Sunday, November 24, 2019

Children's day : 'हे' ५ चित्रपट मुलांना नक्की दाखवा




भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी म्हणजेच १४ नोव्हेंबर रोजी आपल्याकडे हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. लहान मुलं म्‍हणजे देवाघरची फुलं. त्‍यांचा निरागसपणा भावूक करणारा. पंडित नेहरूंना मुलं आवडायची. लहान मुलांवर अनेक चित्रपट आले. त्यापैकी, काही खास बॉलिवूड चित्रपट वाखाणण्‍याजोगे आहेत. बॉलिवूडमधील हे पुढील चित्रपट पालकांनी आपल्या मुलांसोबत नक्कीच पाहायला हवेत.

मिस्टर इंडिया
अभिनेता अनिल कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्‍या या चित्रपटाने प्रेक्षकांना खिवून ठेवले. मुलांविषयी प्रेम आणि मुलांनी आपल्‍या भावाला (सांभाळ करणारा अनिल कपूर) साठी जीवही देण्यास तयार असणाऱ्या मुलांची कथा चित्रपटात मांडण्यात आली आहे. 
Image result for mister india film
‘मिस्टर इंडिया’ १९८७ मध्‍ये रिलीज झालेला हिट चित्रपट होता. चित्रपटातील बाल कलाकारांचा उत्तम अभिनय होता. खास म्‍हणजे, सर्वांत छोटी 'टीना'चा अभिनय. तिचे हाव-भाव आणि निरागसता प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. टीनाचं खरं नाव ‘हुजान खोदैजी’ असं आहे. 
तारे जमीन पर
आमिर खान, दर्शील सफारी, तान्या छेडा, सचेत इंजीनियर, टिस्का चोप्रा, विपिन शर्मा स्‍टारर ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट आपल्‍या मुलांसोबत पालकांनी नक्‍की पाहायला हवा. आमिर खानच्‍या दिग्‍दर्शनाखाली बनलेला हा पहिला चित्रपट होता. एका मुलाला केंद्रस्‍थानी ठेवून हा चित्रपट बनवण्‍यात आला होता. आजच्या धावपळीच्‍या जगात पालकांना आपल्या मुलांकडे पुरेसं लक्ष देता येत नाही. त्‍यामुळे मुलांच्‍या आकांक्षा कशा कोमेजून जातात, मुलांवर त्‍याचा कसा परिणाम होतो, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
Image result for taare zameen par film
आय एम कलाम
एका छोट्‍या मुलाची प्रेरणादायी कथा या चित्रपटात दाखवण्‍यात आली आहे. परिस्थितीमुळे त्‍या लहान मुलाची स्‍वप्ने, कशी नाहीशी होतात. परंतु, स्वप्नांना बळ देऊन ते पूर्णत्‍वाकडे नेण्‍यासाठी जिद्‍दीने काम करण्‍याची त्‍या लहानग्‍याची साहसी कहाणी चित्रपटात पाहायला मिळते. हर्ष मायर या बाल कलाकाराने एका राजस्‍थानी मुलाची भूमिका केली होती. देशाचे 'मिसाईलमॅन' ए. पी. जे. अब्‍दुल कलाम यांना भेटण्‍याची इच्‍छा या मुलाची असते. या मुलाने चित्रपटातील उत्तम अभिनयासाठीचे अनेक पुरस्‍कार आपल्‍या नावे केले आहेत. 
Image result for i am kalam film
चिल्लर पार्टी
या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवालाने केली होती. तर सलमान खान सहनिर्माता होता. या चित्रपटात एका सोसायटीमधील लहान मुले एका कुत्र्याची काळजी कशाप्रकारे घेतात, हे दाखवण्यात आले आहे. एक मुलगा सोसायटीतील गाड्‍यांची साफसफाई करण्‍याचे काम करतो. हे काम करत असताना त्‍याचे सोसायटीतील इतर मुले मित्र होतात. त्‍या मुलासोबत त्‍याचा एक पाळीव कुत्रा असतो. तो सोसायडीतल्‍या मुलांचा देखील प्रिय कुत्रा बनतो. 'प्राणीप्रेम' हा संदेश देणारा चित्रपट केवळ मुलांसाठी नाहीतर समाजासाठीही आहे.
Image result for chillar party film
स्टॅनली का डब्बा
अमोल गुप्‍ते दिग्‍दर्शित या चित्रपटाची कथा अत्‍यंत भावूक अशी आहे. ही कहाणी आहे स्टॅनली नावाच्‍या मुलाची. स्टॅनली शाळेतला हुशार विद्‍यार्थी असतो. त्‍याला शाळेतले शिक्षक प्रेम करत असतात. विशैश म्‍हणजे, स्‍टॅनलीच्‍या जेवणाचा डब्‍बा या मुद्द्‍यावर हा चित्रपट आधारलेला आहे. शाळेतल्‍या शिक्षकांपैकी वर्मा नावाचे एक शिक्षक असतात. वर्मांना दुसर्‍यांचे डब्‍बे खाण्‍याची सवय असते. परंतु, स्टॅनली शाळेत जेवणाचा डबा आणत नाही. त्‍यामुळे वर्मा त्‍याला रोज ऐकवत असतात. नंतर स्टॅनली शाळेत डबा न आणण्‍याचं कारण समजतं. सत्‍य समजल्‍यानंतर प्रेक्षक देखील हबकून जातात. 
Image result for stanley ka dabba film

९२ वर्षे @श्रीराम लागू




बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेले दिग्गज अभिनेते श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर, १९२७ रोजी महाराष्ट्राच्या  सातारा जिल्ह्यात झाला. आज त्यांचा ९२ वा वाढदिवस. त्यांनी भावे हायस्कूल, फर्ग्यूसन कॉलेज (पुणे विश्वविद्यालय) आणि बीजे मेडिकल कॉलेज (पुणे विद्यापीठ) येथून शिक्षण घेतले. 

