Thursday, September 26, 2019

...म्‍हणून देव आनंद यांना काळा कोट घालण्‍यास होती बंदी

देव आनंद अभियाबरोबरच आपल्‍या वेगळ्‍या अंदाजासाठी प्रसिध्‍द होते. २६ सप्‍टेंबर, १९२३ रोजी त्‍यांचा जन्‍म झाला. देव आनंद या जगात नसले तरी त्‍यांचा अभिनय, आठवण अजूनही जिवंत आहे. त्‍यांचे डायलॉग्ज आजदेखील लक्षात राहणारे आहेत. आज त्‍यांचा जन्मदिवस.  

- १९४६ मध्‍ये 'हम एक हैं' या चित्रपटातून सिनेजगतात पाऊल ठेवणारे देवसाहब यांनी आपल्‍या ६० वर्षांच्‍या सिनेकरिअरमध्‍ये जवळपास शंभरहून अधिक चित्रपट केले. 
Image result for dev anand
- त्‍याचबरोबर, देव साहब यांनी नवकेतन फिल्म्सच्‍या बॅनर खाली ३५ चित्रपटांची निर्मिती केली आणि १९ चित्रपटांचे दिग्‍दर्शन ही केले. 
- ते एक असे अभिनेते होते, ज्‍यांनी अनेक अभिनेत्रींच्‍या करिअरची नौका बॉलिवूडमध्‍ये पार केली. 
- देव आनंद यांच्‍या सुपरहिट चित्रपटांमध्‍ये टॅक्सी ड्राईवर, मुनीम जी, फंटूश, इंसानियत, सी.आई.डी , नौ दो ग्यारह, जिद्दी, निराला, विद्या, अफसर, जाल, सोंलवा साल, काला पानी, काला बाजार, बम्बई का बाबू, माया, जब प्यार किसी से होता है, हम दोनों, बात एक रात की, असली नकली, तेरे घर के सामने, शराबी, तीन देवियां, ज्वेल थीफ, गाईड, प्रेम पुजारी, हरे राम हरे कृष्ण, जानी मेरा नाम, तेरे मेरे सपने यांसारख्‍या चित्रपटांचा समावेश आहे. 
Image result for dev anand
- देव आनंद यांचं खरं नाव धर्मदेव पिरोशीमल आनंद असं होतं. त्‍यांचे वडील पिशोरीमल आनंद वकील होते. देव आनंद यांचं नाव त्‍यांच्‍या आई-वडिलांनी 'चीरू' असं ठेवलं होतं. 
- अभिनेता बनण्‍यापूर्वी देव आनंद मुंबईतील एका अकाउंटन्‍सी फर्ममध्‍ये क्लार्क म्‍हणून काम करत होते. त्‍यांना तेथे ८५ रु. पगार मिळायचा. 
- देव आनंद यांना चित्रपटात पहिली संधी १९४६ मध्‍ये मिळाली. प्रभात स्‍टुडिओचा चित्रपट 'हम एक हैं' या चित्रपटातून डेब्‍यू केला परंतु, हा चित्रपट फ्‍लॉप ठरला.
या चित्रपटाच्‍या निर्मितीवेळी प्रभात स्टुडिओमध्‍ये त्‍यांची मैत्री गुरुदत्त यांच्‍याशी झाली. दोघांमध्‍ये चर्चा झाली. पहिल्‍यांदा जो यशस्‍वी होईल तो दुसरा चित्रपट होण्‍यास मदत करेल. आणि जो कुणी चित्रपट दिग्‍दर्शित करेल, तो दुसर्‍याला अभिनय करण्‍याची संधी देईल. 
Image result for dev anand
- १९४८ मध्‍ये रिलीज झालेला चित्रपट 'जिद्दी' हा देव आनंद यांच्‍या करिअरमधील पहिला चित्रपट जो हिट ठरला. या चित्रपटाच्‍या यशानंतर त्‍यांनी चित्रपट निर्मितीत पाऊल ठेवलं. त्‍यांनी 'नवकेतन बॅनर'ची स्‍थापना केली. 
- देव आनंद यांच्‍या लग्‍नाचा किस्सा देखील प्रसिध्‍द आहे. १९५४ मध्‍ये एका चित्रपटाच्‍या शूटिंग दरम्‍यान लंच ब्रेकमध्‍ये अभिनेत्री कल्पना कार्तिकशी विवाह केला. परंतु, त्‍यांचा संसार फार काळ टिकला नाही. त्‍यांना दोन मुले सुनील आनंद आणि देविना आनंद. 
Image result for dev anand
- देव आनंद आणि गुरुदत्त यांच्‍यामध्‍ये चांगली मैत्री होती. असं म्‍हटलं जातं की, ते एकमेकांचे शर्ट बदलून घालत असत. ज्‍या चित्रपटांची निर्मिती देवसाहब करत असत त्‍या चित्रपटांचे दिग्‍दर्शन गुरुदत्त करत असत आणि ज्‍या चित्रपटांचे दिग्‍दर्शन गुरुदत्त करत असत त्‍यात देव आनंद अभिनेते असायचे. 
- त्‍याकाळी प्रत्‍येक अभिनेत्रीला देव आनंद यांच्‍यासोबत आपण चित्रपटात काम करावं, असं वाटायचं. 
- असं म्‍हटलं जातं की, चित्रपट 'हरे रामा हरे कृष्णा'मध्‍ये देव आनंद यांच्‍या बहिणीची भूमिका करण्‍यास कुठलीही अभिनेत्री तयार नव्‍हती. कारण, देव आनंद यांच्‍या बहिणीची भूमिका साकारल्‍यानंतर आपल्‍यास प्रमुख भूमिका मिळणार नाहीत, असे अभिनेत्रींना वाटायचे. 
- त्‍याच दरम्‍यान, एका पार्टीमध्‍ये देव यांनी जीनत अमान यांना पाहिलं आणि चित्रपटात काम करण्‍यासाठी ऑफर दिली. जीनतने देव आनंद यांच्‍या बहिणीची भूमिका केली आणि ती रातोरात स्टार बनली. 
Image result for dev anand
- देव आनंद अभिनेत्री सुरैया यांच्‍याशी प्रेम करत होते. त्‍यांचे आत्‍मचरित्र 'रोमांसिंग विथ लाईफ'मध्‍ये त्‍यांनी सुरैयाशी आपण प्रेम करायचो, याबाबत सविस्‍तर लिहिलं आहे. त्‍याकाळी देव साहब यांनी सुरैया यांना तीन हजार रुपयांची हिर्‍याची अंगठी दिली होती. परंतु, दोघांचे धर्म वेगळे असल्‍यामुळे सुरैया यांची आजी देव साहब आणि सुरैय्‍या यांच्‍या लग्‍नासाठी तयार नव्‍हत्‍या. त्‍यामुळे दोघेही वेगळे झाले. त्‍यानंतर, सुरैया यांनी कधी लग्‍न केले नाही. 
- असं म्‍हटलं जातं की, देव आनंद त्‍याकाळच्‍या सर्वां हँडसम अभिनेत्‍यांपैकी एक होते. विशेष म्‍हणजे, देव साहब यांना काळा कोट घालण्‍यास बंदी होती. काळा कोट आणि पांढर्‍या रंगाच्‍या शर्टाची फॅशन देव साहब यांच्‍यामुळे आली.
Image result for dev anand
सूत्रांच्‍या माहितीनुसार, काळ्‍या रंगाच्‍या कपड्‍यांमध्‍ये देव साहब यांना पाहिल्‍यानंतर एक तरुणी त्‍यांच्‍यावर फिदा होऊन सुसाईड केलं होतं. नंतर कोर्टाने या प्रकरणाला गंभीरपणे घेत देव आनंद यांना काळा कोट घालण्‍यास मनाई केली होती. 
Image result for dev anand
देव साहब यांचे ३ डिसेंबर, २०११ रोजी वयाच्‍या ८८ व्‍या वर्षी निधन झाले. 

