बर, फरीदा जलाल यांच्‍या भूमिका होत्‍या. पियूष मिश्रा यांनी चित्रपटाचे डायलॉग्‍ज लिहिले होते. या चित्रपटामध्ये इंग्रजांना लढा देण्यासाठी भगतसिंग यांनी लढलेला थरारक प्रवास याचं चित्रण करण्यात आलं होतं. या चित्रपटाला २ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच चित्रपटाला बेस्ट फिचर फिल्म म्हणून फिल्मफेअर अॅवॉर्डही मिळाला आहे.
Image result for film the legend of bhagat singh ajay devgan
लक्ष्य 
२००४ आलेला चित्रपट 'लक्ष्य' एक वेगळी कहाणी दर्शवतो. फरहान अख्तरच्‍या दिग्‍दर्शनाखाली बनलेल्‍या या चित्रपटात ऋतिक रोशनसोबत प्रीति जिंटा, अमिताभ बच्चन, ओम पुरी आणि बोमन ईरानी यासारख्‍या स्टार्सच्‍या भूमिका होत्‍या. या चित्रपटात ऋतिकने लेफ्टनंट करण शेरगिलची भूमिका केली होती. या चित्रपटाची कहाणी १९९९ च्‍या कारगील युद्धावर आधारित एक काल्पनिक होती. 
Related image
मंगल पांडे : द रायजिंग
२००५ मध्‍ये हा चित्रपट आला होता. क्रांतिकारी मंगल पांडे यांच्‍या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा होती. अभिनेता आमिर खानची मुख्‍य भूमिका होती. 
Related image

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...