Image result for shriram lagoo age
क्षितिजापर्यंत समुद्रश्रीराम लागू एक ईएनटी सर्जनदेखील आहेत. त्यांनी शंभरहून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटामध्ये काम केले. ४० हून अधिक मराठी, हिंदी आणि गुजराती नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला. २० हून अधिक मराठी नाटकांचे दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. त्यांनी हिंदी चित्रपट 'घरौंदा'साठी १९७८ चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार आपल्या नावे केला आहे. त्यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे 'लमाण.'
Image result for shriram lagoo age
महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकामध्ये अभिनय सुरू केला.त्यांनी वसंत कानेटकर लिखित नाटक इथे ओशाळला मृत्यूमध्ये अभिनय केला. १९७० मध्ये प्रसिद्ध मराठी नाटक नटसम्राटचे लागू पहिले नायक होते. नटसम्राट हे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी लिहिलेले मराठी भाषेतील नाटक आहे. लागू यांनी अनेक दर्जेदार चित्रपट केले. यामध्ये सिंहासन, पिंजरा आणि मुक्ता यासारखे यशस्वी चित्रपट केले.  
त्यांची पत्नी, दीपा लागूदेखील प्रसिद्ध थिएटर, टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री आहे. त्यांनी खुद्दार,बादशाह, चरणों की सौगन्ध, काला धंधा गोरे लोग, लावारिस यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 
Image result for shriram lagoo age
श्रीराम लागू यांनी काम केलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव)-
अग्निपंख (रावसाहेब)
अँटिगनी (क्रेयाँ)
आकाश पेलताना (दाजीसाहेब)
आत्मकथा (राजाध्यक्ष)
आंधळ्यांची शाळा (आण्णासाहेब, विश्वनाथ)
आधे अधुरे (यात ४ भूमिका केल्या आहेत.)
इथे ओशाळला मृत्यू (संभाजी)
उद्याचा संसार (विश्राम)
उध्वस्त धर्मशाळा (श्रीधर)
एकच प्याला (सुधाकर)
एक होती राणी (जनरल भंडारी)
कन्यादान (नाथ देवळालीकर)
कस्तुरीमृग (रावबहादुर पेंडसे)
काचेचा चंद्र (बाबुराव)
किरवंत (सिद्धेश्वरशास्त्री)
खून पहावा करून (आप्पा)
गार्बो (पॅन्सी)
गिधाडे (रमाकांत)
गुरु महाराज गुरू (गुरुनाथ)
चंद्र आहे साक्षीला
चाणक्य विष्णुगुप्त (चाणक्य)
जगन्नाथाचा रथ (भुजबळ, सखा)
डॉक्टर हुद्दार (हुद्दार)
दुभंग
दूरचे दिवे (सदानंद)
देवांचे मनोराज्य (विष्णू)
नटसम्राट (बेलवलकर)
पप्पा सांगा कुणाचे (पप्पा)
पुण्यप्रभाव (वृंदावन)
प्रतिमा (चर्मकार)
प्रेमाची गोष्ट (के. बी.)
बहुरूपी
बेबंदशाही (संभाजी)
मादी
मित्र
मी जिंकलो मी हरलो (माधव)
मुख्यमंत्री (मुख्यमंत्री)
यशोदा (अण्णा खोत)
राजमुकुट (राजेश्वर)
राव जगदेव मार्तंड (जगदेव)
लग्नाची बेडी (कांचन)
वंदे मातरम्‌ (त्रिभुवन)
वेड्याचं घर उन्हात (दादासाहेब)
शतखंड (प्रा. धुंडिराज धांदेफळकर)
सुंदर मी होणार (डॉ. पटवर्धन)
सूर्य पाहिलेला माणूस (सॉक्रेटीस)
हिमालयाची सावली (गुंडो गणेश)
Related image
या चित्रपटांमध्ये केले काम 
ध्यासपर्व (मराठी चित्रपट), खुद्दार, गोपाला, बडी बहन, प्यार का तराना, करन्ट, इमेक्यूलेट इंस्पेकशन (इंग्रजी चित्रपट), सरफिरा, फूलवती, किशन कन्हैया, एक दिन अचानक, गलियों का बादशाह, काला बाजार, दाना पानी, तौहीन, नामुमकिन, तमाचा, चरणों की सौगन्ध, औरत तेरी यही कहानी, शेर शिवाजी, आवाम, मर्द की जबान, इंसाफ की पुकार,  मजाल, मेरा कर्म मेरा धर्म, एक पल, सवेरे वाली गाडी, समय की धारा, लॉकेट, काला धंधा गोरे लोग, जीवा, सिंहासन, दिलवाला, मुद्दत, विक्रम सिंह, घर संसार, अनकही, सितमगर, हम नौजवान, सरफरोश, बद और बदनाम, तरंग, मेरी अदालत, होली, मकसद, लव्ह मॅरिज, मुझे इंसाफ चाहिये, सौतन, पुकार, कलाकार, मवाली, हम से है जमाना, मैं इन्तकाम लूँगी, दीदार-ए-यार, रास्ते प्यार के, श्रीमान श्रीमती, दौलत, सम्राट, विधाता, चोरनी, घुंघरू की आवाज, अग्नि परीक्षा, चेहरे पे चेहरा, जमाने को दिखाना है, सनसनी, लावारिस, गहराई, दो और दो पाँच, इंसाफ का तराजू, थोडी सी बेवफाई, नीयत, कस्तूरी, ज्वालामुखी, स्वयंवर, लूटमार, ज्योति बने ज्वाला, जुर्माना, मीरा, तराना, हम तेरे आशिक हैं, मुकाबला, मंजिल, दामाद, मेरा रक्षक, अरविन्द देसाई की अजीब दास्तान, देवता, नया दौर, फूल खिले हैं गुलशन गुलशन, मुकद्दर का सिकन्दर, देस परदेस, इंकार, घरौंदा, किनारा, ईमान धर्म, अगर, हेरा फेरी, चलते चलते, बुलेट. 
Related image