'त्याने' जीनतला आलिंगन दिलं आणि...


चॉकलेट हिरो देव आनंद यांच्या जन्मदिनानिमित्त 



बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार देव आनंद यांनी आपल्‍या चित्रपटाच्‍या माध्‍यमातून बॉलिवूड इंडस्ट्रीला एका वेगळ्‍या उंचीवर नेले. देव आनंद यांनीच बॉलिवूडला टीना मुनीम आणि जीनत अमान यासारख्‍या सुंदर अभिनेत्री दिल्‍या. चित्रपटांशिवाय, देव आनंद आपल्‍या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत राहिले होते. 

Image result for zeenat aman and dev anand
अनेक अशा अभिनेत्री होत्‍या, ज्‍यांच्‍यावर देव आनंद प्रेम करायचे. परंतु, त्‍यांची प्रेम कहाणी कधी पूर्ण होऊ शकली नाही. आज देव आनंद यांच्‍या अशा एका लव्‍हस्टोरी बद्‍दल जाणून घेऊयात, ज्‍याच्‍याबद्‍दल कदाचित तुम्‍हाला माहिती नसेल. ही लव्‍हस्‍टोरी आहे, देव आनंद आणि जीनत अमान यांची. 
Image result for zeenat aman and dev anand
देव आनंद यांनी चित्रपटात 'हरे रामा हरे कृष्णा'मध्‍ये जीनत अमान यांना कास्ट केलं होतं. चित्रपटात जीनत यांनी देवानंद यांच्‍या बहिणीची भूमिका केली होती. शूटिंग दरम्‍यान, देव आनंद यांना जीनत यांच्‍याशी प्रेम झालं. जीनत यांची प्रत्‍येक गोष्‍ट देव आनंद यांना आवडायची. 
Image result for zeenat aman and dev anand
जीनत यांच्‍या प्रेमात असताना हे वृत्त प्रसारमाध्‍यमांना कळाले. दोघांची मीडियामध्‍ये लिंकअपचे वृत्त यायचे. ते वृत्त वाचून देव आनंद खुश व्‍हायचे. ही माहिती खुद्‍द देव आनंद यांनी खुद्‍द आपले आत्‍मचरित्र 'रोमांसिंग विथ लाईफ'मध्‍ये केले होते.
Image result for zeenat aman and dev anand
एक दिवस देव आनंद यांनी जीनत यांना प्रपोज करण्‍याचा निर्णय घेतला. देवसाहब जीनत यांना हॉटेल ताजमध्‍ये प्रपोज करणार होते. या हॉटेलमध्‍ये देव आणि जीनत डिनरसाठी जात होते. जीनत यांना प्रपोज करण्‍यासाठी देवसाहब यांनी एक छोटी पार्टी ठेवली. या पार्टीत देव आनंद यांनी आपले जवळचे मित्र आणि जीनतला आमंत्रित केलं होतं. परंतु, पार्टीमध्‍ये असा एक प्रसंग घडला, ज्‍यामुळे देव आनंद दुखावले गेले. देवानंद यांनी पाहिलं की, पार्टीत राज कपूर हे जीनत यांच्‍याजवळ आले आणि त्‍यांनी जिनतला आलिंगन दिलं. जीनत यांनीही राज कपूरला आलिंगन दिलं. 
Image result for zeenat aman and dev anand
हे सर्व पाहून देव आनंद यांना दु:ख झालं. आधीही राज कपूर आणि जीनत यांच्‍या रोमान्‍सचे वृत्त मीडियात आले होते. राज कपूर यांनी जीनत यांना आपल्‍या चित्रपटात 'सत्यम शिवम सुंदरम'मध्‍ये मुख्‍य भूमिका दिली होती. 
Related image
देव आनंद यांनी राजकपूर आणि जीनत यांच्‍या अफेअरचे वृत्त केवळ एक अफवा म्‍हणून दुर्लक्ष केले होते. या प्रसंगाचा उल्‍लेख देव आनंद यांनी आपल्‍या आत्‍मचरित्रात केला होता. आत्‍मचरित्रात त्‍यांनी म्‍हटलं होतं की, हे सर्व पाहिल्‍यानंतर ते पार्टीतून बाहेर निघून गेले. त्‍यानंतर पुन्‍हा कधीही जीनत यांच्‍याबद्‍दल त्‍यांनी विचार केला नाही. याप्रकारे देव आनंद यांच्‍या लव्‍ह स्टोरीचा शेवट झाला होता. 
Image result for zeenat aman and dev anand

'या' कारणामुळे आरके स्‍टुडिओच्‍या रंगपंचमीत कधीच सहभागी झाले नाही देव आनंद







होळी आली म्‍हणजे आठवतात ते राज कपूर. आरके स्‍टुडिओमध्‍ये खेळली जाणारी रंगपंचमीची आजदेखील चर्चा होते. कारण, राज कपूर यांच्‍या घरी होणार्‍या रंगपंचमीसारखं सेलिब्रेशन आजपर्यंत कोणीही करू शकलं नाही. 