जीनत अमान आणि देव आनंद

जीनत अमान बर्थडे स्‍पेशल





बॉलिवूड चित्रपटांमधील एकेकाळची सर्वात हॉट अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या जीनत अमान हिने 'सत्यम शिवम सुंदरम' चित्रपटामध्ये अनेक टॉपलेस आणि हॉट सीन दिल्यामुळे तिचे नाव बरेच गाजले होते. चित्रपटांबरोरच जीनत आपल्‍या पर्सनल लाईफमुळेदेखील चर्चेत होती. जीनत आणि देव आनंद यांच्या प्रेमाचे किस्से गाजले. बॉलिवूडचे सुपरस्टार देव आनंद आणि जीनत अमान यांची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर चांगली जुळली. देव आनंद यांनीच बॉलिवूडला जीनत अमानसारखी सुंदर अभिनेत्री दिली. 

Related image
देव आनंद जीनतवर प्रेम करायचे. परंतु, त्‍यांची प्रेम कहाणी कधी पूर्ण होऊ शकली नाही. देव आनंद यांनी चित्रपटात 'हरे रामा हरे कृष्णा'मध्‍ये जीनत अमान यांना कास्ट केलं होतं. चित्रपटात जीनत यांनी देवानंद यांच्‍या बहिणीची भूमिका केली होती. शूटिंग दरम्‍यान, देव आनंद यांना जीनत यांच्‍याशी प्रेम झालं. जीनत यांची प्रत्‍येक गोष्‍ट देव आनंद यांना आवडायची. जीनत यांच्‍या प्रेमात असताना हे वृत्त प्रसारमाध्‍यमांना कळाले. दोघांची मीडियामध्‍ये लिंकअपचे वृत्त यायचे. ते वृत्त वाचून देव आनंद खुश व्‍हायचे. ही माहिती खुद्‍द देव आनंद यांनी खुद्‍द आपले आत्‍मचरित्र 'रोमांसिंग विथ लाईफ'मध्‍ये केले होते.
Related image
एक दिवस देव आनंद यांनी जीनत यांना प्रपोज करण्‍याचा निर्णय घेतला. देवसाहब जीनत यांना हॉटेल ताजमध्‍ये प्रपोज करणार होते. या हॉटेलमध्‍ये देव आणि जीनत डिनरसाठी जात होते. जीनत यांना प्रपोज करण्‍यासाठी देवसाहब यांनी एक छोटी पार्टी ठेवली. या पार्टीत देव आनंद यांनी आपले जवळचे मित्र आणि जीनतला आमंत्रित केलं होतं. परंतु, पार्टीमध्‍ये असा एक प्रसंग घडला, ज्‍यामुळे देव आनंद दुखावले गेले. देवानंद यांनी पाहिलं की, पार्टीत राज कपूर हे जीनत यांच्‍याजवळ आले आणि त्‍यांनी जिनतला आलिंगन दिलं. जीनत यांनीही राज कपूरला आलिंगन दिलं. 
Image result for zeenat aman and dev anand movie
हे सर्व पाहून देव आनंद यांना दु:ख झालं. आधीही राज कपूर आणि जीनत यांच्‍या रोमान्‍सचे वृत्त मीडियात आले होते. राज कपूर यांनी जीनत यांना आपल्‍या चित्रपटात 'सत्यम शिवम सुंदरम'मध्‍ये मुख्‍य भूमिका दिली होती. 
Related image
देव आनंद यांनी राजकपूर आणि जीनत यांच्‍या अफेअरचे वृत्त केवळ एक अफवा म्‍हणून दुर्लक्ष केले होते. या प्रसंगाचा उल्‍लेख देव आनंद यांनी आपल्‍या आत्‍मचरित्रात केला होता. आत्‍मचरित्रात त्‍यांनी म्‍हटलं होतं की, हे सर्व पाहिल्‍यानंतर ते पार्टीतून बाहेर निघून गेले. त्‍यानंतर पुन्‍हा कधीही जीनत यांच्‍याबद्‍दल त्‍यांनी विचार केला नाही. याप्रकारे देव आनंद यांच्‍या लव्‍ह स्टोरीचा एन्‍ड झाला होता. 
Image result for zeenat aman and dev anand movie

जेव्हा २७ वर्षांनी मोठ्या व्यक्तीशी हेलनने केलं होतं लग्न




डान्सर, अभिनेत्री हेलन यांना जर बॉलिवूडची पहिली आयटम गर्ल म्हटले तर वावगे ठरणार नाही. आज हेलन ७९ वर्षांच्या आहेत. हेलन यांना शेवटी २००० मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'मोहब्बतें'मध्ये पाहण्यात आलं होतं. लाईमलाईटपासून ते १७ वर्षे दूर आहेत. कधी-कधी आपल्या परिवारासोबत त्या कार्यक्रमात दिसतात. भारतीय सिनेमामध्ये आयटम सॉन्ग करण्याची सुरुवात हेलन यांनी केली होती. अँग्लो इंडियन हेलन जोपर्यंत चित्रपटांमध्ये होत्या, तोपर्यंत त्यांचे स्टारडम कमी झालेले नव्हते. 

आपल्या डान्सने हेलनने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. तिच्यासारखा डान्स आजपर्यंत कुणीही करू शकलेली नाही. आज त्यांचा वाढदिवस. या औचित्याने त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घेऊया. 
Related image
हेलन यांनी मोठ्या पडद्यावर थिरकताना सिनेप्रेमींचं मन जिंकलं. चेहऱ्यावर हास्य असणाऱ्या हेलन यांच्या आयुष्यात कधी काळी अंधार होता. हेलन यांचा जन्म २१ नोव्हेंबर, १९३८ रोजी बर्मा (म्यानमार) मध्ये झाला होता. त्यांची आई बर्माची होती. हेलन यांना एक भाऊ आणि एक सावत्र बहिण जेनिफर होती. वडिलांच्या निधनानंतर तिच्या आईने एका ब्रिटिश सैनिकाशी विवाह केला. त्यानंतर हेलनने आपल्या  सावत्र वडिलांचे आडनाव रिचर्डसन स्वीकारलं. परंतु, दुसऱ्या महायुध्दात रिचर्डसन यांचा मृत्यू झाला. ज्यावेळी जपानने बर्मावर ताबा मिळवला, त्यावेळी हेलनचे कुटुंब मुंबईला आले. प्रवास करताना त्यांना जंगल आणि गावातून जावं लागलं. हेलन यांची आई आणि भाऊ-बहिण भुकेने व्याकूळ होते. तेव्हा गावातील लोकांनी आपल्या घरात राहायला जागा दिली आणि जेवणही दिले.
तेथे एका ब्रिटिश सैनिकाने त्यांना मुंबईला जाण्यासाठी गाडी, जेवण आणि औषधे दिली. ज्या ग्रुपसोबत हेलन यांचे कुटुंब मुंबईला जात होते. त्याताल काही लोक भुकेने आणि काही जण आजारपणामुळे मृत्यूमुखी पडले. मुंबई दूर होती. त्यामुळे हेलन यांच्या आईने कोलकातामध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. त्या तेथे नर्स म्हणून काम  करू लागल्या. 
Image result for helan
द कपिल शर्मा शोमध्ये हेलेन यांनी आपल्या आयुष्यातील ही घटना सांगितली होती. हेलेन केवळ ३ ‍वर्षांच्या होत्या. त्यावेळी त्यांनी आणि परिवाराने बर्मा सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला होता. बर्मा सोडून भारतात येण्यासाठी त्यांना ९ महिन्यांचा कालावधी लागला होता. यादरम्यान, त्यांच्या भावाचादेखील मृत्यू झाला होता. 
हेलन आणि तिच्या दोन भावंडांना शाळेला पाठवण्यात आले. परंतु, आईच्या पगारातून घर खर्च परवडत नव्हते. कोलकातामध्ये हेलन यांच्या आईची भेट कुकु मोरे हिच्याशी झाली. ती चित्रपटांमध्ये बॅकग्राउंड डान्सर होती. हेलन घर चालवण्यासाठी नोकरी शोधत होत्या. त्यावेळी  कुकुने हेलन यांना चित्रपटांमध्ये कोरस डान्सरची नोकरी दिली. हेलन चित्रपटांमध्ये येताच कुकुचे चार्म कमी पडू लागले आणि हेलनने फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले पाय रोवले. 
Image result for helan
१९ वर्षांची असताना हेलन यांना 'हावडा ब्रिज'मध्ये मोठा ब्रेक मिळाला. या चित्रपटामध्ये गाने 'मेरा नाम चिन चिन चू'ने हेलन यांचे नशीब बदललं. यानंतर त्या बॉलिवूडच्या पहिल्या आयटम गर्ल बनून समोर आल्या. हेलन ६० च्या  दशकातील सेक्स सिंबल म्हणून ओळखली जाऊ लागली. हेलनने आपल्या सौंदर्याने आणि डान्सने सर्वांची मने जिंकली. 
१९५७ मध्ये हेलन यांनी आपल्यापेक्षा २७ वर्षांनी मोठे डायरेक्टर पीएन अरोराशी लग्न केले. परंतु, हेलन यांनृी पीएन अरोराशी घटस्फोट घेतला. कारण हेलन चित्रपटांत काम करून चांगली कमाई करायच्या. आणि तिचा पती पैसे खर्च करायचा. 
Related image
सलीम खानशी अशी झाली भेट 
१९६२ मध्ये 'काबिल खान' चित्रपटादरम्यान हेलन यांची  भेट सलमान खानचे वडील सलीम खानशी झाली. सलीम खान यांनी हेलन यांना चित्रपटांमध्ये काम देण्यासाठी मदत केली. सलीम विवाहित होते. तरीही त्यांनी हेलन यांच्याशी लग्न केले. 
हेलन यांनी १९८३ मध्ये चित्रपटांपासून संन्यास घेतला. परंतु, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये गेस्ट अपीयरेन्स दिला. हेलन यांना भारतीय सिनेमामध्ये अमूल्य योगदानासाठी पद्मश्री आणि फिल्मफेअर लाईफटाईम अचीव्हमेंट ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. 
Image result for helan