आरके स्‍टुडिओमध्‍ये रंगाने भरलेल्‍या पाण्‍याच्‍या टाकीत बुडवून ही होळी (रंगपंचमी) साजरी केली जायची. होळीला येणार्‍या सर्व पाहुण्‍यांना हा खास मान दिला जायचा, असे मिश्‍किलपणे म्‍हटलं जायचं. रंगपंचमीच्‍या निमित्तानं राज कपूर आपल्‍या फॅमिलीसोबत सेलिब्रेशनसाठी हजर असायचे. त्‍यांचे भाऊ शम्मी आणि शशी कपूर, तीन मुले-रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर तसेच सुना आणि नातवंडे सर्वजण येथे असायची. चित्रपट सृष्‍टीतील कलाकारही या सेलिब्रेशनमध्‍ये सहभागी व्‍हायची.
आरके स्टुडिओमध्‍ये रंगपंचमीची सुरुवात पृथ्वीराज कपूर यांनी केली होती. यानंतर ही परंपरा राज कपूर यांनी कायम ठेवली. ६०च्‍या दशकात त्‍यांनी आपल्‍या स्टुडिओत होळी आणि गणशोत्सव सुरू केले होते. मात्र, १९८८ मध्‍ये राजकपूर यांचे निधन झाल्‍यानंतर आरके स्‍टुडिओत रंगपंचमीचं सेलिब्रेशन झालं नाही. 
Image result for rk studio holi
 
आर. के. स्‍टुडिओची आठवण
आर. के. स्टुडिओ १९४८ मध्‍ये उभारण्‍यात आला होता. राजकपूर यांच्‍या नावाने हा स्‍टुडिओ उभारण्‍यात आला होता. शो मॅन नावाने प्रसिध्‍द असणारे अभिनेते राज कपूर यांनी अधिकतर चित्रपटांचे शूटिंग याच स्‍टुडिओत केले आहे. हा स्‍टुडिओ जवळपास २ एकर परिसरात आहे. 
Related image
हिंदी चित्रपट 'आवारा,' 'श्री ४२०,' 'मेरा नाम जोकर' आणि 'बॉबी' यासारख्‍यां अनेक चित्रपटांचे शूटिंग येथे झाले होते. मुंबईच्‍या चेंबूरमध्‍ये असणारा हा स्‍टुडिओ ७० वर्षे जुना आहे. या स्‍टुडिओच्‍या एका भागात गेल्‍यावर्षी एका रिॲलिटी शोच्‍या शूटिंग दरम्‍यान आग लागली होती. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रींचे पोशाख, ज्वेलरी, मेरा नाम जोकरचा क्लोन मास्क, जिस देश में गंगा बहती है मधील बंदूके तसेच आवारा, संगम आणि बॉबी चित्रपटातील ग्रँड पियानो देखील जळाले होते. 
रजा मुराद यांनी सांगितली आठवण 
Related image
पाचशेहून अधिक चित्रपटात काम करणारे अभिनेते रजा मुराद यांनी एका वेबसाईटशी बोलताना आपले आरके स्‍टुडिओशी निगडित अनुभव शेअर केले आहेत. त्‍यांनी बॉलिवूडकरांच्‍या रंगपंचमीविषयी आपले अनुभव सांगितले आहेत. त्‍यांनी सांगितले की, आर. के स्टुडिओमध्‍ये रंगपंचमीचा उत्सव खूपच शानदार असायचा. 
मुराद म्‍हणाले, आर. के. स्टुडिओमध्‍ये रंगपंचमीच्‍या उत्सवाचा अर्थ भांग आणि फूड फेस्टिव्‍हल असे होते. स्टुडिओमध्‍ये एक तात्‍पुरता विहिरीसारखे एक डबके बनवले जायचे. त्‍यामध्‍ये प्रत्‍येकाला उडी मारण्‍यास भाग पाडले जायचे. मला पहिल्‍यांदा स्टुडिओमध्‍ये ज्‍यावेळी रंगपंचमी उत्‍सवात सहभागी होण्‍याची संधी मिळाली, त्‍यावेळी मला खूप आनंद झाला होता. अनेक वर्षे हा उत्‍सव स्‍टुडिओत साजरा होत राहिला.
Image result for r k studio holi amitabh
राजकपूर यांची रंगपंचमी बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडपर्यंत प्रसिध्‍द होती. बिग बी अमिताभ बच्चन यांच्‍यासोबत अनेक कलाकारदेखील आर के रंगपंचमीचा उत्‍सव साजरा करण्‍यास स्‍टुडिओत येत असत. 
देव आनंद कधीच सहभागी झाले नाहीत
दिलीप कुमार, मनोज कुमार, शम्मी कपूर, शशी कपूर, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, जितेंद्र, धर्मेंद्र, हेमा मालिनी यांच्‍यासारखे सेलिब्रिटीज आर के स्टुडिओच्‍या रंगपंचमी पार्टीत दिसत होते. परंतु, बॉलिवूडचे एक असे सुपरस्टार होते, जे या पार्टीत कधीच सहभागी झाले नाही. राज कपूर यांच्‍याआधी बॉलिवूडमध्‍ये याप्रकारे भव्य पध्‍दतीने रंगपंचमी सेलिब्रेट करण्‍याची परंपरा नव्‍हती. परंतु, राज कपूर यांनी स्‍टार्ससाठी रंगपंचमी पार्टी सुरू केली.
Related image
आर के स्टुडिओमध्‍ये राज कपूर यांच्‍या पार्टीमध्‍ये बॉलिवूडचे तमाम कलाकार सहभागी व्‍हायचे. परंतु, सदाबहार अभिनेते देव आनंद त्‍या पार्टीमध्‍ये कधीच सहभागी होत नसत. असे म्‍हटले जायचे की, देव आनंद आणि राज कपूर यांच्‍यामध्‍ये कोणताही वाद नव्‍हता. दोघे चांगले मित्र होते. परंतु, देव आनंद कधीच रंगपंचमीसाठी या स्‍टुडिओत गेले नाहीत. त्‍यांना रंगपंचमी साजरी करणे आवडत नसायचे. ते नेहमी सण-उत्‍सवापासून दूर असायचे. राज कपूर यांना देव आनंद यांची ही गोष्‍ट माहिती होती. त्‍यामुळे त्‍यांनी कधीही देव आनंद यांना आर के स्टुडिओच्‍या होळी पार्टीमध्‍ये आमंत्रण दिले नाही. 
Related image
१९८८ पर्यंत आर. के. मध्‍ये रंगपंचमी साजरी व्‍हायची. परंतु, राज कपूर यांच्‍या निधनानंतर आर. के. स्टुडियोच्‍या रंगपंचमीचा सिलसिला कायमचा थांबला. 
आरके स्टुडिओमध्‍ये होळीची सुरुवात पृथ्वीराज कपूर यांनी केली होती. यानंतर ही परंपरा राज कपूर यांनी कायम ठेवली. ६०च्‍या दशकात त्‍यांनी आपल्‍या स्टुडिओत होळी आणि गणशोत्सव सुरू केले होते. मात्र, १९८८ मध्‍ये राजकपूर यांचे निधन झाल्‍यानंतर आरके स्‍टुडिओत होळीचं सेलिब्रेशन झालं नाही. 

Monday, September 23, 2019

मादक अदाकारा 'सिल्क स्मिता'-स्मृतिदिनानिमित्त


सिल्क स्मिताचे बी-ग्रेड चित्रपट पाहण्यासाठी तिकिट खिडकीवर तुटून पडायचे लोक
वयाच्या ३५ व्या वर्षी झाला होता मृत्यू 


दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीतील एकमेव अशी अभनेत्री जिचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक तिकिट खिडकीवर तुटून पडायचे. या अभिनेत्रीचे नाव विजयलक्ष्मी वदलापति. तिला सिनेजगतात 'सिल्क स्मिता' नावानेही ओळखले जाते.

१९९० च्या सुरूवातीपासून सिल्क स्मिताची जादू चालली. बोल्ड स्मिता अशी तिची ओळख. सिल्कने अनेक बी ग्रेड चित्रपट आणि सॉफ्ट पोर्न चित्रपट केले. त्याकाळी रजनीकांत आणि कमल हासन यासारखे स्टारदेखील सिल्कची लोकप्रियता पाहून थक्क झाले होते.

रजनीकांत आणि सिल्क स्मिताने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. यामध्ये १९८३ मध्ये आलेला चित्रपट 'जीत हमारी हुई,' १९८३ मध्ये आलेला चित्रपट 'थंगा मगन,' पायम पुली' आणि 'सिवाप्पु सूर्या' यांचा समावेश आहे. या चित्रपटांमधील त्यांचे डान्स मूव्ह्ज कंट्रोव्हर्शिअल ठरले.

सिल्कचा बोल्डनेस पाहून चित्रपट आणि निर्मात्यांची लाईन लागली.  एकापेक्षा एक हिट चित्रपट दिल्यानंतर सिल्कचा एक डान्स नंबर चित्रपटात असायला हवाच, हे सूत्रच ठरले.

गरिबीत गेलं बालपण 

२ डिसेंबर, १९६० रोजी आंध्र प्रदेशातील एलुरूजवळील एका गावात सिल्क स्मिताचा जन्म झाला होता. बालपणापासून पाहिलेल्या गरिबीतून तिला मुक्त व्हायचं होतं. तिच्या आईने एका बैलगाडीवाल्यासोबत तिचे लग्न ठरवले. सिल्क आपल्या शहरामध्ये येणाऱ्या चित्रपटांचे पोस्टर पाहायची. एक दिवस सकाळी सिल्कने मद्रासला जाण्यासाठी रेल्वे पकडली आणि कॉलिवूड निर्मात्यांकडे गेली.

मोलकरीण ते मेकअप असिस्टंट

सिल्क एका अभिनेत्रीच्या घरात मोलकरीण म्हणून काम करत होती. त्यानंतर ती तिची मेकअप असिस्टेंट बनली. एक दिवस एक चित्रपट निर्माता आपल्या चमचमत्या कारमधून त्या अभिनेत्रीच्या घरात  आला. सिल्क त्या कारला पाहतच राहिली आणि एक दिवस अशाच कारमध्ये बसण्याचे स्वप्न पाहू लागली.

सिल्कची बिनधास्त इमेज 

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर सिल्कने बी-टाउनमध्ये नशीब आजमावले. 'सदमा' या चित्रपटात तिने साकारलेली भूमिका आजदेखील लक्षात राहण्यासारखी आहे. सिल्कचे अनेक चित्रपट हिंदीमध्ये डब करण्यात आले आहेत.

रजनीकांत आणि स्मिताचे अफेअर? 

असे म्हटले जाते की, रजनीकांत आणि सिल्क स्मिताचे अफेअर होते. रजनीकांत यांनी सिगारेटने सिल्कच्या शरीरावर डाग बनवले होते. परंतु, याला कोणताही पुरावा नाही.

एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट!

१९७९ मध्ये रिलीज झालेला तमिळ चित्रपट 'वंदीचक्रम'मध्ये सिल्कच्या भूमिकेने धुमाकूळ घातला. या भूमिकेमुळे तिला मोठा ब्रेक मिळाला.

१७ वर्षांचे करिअर

१७  वर्षांच्या मोठ्या करिअरमध्ये तिने ४५० हून अधिक तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले.

सॉफ्ट पोर्न भूमिका

तिला एकाच प्रकारच्या भूमिका मिळत गेल्या. त्याला 'सॉफ्ट पोर्न' असं म्हटले जाऊ लागले. 

रहस्यमयी मृत्यू 

२३ सप्टेंबर, १९९६ रोजी विजयलक्ष्मी उर्फ सिल्क स्मिताचा मृतदेह आपल्या राहत्या घरात पंख्याला लटकलेला आढळला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना हत्या की आत्महत्या याबाबत कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाही. फॉरेन्सिक तपासातही काही निष्पन्न झाले नाही. तेलुगुमध्ये एक सुसाईड नोट मिळाले होते. परंतु, त्यावरूनही काही समजले नाही. अखेर तिचा मृत्यू एक रहस्य बनून राहिले. चेन्नई पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे सांगत केसची फाईल बंद केली. काही लोक आजदेखील ही हत्या असल्याचे मानतात.