अभिनयालाही 'अमृता'चा गोडवा




प्रिय अमृता, 

नावाप्रमाणेच गोड असणारी अमृता. तुझ्या नावातचं अमृत. म्हणून तुझ्या अभिनयालाही अमृताचा गोडवा. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत तू आपलं नाव कमावलंस. सगळ्यात आधी तुला (अभिनेत्री अमृता खानविलकर) वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अमृता तुझे मराठीतले अनेक चित्रपट हिट ठरले. नटरंग, कट्यार काळजात घुसली, बाजी याचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. परंतु, अमृता खानविलकर म्हटलं की, आठवते ती, हिंदीतील राजीमधील अस्खलित उर्दू बोलणारी पाकिस्तानी गृहिणी. याच चित्रपटात मुनिराची म्हणजेच आलियाची मोठी जावेची भूमिका साकारून तू  प्रेक्षकांच्‍या मनात घर करून गेलीस. 

बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणं तितकं सोप्पं नाही. चमचमत्या दुनियेतले सर्व अडथळे दूर करून तू सिनेसृष्टीत आपली एक खास ओळख बनवलीस. 'राजी', 'सत्यमेव जयते' हे सुपरहिट चित्रपट आणि 'डेमेज्ड' या वेबसीरीजमधून तू  बॉलिवूडमध्ये नवी छाप सोडलीस. 

तू एक सुंदर अभिनेत्री, एक उत्तम नृत्यांगना आणि एक सुशील गृहिणीदेखील आहेस. संसारात रमताना मात्र तू आपला अभिनय सोडला नाहीस. एकीकडे प्रपंच आणि दुसरीकडे करिअर यांची योग्य सांगड तू घातलीस. हिमांशु मल्होत्राशी असलेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तो पंजाबी असतानादेखील तू धर्म मध्ये कुठेच आणू दिला नाहीस आणि म्हणूनच तब्बल १० वर्षे एकमेकांनी डेट केल्यानंतर लग्नगाठ बांधलीस. हिमांशूदेखील छोट्या पडद्यावरचा अभिनेता. हिंदी मालिकांमध्ये त्याने आपली खास ओळख बनवलेली. तब्बल १५ वर्षे एकत्र असलेली तुमची जोडी आजही नव्याने प्रेमात पडल्यासारखी भासते.



अभिनयाबरोबरच कुठल्याही शोचं सूत्रसंचालन करणं तुला अवघड गेलं नाही. हे तू मराठी लाफ्टर शो कॉमेडी एक्सप्रेसमधून दाखवून दिलंस. चित्रपटांच्या वलयाभोवती फिरत असताना तू डिजीटल विश्वाकडेही लक्ष दिलेस. भविष्यातील करिअरची गती ओळखलीस आणि वेब सीरिजमध्ये काम करण्याचा निर्णय घेतलास. वेब सीरिजमध्ये काम करून तू स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करून लोकप्रिय होण्याची किमया साधलीस. 

वेबसीरिजबरोबरच तू एका नव्या मराठी चित्रपटात दिसणार असल्याने तुला पाहण्यासाठी उत्कंठा लागून राहिली आहे.  

अमृता या यशस्वी वाटचालीमध्ये तुझ्या चाहत्यांचीदेखील तुला मोलाची साथ आहेच.
- तुझी चाहती 
स्वालिया 

Saturday, November 2, 2019

शाहरुख-गौरीची हटके लव्हस्टोरी


शाहरुख खान - बर्थडे स्‍पेशल



बॉलिवूडमध्‍ये शाहरुख खान आणि त्‍याची पत्‍नी गौरी खान हे बॉलिवूडमध्‍ये क्‍यूट कपल्‍सपैकी एक आहेत. वर्षांचा त्‍यांचा प्रवास आजही सुरळीतपणे सुरू आहे. २५ ऑक्‍टोबर, १९९१ मध्‍ये दोघांनी विवाह केला. शाहरुख २ नोव्‍हेंबरला आपला वाढदिवस साजरा करत आहे. या औचित्‍याने त्‍याची पत्‍नी गौरी खान आणि शाहरूख खानबद्‍दल जाणून घेऊयात या खास गोष्‍टी. 

शाहरुख खानशी विवाह करण्‍यापूर्वी गौरी खानचं नाव गौरी छिब्बर होतं. गौरी आज एक यशस्‍वी उद्‍योजिका आहे. गौरी रेड चिलीज एंटरटेनमेंटची को-ओनर आहे. तिने आपला पहिला चित्रपट 'मैं हूं ना' २००४ मध्‍ये प्रोड्यूस केला होता. इंटीरियर डिझायनर गौरी खानने आपलं करिअर २०१२ मध्‍ये सुरू केलं होतं. 
Image result for shahrukh khan and gauri
गौरी खान आणि शाहरूख खान याची लव्‍ह स्‍टोरीही हटके आहे. परंतु, त्‍यांच्‍या आयुष्‍यात असं एक वळण आलं की, दोघांचा ब्रेकअप झाला. पण, दोघे पुन्‍हा भेटणार, हे कोणाला माहित होतं. शाहरुख खान आणि गौरी शाळेत असल्‍यापासून एकमेकांशी प्रेम करत होते. आणि अनेक वर्षांच्‍या अफेअरनंतर दोघांनी आपल्‍या प्रेमाबद्‍दल घरच्‍या मंडळींना सांगितले. शाहरुख खान मुस्लिम असल्‍याने गौरीच्‍या घरच्‍यांना हे लग्‍न मान्‍य नव्‍हतं. 
गौरीप्रमाणेच शाहरुखही दिल्लीचा रहिवासी होता. दोघांची पहिली भेट १९८४ मध्‍ये एका कॉमन फ्रेंडच्‍या पार्टीत झाली. त्‍यावेळी  शाहरुख फक्‍त १८ वर्षांचा होता आणि गौरी १४ वर्षांची. मजेशीर म्‍हणजे शाहरुखच्‍या लाजाळू स्‍वभावामुळे गौरीसमोर तो आपलं प्रेम व्‍यक्‍त करू शकला नाही. गौरी ज्‍या-ज्‍या पार्टीत जायची, तेथे पहिल्‍यांदा तो हजर राहायचा. गौरी आणि शाहरुखचं फ्रेंड सर्कल कॉमन होते. मित्रांच्‍या मदतीने आणि थोड्‍याशा हिम्‍मतीने त्‍याने गौरीचा नंबर मागितला आणि गौरीने देखील आपला फोन नंबर शाहरुख दिला.
Image result for shahrukh khan and gauri
त्‍यानंतर दोघांचं बोलणं नित्‍याचचं झालं. थोड्‍या दिवसांनंतर शाहरुख आणि गौरीमध्‍ये वाद होऊ लागले. हे वाद अधिकच वाढल्‍याने गौरी दिल्ली आणि शाहरुखला सोडून मुंबईत आली. शाहरुख खान सुरुवातीला गौरीबद्‍दल खूप पझेसिव्‍ह होता. दुसर्‍यांशी बोलणे आणि केस मोकळे ठेवणं हे शाहरुखला आवडायचं नाही. या गोष्‍टीला कंटाळून गौरीने शाहरूखशी ब्रेकअप घेतला होता. नंतर शाहरुख तिला भेटण्‍यासाठी पुन्‍हा मुंबईत गेला. गौरीसाठी शाहरुखला कसरत करावी लागली. तिच्‍या आई-वडिलांना इम्‍प्रेस करण्‍यासाठी त्‍याने आपण हिंदू असल्‍याचं सांगितलं होतं. 
Image result for shahrukh khan and gauri
दोघांनाही रडू कोसळले
शाहरुखला ज्‍यावेळी समजलं की, गौरी मुंबईला निघून गेली, त्‍यावेळी शाहरुखही मुंबईत आला. त्‍यावेळी शाहरुखजवळ पैसेही नव्‍हते. पैशांची जमवाजमव करून गौरीला शोधण्‍यासाठीत तो मुंबईत पोहोचला. शाहरुखने गौरीला खूप शोधलं, पण तिचा पत्ता लागेना. निराश होऊन शाहरुख मुंबईच्‍या एका बीचवर जाऊन बसला. त्‍याचवेळी तेथे त्‍याला गौरी दिसली. ती आपल्‍या मैत्रीणींसोबत तेथे आली होते. त्‍यांनी एकमेकांना पाहिले आणि दोघांनाही रडू कोसळले. त्‍यानंतर दोघांनीही लग्‍न करण्‍याचा निर्णय घेतला. 
Related image

मनावर रुंजी घालणारा शाहरूख!...