२०११ मध्ये विद्या बालनने 'डर्टी पिक्चर' हा चित्रपट केला. हा चित्रपट सिल्क स्मि‍ताच्या आयुष्यावर आधारित होता. 

Sunday, September 22, 2019

प्रियदर्शन जाधवला बनवायचाय कोल्‍हापूरचा सिनेमा


आपल्‍या सर्वांचा लाडका अभिनेता प्रियदर्शन जाधव मूळचा कोल्‍हापूरचा. तो उत्तम कलाकार, अभिनेता आहे. टाईमपास २ सारखा हिट चित्रपट देणारा प्रियदर्शनला आता कोल्‍हापुरात येऊन चित्रपट बनवायचायं. विशेष म्‍हणजे कोल्‍हापुरातील कलाकारांना घेऊन कोल्‍हापुरातचं चित्रपट बनवण्‍याचं त्‍याचं स्‍वप्‍न आहे. या त्‍याच्‍या ड्रीम प्रोजेक्‍टबद्‍दल 'पुढारी ऑनलाईन'ने मराठमोळा अभिनेता प्रियदर्शन जाधवशी विशेष संवाद साधला.
कोल्‍हापूरशी असलेलं नातं प्रियदर्शनने जपयलं. त्‍याचा जन्‍म कोल्‍हापुरात झाला आणि आपण कोल्‍हापुरचं काहीतरी देणं लागतो, या भावनेतून तो चित्रपटाची निर्मिती करणार आहे. सुरूवातीपासूनच प्रियदर्शनला दिग्‍दर्शक व्‍हावं असं वाटत होतं. आणि त्‍याचं हे स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासाठी तो प्रयत्‍न करत आहे.

प्रियदर्शन म्‍हणाला, 'मी कोल्‍हापुरात लहानाचा मोठा झालो. कोल्‍हापूर या शहराला घेऊन काही करता येईल का? या शोधात मी होतो. आणि ती गोष्‍ट मला मिळाली आहे. कोल्‍हापुरातले लोक, कलाकार, तंत्रज्ञ, मेकअप आर्टिस्‍ट घेऊन चित्रपट करावा असं मला वाटतयं आणि मी तो लवकरच करेन.'

प्रियदर्शन दिश्‍दर्शनाकडे कसा वळला, याबाबत त्‍यानं सांगितलं की, 'जरी मी मुंबईत राहत असलो तरी कोल्‍हापूरशी नातं मी जपलयं. माझं जन्‍मस्‍थान कोल्‍हापूर आहे. कोल्‍हापूरसाठी काहीतरी करायचं होतं. मला दिग्‍दर्शन आणि अभिनय दोन्‍हीही करता येतं. माझ्‍या अखत्‍यारित मला जे काही करता येईल, ते मी करणार. त्‍यामुळे या चित्रपटातून कोल्‍हापुरातल्‍या कलाकारांचं टॅलेंट समोर येईल. कोल्‍हापुरात उत्तम सिनेमा होऊ शकतो, हे करून दाखवायचं आहे. सिनेमाची कथा लिहायचं सुरू आहे. सध्‍या चित्रपट निर्मात्यांचा शोध घेणंही सुरू आहे. कोल्‍हापुरात खूप चांगले कलाकार आहेत. नाट्‍यसंस्‍था आहेत, नाटक, एकांकिका पातळीवर कलाकार काम करताहेत. त्‍यांच्‍यासाठी कोल्‍हापूर हे उत्तम व्‍यासपीठ आहेच. फक्‍त मदत घ्यावी लागेल ती, तंत्रज्ञानाची. कॅमेर्‍याशी निगडित तंत्रज्ञान, गोष्‍टी आहेत, ते मुंबईतून मागवावे लागतील. कोल्‍हापुरात एडिटर, कॉस्‍ट्‍यूम डिझायनर मिळतील, मेकअप आर्टिस्‍ट मिळतील, प्रोडक्‍शन असेल, असिस्‍टंट डायरेक्‍टर उपलब्‍ध होतील. त्‍या सगळ्‍या गोष्‍टी घेऊनच चित्रपट बनवायचा आहे. यासाठी मुंबईचा एखादा निर्माता घेऊन चालणार नाही. तर कोल्‍हापूर जाणणारा आणि कोल्‍हापूरची सगळी माहिती असणारा निर्माता हवा आहे. कोल्‍हापुरातल्‍या लोकांनी एकत्र येऊन केलेला हा सिनेमा असणार आहे.'

चित्रनगरीसह संपूर्ण कोल्‍हापुरात चित्रपटाचं शूटिंग करणार असल्‍याचं त्‍यानं सांगितलं. गेली १८ वर्षे तो मुंबईत दिग्‍दर्शन क्षेत्रात आहे. जवळपास ११ व्‍यावसायिक नाटकांचं दिग्‍दर्शन प्रियदर्शनने केलं आहे. 'टाईमपास' या चित्रपटाची पटकथाही प्रियदर्शनने लिहिली होती. तसचं 'टाईमपास २' मध्‍ये त्‍याने काम केलं आहे. शिवाय, पटकथादेखील त्‍यानेच लिहिली होती. भरत जाधवचा 'जत्रा' चित्रपटाचे संवाद लेखनही प्रियदर्शनने केलं होतं. त्‍यामुळे आता त्‍याचं दिग्‍दर्शनाकडे पडलेलं पाऊल स्‍वागतार्ह आहे. दिग्‍दर्शन आणि अभिनय दोन्‍हीही सुरुच ठेवणार असल्‍याचं प्रियदर्शनने सांगितलं. 

खंबीर निर्मात्‍याची गरज

चित्रपटासाठी फायनान्‍सर शोधण्‍यापासून सुरुवात झाली आहे. खंबीर निर्मात्‍याची आवश्‍यकता असून त्‍याबाबतचं आवाहन त्‍यानं सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून केलं आहे. निर्माता मिळाला की चित्रपटाचे शूटिंग सुरू करू, त्‍याबद्‍दलची माहिती सोशल मीडियावरून दिली जाईल, असेही त्‍याने यावेळी सांगितले. 