शाहरुख खानचा आज ५४ वा वाढदिवस


छोट्‍या पडद्‍यावरून आपल्‍या करिअरची सुरुवात करणार्‍या शाहरुखला 'बॉलिवूडचा बादशाह' म्‍हणून ओळख निर्माण करायला बराच संघर्ष करावा लागला. आजदेखील लाखो-करोडो लोकांच्‍या मनावर रुंजी घालणारा तो शाहरूखच आहे. 
चित्रपट इंडस्‍ट्रीत 'किंग खान' अशी ओळख असलेल्‍या शाहरुखचा जन्‍म २ नोव्‍हेंबर १९६५ रोजी दिल्‍लीत झाला. त्‍याचे वडिल टान्‍सपोर्ट व्‍यवसायाशी संबंधित होते. 
शाहरुखने जामिया मिलिया इस्‍लामिया विद्‍यापीठातून पदवी घेतली. 
१९९८ मध्‍ये शाहरुख खानने टीव्‍हीवरील 'फौजी' मालिकेतून करिअरला सुरुवात केली. १९९१ मध्‍ये आपले स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासाठी तो मुंबईत आला. अजीज मिर्झा यांनी शाहरुखला आपली मालिका सर्कसमध्‍ये काम करण्‍याची संधी दिली. त्‍याचवेळी हेमा मालिनी यांना त्‍यांचा पहिलाच दिग्‍दर्शित चित्रपट 'दिल आशना है'साठी नायक म्‍हणून नव्‍या चेहर्‍याचा शोध सुरू होता. त्‍यात दिव्‍या भारतीची प्रमुख भूमिका होती. 
शाहरुखला ज्‍यावेळी ही गोष्‍ट समजली, त्‍यावेळी आपल्‍या मित्रांच्‍या मदतीने या चित्रपटाच्‍या स्‍क्रिन टेस्‍टसाठी जाण्‍याचा शाहरुखने निर्णय घेतला. 
Image result for shahrukh khan hd
हेमा मालिनी यांना अखेर हिरो सापडला...
हेमा मालिनी यांना मात्र, 'त्‍या' अज्ञात नायकाबद्‍दल खात्री वाटत नव्‍हती. ठरवल्‍याप्रमाणे हेमा मालिनी हैदराबादचा कार्यक्रम आटोपून मुंबईला आल्‍या. सवयीनुसार, घरी आल्‍यानंतर हेमा यांनी टीव्‍ही लावला. चॅनेल बदलत असताना अचानक टीव्‍हीवर 'फौजी' मालिका लागली होती. हेमा यांना एक लक्षवेधी चेहरा दिसला होता. त्‍या तरुणाचा चेहरा होता -शाहरूखचा. हेमा यांनी तत्‍काळ ऑफिसमधल्‍या माणसांना शाहरूखचा पत्ता शोधायला सांगितलं. शाहरुख त्यावेळी दिल्‍लीमध्ये राहत होता. त्‍याचा फोन नंबरही मिळाला होता. त्‍यानुसार, प्रभा यांनी (हेमा यांची मावस बहिण) शाहरुखला फोन लावला. खुद्‍द शाहरुखने फोन उचलला. हेमा यांच्‍या ऑफिसमधून फोन आलाय, याचा शाहरुखला विश्‍वासच बसेना. आपली कुणीतरी चेष्‍टा करतयं, असं वाटल्‍याने शाहरुखने प्रभा यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. खरचं हा फोन हेमा यांच्‍या हुकमाप्रमाणे करण्‍यात आलाय, हे पटवून देण्‍यासाठी प्रभा यांना तारेवरची कसरत करावी लागली होती. अखेर प्रभा म्‍हणाल्‍या, 'तुला मी हेमाचा डायरेक्‍ट नंबर देते. तू स्‍वत:च फोन करून खात्री करून घे. मग शाहरुखने होकार देत हेमा यांना फोन केला.' 
Image result for shahrukh khan fauji
जेव्‍हा हेमा यांना पहिल्‍यांदाच भेटला शाहरुख...
दोन दिवसांनी शाहरुख खान मुंबईत हेमा यांच्‍या घरी आला. हेमा यांना त्‍याचा अभिनय आधीच आवडला होता. हेमा त्‍याला म्‍हणाल्‍या, 'तू जरा केस एका जागी ठेवशील का?' शाहरुखने आपले केस ठिक केले. हेमा यांनी मेकअप मॅनला बोलावलं. त्‍याने शाहरुखच्‍या केसांना जेल लावून केस नीटनेटके बसवले. हे सुरू असताना धर्मेंद्र यांची एन्‍ट्री झाली. 'हा माझ्‍या नव्‍या सिनेमाचा हिरो-शाहरुख खान' असे म्‍हणत हेमा यांनी धर्मेंद्र यांच्‍याशी शाहरुखची ओळख करून दिली. धर्मेंद्र यांनी हेमा यांच्‍या चॉईसला दाद दिली. त्‍यावेळी 'दिल आशना है'साठी शाहरुखची हिरो म्‍हणून निवड झाली. 
Image result for shahrukh khan hd
याबद्‍दल एकदा हेमा म्‍हणाल्‍या होत्‍या, 'फौजी बनवणार्‍यांना शाहरुख चांगला नट आहे, हे लगेचं कळत होतं. पण, तो एक दिवस देशाचा इतका मोठा स्‍टार बनेल, असं कुणालाही वाटलं नसले.' 
Image result for shahrukh khan and hema
थाटामाटात चित्रपटाचा मुहूर्त
मुंबईच्‍या एका हॉटेलमध्‍ये मोठ्‍या थाटामाटात हेमा यांच्‍या चित्रपटाचा मुहूर्त झाला. 'दिल आशना है' असं चित्रपटाचं नाव. 'दिल आशना है'ची कथा शर्ली कॉनरॅन या लेखिकेच्‍या 'लेस' या गाजलेल्‍या कादंबरीवर आधारीत होती. तीन स्‍त्रियांमध्‍ये विशिष्‍ट परिस्‍थितीत निर्माण होणार्‍या भावबंधनाची ती कथा आहे. या चित्रटासाठी हेमा यांनी डिंपल कपाडिया, अमृता सिंग, सोनू वालिया या त्‍याकाळी गाजलेल्‍या अभिनेत्री आणि दिव्‍या भारतीची निवड केली होती. हा चित्रपट स्‍त्री प्रधान होता. तर शाहरुख खान, कबीर बेदी, जीतेंद्र, असीफ हे मुख्‍य नायक होते. स्‍त्री प्रधान चित्रपट म्‍हणजे त्‍याकाळी 'भलतचं काहीतरी' असं असायचं. त्‍याची या नायकांना जाणीव होती. याबद्‍दल हेमा म्‍हणाल्‍या होत्‍या की, 'कुणी नाराज नव्‍हतं. सर्वांनी उत्तम सहकार्य केलं. हे नट सेटवर आले की, वातावरण बदलायचं. मी या चित्रपटाचे दिग्‍दर्शन करीत होते, तरीही कॅमेर्‍यातून त्‍यांच्‍याकडे पाहताना माझ्‍यातली अभिनेत्री जागी व्‍हायची आणि त्‍यांचं निरीक्षण करायची. आणि या नात्‍यानंसुध्‍दा कॅमेर्‍यासमोर उभं राहून त्‍यांच्‍या चेहर्‍यावरचे भाव न्‍याहाळण्‍याऐवजी कॅमेर्‍यामागून ते वाचणं वेधक वाटत होतं.'
१९९१ मध्‍ये 'दिल आशना है' रिलीज झाला.
Image result for shahrukh khan hd
दरम्‍यान, दीवानामध्‍ये काम करण्‍याची शाहरुखला संधी मिळाली. ऋषी कपूर या प्रसिध्‍द अभिनेत्‍याबरोबर काम करून शाहरुखने त्‍याला मिळालेल्‍या संधीचं सोनं केलं. 'दीवाना'साठी शाहरुखला फिल्‍मफेअर पुरस्‍कार देखील मिळाला. त्‍याचवेळी दिग्‍दर्शक अली अब्‍बास यांची नजर शाहरुखवर पडली. अली अब्‍बास यांना इंग्रजी कादंबरी 'ए किस बिफोर डेथ'वर एक चित्रपट काढायचा होता. शाहरुखला त्‍यांच्‍या चित्रपटात घेण्‍यात आलं. १९९३ मध्‍ये रिलीज झालेला चित्रपट 'बाजीगर' सुपरहिट ठरला. त्‍यामुळे इंडस्‍ट्रीत शाहरुखला वेगळी ओळख मिळाली. 
Image result for shahrukh khan hd
१९९३ मध्‍ये यश चोप्रा यांच्‍या 'डर' चित्रपटात काम करण्‍याची संधी शाहरुखला मिळाली. 'क...क...क...किरण' हा शाहरुखचा डायलॉग चांगला गाजला. १९९५ मध्‍ये यश चोप्रा यांनी 'दिलवाले दुल्‍हनिया ले जाएंगे'मध्‍ये काम दिलं. हा चित्रपट ब्‍लॉकबस्‍टर ठरला. 
निर्मिती क्षेत्रात पदार्पण
१९९९ मध्‍ये शाहरुख खानने चित्रपट निर्मितीकडे लक्ष वळवले. अभिनेत्री जूही चावलासोबत मिळून शाहरुखने ड्रीम्‍स अनलिमिटेडची स्‍थापना केली. या बॅनरअंतर्गत शाहरुखने 'फिर भी दिल है हिंदुस्‍तानी' चित्रपट बनवला. चांगली पटकथा आणि अभिनय असतानाही बॉक्‍स ऑफिसवर हा चित्रपट चालला नाही. याच बॅनरखाली त्‍यांनी 'अशोका' चित्रपट बनवला. हा देखील चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सटकून आपटला. परंतु, तिसरा चित्रपट 'चलते चलते' सुपरहिट झाला. 
२००४मध्‍ये शाहरुख खानने 'रेड चिली एंटरटेनमेंट' कंपनीची निर्मिती केली. या बॅनरखाली 'मैं हू ना' बॉक्‍स ऑफिसरवर आणला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्‍यानंतर 'पहेली,' 'ओम शांती ओम,' 'बिल्‍लू बार्बर,' 'चेन्‍नई एक्‍सप्रेस,' 'हॅप्‍पी न्‍यू इयर,' 'दिलवाले' यासारखे चित्रपट बनवले. 
२००७ ला त्‍याचा लंडनमध्‍ये मादाम तुसाद संग्रहालयात मेणाचा पुतळा उभा करण्‍यात आला. 
Image result for shahrukh khan wax statue
सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेता
शाहरूखला त्‍याच्‍या सिनेकरिअरमध्‍ये आठ वेळा सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेता फिल्‍म फेअर पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले आहे. शाहरुखची ऑनस्‍क्रीन जोडी काजोल आणि माधुरी दीक्षित यांच्‍यासोबत चांगली जमली. 
Image result for shahrukh khan hd

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...