कोल्‍हापूरच्‍या कलाकारांना सुवर्णसंधी

प्रियदर्शन जाधवच्‍या या चित्रपटात काम करण्‍यासाठी कोल्‍हापूरच्‍या कलाकारांना सुवर्णसंधी मिळणार आहे. कोल्‍हापुरातील कलाकारांना आपलं कौशल्‍य, अभिनय सर्वांसमोर आणता येणार आहे. हे जर प्रत्‍यक्षात साकारलं तर कोल्‍हापूरनगरी खर्‍या अर्थाने चित्रनगरी होईल.

प्रियदर्शन जाधव दिग्‍दर्शित 'मस्‍का'

लवकरच प्रियदर्शन जाधव दिग्‍दर्शित 'मस्‍का' हा विनोदी चित्रपट १ जून २०१८ ला रिलीज होतोय. त्‍यात अभिनेत्री प्रार्थना बेहरे, अनिकेत विश्‍वासराव हे प्रमुख भूमिकेत असून पुरुषोत्तम पाटील, धनंजय साठे, चिन्‍मय मांडलेकर, शशांक शेंडे, प्रणव रावराणे यांच्‍याही भूमिका आहेत. प्रार्थना बेहरे आणि अनिकेत ही जोडी पहिल्‍यांदाच पडद्‍यावर एकत्र दिसणार आहेत. 'मस्‍का' चित्रपटात तीन गाणी असून चिनार-महेश यांनी संगीत दिलं आहे. 

बॉलिवूडची 'बेबो' करीना कपूर

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा २१ सप्टेंबरला वाढदिवस. वयाची तिशी पार केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्रींची करिअरची गाडी मंदावते. चेहऱ्यावर वय दिसून येतं. परंतु, करीना कपूर याला अपवाद आहे. सध्या ती आपल्या करिअरच्या एका नव्या उंचीवर आहे. जाहिरातीपासून चित्रपटांपर्यंत आताही तिला ऑफर्स येत आहेत. आता देखील तिच्या चेहऱ्यावरील तेज, सौंदर्य कायम आहे. ती आगामी काही वर्षांपर्यंत बॉलिवूडमध्ये राज करेल, असे वाटते.

बेबोने नेहमी आपल्या अटींवर काम केले आहे. मग, तुम्ही तिला अकडू म्हणा किंवा गर्विष्ठ. जर तिला कुठली गोष्ट आवडली नाही तर ती पटकन सांगते, मग त्यामध्ये तिचे नुकसान जरी असेल तरीही.

करण जोहरसारख्या बॉलिवूड दिग्गज निर्मात्याचा चित्रपट तिने हे सांगून सोडला होता की, तिला चित्रपटाची मार्केट प्राईस दिली जात नाही. करीनाच्या या धाडसाचे कौतुक तिचे विरोधक देखील करतात.

करीनाचे आयुष्य एका उघडलेल्या पानांसारखे आहे. तिने कोणतीही गोष्ट लपवलेली नाही. ज्यावेळी ती शाहिद कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये होती, त्यावेळीही तिने सार्वजनिकपणे सांगितलं होतं की, ती शाहिदवर प्रेम करते.

तिने छोटे नवाब सैफ अली खानशी प्रेम केल्यानंतर एकच चर्चा रंगली ती म्हणजे दोन मुलांचा बाप आणि करीनापेक्षा १० वर्षांनी मोठा असणाऱ्या सैफशी करीनाचं सूत जुळले. खमंग चर्चेनंतर अखेर सैफ-करीनाने लग्न केले. सैफ-करीना बॉलिवूडच्या हॉट कपल्सपैकी एक आहेत.

करीनाला आवडतो शाहरूख

करीना कपूरला शाहरुख खान खूप आवडतो. ती म्हणते की, शाहरुख महिलांसोबत खूप नम्रतेने वागतो. तिने शाहरुखसोबत ‘रॉ-वन’ हा चित्रपट केला आहे.

शाकाहारी आहे करीना

करीनाने मांसाहार सोडला असून ती शुद्ध शाकाहारी आहे. तिने आपल्यासोबत काम करणाऱ्या अनेक कलाकारांनाही शाकाहारी बनवलं आहे. तिला ‘सेक्सिएस्ट वेजेटेरियन सेलिब्रिटी’ म्हणून निवडण्यात आले आहे.

झिरो फिगरसाठी चर्चेत राहिलेल्या बेबोने आपल्या करिअरच्या सुरूवातीला अनेक फ्लॉप चित्रपट दिले. रिफ्यूजीतून डेब्यू केलेल्या करीनाने आपली अभिनयाची खास जादू दाखवू शकली नाही. परंतु, तिने हार न मानता 'अशोका,' 'कभी खुशी कभी गम,' 'मैं प्रेम की दीवानी हूँ,' 'देव', 'ओमकारा', 'डॉन', 'बॉडीगार्ड', 'तलाश', 'बजरंगी भाईजान', 'उडता पंजाब' 'चमेली,' 'युवा,' 'ऐतराज,' 'ओंकारा,' 'डॉन,' 'जब वुई मेट,' 'गोलमाल रिटर्न' आणि 'थ्री-इडियट्स', 'वीरे दि वेडिंग' यासारखे चर्चित चित्रपट केले.

हेदेखील वाचा -

* करीना कपूर-खानचा जन्म २१ सप्टेंबर, १९८० ला मुंबईत झाला.

* करीनाचे निक नाव 'बेबो' आहे.

* करीनाचे वडील प्रसिध्द अभिनेते रणधीर कपूर, आई अभिनेत्री बबिता आणि बहीण प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर आहे.

* ऋषी कपूर करीनाचे काका असून रणबीर कपूर चुलत भाऊ आहे.

* लग्नाआधी लव्ह अफेअरवरून करीनाची खूप चर्चा झाली होती. खासकरून,  शाहिद कपूरसोबत ती लॉन्ग टाईम रिलेशनशीपमध्ये होती. काही कारणांनी दोघांचं ब्रेकअप झालं.

* करीनाचा पहिला चित्रपट 'कहो ना प्यार है' होता. परंतु, काही दिवसांच्या शूटिंगनंतर करीनाला वाटले की, या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन हे अधिक फोकस ऋतिक रोशनवर करत आहेत. यामुळे बेबोने हा चित्रपट सोडला.

* करीनाने २००० मध्ये रिलीज झालेल्या 'रिफ्यूजी'तून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. तिचा आणि अभिषेक बच्चनचा हा पहिला चित्रपट होता.

* 'गोलियों की रासलीला रामलीला' आणि 'चेन्नई एक्सप्रेस' या चित्रपटांसाठी करीना कपूरला ऑफर देण्यात आली होती. परंतु, तिने दोन्ही चित्रपट करण्यास नकार दिला होता.

* लंडनच्या मादाम तुसाद गॅलरीमध्ये करीनाचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. 

बार्शीच्‍या 'म्होरक्या'ने गाजवली दिल्‍ली - मुलाखत



'म्होरक्या' असं म्हटलं की कसं वाटतयं? आहे की नाही नावात दम! होय, 'म्होरक्या' या चित्रपटात खरचं दम आहे. कारण, 'म्होरक्या' चित्रपटाला ६५ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. हा चित्रपट अमर देवकर यांनी दिग्दर्शित केला आहे आणि त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. १३ एप्रिलचा तो दिवस अमर देवकर यांच्यासाठी आनंदोत्सवाचा ठरला. 'म्होरक्या'ला सर्वोत्कृष्ट बालचित्रपट म्हणून घोषित करण्यात आले. पहिल्याच चित्रपटात राष्ट्रीय स्तरावर अमर देवकर यांनी मिळवलेलं यश खरचं उल्लेखनीय आहे.

अमर देवकर यांच्या ‘म्होरक्या’ चित्रपटाला याआधीही पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) विविध पुरस्कार मिळाले आहेत. स्वस्तिक प्रिती फिल्म प्रोडक्शन आणि अमर चित्रवाणी निर्मित 'म्होरक्या' चित्रपटात बालकलाकार म्हणून रमण देवकर याने भूमिका साकारलीय. तर चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी गिरीष जांभळीकर यांनी केलीय. 'पिफ'मध्ये रमण देवकरला उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आणि गिरीष जांभळीकर यांना उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार मिळाला होता. 'पिफ'नंतर आता राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे 'म्होरक्या'चं चौफेर यश वाखाण्याजोगं आहे.

सोलापूरच्या बार्शीचा 'म्होरक्या

सोलापुरातील बार्शीसारख्या दुष्काळी भागातील अमर देवकर यांनी जिद्द मनात कायम ठेवून राष्ट्रीय पातळीवर आपलं नाव कमावलं. अमर देवकर यांचा चित्रपट दिग्दर्शन, अभिनयातील प्रवास तसा खडतर आहे. त्यांनी शिवाजी महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ललित कला विभागात  देवकर यांनी प्रवेशासाठी पर्यत्न केला. पण त्यांना यश मिळाले नाही. म्हणून त्यांनी मास कम्युनिकेशनसाठी प्रवेश घेतला. दरम्यानच्या कालावधीत त्यांनी ८२ लघुपट तयार केले.

मनातल्या गोष्टी मोठ्या पडद्यावर

एक नाट्य कलावंत, हौशी कलावंत म्हणून गेल्या १३-१४ वर्षांपासून काम करत आलेले दिग्दर्शक अमर देवकर यांना चित्रपट काढावा, अशी इच्छा होतीच. परंतु, त्यासाठी लागणारं आर्थिक बळ, तंत्रज्ञानाशी संबंधित गोष्टी आणि विशेष म्हणजे चित्रपट काढण्यासाठी कौशल्याची गरज होती. म्हणून अमर देवकर यांनी ॲकॅडमिक प्रशिक्षण घेण्याचं ठरवलं आणि थेट पुणे गाठलं. २०११-१२ मध्ये पुणे विद्यापीठात डिपार्टमेंट ऑफ स्टडिजमधून फिल्म मेकिंगमध्ये मास्टर डिग्री पूर्ण केली आणि तेथूनचं त्यांच्या सिनेसृष्टीच्या करिअरला दिशा मिळाली. चित्रपटांचा अभ्यास करत असताना कोठेतरी त्यांच्या मनात सलत होतं की, आपण काहीतरी करायला हवं. मनातल्या गोष्टी पडद्यावर आणाव्यात आणि त्याचदृष्टीने अमर देवकर यांचा प्रवास सुरू झाला.

असा घडला म्होरक्याचा प्रवास

अमर देवकर म्हणाले, 'चित्रपटाच्या माध्यमातून मनातले विचार व्यक्त होण्याची इच्छा होती. त्याचदृष्टीने माझी बौद्धिक, मानसिक, शारीरिक ताकद, पात्रता तयार होत गेली. हे करत असताना २०१४ मध्ये 'म्होरक्या'ची गोष्ट सूचली. दोन -अडीच वर्षे अभ्यास करून म्होरक्याचं स्क्रिप्ट मी स्वत: लिहिलं. ज्या ज्या गोष्टी लागतात, त्या उभ्या केल्या आणि निर्मात्याचा शोध घेणं सुरू झाला. अनेक अडचणींचा सामना करत 'म्होरक्या'चा प्रवास सुरू झाला आणि आज 'म्होरक्या'ला तब्बल ६ पुरस्कार मिळाले. ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये उल्लेखनीय कामगिरी आणि सर्वोत्कृष्ट बालचित्रपट या पुरस्काराने गौरवण्यात आले.'

एक चित्रपट अभ्यासक, दिग्दर्शक म्हणून काम करत असताना स्वत:च्या आणि बाहेरच्या-अवतीभोवतीच्या सगळ्याचं गोष्टींकडे एका सृजनात्मक दृष्टीकोनातून, संवेदनशीलपणे आपण पाहत असतो. अशा असंख्य गोष्टी पाहत त्याची नोंद डायरीमध्ये घेत असतो. मग, त्यातल्या कोणत्या गोष्टी भक्कमपणे, दर्जेदारपणे मांडता येईल याचा विचार करताना मला जवळची वाटलेली म्होरक्याची कथा मी निवडली. चित्रपटसृष्टीत ज्यावेळी आपण पाऊल टाकतो. तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने येणाऱ्या ज्या खर्चिक बाबी आहे, आर्थिक बाबी त्या उपलब्ध करण्यासाठी माझ्यासाठी शक्यच नव्हते. माझ्यासारख्या एका कलाकाराला इतकी मोठी रक्कम उभी करणे, परवडणारं नव्हतं. त्यामुळे अनेक निर्मात्यांशी डिल करण्याचा, बोलण्याचा प्रयत्न केला. पण, सकारात्मक उत्तर मिळालं नाही, असं त्यांनी सांगितलं.

शेती गहाण ठेऊन उभारला पैसा

अमर यांना हा चित्रपट काढण्यासाठी मामाची शेती गहाण ठेवून पैसा उभा करावा, असं वाटलं होतं. परंतु, मामाची शेती गहाण ठेवली नाही. 'आयडेंटिटि'च्या पुरस्काराची रक्कम जमा झाली होती. त्यातून मग, सहकाऱ्यांना घेऊन चित्रपटाच्या पूर्वी जी तयारी असते, ती करण्यास तीन-चार महिने सुरूवात केली होती. योगायोगाने त्यांना सोलापूरच्या स्वस्तिक प्रिती फिल्म प्रोडक्शनशी भेट झाली होती. त्या प्रोडक्शन टीमने त्यांच्या हातातला प्रोजेक्ट बाजूला ठेऊन 'म्होरक्या'वर लक्ष दिलं. आर्थिक पाठिंबा देण्यासाठीची जबाबदारी त्या प्रोडक्शनने घेतली. त्याप्रमाणे चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं. चित्रपटाच्या अंतिम टप्प्यासाठी अमर देवकर यांनी त्यांची स्वत:ची दोन एकर शेती विकून पैसा उभा केला.

घरच्या मंडळींचा पाठिंबा

अमर यांना चित्रपट निर्मितीसाठी घरच्या मंडळींचा पाठिंबा होता. त्यासाठी तीन-चार महिन्यांपासून त्यांचं काम सुरू होतं. त्यांचं काम, आत्मविश्वास पाहून घरच्यांनी शेती विकण्यास परवानगी दिली. 'म्होरक्या' साकारायला मित्र-परिवाराचाही पाठिंबा मिळाला. आई-वडिल, भाऊ, बहिण यांचे तसेच १५-२० वर्षांपासून असलेले जिवलग मित्र, गुरूजन, गावकरी, निर्माते यांनी अमर यांच्या कामावर विश्वास ठेवून मदत केली.

'म्होरक्या'ची कहाणी 'नेतृत्वा'ची

'म्होरक्या'ची कथा सांगताना अमर म्हणाले, 'या चित्रपटाच्या माध्यमातून नेतृत्व कसं असावं, हे मांडण्याचा मी प्रयत्न केला. मेंढ्या राखण्याचं काम करावा लागणारा एक १३-१४ वर्षांचा मुलगा असतो. शाळेमध्ये त्याचं नाव आहे. परंतु, त्याला मेंढ्या राखाव्या लागतात. मग, अचानक त्याला शाळेत जावं लागतं. शाळेत २६ जानेवारीसाठीची वर्गमित्रांची तयारी तो पाहतो आणि २५ मुलं त्याच्या मागे उभे राहतात. त्यांचा लीडर म्हणून तो मुलगा उभा राहतो. त्याच्या आधी तो मुलगा मेंढ्या राखताना २०-२५ मेंढ्यांच्या पुढे चालत असतो. त्याला साधी गोष्ट वाटत असते की, मेंढ्या नाही ही २५ मुलं माझ्या मागे आली पाहिजेत. तसा त्या मुलाचा स्ट्रगल सुरू होतो. स्वत:ला आपण कसं लीड करावं, कुटुंबाला कसं लीड करावं, पुढाकार घेऊन समाजाचं नेतृत्व कसं करावं, त्यातलं तत्वज्ञान या सर्व संदर्भांना स्पर्श करत चित्रपट पूर्णत्वाकडे जातो.'

'म्होरक्या' नाव सूचलं असं...

'म्होरक्या' हे नाव कसं सूचलं, यावर अमर म्हणाले, 'ज्या विषयावर चित्रपट बनवत होतो. त्याविषयाला अनुसरून नावं दिलं.' नेतृत्वाची माझी संकल्पना, अस्सल ग्रामीण शब्द म्होरक्या, तो सगळ्यांना पुढे घेऊन जाणारा म्होरक्या...म्हणून म्होरक्या असं चित्रपटाला नावं दिलं.

आगामी चित्रपट

आगामी चित्रपटांचे स्क्रिप्ट, त्याचा अभ्यास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. आगामी चित्रपटासाठी लागणारी साधनसामुग्री उभारणे गरजेच आहे. या सगळ्या गोष्टी मी एकटा करू शकत नाही. तर त्यासाठी सर्वांचं सहकार्य मिळणे आवश्यक असतं. या चित्रपटाची निर्मिती ही माझ्या एकट्याची नाही. ती माझी अभिव्यक्ती आहे, ती संपूर्ण टीमने दृक-श्राव्य माध्यमातून पडद्यावर साकारलीय. त्यासाठी सर्वांची मेहनत कामी आली. ग्रामीण भागात खूप टॅलेंटेड लोक आहेत. ते समोर येत नाही किंवा त्यांना तसं व्यासपीठ मिळत नाही. चित्रपट करताना मी त्या-त्या भागातील, परिसरातील लोकांना अभिनयासाठी प्राधान्य देतो. ग्रामीण जीवनशैली, मी अनुभवलेल्या, प्रत्यक्ष पाहिलेल्या घटकांवर भविष्यात चित्रपट होऊ शकेल. म्होरक्यासारख्या कथेसारखी, तशा आशयाच्या चित्रपटांच्या पलीकडे जाऊनही चित्रपट होऊ शकेल, असंही ते म्हणाले.

पुरस्काराची घोषणा होताच जल्लोष...

मी माझ्या घरी कुटुंबासोबत होतो. टीव्हीवर ६५ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा होत होती. सगळ्यांनाच हूरहूर लागली होती आणि अचानक घोषणा झाली की, स्पेशल मेन्शनमध्ये 'म्होरक्या'ला पुरस्कार. यानंतर सगळ्यांनी एकच जल्लोष केला. लगेचच सर्वोत्कृष्ट बालचित्रपट -म्होरक्या अशीही घोषणा ऐकू आली. त्यावेळी मन भरून आलं. माझा आनंद गगनात मावेना, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

वडिलांचं स्वप्न साकारलं

एक कलावंत होण्याच माझ्या वडिलांचं स्वप्न साकारलं. त्यांनी प्रत्येक वेळी मला पाठिंबा दिला. म्हणूनचं हे यश आता माझ्या हाती पडलं आहे.
                                                                                                                                                                                                                                                                   - दिग्दर्शक अमर देवकर  

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...